साद चित्पावनीचो - जुलै २०२६
साद
चित्पावनीचो
चित्पावनी त्रैमासिक, वर्ख ३ | अंक तिसरो
जुलै २०२६
संपादिका: सौ. आरती मोने
मुखपृष्ठ, संकलन, अक्षर जुळवणी, प्रकाशन: गणपुले फाऊंडेशन, ठाणे, महाराष्ट्र
(c) गणपुले फाऊंडेशन (डॉ. सौ. अनुश्री वैभव गणपुले)
या अंकातील मजकूर प्रकाशकांच्या परवानगी शिवाय अन्यत्र प्रकाशित करण्यास मनाई आहे.
या अंकात वापरण्यात आलेली चित्रे इंटरनेट वरून घेण्यात आली आहेत.
सर्व चित्रांचे कॉपीराईट मूळ लेखकांचे व संकेत स्थळांचे आहेत.
अंकात व्यक्त झालेली मते लेखकांची वैयक्तिक मते आहेत.
त्याच्याशी संपादिका व प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.
प्रकाशन दि. आषाढ कृ. १, ३० जुलै २०२६
अनुक्रमणिका
Toggle—- दिवाळी अंकासाठी साहित्य १० ऑगस्ट पयली धाडा —-
संपादकीय- आरती मोने
नमस्कार !!!
“कें कितां!” ह्या रसाळ भाषावर प्रेम करनांरे अणि चित्पावनी भाषाचो अभिमान सलेले सगळे भावा भेणिशीनां मनापाश्णी माजो नमस्कार !!
नवे उमेदीन चित्पावनी लिखाण बरयनांरे नवे साहित्यिक घडत सत हें बघ्नी मनाला बरां दिसलां. तुमचां सातत्य अणि आवड तुम्ला लिव्हे प्रेरणां देसे म्हणीच एकापेक्षा एक सरस असां साहित्य “साद चित्पावनीचो” हे अंकाला आमचे पर्यंत पावसे. तेचेकरतां वैयक्तिक असां नांव न घेतां सगळेंचां कौतुक करसां. तुमचे सगळेंचे कष्टान तयार जालेलो, तिसरे वर्खाचो तिसरो, “साद चित्पावनीचो” हो अंक संकेतस्थळाचे माध्यमात्थीन तुमचे पर्यंत पाववीत सों जेणेकरनीं तुम्ला हो अंक ऑनलाईन वाचे मिळेल.
“गणपुले फाऊंडेशन” हें एक बरां व्यासपीठ उपलब्ध जालां अणि हरएक साहित्यिक आपलेकडा ‘जां से तां’ चित्पावनी शब्दांचां ‘बी’ हे व्यासपीठावर उमेद्यान रुजत घालीत से अणि आम्लाय खात्री से की एक दिवस तुमचे हे एकेका ‘बी’ पाश्णी मोठां झाड तयार हंव्नी, तुमचे प्रेमळ सहकार्यान “साहित्य झाडाचो खांदेंन खांदो” घोसांनीं लगडनांर से.
जसो साहित्यिकां शिवाय अंकाला ‘आकार’ नाय तसो वाचकांशिवाय पूर्णत्व नाय. म्हणी संपर्कात सलेले प्रत्येकाला ही वेबसाईट लिंक पाववेचां कार्य तुमी आमी करे हवां. कारण कितां ते, अंकाचे वाचनान एखादेची कल्पनाशक्ती समृद्ध हयेल, एखाद दुसरो शब्द तेंचे घरांत आयके येल अणि एखाद दुसरो नवो चित्पावनी लेखक, लेखीका, कवी, कवयित्री घडे प्रेरणां मिळेल. दुसरो मुद्दो वाचनांत्थीनय आयुष्यातले ल्हान ल्हान गोष्टींकडां बघणेचो दृष्टिकोन बदलों शकसे, कारण हे अंकातलां साहित्य घरांतले प्रत्येकाचे मनाला ‘कितां नां कितां’ बरां खाणं देनांरा से हें नक्की!
हें अंकातले साहित्याची ओघवती रुपरेषा एक झलक :-
वेळ लागसे ही कविता वाचताना मन भारावसे. जाले गावठी फळा खावनीं पोट भरसे. थोडी विश्रांती घेत घेत सांगा में कोण कोडी सोडवीत सतानां पोटभरी हसे येसे. तितकेंत झणझणीत मेथ्याचां पिठलां, घोटांचा सासंव, कारेत्याचो कायरस, खमंग मेतकूट असे जिन्नसाची नावां वाचनीं, जिन्नस खायवेची इच्छा हसे.
‘कवितांचे मैफिलीत’ तर अनेक विषय मनाला भावनांरे. शब्दांची उत्कृष्ट सांगड कवी कवयित्री हेंचेनीं तेंत घायलेनी से. कवितांचां वाचन करीत आनंदाचो अनुभव घेत तुमचे विचारांना मनसोक्त भोवडावनीं हाडा अणि मनापाश्णी प्रत्येक कवी/ कवयित्रीला दाद द्या.
कविता -: वेळ लागसे, आस, स्वप्नपूर्ती, विदरणां, मैत्री, अनभिज्ञ, परिसीमा, आमी भावंडा.
घरांतले जाण्टे नेण्टेनां वाचनीं दाखया. तेनांय कवितांचो आनंद मिळोंदे!
पुढां वाचन करताना सुशेगाद ओलतेरांत बेसलेलेचो, शब्दात्थीन अनुभव घ्या. सध्या घोंगेनी पाऊस पडसे पण काळजी करुं नाकां तेचेकरता बरी सोय केलेली से ती केंची तां वाचा डकबॅकाची काणी. ऱ्ह्या ऱ्ह्या …..!!
पावसांत फिरोनीं कंटाळो आयलो से का? भूकय बी लागली से? जाले एतां वाचाच माझे ल्हानपणांतलो पाऊस. एतां पुढां कितां!! प्रत्येकाला आत्मानंद गरजाचो, तो मिळवे अणि ज्ञानात भर घाले अधिक मासा निमित्त. माहिती वाचा, तेच बरोबर आमी मध्यमवर्गीय सों. तरीय बी वेळांत वेळ काढनीं प्रत्येक जण आपले आवड्याचो छंद जपसे. बरोबर? तसां जाले पुस्तक वाचनाची आवड निर्माण करनांरो असोच एक प्रकार वाचा पुस्तक परिचय.
केंचाय काम मनासारखां पूर्ण जालां की आमी कितां करसों?साखराची चिमटी हातावर घालसों अणि तोंड गोड करसों! मात्र ते चिमुटभरी साखरा पाठल्या कितके कष्टकरी हात अणि तेंची जगणेतली धडपड ससे तां वाचा गोड साखरे पाठली कथा. खडतर, कष्टप्रद अणि गरिबीतलां जगणां कळ्ळां. माणूस कितकोय हुशार सों, मनांत कसलो ना कसलो भय सयेल जाले तो घालवे कितकेसेच यत्न करसे. अनेक क्लृप्त्यांचो, शस्त्रांचो वापर करसे. बरोबर ? असेच आशयाचां, भलेभलेनां गारद करनारां धारदार लेखन वाचा शस्त्रांची कथा अणि व्यथा.
विविध विषयांवेल्ले माहितीपूर्ण लेख, साहित्यकृती, कविता, कथा, लेखकांचे कल्पक अभिव्यक्तीचो समावेश अंकात से. हो अंक वाचकवर्गाला विचारप्रवृत्त करेल, नवी प्रेरणा देल अणि वाचनाचो आनंद द्विगुणित करेल, अशी आम्ला खात्री से.
हे अंकाचे निर्मितीसाठी मोलाचां सहकार्य करणाऱ्या सगळे लेखक, मार्गदर्शक अणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. वाचकाच्यो सूचना, अभिप्राय अणि सहभाग हेला लागोनीं हो उपक्रम अधिकाधिक समृद्ध होत ऱ्हेल!!
“ज्ञानाचा दिवो अखंड तेवत ऱ्हेवंदे,
विचारांचो प्रवाह सद्दानीं व्हावत ऱ्हेवंदे,
आपुलकी, संस्कार, सृजनाची साथ सोंदे ,
वाचकाचे जीवनाला नवां क्षितिज मिळोंदे,
तुम्ला सगळेंना आनंददायी, प्रेरणादायी अणि अंक वाचनाच्यो हार्दिक शुभेच्छा!
धन्यवाद! देव बरां करुं.
सौ. आरती मोने
साखळी, गोवा
फोन: ७०३८०६२५३६
गणपुले फाऊंडेशन चे वतीन- वैभव गणपुले
नमस्कार,
सगळे साहित्यिकांचा विशेष अभिनंदन. साद चित्पावनीचो ११ वो अंक वाचकांच्या हातात देताना आम्ला खूप आनंद हसे.
तसाच माला सांगे आनंद हसे की – आधी प्रकाशित केलेले सगळे ऑनलाईन अंक एता वेबसाइट वरती उपलब्ध सत. जानेवारी २०२४ ते जुलै २०२६ हे कालावधीतले अंक एता वाचे साठी वेगवेगळ्यो पीडीएफ सोदेची गरज नाय. गणपुले फाऊंडेशनान दिलेला आणखी एक आश्वासन एता पूर्ण जाला से. माला खात्री से की तुमी चित्पावनी साहित्याचो आस्वाद घेनार अणि आम्ला तुमच्यो सुचना सुद्धा धाडनार.
दिवाळी अंकाची तयारी सुरू जाली से अणि आमी तुमच्या साहित्याची वाट बघसो. कृपया तुमचा साहित्य १० ऑगस्ट पयली आम्ला editor@ganpulefoundation.org हे ईमेल वरती धाडा. दिवाळी अंकासाठी स्वयंसेवकांची गरज से. तुम्ला जर दिवाळी अंकासाठी योगदान देव्वेचा सयेल तर आम्ला नक्की संपर्क करा.
चित्पावनी भाषेची तोंड ओळख कार्यशाळाचा आयोजन सुद्धा येणारे काही महिनेत केला जानार से.
२०३० पर्यन्त प्रत्येक चित्पावन घरात चित्पावनी हो ध्यास घेव्नी गणपुले फाऊंडेशन चा कार्य सुरू से.
अंकातले विविध साहित्य प्रकार वाचा अणि अभिप्राय कळया. धन्यवाद.
वैभव गणपुले
संस्थापक – गणपुले फाऊंडेशन
ठाणे, महाराष्ट्र
फोन: ९९२०३४५८६१
सांगा में कोण?- दिनेश्वर जोग
(१)
अरे अरे एका पायाच्या .. दोन पायांचो कें गेलो से ?
चार पायांचो येनांर से म्हणी धा पायांचेला हाडे गेलो ..!!
(काठी, राखणो, वाघ अणि कुल्ली)
(२)
तीन पायाची त्र्यंबक रानी
खासे लाकूड अणि प्येसे पाणी.
(सहाण आणि खोड )
(३)
एका झाडाला सात खांदे ..
तेंतले पांच ओले दोन सुके.
(आठवडो)
(४)
घाटावर्थीन आयलो बुकलो तो दही दही ओकलो.
(पणस)
(५)
घाटावर्थीन आयलो जोगी
गोबर फासनीं बेसलो ओगी !
(कुवाळो)
(६)
एका झाडाला कोळसेच कोळसे
(जांभळां )
(७)
इवळोसो पोर पण घर राखे थोर !
(कुलूप)
(८)
इवळोसो पोर झाडाचे खांदेन खांदी फिरसे
(हुमलो)
(९)
पाठल्यां पांचशें लोक पूढां तांबडी चोच
(केळीचो घड)
दिनेश्वर जोग
गोवा
फोन: ९४०५६६५७७२
आमची गावठी फळां- रामकृष्ण सोमण
चित्पावनी कोकणस्थ आमी सों खूप नशीबवान,
निसर्गान कितकां दिलान से, नाय कितेलाच वान !
कर्माची फळां खे कयतरी मिळसत, आमी मात हेत वेगळेच,
बारा म्हयने आमचे बरोबर केंचांतरी फळ ससेच!
