साद चित्पावनीचो
साद चित्पावनीचो हे अंका बद्दल
“साद चित्पावनीचो” हे एकमेव चित्पावनी मध्या प्रकाशित हणारा त्रैमासिक सें जां गणपुले फाऊंडेशन प्रकाशित करसे. जानेवारी, एप्रिल अणि जुलै हे महिनेत हे त्रैमासिक ebook रूपात प्रकाशित करसत अणि ऑक्टोबर महिनेचा त्रैमासिक दिवाळी विशेष म्हणी छापील रूपात प्रकाशित करसत.
सौ. आरती मोने ह्यो त्रैमासिकाच्यो संपादिका सत अणि श्री. अशोक नेने हे प्रमुख मार्गदर्शक सत. अंकाचे संपादक मंडळात श्री. वासुदेव दामले अणि सौ. गायत्री भुस्कुटे ही मंडळी सत.
“साद चित्पावनीचो” हे अंकाची सुरुवात जानेवारी २०२४ पाष्णी जाली से अणि दोन वर्खा यशस्वी पणान पूर्ण करनी, तिसरे वर्खाची वाटचाल सुरू से.
नोव्हेंबर २०२३ मध्या गणपुले फाऊंडेशनान “चित्पावनी भाषेची तोंड ओळख” ही ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केली सली अणि त्या कार्यशाळात शिकणारे विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ मिळेवा हे हेतून “साद चित्पावनीचो” त्रैमासिकाची सुरुवात केली सली.
इतिहासात पयलीच ऑक्टोबर २०२४ हे महिनेत चित्पावनी दिवाळी अंक छापील रूपात गोवा एठा श्री. श्रीधर बर्वे हेंचे शुभहस्ते प्रकाशित केलो गेलो.
हे अंकाच्यो ३२५ प्रती पूर्ण भारत देशात अणि परदेशात प्रसारित केल्यो.
अंकाचे प्रकाशना वेळा गणपुले फाऊंडेशन चे संस्थापक श्री. वैभव गणपुले हेंनी अशी घोषणा केली सली की पुढा प्रकाशित हणारे अंक (दिवाळी अंक सोडून) वेबसाइट रूपात प्रकाशित करनार सत.
एप्रिल २०२५ हे अंकापाष्णी साद चित्पावनीचो हो अंक वेबसाइट रूपात प्रकाशित हसे.
गणपुले फाऊंडेशनान दिलेलां वचन पूर्ण जालां सें!
एक एक करनी आधी प्रकाशित केले गेलेले अंक एठा उपलब्ध करनार सां.
जानेवारी २०२६
हे अंकात वाचक वर्गाला काही खास गोष्टी सत. अनेक विषयांतले लेख, दर्जेदार ओडिओ रुपांतला काव्य, चित्रकृतीचे माध्मात्थीन मनोरंजन, कवितांत्थीन मिळणारो आनंद, चित्पावनी सुविचार, मनांत विशेष घर करनीं ऱ्हेनांरे एखादे जागेचां मर्म. तेच बरोबर जिभाला चविष्ट लागेल अशी पाककृती बी एठा से जी वाचनी, जिन्नस करनीं तरी बघूया अशी ओड लायणारी से.
असे तऱ्हा तऱ्हाचे विषय घेव्नी प्रत्येक साहित्यिकान योग्य शब्दांत गुतलेले शब्दांचे दागिने घायलेलो “सुफळ संपूर्ण” अंक “साद चित्पावनीचो” तुमचे भेटीला आयलेलां से.
जुलै २०२५
वेबसाइट रूपात प्रकाशित हणारो हो दुसरो अंक से. हे अंकात व्यक्तिचित्र, कथा, कविता, रेसिपी, म्हणी, चित्पावनी शब्द अणि तेंचो वाक्यात प्रयोग अश्यो वेगवेगळे विषयावरती लिखाण केलां से.
एप्रिल २०२५
वेबसाइट रूपात प्रकाशित हणारो हो पयलोच अंक से. हे अंकात कथा, कविता, कोडां, रेसिपी अश्यो वेगवेगळे विषयावरती लिखाण केलां से.
जानेवारी २०२५
एक वर्ख यशस्वी रीतीन पूर्ण करनी, दुसरे वर्खाचो हो पयलो अंक. हे अंकाचा वैशिष्ट्य म्हणजे, चित्पावनी भाषाची तोंड ओळख हे समूहातले सदस्यांनी लिखाण केलां से. हो अंक सुरू केलो तो कार्यशाळा केलेले विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळेवा म्हणी.
अंकासाठी साहित्य धाडेचा से?
येणारे अंकासाठी जर तुम्ला साहित्य धाडेचा सयेल, जालेवर पयली प्रकाशित न केलेला तुमचां साहित्य आम्ला धाडा. चित्पावनीतला तुमचा साहित्य टाईप करनी आमचे ईमेल पत्तेवर किंवा व्हॉटस्यॅप क्रमांकावर धाडनी द्या.