केळी बाराय म्हयने, नारळ तर सद्दानीं ससे जेवणांत,
पोपायो, अन्सां, नीरपणस सदांच ससत घरात !
लिंबू, करमलीची झाडां देसत सदाच आंबट फळां,
राय आवळे, आवळकाठीचे आवळे आवडसत तेंचीय फळां।
पणस, आंबे, काण्णां, जांभळां आपले ऋतूतच येसत,
येव लागली की भरपूर, कितां करू कितां नाकां करनीं सोडसत।
अशी कितकीशीच फळां, निसर्ग आमला वर्खभरी देसे,
ते ते ऋतूत नाय आयली, जाले मोग चुकलेगत हसे।
सफरचंदां, संत्री, मोसंबी ही बाजारातली हाडेची,
पण आमच्या गावठी फळांची सर तेना नाय येवेची ।
श्री. रामकृष्ण दिनकर सोमण
गोवा
फोन: ९४२३८८३८४३
झणझणीत मेथी पिठलां- वर्षा केळकर
साहित्य :
एक मेथीची चुडी, डाळीचां पीठ (बेसन ), कांदो एक, लसूण अणि धोडायलेल्यो मिर्सांगो, तेल, हिंग, सासवां ( मोहरी) हळद, जिरां, करवील, भिंडाची सोलां दोन ( कोकमसोल ), मीठ अणि कोथंबीर. (कोथिंबीर आवडीप्रमाणं.)
कृती :
मेथी दोन ते तीन वेळा पाणी घालनी स्वच्छ धवनी बारीक चिरनीं घेव्वी. कायलीत दोन ते तीन चमचे तेल घालनी तां बरां गरम जालेवर तेत सासवां, जीरां, हळद, करवील, लसूण अणि धोडायलेल्यो मिर्सांगो, सगळां बरां परतवनी घेव्वां. पिठलां कितकां तिखट हवां तेप्रमाणं लसूण अणि धोंडायलेल्यो मिर्सांगो घाला. हे सग्ळां परतूनी घेव्वेचां मोग तेत बारीक चिरलेलो कांदो तो बी परतूनी घेव्वेचो अणि तेंत बारीक चिरलेली मेथी घालनी ती बी बरी परतूनी तेचेवर धापणां थेवनीं बारीक गॅसवर दोन ते तीन वाफो काढेव्यो. जोपर्यंत मेथी शिजसे तोपर्यंत डाळीचां पीठ पाणी घालनी बरां एकजीव करनीं घ्या म्हणजे तेंत गुठळयो हैय्वेच्यो नाय.
एतां मेथी अणि कांदो बरो शिजवनीं तेचो गोळो तयार जालो से तेंत हे कालयलेलां पीठ घालनी बरां एकजीव करनीं घेवेया. जे वाडगेत पीठ कालयला तेच वाडगेत थोडा पाणी घालनी तां पाणी पिठलेत घालनी ढवळनी घेवया. एतां तेंत सोलां ( कोकम साल ), इवळी साखर, चवीप्रमाण मीठ घालनीं बरां एकजीव करनीं थोडां शिजवनी घेवया. पिठलां आपलेला हवां तितकां पातळ किंवा दाट करनीं तेंत चिरलेली कोथिंबीर घाला. जालां आपला मस्त असां झणझणीत मेथी पिठलां तयार.
हें पिठलां आमी भात, भाकरी किंवा चपाती बरोबर सुद्धा खावं सकसों.
मोग कशी से हि झणझणीत मेथी पिठलेची रेसिपी?
तुमी एकदा नक्की करनीं बघा अणि माला सांगा कसां लागलां तां.
तोपर्यंत बरे ऱ्ह्या, आनंदी ऱ्ह्या अणि मुख्य म्हणजे खात ऱ्ह्या.
वर्षा केळकर
बदलापूर
फोन: ७५५९४२४३२१
गोड साखरे पाठली कथा- पंक्ति जोग
दक्षिण गुजरातांतले सूरत अणि तापी हे दोन जिल्हेंत उसाचां पीक भरूपूर हसे. एठा उस लायणारे हजारों शेतकरी सत. प्रत्येकाची शेकडो एकर जमीन ससे. तेंची संघटना पण खूप मजबूत से. सरकारा कडा कितांय कांम सलां किंवा उसाचो दर थरवेचो जालो जाले शेतकरी संघटनाच पुढाकार घेवनीं वाटाघाटी करसत. उस लायनारे जे शेतकरी सत, ते सगळे सहकारी साखर कारखान्येंत नोंदणी करनीं सदस्य ( मेंबर) जालेले सत. म्हणी उस तोडणीची जवाबदारी कारखानो घेसे. शेतकऱ्यान फक्त उस पिकलो की साखर कारखानेला एक अर्ज करेचो, म्हंजे उस कापे कामगार मनाय धाडले जासत.
सप्टेंबर-ऑक्टोबर म्हयनेपाश्णी सामकी मार्च महीने पर्यन्त उस कापणी चालसे. तेंत गुजराताचे डांग जिल्हेथीन १ लाख अणि महाराष्ट्राचे नंदुरबार, धुळे, वैगेरे भागांथीन १ लाख असे २ लाख कामगार (मजूर) काम करसत.
डांग जिल्हो म्हंजे घाट, ल्हान-मोठे डोंगर, दऱ्यो, अणि बारीक बारीक व्हाळ सलेलो प्रदेश. एठा प्रत्येक गावांत खूप वाडे ससत. तेनला गुजरातीत “फळीया” म्हणसत. प्रत्येक वाडेवर पण घरां एकाला लागोन दुसरां अशी नाय, पण एका बारीक डोंगरावर एक घर, अणि त्याहांच तेंचा शेत .. मग दुसरे बारीक डोंगरावर दुसरां घर असे तऱ्हान लोक ऱ्हेसत.
नैसर्गिक सौन्दर्य खूप सलां तरी बाकी सगळे बाबतींत हो जिल्हो खूप पाठी. गरिबी पाचव्यालाच पूजलेली. डोंगरावरती बारीक बारीक शेतांत पावसाळे पुरतां कितां तरी पिकसे .. गावातले आडाकुशीला दूसरा केंचाच काम नाय. प्रत्येकाचे घरांत ८-१० तरी भुरगी ससत. हो मागासलेलो विस्तार म्हणी सरकारी अधिकारी, शिक्षक, डॉक्टर कोण येवे बघत नाय. परिणाम गांवात शाळा, बालवाडी, सवाय धान्य दुकान ( रेशनिंग) म्हणां किंवा सरकाराचो एकय कार्यक्रम धड चालत नाय. पाऊस सोपलो काय पोटापाण्याला लागोनीं आदिवासी घर दार सोडनीं दुसरे कडा काम करे जासत.
मुकादम बी आदिवासी लोकांना उस कापे (उसतोडणी) “तापी” नाय जालेवर “सूरत” घेवनीं येसत. उस कापेचां काम दिसावडेवर हत नाय. बायल अणि घो असो ‘जोडीचो कोयतो’ म्हणी उल्लेख करेची पद्धत से. एक कोयतेचो (जोडी चो) एक टन उंस कापोनी, तेंचे भारे बांधोनी ट्रकावर चढवेचो दरय (रेट) बी ‘साखर कारखाने’ फिक्स करसत. हे वरखा ४७८ रुपये दर से. एका जोडप्याला एक टन उस कापे, बांधे अणि ट्रकावर घाले (लोड करे ) जवळ जवळ १२ ते १४ वरां ( तास ) लागसत. म्हंजे १४ वरांच्या कामाचे ते दोघाय जणांना मात्र ४७८ रुपये गावसत. तेंत अणि मुकादम ८० रुपये कमिशन घेवनीं जासे. म्हंजे आदिवासी जोडपेला मिळसत फक्त ३९८ रुपये. तेंतकरनीं मुकादमा कडथीन अडी अडचणीला उधार घेवेचां पडसे.. घरांत कोणाला दुखणां खुपणां (आजारी )जालां, कोणाचां लग्न, जन्म, मरण वैगेरे बरे वाईट प्रसंगाला मुकादमच मदत करसे. पण फुकट न्हुय. जितके पैसे मुकादम गरजाला ( एडवांस) म्हणी देसे तेचे दीड पटीन तेला परत देवेचे पडसत. म्हंजे व्याजाचो दर ५०%..!! मुकादमाचो कायदो कडक म्हणजे निर्दयी (जुलुमी ) एक दिवस जरी काम बंद थेयलां तर ५०० रुपये दंड..!! कारखानो (फॅक्टरी ) दर म्हयनेला थोडां ज्वारीचां धान्य धाडसे…. सीझनाचे सुरुवातीला पाल / आसरण बांधे ताडपत्री (टार्पूलीन) देसे .. पण हे सगळेचे पैसे हिशोबाथीन वजा (कट ) करसे.
सीझन पूर्ण जालो की, कारखाने वाले हिशोब करसत. सर्रास एक दादलो अणि बायल मिळोनीं २०० टन उस कापों शकसत. एडवांस, दंड, व्याज सगळां कट करनीं अवघे १०-१५ हजार रुपये घेवनीं घरा येवेचां ..!!
तरी पण गरीबी पूढां लाचार हौव्नी आदिवासी दर वरखा उसांत येसत.. ५ -६ म्हयने जिवापाड कष्ट करसत. तेंचे खूप हाल हाल हसत. दादले कामावर्थीन परत पालांत आयले की आड पडसत पण बायलांना रांदेचां ससे.. भुरग्येना बगेचीं ससत.. सगळां साफसारोनीं ती निदवसत म्हणे पर्यन्त ट्रक येवेची वेळ हसे.. म्हंजे उठोनी उस ट्रकांत भरेचो.. रात्रीचे वेळा ट्रक आयले की अपघातय पण हसत..गेले सीझनात ३ बारकेली भुरगीं ट्रकाखालती चिरडोनी मेलीं… फेक्टऱ्याचे मालकान सांगलान की जे शेतकऱ्याचे शेतांत उस कापे गेलेलीं तेची जवाबदारी से, अणि शेतकऱ्याची जबाबदारी “फेक्टरीची” से, असां म्हणी हाथ वर केलेन..!!
१९८४ सालांत गुजरात हायकोर्टान हुकूम दिलेलो की आदिवासी कामगारांना परवडेल, सोबेल अशी मिळकत मिळे हवी. उस कापे येसत त्याहां पाण्याची सोय हवी, तेंचे भुरगेंसाठी शाळा हवी. हें सगळां कारखान्याचे मालकांनी करेचां. पण सहकारी साखर कारखान्यांची संघटना पेदांत (पावरफुल) से, म्हणी तेंचेनी हे हुकुमांचां पालन करे सरकाराला सहकार्य केलां नाय. सरकारी तंत्राला काय आदिवासी समाजाचे प्रश्न सोडयणेंत रस नतलो.. म्हणी आज पर्यंत परिस्थितींत अधिक असो फरक पडलो नाय.
आमचे खाद्य संस्कृत्यांत साखराला खूप महत्व से. बरी बातमी सेल जालेवर आमी रोकडेच “तोंड गोड करे” साखर देसों. जास्तसे गोड पदार्थ साखरापाश्णीच हसत. पण कोणाला खबर से की आमचां जेवण गोड करणारी साखर आदिवासी लोकांचा जीवन मात कडू करनीं थेयसे.
पंक्ति जोग
गुजरात
फोन: ९९०९००६७९१
पुस्तक परिचय- गायत्री भुस्कुटे
पुस्तकाचा नांव- “गोव्यातील धर्मांतर कथा आणि व्यथा”
लेखक -रंगा हरी
मराठी अनुवाद -सुनेत्रा जोग
Proselytism in Goa -The story and the sorrow हे इंग्रजी पुस्तकाचो अनुवाद केलोसे सुनेत्रा जोग ह्यांनी.
प्रकाशन -भारतीय विचार साधना
ऐतिहासिक वस्तुस्थितीला पूर्ण न्याय देत लोकांच्यो व्यथा, तेंना सहन करेव्यो लागलेल्यो अग्नीपरिक्षा अणि तेंवां पुनरुत्थान हेच्यो विचित्र काण्यो वाचे मिळसत. पयले भागात अस्सल नोंदी अणि सामाजिक प्रतिज्ञापत्राचे आधारान गोवेंतले लोकांची धार्मिक असहिष्णुता अणि फिरंगेची आक्रमणां, घुसखोरी, तसांच एकेश्वर वाद, तेच दृष्टीकोनात्थीन जन्मलेल्यो, धार्मिक कट्टरता, तेला धरनीं सुरू जालेलो क्रूर अणि पाशवी धर्मांतराच्यो ओघवत्यो काण्यो हे पुस्तकांत सांगितलेल्यो सत.
ईश्वर शासित देशाचो शाही फतवो, देवळांची तोडफोड, पवित्र ग्रंथ जाळले, फिरंगेना दिसे हिंदू तत्वज्ञान ग्रंथ जाळले काय कायमचा नष्ट हयेल. पण..
आमचे अणि तेंचे दृष्टीकोनांत फरक से हे वाचे मिळसे. देवळां हिंदू धर्माचो पायोच निखळे पुढे सरलेलो. ख्रिस्ती धर्म लादलो असो, लोकू नाव सलेलो लुकास दे हा जालो, पाचजण सलेले कुटुंबाचा धर्मांतर केलां असे यशामुळां तेना धर्मांतर करे सोपा गेला. हिंदुत्व जपणारेनां हद्दपार करेचो फतवो तेणी काडलो.
धर्मपठण, प्रवचना करनांरे ब्राह्मणाला हे राज्यात ऱ्हेवेची परवानगी देत नतले. पारंपारिक पध्दती बदलेच्यो, ‘कौल लावणे’ धर्म बदललो तरी लग्नापयली अजूनय कौल घेतलो जासे. पुतना रणनीती वापरोनीं भुरगेंचा अपहरण करीत हिंदुंची धार्मिक दृढतेची तीक्ष्ण धार इतकी वर्खां उलटली तरी बोथट जाली नतली असां दिससे..
हिंदूंचे तीर्थयात्रा ना बंदी घायली तरी त्यो अशो चालू उरल्यो हे वाचे मिळसे. इतिहासाकडल्या कितां धडे मिळ्ळे, किंवा मसूर आश्रमाचा कार्य वाचे मिळसे.
धर्मांतरीत जालेलेचा हिंदूधर्मात पुनरागमन. हेत आयलासे.
विभाजनाचा धोरण अवलंबोनी लोकांमधले संबंध कसे तुटतील हे पोर्तुगीजांनी बघितलां.
“सत्य सांगा” मोहीमात हिंदूंवर अक्षरशः अत्याचार केले. तां वाचनीं आज आमी हिंदू उरलों सों हें आमचे पूर्वजांनी जपलेले सांस्कृतिक परंपरांना, तेंचे स्वाभिमानाला नतमस्तक हंव्नी प्रत्येक हिंदु हात जोडनीं नक्कीच उभो ऱ्हेल.
कुंकळीतलो लढो मुद्दाम वाचे हवो. स्वधर्माचां अणि आमचे मातृभूमीचां रक्षण करे जे शूरवीरांनी केलेलां बलिदान कसां विसरे येल? स्मारक कसा जालां? हे पुस्तक प्रत्येकानं वाचे हवां असांच से. अनुवाद ओघवतो जालो से. पुस्तकाची किंमत २०० रुपये से. गोवेकडा, गोवेची, गोवेतले लोकांची गोष्ट म्हणी वाचे हवां. सगळेंना गोवेचो भूतकाळ दर्शयणारां, दाखयनारां से हें पुस्तक.
गायत्री भुस्कुटे
गोवा
फोन: ९४२२४५८३४०
ओलतेर (आरामखुर्ची)- कृष्ण गणेश वझे
कसां, कितां, अणि केंथीन हें नांव आयलां कोण जाणे पण पयलेपाश्णी हे खुर्च्याला ‘ओलतेर’ म्हणसत हें खरां. साधारणपणांन हें ओलतेर घराचे पुढले पडव्यावर बेसेला, जाण्टे दादले ( पुरुष मंडळी ) घेत सले. नावाप्रमाण हेंत बेसलेवर जीवाला मात्सां बरां दिस्से.
हेची रचना तशी सोपी पण बाजारात सहज मिळत नतलां. मेस्ता कडथींन ( सुतार – कारागीर) करनीं घेय्वेचां. दोन लांब, वावभरी लांबाईच्यो चिरपी (कडणीच्यो) कांबी. तसल्योच चार, दिड हात लांब कांबी. दोन हातभरी लांबीच्यो वाटकुळ्यो, किसुळ मारलेल्यो काठ्यो. दोन वार ( २ वार = १ मिटर ) मापाचो कपडो. जो हे खुर्च्याला वापरसत. अजूनीं कारींकारी अशी हीं ओलतेरां वापरांत सत.
पयलेंदा सगळ्यो कांबी बऱ्यो तास्नी, किसुळ मारनीं सुळसुळीत करनीं घेवेच्यो. मोग लांब कांबीचे एका तोकांकडथींन तीन खापां ( खाच) करनीं घेव्वेची. कपडेचे दोनय कडांना काठी घाले मिळेल अशी शिलाई मारनी घेय्वेची. काठ्यो व्यवस्थित आडव्यो उभ्यो जोडल्यो काय खुर्ची तयार जाली. मोग तेला कपडो चढवेचो. कपडेचे दोनय कडा काठ्यो ( तोण्यो ) घातल्यो काय बेसेला खुर्ची तयार. हेलाच म्हणसत ‘ओल्तेर’ . हवां तेड्ला दुड घालनीं थेव्वे गावसे. महत्वाचो मुद्दो म्हणजे हेला खूप असो खर्चय नाय अणि बेसेची सोय बी बरी हसे!
कृष्ण गणेश वझे
गोवा
फोन: ९४२०३१७१२८
वेळ लागसे- रामकृष्ण दिनकर सोमण
सकाळ जाली की नवो दिवस, आपणच होसे सुरू,
नीजमोड जाली तरी दोळे उघडे करे, आम्ला वेळ लागसे।।
चिमण्यो सुकणीं कयची सरलीसत, घोटेराचे भायेर,
वर ऊठे हत नाय रोकडांच, उभां ऱ्हेवे आम्ला वेळ लागसे।।
नाईलाज म्हणी करुं लागसों, आमी उठोनीं कामां,
फुकट कोणी दिलां तरी, नस्से तां बरां, हेंच समजे वेळ लागसे।।
कोण सांगसे पशू प्राण्यांना, उठोनी जावे हवां पोट भरे,
कष्ट करनींच जीव जगवे हवो, हे कळे वेळ लागसे।।
आयुष्याचो हो गाडो चालवे, दोन चाकांच पुरत नाय,
कोणीतरी तो ओढे, पुढां सरे हवां, हें कळे थोडो वेळ लागसे।।
सदांच आमी चितसों, आजचे पेक्षा, उद्याचो दिवस बरो जायवे हवो, पण उद्या आमी सनांर काय नाय, हेंच कळे वेळ लागसे।।
घराघरांतली मिळकत ससे कमी अधिक, पण भाज्यातलां मीठ
अणि भाकरीचां पीठ तांच ससे, हें कळे वेळ लागसे।।
मोठी सुखां मिळवे, मोठ्यो खटपटी चालसत,
बारीकसारीक सुखाचे कण साठवे, आम्ला थोडो वेळ लागसे।।
आमचां सुख ऐश्वर्य आम्ला हवांच, हेचेसाठी झगडसों जन्मभर , पण आमचे साठी अणि कोणी तरी त्याग केलोन से, हें कळे वेळ लागसे।।
आयुष्यभर जमयलो पैसो, जोड भरपूर केली, पण आपले पाठल्या त्याची वाताहातय लागो शकसे, हें कळे वेळ लागसे।।
झाडावरची पानां फुलां फळां आम्ला दिस्सत, पण तां झाड वाढवे मात्यांत गाडसे आपली पाळांमुळां, हें कळे वेळ लागसे।।
संध्याकाळा फुल्लेली फुलां, रात्रभर वास देसत, पहाटे गळसत, पण एका दिवसाचे जगणेलाच ती जीवन म्हणसत, हें कळे वेळ लागसे।।
बारीकसारीक झगडी, राग अणि द्वेष हेंतच खुपसां आयुष्य जासे,
मात हेचो फायदो कायच नतलो, हें कळे वेळ लागसे।।
कितेला आमचो जन्म, कितां करेचां से आमी एठा येव्नीं,
म्हातारपण आयला तरी, हो प्रश्न सुटे वेळ लागसे।।
एकंदर सगळे प्रश्नच सत आयुष्यात, कय ल्हान कय मोठे,
पण सगळेंनाच उत्तर नस्से हें कळे वेळ लागसे।।
आपलांच दुःख दिस्से, तेलाच वेंगमारनीं रडत ऱ्हेसत,
दुसरेंच्या दुःखाचो डोंगर दिसे मात, खूप वेळ लागसे।।
आमचेसाठी आमी जगसों, दुसरेचे बरेचो विचार खूपच कमी करसों, मात दुसरेसाठी जगणां हेच खरां, हें कळे मात वेळ लागसे।।
थोडेच क्षणांची सोबत, कोणी येसत, कोणी सोडनी जासत, आम्ला सुदा असांच जावेचा पडणार हे कळे वेळ लागसे।।
रामकृष्ण दिनकर सोमण
गोवा.
फोन: ९४२३८८३८४३
आस- सुभाष जोशी
खबर से, एक दिवस असो सयेल
माजे क्षितिजाचां दृश्य सोपेल
में सयेन अनिर्विण्ण शांततात
डोळेवर पडदो पडलेलो सयेल
तरी नक्षत्रतारे रात्री तसेच बघीन
सकाळची पहाट तशीच अनुभवेन
अणि काळ तसोच गर्जेल जशो
समुद्रलाटो जणू सुखदुःख हाडेल
जेड्ला हे क्षण में विचार करसां
जणू मरणात हें सगळां बघसां
मृत्यूत मूल्यवान दागिने लिपले सत
किंमती जीवांचे सुंदर बिछाने सत
जेची आस धरली तां मिळ्ळां नाय
जां माला मिळ्ळां तेची गरज नाय
जा कायम अव्हेरला अणि नाकारला
तां सत्व एतां माजांच होवनीं ऱ्हेवं दे !
सुभाष जोशी
गोवा
फोन: ७०२०६१८३२८
स्वप्न पूर्ती- देवश्री गोडबोले
खेडेगावातलां एक स्वप्न,
बघूया कसां से पुणां शहर;
शहराची नवलाई नवी,
ओळखीचां न्हूय, पसरलेला शहर ।।१।।
उरली पाठल्या भावंडां,
आई- आण्णा, आप्त;
जाल्यो नव्यो ओळखी,
सगळ्यो व्यवहारातल्यो फक्त ।।२।।
शहराची नवलाई सोपली,
पण खुळखुळ्ळो पैसो हातांत,
सुटी घेवनीं मिळयलां मोग,
वात्सल्य सलेलां घर जोमांत ।।३।।
पाऊल पडलां मोठेंचे जगात,
जाली संसाराची सुरुवात;
परत पावल्या वेगळेच जगात,
मैत्रीणी, शेजारी – उरले मनांत ।।४।।
जातां- जातां दिवस गेले,
संसाराचे क्षण सोपले;
निवृत्त हतांच हळू जाले,
आयुष्याचे दिवस आपले ।।५।।
केलो एक नवो विचार,
रचल्यो कविता, चित्पावनीत चार;
निवृत्त्याचे नाय मनांत विचार,
शांत मनांत से बोलीभाषाचो प्रसार ।।६।।
चित्पावनी ही मायबोली,
आईचीच माज्या सावळी;
नवी सगळीं आप्त- मंडळी,
हातात हात घालूया सगळी ।।७।।
देवश्री गोडबोले
पुणे
फोन: ९०११९५८७२५
डकबॅकाची काणी- वेदिका गाडगीळ
हमीरपूर चे तुरुंगाची ती काळखान भरलेली कोठडी. भायेर पावसाचां तांडव सुरु सलां. आकाशात्थीन कोसळणारे पावसाच्यो धारो जमनीवर आदळत सल्यो.अणि ते मुशळधार पावसांत कांय भारतीय सैनिक कुडकुडत उबे सले. तेंचे आंगावेल्ले सुती कपडे पावसांत चिप्प भिजले सले. थंड्यान तेंचे ओठ निळे पडलेले. कांयजण जरान थरथरत सले, जालेवर कांय अति थंड्यान मरणाचे दारांत पावलेले!
तेच वेळा, तेंचे पुढेंत्थीन जावपी ब्रिटीश अधिकारी मात्र सुके सणसणीत सले. तेंचे आंगावर विलायतात्थीन मागयलेले ‘वॉटरप्रूफ’ कोट सले. ते तुरुंगाचे एका कोठड्यांत्थीन एक तरूण हें बगीत सलो. तेचे दोळेंत संताप सलो अणि मनांत एक विचार – ‘ब्रिटीश साम्राज्याकरतां लढणारे एका भारतीय सैनिकाच्या आयुष्याची किंमत एका कापडाचे कुडकेपेक्षां सुद्दा कमी से का कितां?’
हो तरुण भुरगो म्हणजेच सुरेंद्र मोहन बोस. बर्कले अणि स्टॅनफोर्ड विद्यापीठांत्थीन केमिस्ट्री ची पदवी घेतलेलो एक वैज्ञानिक. खरां म्हणजे तेला त्याहांच विलायतांत एक सुशेगाद (आरामशीर) करीयर करतां येत सलां. भरपूर पैसोय मिळनार सलो. पण तेणी स्वातंत्र्य लढेंत भाग घेव्वेचो थारायलो, अणि हेच कारणाकरतां ब्रिटीशांनी तेला तुरुंगांत घायलेलो. पण ते दिवसा हमीरपूर्चे तुरुंगांत पावसांत भिजनांरे ते भारतीय सैनिकांचे दु:खान सुरेंद्र मोहन हेंचे आयुष्यालाच एक वेगळी दिशा दिली.
तुरुंगात्थीन सुटतकच सुरेंद्र आपले कोलकात्यांत ‘नझर अली लेन’ हे गल्ल्यांतले आपले घरा आयले. बोल्सांत पैसे नतले. पण मनात एक ध्यास सलो. तेंणी आपले घराचेच पाठल्या वाटा सलेले एका खोल्यांतच आपली प्रयोगशाळा सुरु केली. वांगडाला सले तेंचे तीन भाऊश – अजित मोहन, जोगेंद्र मोहन, अणि विष्णु बाडा.
कसलांच मोट्ठां मशीन नाय, भांडवल नाय अणि कोण गुंतवणूकदारय नाय. फक्त केमिस्ट्रीचां ज्ञान अणि आपले देशाकरतां कितां तरी करेची जिद्द. हेचेच नेटावर तेंणी कापूस अणि रबर एकत्र करनी वॉटरप्रूफ कापड तयार करेचे प्रयोग सुरु केले.
पण हें भायेल्ल्यां दिस्से तितकां सोपां सरळ नतलां. भारताचां हवामान युरोप पेक्षां वेगळां. गिमाळेंत ( उन्हाळ्यात ) रबर वितळे, जाले थंड्याचे दिवसांत तेला तडे जावनी तां फुटे. शेजारीपाजारी हसत. ‘मॅंचेस्टर च्या गिरण्यांशी हे बंगाली भाऊश कसली काय स्पर्धा करणार?’ असे शब्दांत तेंना केंड्नी ( हिणवून) बोलत. पण सुरेंद्र मोहन ओगी र्हेले नाय. तेंणी आपलां काम सुरुच थेयलां.
केडलाय खूपच वाज आयलो कीं ते तळ्याचे काठावत जावनी बेसत. त्यांहां एक दिवस तेंचे लक्षांत आयलां की, बदकाचे पंखांवर पाणी थारत नाय. तां मोत्यांवारी गळोनी जासे. हेच निरीक्षॅणांत्थीन तेंणी व्हल्कनायझेशन ची एक ‘सिक्रेट’ पद्धत सोदनी काडली. बदकावेल्ल्यां हेची प्रेरणा गावली – म्हणीं तेंणी ह्या प्रक्रियाला नांव दिलां ‘डकबॅक’ (DUCKBACK)
१९२० वे वर्खा भारताला स्वत:चो पयलो स्वदेशी, बॉल्साला परवडसे असो अणि टिकाऊ असो रेनकोट मिळ्ळो. अणि पुढां कितां जालां? बगतां बगतां डकबॅक हें नांव घराघरांत पावलां. १९४१ पावत कंपन्याची उलाढाल ४० लाखांवरतीं पावली. शाळांचीं दप्तरां, रेल्वेचे होल्ड ऑल किंवा जोर आयले थेयसत ती आईसबॅग – डकबॅक हें विश्वासाचां दुसरां नांव जालां.
डकबॅकाची काणी एठाच सोंपत नाय. २००० च्या दशकांत चिनी (उदार धोरण) प्लास्टिकचे स्वस्त रेनकोटांनी भारतीय बाजारपेठ व्यापली, तेडला ड्कबॅकाचो कठीण काळ सुरु जालो. मूळ मालकांचे हातात्थीन कंपनी गेली. लोकांना दिसलां, की एतां ‘डकबॅक’ ब्रॅंड सोंपलो.
अजूनीय काणी सोंपली नाय. जिद्दीन सुरु जालेली कंपनी अशी कशी हरनांर ते? आज डकबॅक भारतीय वायु दळाचे वैमानिकांकरतां जी-सूट (G-suit) तयार करसे. नौदळाचे कमांडोंकरतां ‘सबमरीन एस्केप सूट’ अणि स्पेशल फोर्सेसकरतां ‘टॅक्टिकल बोटस्’ तयार करसे. जे सैनिकांना पावसांत भिजताना बगनी सुरेंद्र मोहन हेंचे मनांत संतापाची कीट पडलेली, तेच सैनिकांना आज डकबॅकाचीं आधुनिक उपकरणां सुरक्षा देसत.
सुरेंद्र मोहन हेंची काणी आमला हेंच शिकयसे की, जगांतले मोठे मोठे ब्रँड हे फक्त केंचेतरी उत्पादनावर न्हूय, तर एका ‘अपमानावर’ उबे जालेले सत. अपमान असो खोल, की तो भरनी काडे कंपन्याचो संस्थापक आपलां आयुष्य पणाला लायसे. (जॅग्वार कार, ५०१ साबण, धीरुभाई अंबानी, जमशेदजी, लक्ष्मीनिवास मित्तल हेंच्यो अश्योच काण्यो सत.)
सुरेंद्र मोहन हेंणी फक्त रेनकोटची कंपनी काडली नाय, तर तेंणी एक अघोषित युद्ध सुरु केलां सलां. तेडला डकबॅकाचे प्रत्येक बॉक्सावर एक वाक्य दिसे – ‘DUCKBACK: Entirely Indian’. “भारतीय भांडवल, भारतीय मजूर, भारतीय कच्चा माल आणि
भारतीयाची बुद्धी.” हें फक्त ब्रीदवाक्य नतलां, तर तां ब्रिटिशांचे अहंकाराला दिलेलां एक सणसणीत थापट सलां. आज आमी आत्मनिर्भर भारत बद्दल बोलसों, तेड्ला शंभर वर्खांपयलीं सुरेंद्र मोहन हेंणी तुरुंगाचे कोठड्यांत उगडे दोळेंनी बगलेलां हें स्वप्न तितकांच प्रेरणादायी से. विज्ञानाला जर देशभक्तीची जोड दिली, जाले पावसाच्यो धारोय प्रगतीचो मार्ग आडोंव शकत नाय, हेंच सुरेंद्र मोहन हेंणी सिद्ध केलां से. एका भारतीयाचे स्वाभिमानाची ही काणी दकबॅकाचे प्रत्येक धागेंत विणलेली से.
(तळटीप: सुरेंद्र मोहन बोस हेंची अमना ५० वी पुण्यतिथी से.)
वेदिका गाडगीळ
गोवा.
फोन: ८२०८१६५६०५
चित्पावनीचे संवर्धनासाठी गणपुले फाऊंडेशन चे उपक्रम
- चित्पावनी भाषाची तोंड ओळख – ऑनलाईन कार्यशाळा
- चित्पावनी पाठयक्रम
- चित्पावनी त्रैमासिक
- छापील चित्पावनी दिवाळी अंक
- संकेतस्थळाची सुरुवात
हिशेब लागे हवो- रोहिणी कुलकर्णी
बरेच दिवसां पाश्णी हो विषय, हें वाक्य माझे मनात घोळत सलां म्हटलां एतां लेव्हेच घेवया.
माजो मांव (अर्थात माझे सासरे) .. बाबा म्हणत सल्यां में.. हेंचां हें वाक्य. वक्तशीरपणा, वस्तू नीटनेटकेपणान जागे वर थेवप, सुंदर वळणदार अक्षर, हाडाचो शिक्षकी पेशा, सगळे विषय शिकवीत सले तरी इंग्रजी भाषावर जबरदस्त पकड. शेक्सपियर तोंडपाठ, मराठीवर सुद्धा तितकीच हुकूमत. तर असे सासरे मूळचे शेतकरी कुटुंबातले. कष्टाळू जीवन. किडुक मिडूक जमोवनी संसार करेची सवय बहुतेक ते काळ चे सगळेंचीच सली तेला बाबा अपवाद नतले.
एतां हिशेबाची गोष्ट किता ती बघूया.
तेनां एखादी वस्तू गावत नसेल जाले सगळेंना विचारीत. आमी बी सोदीत सलों पण नाय गावली जाले नाय असा म्हणोनी आमचे तकल्यांत्थीन तो विषय कडाला पडे पण तेंचे तकल्यांत्थीन जात नसे. दाहा दाहा वेळा विचारीत आयले गेलेलेला. आमी वैतागत सलों एकेकदा. पण तेन्चो शोध सोपत नतलो .आमी म्हणणार सांडली तर सांडली दुसरा हाडतां येल तेडला ते म्हणत सांडली तरी पण तशी खात्री हवी न्हूय तेचो हिशेब लागे हवो .खात्री सले शिवाय सांडली हेचेवर विश्वास कसो ठेवेचो? पटत नसेच तेनां कारण तेंचा थेयणा व्यवस्थितच सत सलां वस्तू नायशी जालीच कशी असां तेंचा मत.
ते एतां नाय. पण माला मात्र कय कय तरी तेंचे हे वाक्याचो पडताळो येसे.
गेटीकडा दुधपिशव्यो थेवे एक पिशवी बांधनी थेयसत लोक तशी आमची बी हवी.
तेडला बोड्यो वेल्ले मजलेवर आमी खालती र्हेत सलों. एक दिवस सकाळीं सकाळीं परस्पर एक पिशवी तेणीन वरती न्हेलेली माला खबर नतली. में सवयी प्रमाण पिशव्यो हाडे गेल्या तर एक कमी दिसली. मनात विचार केलो आज दूध वालेन कमी थेयली सनांर.
दुपारी परत एक पिशवी फ्रिजा थीन गायब जाली अणि हे बी माजे अपरोक्ष जालां. माला प्रश्न पडलो.
सद्दा ३ पिशव्यो घेत सलों. पिशव्यो घरात हाडेच्यो, फ्रिजांत थेवेच्यो हें सद्दाचां माझा काम. आज तेंत अनपेक्षित बदल झालेलो. वरती बहुतेक वेळा एकच पिशवी जाय आज दोन गेल्यो पण माला कळला नाय. म्हणी बोड्येला म्हटलां आज एक पिशवी कमी दिलीन से दुधवालेन. तेडला माला म्हणसे नाय मेंच दोन न्हेल्यो (कारण दुधाचे पिशव्यांचो हिशेब सुद्धा दूधवालेला सारखो देवे हवो.) आज दूध सांडला म्हणी अणिक एक न्हेली पिशवी….. तेडला हुश्श! म्हणत मनात म्हटला ..”हिशेब लागायला हवा” असां बाबा की म्हणत…
आज माजी भूमिका बदलली. तेडला ते कुटुंब प्रमुख सले एतां आमी. हिशेब थेवेची जबाबदारी आमचेवर आयलेली. तेडला ते वडीलधारे म्हणी हिशेब विचारीत एतां तां काम आमचां. साधे साधे गोष्टींचो हिशेब थेवेची सवय आपसुकच लागली. जाण्टेनी दिलेले संस्कार मोग संसाराच्यो जबाबदाऱ्यो पडल्यो की असे कामी येसत.एकेकदा ती वस्तू तितकी महत्वाची बी नसेल,परत मिळो शक्से पण हवी त्याचां कितां जालां हेचो हिशेब लागे हवो.. पटो लागला से मनापाश्णी.
रोहिणी कुलकर्णी
बेळगावी
फोन: ९७४२४९९८१४
अनभिज्ञ- सुभाष जोशी
अनभिज्ञ क्षण तो जेवेळा पयली
आयुष्याची पायरी ओलांडली
विलक्षण शक्तीची जाणीव जाली
महाअरण्यी रातकिडेचो भय गेलो
पहाट्याचे वेळा सुंदर अनुषा दिसली
तत्क्षणी अजाण नाय जाणीव जाली
मातासमान शान्त जालो कुशीत
जो नामरूपाविना सार्वभौम अनंत
मृत्युंचा कसला भय ते एकरूपात
म्हणी निस्सीम प्रेम हे आयुष्यावर
जन्ममृत्यू से त्याहां समान स्वर
भुरगां रडसे करशील स्तनाथिन दूर
दुसरा स्तन धरनी सुखात निदवसे
सुभाष जोशी
गोवा
फोन: ७०२०६१८३२८
आमी भावंडा- पूजा विष्णू मराठे
मात्याचे जमिनीवरच जन्मलों
मात्याचो स्पर्श, वास घेत
खडबडीत खळेंत रांगलों
शेकारेंचे वाटांन धावलों
पडलों, धोपरांय फुटली पण …
दोतोराकडा केड्ला आमी गेलोंच नाय || १ ||
पावसापाण्यात खेळलों
झर, पाटाचां पाणी प्यालों
उसळे, भाकरी गावठी तांदळांचा
दह्या बरोबर आटवलय जेयलों, आमी
मोठी केड्ला झालों तां कळ्ळांच नाय ||२||
कुळागरांत वायंगणांत खेळलोंकुदलों
माड्याचे पोवल्यांवर्थीन निसर्लो
मेरांवर्थीन धावताना पडलों, खूपदा रेबेंतय बुडलों पण …आमी
‘अळशीक’ केड्ला म्हटलांच नाय ||३||
बेडी पुंजायली, नारळ हाडले गुंडे मारनी
तोरां जांब बी पाडले
एका मेकाची
कपाळां फुटलीं पण …
कुरकुर केडला आमी केलीच नाय ||४||
पाटलो घेव्नी आंबे मुट्टे वेचले
कडाकेचे निबरांत, डोंगर चढलों उतरलों
केड्ला तरी निसरोनी बी पडलो
काटे लागले, खुट्यो तोपल्यो पण..
रडे आमलां केड्ला आयलांच नाय ||५||
व्हाळ पार करनीं गेलों
आड्यांवर्थीन पेलतडी गेलों आयलों
दुर्गांवर चडलों उतरलों नाटकां, कालेंना जाताना
रात्री चुट्याचे उजेडांत फिरलों पण…
भय केड्ला आमलां दिसलोच नाय ||६||
रानांवनांत खूप फिरलों
पोटभरी रानमेवो खाल्लो
काण्णां, कणेंरां, चुर्णीचे काटे लागले
आवळे, चिंचो, घोटगां, कोंग्लां,खाल्ली पण…
पुरे, एतां नाकां! असां आमलां केड्ला झालांच नाय ||७||
सगळेंची लग्ना झाली संसारात गुंग झालो
सगळेंनां सांभाळनीं घेत घेत
प्रत्येक नातां जपत ऱ्हेलों
दिवस, म्हयने, वर्खा सरली पण…
वय केड्ला झाला ता आमलां कळ्ळांच नाय ||८||
पूजा विष्णू मराठे
गोवा
फोन: ७०८३०७८६२१
विदरणा- भावना दातार
अगो चेडी, कितां सामखी
लाज घालयलीस,
मेलेले देहाचीय तू,
खिल्ली कशी उडयलीस ? १
देवापाठोपाठ सगळीं,
तुमला हात जोडसत,
तुमला शिके म्हणी,
लोक देह दान करसत…२
तू मात तेंचे,
विसरोनी गेलीस उपकार,
बुरसे तुजे नदराला,
दिसले निस्तेच आकार…३
“प्रणित” नावाचे अर्थाची
तेनीय नाय थेयलीन जाण,
कॉलेज्यात तू “चिंधी” म्हणोनी,
अणखिनच खाल्लीस घाण..४
शिक्षणाचो, आई -बाबाचो,
शापच घालयलोत मान,
कें, कितां बोलेचां,
हेचांय उरलां नाय भान? ५
कोण एतां माननांर सत,
तुमची दुखां खरी?
कशी विसरतील अवहेलना,
नाक घसटलांत तरी??..६
भावना दातार
बेळगुंदी, बेळगाव
फोन: ९४८०४८४७१०
आमी मध्यमवर्गीय सों!- विद्या दांडेकर
आमी मध्यमवर्गीय सों ही भावना साधारणता २०-२५ वर्खा पयलीचां सुरक्षित, साधां पण स्वप्नाळू जीवन शैलीचां प्रतीक सलां. मध्यमवर्गीय सणां म्हणजे केवळ मर्यादित उत्पन्नाचो गट नसोनीं त्याला एक जीवन शैली म्हणा किंवा संस्कारांची शिदोरी. बाकी “आमी मध्यमवर्गीय सों” असां म्हण्टानां ते पाठलो संघर्ष, साधेपणां अणि स्वप्नांची आठवण हसे. बहुतेक मध्यमवर्गीय माणसां एकाच गोष्टीची चिंता करसत अणि ती म्हणजे पैसो. कितको प्रयत्न केलो तरी शेवटाला पगार खर्च हसेच. म्हयनेचे शेवटाला तेंचां बँक खातां रिकामा हय्वेचे मार्गावर ससे.
मध्यमवर्गीय घराची सुरुवात हीच मुळांत नियोजित ससे. म्हयन्याचो पगार जालो की, पयले तारखाला दुधाचो, पेपरवाल्याचो अणि किराणाचो हिशोब मांडेचो. सगळेंत महत्वाची गोष्ट म्हण्जे प्रत्येक रुपयो खर्च करताना तो दाहा वेळां विचार करनीं खर्च करेचो. कारण पुढेंत प्रश्न उभो ससे पुढले म्हयन्याचां नियोजन कसा करेचां? हो प्रश्न सद्दानीं मनांत घर करनीं ससे. तेमुळां काटकसर हो शब्द अगदी रक्तात भिनलेलो ससे.
सगळेंत मोठां वैशिष्ट म्हणजे शिक्षणाबाबत सलेली ओढ. आपल्याकडा ना जमीन-जुमलो ना इतको पैसो आडको, ससे तां फक्त शिक्षण. हेंच वाक्य आजपावेतो आयके मिळसे. भुर्गेनची शाळेची फी देव्वेसाठी स्वत:चो छंद, आवड, नवीन कपडे, खर्चिक सहली हे सगळेंचो त्याग करनांरे आई वडील हे प्रत्येक मध्यमवर्गीय घराचे आधारवड, ‘नायक’ ससत.
जुनें काळांत “डिस्टिंक्शन किंवा स्कॉलरशिप” मिळयणां हो केवळ आनंद सोहोळो नतलो ते प्रत्येक घराचो सन्मान सलो. कारण ते काळांत सुखाच्यो व्याख्या साध्यो सल्यो. उन्हाळ्याचे सुट्यांत मामात्यां जायवेचां, आदितवारा सकाळी टीव्ही वरथी लागणारो चित्रहार, किंवा रामायण, महाभारत बघेचां, तसांच सणावाराला मिळ्ळेले नवीन कपडे हेंत जो कितां निखळ आनंद सलो तो हे आजचे म्हारगी ( महागडे ) गॅझेटमध्यां सुद्धा मिळेचो नाय. शेजाऱ्यांशी बी सलेलां नातां इतका घट्ट सलां की घरातली साखर जर सोपली जाले हक्कांन मागत सले. न बलायता सोयरे धायरे एकमेकाचे घरा जात सले.
म्हणजेच ते काळात सुखाची व्याख्या पण खूपच साधी अणि सोपी सली. बारीकशी केलेली सहल, किंवा मामाचे घरा जायवेचा हेचे सारखां समाधान आताचे तेपाला परदेशवारी करनीं बी गावेचा नाय. नवीन सायकल मिळनांर हें ते वेळां वाडेवेल्ली ब्रेकिंग न्यूज सयवेची. वस्तूंची किंमत हि पैशेंत हत नतली जाले ते सायकलीची किंमत बाबाचे कष्टाचे रुपांत जोखली जायवेची. तेड्लाचे काळांत घरां ल्हान सली पण माणसांची मनां मात खूप मोठी सली. शेजाऱ्याकडा रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट संबंध सयवेचे. कसलांय सुखदु:ख सों अख्खो वाडो, एक हयवेचो. पण आजकाल आम्ला आमचे शेजारी कोण ऱ्हेसे हेचो पत्तो नस्से. मैत्री तर दूरच.
‘आमी मध्यमवर्गीय’ हें केवळ एक वाक्य न्हुय ती एक जाणीव सली. एका संघर्षाचो इतिहास सलो. एका पिढ्याचां जगणेचां सार सलां. जेड्ला आमी हे ‘इन्स्टंट संस्कृतीत’ स्वतःला पाठल्या वळोनीं बघसों तेड्ला तो मध्यमवर्गीय काळ आम्ला खूप कितां शिकौव्नीं जासे.
मध्यमवर्गीय सणां म्हणजे नेमकां कितां? तर मर्यादा अणि स्वप्नां हेंचेतलो सुवर्ण मध्य गाठेची एक बाबडी धडपड. आईचे पदराला बांधलेलो तो चाव्यांचो घोस (जुडगो ) अणि आलमारितली हिशोबाची ती इवळीशी चोपडी हे प्रत्येक घरातलां अर्थ मंत्रालय सलां. मध्यमवर्गीय घरात केंचीच वस्तु हि एकाच कामासाठी हाडीत असां नतलां. उदा: कपडेंचो प्रवास हो खूप मोठो विलक्षण सयवेचो. मोठ्या भावाचो शर्ट धाकट्या भावाला मिळेचो. इतको वापरेचो की शेवटी तेचो वापर सुडको म्हणीं चुलिकडा हय. तिच काणी शाळांतले वस्तूंची. चोपड्यांची उरलेली कोरी पानां काढनीं त्याची एक रफ वही तयार हत सली. पुस्तकांवर कडक पुठ्याचा कव्हर घातला जायवेचा. जेणेकरनीं पुढले वर्खा तां कोणाचे तरी उपयोगाला येल. असले प्रक्रियाला लागोनीं केड्ला गरीब सलेलेची जाणीवच ऱ्हेली नाय. उरफाटो वस्तूंचो आदर कसो करेचो हि शिकवण मिळ्ळी.
एतां आमी प्रगती केली. यशाची शीखरां पादाक्रांत केली सत. आर्थिक सुबत्ता आयली म्हणीं आयुष्य खूप सोपा झाला से. परंतु आजय बी मनाचे एका कोनाडेत ‘मध्यमवर्गीय सुखाचो काळ’ कारोतरी जीवंत से. कारण ते काळांन आम्ला संयम, त्याग अणि नात्यांची खरी किंमत शिकयली. म्हणोनीच आजय आमी ‘मध्यमवर्गीय सों’ हे सांगताना काळीज अभिमानान भरोनीं येसे. कारण एतां तेच संघर्षाचे अणि संस्कारांचे पावलांवर्ती आमचां ‘यशस्वी भविष्य’ ठाम पणान उभां से.
विद्या दांडेकर
पुणे
फोन: ९८९०८९०४६०
धांगड- कृष्ण वझे
नावावर्थीन हें कितां से, हेचो बोध सध्या कोणाला हयेल असां दिसत नाय. जाण्टेंचे लक्षात येल एखादे वेळा. सांगसां..
पावसापाष्णी भीजे हंव नये म्हणी केलेलां एक साधन. साधारणपणान पन्नास ते पंचावन वर्षाचे आधी हे साधन अगदीच कांही लोक तात्पुरता असां करीत सले. घरगुती कसां! लागीचे लागी पावसात कारां जावेचा जाले हेच उपयोग करीत. तेडला छत्र्यो अगदी कमी. कारां दूर जायवेचां जालां तर छत्र्यो वापरीत.
मीटरावर कापेती मिळत सल्यो, त्याची खोळ करनी घेत. मेणकापड म्हणत तेला. एता तऱ्हांतराच्यो छत्र्यो आयल्यो. बारीक मोठ्यो रंगीत, बटणाच्यो. शिवलेले तयार रेनकोट आयले. सों……
आसरणांची कशी प्रगती हंत गेली हे दाखयणेसाठी हो एक लिव्हेचो प्रपंच इतकांच——–
एतां आमी मूळ पदावर येवया.
धांगड
माडीच्यो (पोफळीच्यो) बारीक कांबी. चार ते साहा जोड्यो घेवेच्यो लांबी रूंदी साधारणपणान हात ते दीड हात. जमिनीवर बरोबर लावनीं चौकट तयार करेची. तेचेवर माडीचे चुट्टांच्यो पोवल्यो पाणी भितर येता कामा नये असे पध्दतीन लावेच्यो. वर्थीन परत एकेक कांब थेवनी घट्ट ताठो बांधेचो. हेचे करता दाभण अणि कुमयेचे किंवा केवणीचे बारीक दोर वापरे मिळसत. जालां धांगड तयार.
एक साधां सोपा बीनखर्चाचा पण थोडासा उपयोगाचा हे धांगड.
पाउस आयलो कीं, धवी बाजू तकल्याहारथीन अणि पोवल्यांची दुसरी बाजू काफीकोर ( तपकिरी ) रंगाची गुळगुळीत वर्थीन थैवेची अणि दोनी हातांन धरेचा तकल्यावर. भिजे हंत नाय. पोवल्यावेल्या पाणी बरां पागळोनी जाते. न्हेला कारांय काय उभां करनी थेवेचां.
धांगड
अल्पमोली बहूसंतोषी पावसांतलां आसरण.
पोवली = माडीचे चुडताना पुढां संसे ती.
आसरण=पावसात भिजे होंव नये म्हणी तकल्यावर हातात धरेचां एक साधन.
तागे=दोन्हीबाजूनी कांबी धरनी घट्ट बांधसत तेला ताठो म्हणसत.
केवण = बारीक सरळ ( झिळ ) झुडपां.
कृष्ण वझे
गोवा
फोन: ९४२०३१७१२८
जाग- अंजली माधव भिडे
तू रात्री येवनीं गेलोस
माला कळलांच नाय रे
कशी पापयी नीद लागली
काय समजलांच नाय रे
खूप दिवस जाले, वाट बगीत सल्यां
आठवणीत सामकी, बावोनीं गेल्यां
दिवसा सुस्कारे सुटत सले
रात्रीचे तळमळे लागत सले
खायवे कांय गोड लागत नतलां
पेज जेवनीं दिवस काढीत सल्यां
अणि कीतां कीतां हत सलां कितां सांगो
पण में बी अडाणी अशी कशी
तुला हें भलतांच सांगत बेसल्यां
तुला माजां सगळां खबर सतानां
तू सय म्हणी में सां, असां सगळेंना सांगसां
पण तू मात असो कसो रे निर्दयी
आपलां काय्येक तू माला सांगत नाय
तुजे मनात कितां से, तांय बी कळत नाय
इतकी काय रे में परकी जाल्यां तुला
तेयसा एक दिवस मध्यांच तुजो भास जालो
चकचकाट गडगडाट करीत
सगळे जण तुला हाडे धावले
में बी सगळी तयारी केली
भायेल्लां सगळा धाकनीं थेयला
घरातलेना भायेर घेवनीं आयल्या
दूरथीन साटली पोटली दिसत सली
में वेळ, काळ, वय विसरोनीं गेल्या
नदर तुजे वाटाकडा लायली,
पण तू ते धावरे वारेचो हात धरलोस
अणि माजे पुढेत्थीन धावत पुढां गेलोस
तू असो कसो विसल्लोस कोण जाणे
माजो मात हेगडा हसो जालो
मोग में थरयला मनापाष्णी
हे पुढां असां, पुढा पुढा करेचा नाय
तुजे नादाला अजिबात लागेचा नाय
तुला हवा जाले ये, नाय जाले नाकां येंव
पण असां करे, माला मात जमेचा नाय
तुजां माजां नातां से युगायुगांचा
हें में मानसा अणि ते प्रमाण वागसां
तुजां मात कितां कळत नाय
तू माला ओळखसय का नाय हें बी खबर नाय
पण तेणी माला कायच फरक पडत नाय
तू सय सगळेंचो हें में जाणसां
सगळेंनाच तू हवो सय असांय म्हणसां
तुजी रुपां अनंत, अथांग
प्रत्येकाचो तू वेगळो सय
माजो तू फक्त माजेकडाच सय
अणि तो तू माजो फक्त माजोच सय
एतां कसलोच संभ्रम नाय मनात
काल तू आयलेलोस तेडला
माला मात सुस्त नीद लागली
तन- मन सगळा घुवों लागला
राना वनात मुरली वाजो लागली
एक असीम तेज गात्रांनी रिगलां
सक्काळी निरामय जाग आयली
थोडे वेळा पयली अनुभवलां तां कीतां
प्रश्न घेवनीं भायेर आयल्या
स्वप्न का खरां ! सोदू लागल्या
सगळांच ताजां टवटवीत अणि नितळ
तरी बी मन भोवसे हेगडा तेगडा
इतकेत पोरसाचे धडाला नदर गेली
दिसली लुसलुशीत तेरेची एक कोमरी
वारेबरोबर हसत सली, खेळत सली
तुजे येणेची खात्री करे अणि कितां हवी खूण
राग आयलो तुजो पण एक कळलाय बी
इतके दिवस में जागरणां सोसली
आज नीद मोड नाकां म्हणी सनांर
तू माला न उठयतां परत गेलोस
हे आज जाला तां जालां
परत तुला असां करे देव्वेच्या नाय
तुजे पाळतीवर जागत बेसनांर
येतकच पयली कानाला धरनांर
माला न सांगता जासयच कसो
हेचो तुला खर जाब विचारनांर
में अशी लाख तयारी करनीं थेयली से
पण माला हेंय बी खबर से
तू येतकच में हेतलां कायच करे पाव्वेच्या नाय
तुजे बरोबर में व्हावोनी जानांर सां
तसा बगे गेले माला तांच हवा ससे
पण.. हो ‘पण’ आडवो येसे
म्हणीं में भायेर कांयच दाखवीत नाय
सोंदे तां सगळां एतां तुजे माजे भितर
असे मनाचे खेळ चालेचेच
ते मुळांत ससत अव्यक्त, चंचल
एतां हें सगळा पुराण एठा पुर्ण करसां
एकच शेवटचा सांगसां तुला
तू परत आयलोस का तुला तसो सोडेच्या नाय
दोन कामा सगळेंत पयली करेची सत
तुजेबरोबर मात्यांत, सृजनाचे मंत्र पेरेचे सत
अणि माजे बरोबर तुलाय बी भिजवेचो से
अंजली माधव भिडे
गोवा
फोन: ९५१८७६५५३७
मैत्री- विद्या दांडेकर
जग कितकांय बदलला तरी
केड्लाच न बदलनांरी
कसलीय वेळ आयली तरी
साथ केड्लाच न सोडनांरी
न बोलता समजोनीं घेनांरी
एक अनोखां नातां जपनांरी
अपयशाच्या काळखांत
आशाचो दिवो हनांरी
नां रक्ताचां नां धाग्यांचा
नातां केवळ मनाचां
सुखात सोबत हसनांरी
दु:खात आसवां पुसनांरी
मनाचो आरसो ससे मैत्री
चुको दाखोवनीं पदरात घेनांरी
आयुष्याच्या शेवटचे श्वासापर्यंत
सोबत सनांरी.. साथ देनांरी…
विद्या दांडेकर
पुणे
फोन: ९८९०८९०४६०
परिसीमा- सुभाष जोशी
ती आयली, ती आयली परंतु
स्तब्धता अनिर्विन्ण जाली
जशो मुंग्यो स्पर्शान दूर हसत
तद्वतच शांतता भंग पावली
विक्षेप, भ्रम का आभास?
का मनोवेगाचो परिहास?
विचारांचो जमलो कल्लोळ
भावनांचो जालो हल्लोळ
शब्द शब्द नि:शब्द जाले
वाचा सगळी आटोनी गेली
मन संयमी हत गेलां
इंद्रिया एकरूप जाली
अतिंद्रीय अवस्था जाली
पैलतीर खूप धूरकट दिसलो
विस्तीर्ण निर्जन माळरानी
कुंजनगुंजन खुप मिसळला
अचानक एक स्वर घुमलो
अनाहत स्वर तोच सलो
अंतर्यामी एक तार छेडली
प्रणव परिणत जालो सलो
सुभाष जोशी
गोवा
फोन: ७०२०६१८३२८
रेसिपी- रमा जोशी
१. पिके घोटांचा सांसव!
कृती १-: पयलीं वासापुरतो शंकर छाप हिंग किंवा खडेचो हिंग, ५/६ सुक्यो मिरसांगो, सासवां, कातलेलां खोबरां भाजनी बारीक वाटप तयार करनीं थेवेचां.
कृती २ -: ७/८ बरी पिक्की घोटां ( रायवळ आंबे) धोव्नीं त्यांचो साली काढनीं बरी हातान चिड्डोनीं रस काढनीं बाठ्यो बी तेतच एकिकडा करनीं थेवेचां.
मोग १/२ कांदे बारीक चिरनीं फोडण्यांत भास्टवेचे. ( कांदो नाकां तें घालू नाकां. ) करवीलाची चार पानां घाला मोग तेंत सोललेली घोटां ओता. बारीक, मंद आचेवर शिजवा. चवीपुरतां मीठ अणि गॉड ( गुळ) घाला. तेचे वर वाटप घाला. सगळां एक जीव हयसर ढवळा. बरो खतखत आयलो काय गॅस बंद करा. उनुनित भातावर कालवेला घेवेचां, बरां रूचीक लागसे सांभारा बी काय एक नाकां. हेला “घोटांचा सासंव बी म्हणसत.”
“हरवां करसत तां रायतां!” तेचे साठी हिंग, सासवां, हरव्यो मीरसांगो, ओलां खोबरा सगळां बारीक वाटनीं रायतां करेचां.
विशेष म्हणजे भाजनीं -वाटनीं, फोडण्याला घायलां जाले घोटाची थंडी हत नाय अणि बादतय नाय. असां अणिक बरां लागसे.
२. कारेत्याचो कायरस
साहित्य -: चार कारेती, पांच सुक्यो मीरसांगो, एका नारळाचां खोबरां, हिंग, सासवां, मेथी, १ चमचोभर तांदूळ, १ चमचो चणेची डाळ, ( शेंगदाणे किंवा चणेची डाळ हेचेमुळां कायरस बरो आळोनीं येसे.) रुच्याप्रमाण मीठ, गॉड अणि चिंच.
कृती १ -: पयलीं कारेती धोव्नी तेंचे काटे तासनीं बारीक पातळ फोडी करा. वरती मीठ मारनीं मात्शी चेपणांला थेवा. पाणी सुटसे तां काढनीं उडवेचां. मोग फोडी इवळे तेलांत घाल्नी बऱ्यो कुरकुरीत हयसर भाष्टवेच्यो.
कृती२ -: एका कायलीत चार चमचे तेल घाल्नी सुक्चो मीरसांग्यो, हिंग (शंकरछाप सलो ते वास बरो येसे इतकांच.) चार मेध्याचे दाणे, सासवां, खोबरां, शेंगदाणे नाय जालेवर चणेचीडाळ अणि तांदुळ, असां सगळां बरां खरपूस भाजनीं बारीक वाटेचां. ( चिंच वाटत सताना घाला.) मोग दाट बुड सलेलो तोप नायजाले कायल घेवेची. फोडणी करनीं कारेतेच्यो फोडी घालेच्यो. वरती वाटप घालनी बरां ढवळेचां. चवीपुरतां मीठ, गॉड घालेचां. बरां आटवेचां, शीजलां काय वाढेचां. भाकऱ्या बरोबर खायवे एकदम बरां लागसे. बरां रटमटाव्नी शिजयलां जाले बेळसत नाय. दोन दिवस बी खावं शकसों. करा अणि खावनीं बघा.
३. मेतकूट
साहित्य -: १ वाटी डाळं, पाव वाटी तांदूळ, दोन चमचे सुकी कोथंबीर, १ चमचो जिरां, थोडी सासवां, हिंग, हळद, सुंठ, ४/५ मिऱ्याचे दाणे, चवीपुरतां मीठ, चिमुटभरी ओवो असां सगळां घेव्नी ‘बरां खरपूस भाजेचां’ अणि मिक्सरांत नायजाले जातीणीवर ( उपलब्ध सयेल जाले. ) बारीक बरां दळेचां. मऊ बरो उनुनीत भात, गावठी तूप अणि मेतकूट घेव्नी जेवेचां. भात इतको बरो रूचीक लागसे की अजूनय चपकोभरी भात जेवेची रूच येसे.
आयते वेळा तोंडिलावे कितां करु असो प्रश्न पडसे तेड्ला अर्धी वाटी दाट नारळाचो आपरस घ्या अणि तेंत २चमचे मेतकूट अणि इवळा गॉड घाला, कालवा अणि खाय्वे घ्या.
असां मेतकूट मुद्दाम करा अणि खाव्नी बघा!!
तुमी कसां करसां मेतकूट? कितां कितां साहित्य घालसा तां पुढले खेपा नक्की रेसिपी बरवनीं धाडा. ( कारण प्रत्येकाची जिन्नस करेची पध्दत वेगळी ससे.)
देव बरां करू!!
श्रीमती रमा जोशी
गोवा
फोन: ७५०७१५८४०३
खंडेनवमी- माधव बांबरावेल्लो
खंडेनवमी किंवा खड्ग नवमी म्हणी ओळखलो जाणारो दिवस म्हंजे शस्त्र पूजनाचो दिवस. “गोरवांचे पाडवे” दिवसा गोरवांना न्हाणवनी, पूजा करनी तेंचे गळेंत रोजांचे हार चढसत, अणि न्हवरो-न्हवरी सलेसारखीं तीं दिसों लागसत. (अर्थांत, पंधरा मिन्टांतच ते गळेंतले हार एकामेकांचे गळे खालते गेलेले ससत, ती गजाल अलायदा!) तशोच खड्गनवमीला खळेंत उभ्यो सलेल्यो गाड्यो, घोड्यो आज शुचिर्भूत होवनीं गळेंत रोजांचे हार घालनीं मिरवीत ससत. कंप्युटर, रेडीओ, टिव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन अणि मोबाईलचे कपाळावर सुद्धा गंधाचां बोट ओढलां जासे. खोरीं, कुदळी, पाळ, कोयते, कुराडी असले आयुधाना, भिंत्याचे एका कोन्सेतलो (कोपरेंतलो) जागो निव्वळ करनीं शस्त्रां ओळीत थेव्नीं तेंची पूजा करसत, बऱ्यो वाती, उदवाती बी ओवाळनी!
आमचो एक शेजारी खे विसर्जन केलेले गणपतीची माती घेवनी, आपल्या बायलाचे जीबल्यासारखी एक जीभ तयार करसे अणि त्याची पूजा करसे, असां दुसरो एक शेजारी तिसरे एका शेजाऱ्याला सांगताना में आईकलेलां. खरां खोटां तो पयलो अणि दुसरो शेजारीच जाणत! नंग्या तलवारी सारखी चालणारी त्याची जीभ म्हणजे भलेभलेना गारद करणारां एक शस्त्रच!
इतके सगळे आवताना मान देंत सताना ज्याचां अख्खां आयुष्य एका कोन्सेत जासे, अणि ज्याला वर्खांत्थीन एक दिवस सुद्धा सुटी मिळत नाय असां बहुपयोगी पण दुर्लक्षित असां आवत किंवा शस्त्र म्हंजे सळाथी!
बाकीचे आवताना निदान हो एक दिवस तरी सुटी ससे, पण सळाथ्याला मात्र आपलां काम चुकत नाय. सकाळीं आपलां सद्दाचां काम करनीं हतकत आजचे मानकऱ्यांकरतां जागो निव्वळ/स्वच्छ करेचां काम बाबडां त्यालाच करेचां पडसे. तां जालां काय मात्र त्याला आज सचैल न्हाण घालनी पूजा करेचे जागेवर थेयसत. पण एठा सुद्धा त्याचो जागो कोपरेंतच!
नवी करकरीत सळाथी वापरे काढसत ते दिवसा त्याला सवाष्णी सारखां हळद कुंकू लावनी त्याचां स्वागत करसत. तेवेळा त्याचां सर्वांग रोमांचित जाले सारखां नाजूक आवाज करीत सळसळसे! त्याचो हिरांचो संभार बघनी ती हिरकणी सारखी दिससे! पण हें औटघटकाचां हिरकणीपण!
पुढलेच क्षणाला, देवघरा पासणी सुरुवात करनी ती खळेचे पायऱ्यांपावत सगळां घर स्वच्छ करसे. खळां झाडेचां काम मात्र त्याला नवी सताना करेचां पडत नाय. तेमुळां ती आधीच्या सळाथ्याकडा मात्शी तुच्छपणान बघसे. कांय दिवसानी आपली अवस्था तशीच हनांर हें त्याचे तकल्यांत येंत नाय. खळेंत सलेली सळाथी मात्र या नव्या सळाथ्याचे तोरेकडा, हंसोनी बघीत ससे. खिन्नपणान!
एक मात से! सळाथ्याला प्रवेश निषिद्ध असो कारोच नाय. नारळ फोडेचे निमतान कोयतेला रांदपाचे खोल्यांत प्रवेश मिळसे पण तो तितके पुरतोच! बाकी आवताना सहसा घरांत कितां चाललांसे तां बघेची संधी मिळत नाय. मरोळी मात्र अपवाद! ती अधिकशी घरांतच ठाण मांडणी ससे! सळाथी मात्र मुक्तपणान चुली पासणी “प्रणयखोली” पर्यंत घराचे प्रत्येक कानाकोपरेचो आढावो/धांडोळो घेवे मोकळी. माळो, कंत्रेल, खिडक्यो, दारांसकट घराचे प्रत्येक भागांत, मागीलदारा पाश्णी पुढले दारा पर्यंत सगळेला ती फिरोनीं येसे. सकाळीं फिरफिर फिरोनीं, दमोनीं भागोनीं ती परत आपले जागेवर जावनी बेस्से, नाय जाले तेच कोपरेंतले भिंतीवेल्ले खिळेला लटकत ससे. पण बिनघोरपणान ऱ्हेवे मिळेलच हेची खात्री केडलाच नस्से. एरवीं आपले पॅंटीत्थीन भितल्ले चड्ड्याची नाडी भाएर येवनीं लोंबत सलेली, किंवा पॅंटीची चेन लावेची उरलीसे, हें सुद्धा खबर नसलेले नवरोबाला गॅसचे वेल्ल्यावाटाचां कोळीष्टक मात्र बरोब्बर दिससे. तां काडेचां काम सळाथ्याचेच नशिबांत लिव्हलेलां ससे.
घरातलीं सगळीं माणसां जेवनीं मात्शीं आडवीं हसत तेड्ला मात्र बहुतेक सळाथ्याला विश्रांती मिळसे. पण तेचे आधी जेवनीं जाले बरोबर आपले धोंदावर हात फिरवीत अणि ढेकरी काढीत एकेकटो “दांतकोरणे”चे शोधांत येवनी सळाथ्याचे हिराचो एकेक लचको काढसत. एकेक हीर मोडलो जासे तेड्ला शब्दशः त्याचो “हिरमोड” हसे. पण आपले कामाकडा ती हयगय करीत नाय.
अशा या सळाथ्याला खरां म्हंजे शस्त्र पूजनां दिवसा अग्रस्थान मिळे हवां. कारण सहज हातालागीं सलेलां शस्त्र म्हंजे सळाथी. धूमकेतूचे आकाराचे हे वस्तूचो उपयोग “केर काडेचां साधन” हेचे पेक्षां शस्त्र म्हणीच अधिक!
एखाद्या मुंग्यां पाश्णी गोठेंतले खोडगे “मंग्या” पर्यंत, पाठीवर रमाटो घाले सळाथी उपयुक्त! अणि हें शस्त्र दुधारी! दोनय वाटान वापरे मिळसे. मुंगी, विंचू, पाल, असले धोपटणे लायक प्राण्यांना धोपटे सळाथ्याचे पुढले वाटाचो उपयोग, अणि कुत्रो, गोरवां, म्हसरां असले चतुष्पादांचे पाठीवर रमाटो घालेचो तो मुगडेचो. ल्हानपणात केड्ला केड्ला आई माजेवरय हो मुगडोप्रयोग करी. जेवे बेसलेलेकडा आयलेलो बोकलो सुद्धा हे मुगडेचे प्रसादान कृतार्थ हय.
पाठी एकदा कारो तरी एक बाबा एका बायलाला मुगडेन बडवनी बडवनी भूत उतरावीत सलेलो व्हिडिओ बघलो. भूत म्हटलां काय माजे हातपांय भयान कडकडूं लागसत. भुताचे भयान में रात्रीचो अजिबात घराभायेर पडत नाय. हो व्हिडिओ बघनी माला मात्सो धीर अणि उत्साह आयलो. साक्षात भूत उतरावेची ताकद सलेली ही सळाथी म्हंजे कितां तरी विशेष चीज सनार अणि इतके सवाय उपायान जर माजो भूतभय कमी हनांर सयेल जाले उत्तम काम हनांर, असो विचार करनीं में दीड दोन हजार रुपये खर्च करनीं मुद्दाम ते बाबाचे दर्शनाला गेलों. त्याहां में पावलों तेड्ला एक बाईल तोंडांत्थीन हूं का चूं न करतां मुगडेचो मार खांत सली. खूप वेळान ती बेशुद्ध पडलेसारखी आडवी पडली. मोग दुसरी बाईल येवनीं तेचे समोर उभी ऱ्हेली. त्याचां भूत उतरावेचो विधी चालू जालो. ती तशीच काळी निळी हयसर मार खावनीं धाराशाई जाली. दहा एक जणींचां भूत उतरायले उपरांत तो बाबा रुपी वेताळ बहुतेक दमलो. कडाला जावनी तेणी पाण्याची बाटली तोंडाला लायलीन. कसो कोण जाणे पण नेमको तेच वेळा माला, “गांवांतलो, सदा सर्वकाळ टाईट सणारो, झेंगडो येतकत येसे तसलो उग्र वास आयलो.”
एतां हळूहळू त्यो जमनीवर निपचित पडलेल्यो बायलो उठोनी उभ्यो ऱ्हेल्यो, अणि भितर काऱ्यो तरी गेल्यो. बहुतेक त्यो एतां भूतबाधा मुक्त जालेल्यो.
में भायेर आयलों. त्याहां खूप दुकानां सलीं. बहुतेक सगळे दुकानानी सळाथ्यो विके थेयलेल्यो दिसल्यो. में एका दुकानात किंमत विचारली. चार हजार रुपये आईकतकत मेंच चाट पडलों. पुढले दुकानात सवाय मिळनांर असो विचार करनीं दहा पंधरा तरी दुकानां पालथीं घायलीं. पण सगळेकडा एकच दर! शेवटी चार हजार रुपये देवनीं एक सळाथी घेतलीच. चार हजार रुपयेंचो विचार करनी कितां उपयोग?
माजो भुतांचो भय घालयनार जाले जाव तेगडा चार हजार!
घराशीं येवनीं में सळाथ्याला कितके रुपये पडले ते बायलाला सांगतकत त्याणी ती सळाथी माजे हातांत्थीन हिसकावनी घेतलीन अणि……..पुढां कितां केलान तां सांगे सारखां नाय!
दोनच दिवसांत माला ती सळाथी अणि आमची घराकडली दिडशें रुपयेंची सळाथी हेंत एका हिरा इतको सुद्धा फरक नाय हें कळलां.
माजे धंदेवाईक मनात अचानक एक कल्पना आयली.
ते बाबाचो फोन नंबर मिळवनी सळाथ्यो पुरवठेची ऑर्डर मिळसे काय बघे हवी. तो बडवीत सलो ते हिशोबान जाले एका बायलाला एक सळाथी लागत सनार. म्हंजे बरीच मोठी ऑर्डर मिळों शकसे, असो विचार माजे मनात येवनीं गेलो. अणि हे बाबाचां खरां रूप जे वेळा उघड हयेल ते दिवसा ते सळाथ्याना मागणी अधिकच वाढनार. फक्त फरक इतकोच की सळाथ्याचो पुरेपूर उपयोग करेची सवयच सलेले बायलांचे हातांत सळाथ्यो सनांर अणि प्रसाद भक्षण बाबा करीत सनांर!
चार हजार रुपयेंची सले मुळां या सळाथ्याची काळजी मात्र मात्शी जास्ती घेतली जांव लागली. दांत कोरे नायले पुढां कापूस लावनी कान कोरे या सळाथ्याचे हीर वापरणेवर सक्त बंदी आयली.
पावसाचे दिवसांत मंडळी मारे जुन्या सळाथ्याचे हीर वापरुनी कापसाची बोथी वापरेचो हुकूम सुटलो. मंडळीना खळेचे भाएर “स्वीप शाॅट” मारनी पाववेचां काम जुन्या सळाथ्यालाच लागलां.
नवी सळाथी फक्त घरांतलोच केर काढे वापरेची.
पण हे लाड जेमतेम पांच सहा म्हयने चालले. ती तब्येतीन, आरोग्यान बरी सली तोपर्यंतच! पयलींसारखां काम त्याचेकडा हत नाय जालां अणि त्याची रवानगी थेट गोठेंत जाली! अणि आश्चर्य म्हंजे घरांत्थीन त्याची उचलबांगडी जाले बरोबर, त्याचां चक्क लिंगपरिवर्तन जालां. म्हंजे इतके दिवस “ती सळाथी” सलेली, एतां पुल्लिंगी “तो खुटारो” जालो! इतके दिवस घरांतलां ते मानान सोपां असां काम करेची सवय जालेल्या सळाथ्याला म्हातारपणात मात गोरवांचे शेणामुतांत लोळेचां नशिबांत आयलां! पण आपली कर्तव्यपरायणता त्याणीन सोडलीन नाय. जर्जर होवनीं त्याचो एकेक अवयव मोडों लागलो, सुटों लागलो, गळों लागलो. सळाथी हें निवडणूक चिन्ह सलेले पक्षासारखीच त्याची अवस्था जाली.
शेवटी एक दिवस त्याचो सगळो मुगडो सैल जालो अणि त्याचे सगळे हीर अस्ताव्यस्त पसरले. में ते सगळे लागीं केले अणि मुगडे सकट चुलींत न्हेवनी घायले!
माधव बांबरावेल्लो
गोवा
फोन: ९४२०५९६९८२
पावसा ये- अंजली माधव भिडे
पावसा पावसा ये रे ये
आमचे घरा ऱ्हेव्वे ये
खळेंत आमचे धाव्वे ये
व्हाळांतले कोंडीत कुदे ये
रोव पेरे, मेरी बांदे शेतांत ये
ओळवाची चरी लाव्वे ये
तवशिणीच्यो बियो पेरे ये
कोंगलां सोदे काजीनी ये
तायकीलो, कणक्याचे कोंब काडे ये
आमटीणी, भेडसां खायवे ये
परसेत भाजलेली भिंगटा खायवे ये
तिखट- गोड सालां खायवे ये
गड्डेनी, गुंडेनी खेळे ये
एकाच छत्र्यात भिजे ये
भिजताना रुजोनी ये, रूजोनी ये
भिजयताना जीवन दे, जीवन दे
अंजली माधव भिडे
गोवा
फोन: ९५१८७६५५३७
पड्डेआडचो स्वातंत्र्यसैनिक (कै. केशव रामचंद्र भुस्कुटे)- डॉ. माधव गोविंद भुस्कुटे
नानोडा-अस्नोडा गोवा, तसो ल्हानसोच गांव. वस्ती तशी खूपच कमी. पोर्तुगीज काळांतली ही गजाल.
गोवेची सीमा सकिरव्हाळ अणि महाराष्ट्राची सीमा दोडामार्ग. तेड्ला महाराष्ट्र प्रदेश म्हंजे गर्जेतलो प्रदेश अशी म्हणेची प्रथा सली. पोर्तुगीजांचो अंमल गोवेवर सलो. पोर्तुगीज ‘गोवेंतले लोकांचो’ अमानुष छळ करीत सले. धार्मिकस्थळां- देवळां, मठ हेंची नासधूस करेची अणि बाटाबाटी करनीं लोकांना त्रास देवेचो. हेला लागोनीं लोक खूप कंटाळले सले. असे प्रकारचे छळणुकीला लोक कंटाळले कारणान स्वातंत्रतेचो उठाव सुरु जालो.
दरमेन गोवा राज्य पोर्तुगीजांचे त्रासापाश्णी वाचवे हवो हे कारणांन गोवेंतील अणि महाराष्ट्रातील राष्ट्रप्रेमी लोकांनी पोर्तुगीजांचे विरुद्ध स्वातंत्र्यतेचो लढो उभो केलो. कैक स्वातंत्र्यसैनिकांनी हाल अपेष्टा सोसनीं प्रसंगी तुरुंगवास भोगनीं प्राणार्पण सुद्धा केलेनींं से.
ते काळांत गोवेंत महाराष्ट्रात्थीन धान्य – चीजवस्तू हाडेच्यो लागत. तेचेंवर पोर्तुगीजांचो प्रतिबंध सलो. मोग गोवेंतले कांय लोक तां धान्य, त्यो वस्तु लिपवनीं (गोपनीय पद्धतींन) कसां-बसां हाडीत सले, अणि आपल्यो गरजो भागवीत सले.
गोवेंतले लोंकाचो उदरनिर्वाहाच्यो कांय वस्तु हाडेचे कामांत, गोवेंतले बरेच परोपकारी लोकांचां सहकार्य सलां. असोच एक कार्यकर्तो म्हणजे नानोडा गावांतलो सुपुत्र कै. केशव रामचंद्र भुस्कुटे . ‘निर्भिड कष्टी, जिद्दी अणि धडपडणां’ हो तेंचो स्थायीभाव. योग्य तां मिळवेचांच असो करारी स्वभाव.
गोवा स्वतंत्र हव्वेच हवो अणि आमचे गोंवेकारांना स्वतंत्र / मोकळेपणांन व्यवहार करे येव्वे हव्वो हें लक्षांत घेव्वनी केशवांन ‘पोर्तुगीजांविरुद्ध लढो देणेसाठी’ सोलदार मोंतेर वगैरे पोर्तुगीज अधिकाऱ्यांचे विरुद्ध चिड, तिरस्कार निर्माण करणी’ हे लोकांपाश्णी कसो धोको से हें जनमानसांत रुजव्वेचा काम केलांन.
असांच एकदा महाराष्ट्रातले एका स्वातंत्र्यसैनिकाला, “आज मोंतेर किंदा तरी वेगळी चाल खेळणार!” असां सांगे केशव महाराष्ट्रातले कळंबे गावांत गेलो सलो. तेड्ला परत येतांना थोडां धान्य घेव्वनीं परतत सतांना एका सोलदारांन तेला धरलोन अणि पाठ मोडेस्तोवर भरपूर चोप देव्वनीं आग्वादचे तुरुंगात उडयलोन. केशवा कडत्थीन खूप जवाब घेतलो गेलो. तो बी खरां तांच सांगीत सलो. पण सोलदार तां मान्य न करता पाठीवर अणि पायांवर चाबकाचे फट्के मारनीं पाठ फोड्नीं काढलीन.
५ – ६ दिवस तुरुंगात काढलेवर केशवाला सोडणेत आयलो. पाठीचे कणेला खूप मार लागले कारणांन केशवाला केंचाच काम करणां शक्य जालां नांय. तरी पण नाईलाजांन कुळागरांतली कामां, बैलगाडी (खटारो), शेत पेरणी असे प्रकारची प्रापंचिक कामा करेची जबाबदारी सलीच. गोवा स्वातंत्र्य हव्वेच हवो असां मनांत सोवनी बी कांयच करे मिळत नतला. तरी पण गोवा स्वातंत्र्य संग्रामात सहभागी जालेले लोकांना ‘पोर्तुगीजांच्यो कारवायो, चोरयांड्यो (गुप्त मसलतींन) कळयणां अणि तेंना प्रोत्साहित करणां” असां कार्य केशवान चालूच थेयलान सलांन.
१९६१ सालांत गोवा स्वतंत्र जालो. पोर्तुगीजांचे अमानुष, क्रूर अणि जुलुमी राजवटीत्थीन गोमन्तक मुक्त जालो. गोवा मुक्तीत सहभागी जालेले अनेक स्वातंत्र्य सैनिकांचां स्वप्न साकार जाला. आज आमी गोवेतले लोक मुक्तपणांन अणि समाधानांन फिरसों वावरसों तां तेंचेंच कर्तृत्वांन अणि पुण्यायान.
केशव काकांसारखे नैक स्वातंत्र्यसैनिकांचा हे बलिदान, समर्पित वृत्ती लक्षात घेव्वनीं गोवा सरकारांन तेंचो उचित सन्मान करनीं तेंना उपकृत केलेनीं से.
कै. केशव काकांसारखे अनेक स्वातंत्र्यसैनिक सत. तेंचा कार्य जनमासनांत येव्वे हवां, म्हणीच हो लिखाणाचो प्रपंच.
डॉ. माधव गोविंद भुस्कुटे
पुणे
फोन: ९४२३९०८२२२
माझे ल्हानपणातलो पाऊस- विद्या शरद भुस्कुटे
माला पावसाळो ल्हानपणा पाश्णीच खूप आवडसे. धोधो पाऊस पडो लागलो की आई उनुनीत भजी नाय जाले कितांतरी खायवे करी. आमी सगळी पडव्यात बेसोनीं गजाली करीत खात सलो. बरोबर पिव्व्ये कोथिंबीर,गंजनाचा पाणी.
पण एतां पाऊस तेड्ला सारखो पडतच नाय. तेड्ला पाऊस खूप पडे .सगळीकडा थंडगार वातावरण हय. आम्ला शाळांत जाताना मध्या व्हाळ सलो तेमुळां पाऊस पडलो की व्हाळ दोनय वाटांनी भरोनी व्हावे. मग आमची शाळा आमच्या पडव्यातचं भरत सली. कारण माजे दादाचं आमचे गुरुजी सले. पण तेना शाळांत जायवाच लागे. आमचे शेजारची भुर्गीं आमचेत्याहाच येत सली. गुरूजी आमला अभ्यास देव्नी जात सले. आमचो थोडो अभ्यास जालो काय आमी खेळत सलों. छत्र्यो घेवनीं व्हाळाला पाणी कितकां आयलासे तां बघे हळूच आई, आजीची नदर चुकोवनीं जायवेचां अणि येताना एकमेकांवर पाणी उडवीत भिजोनीं येत सलो. घरा येवनीं आईची तापवणी सत सली. असो दोन, तीन दिवस पाऊस घोंग्यानीं ( मुसळधार) पडत ऱ्हेत सलो तेला लागोनीं आमची शाळा चार दिवस घराशीच. मज्जाच सत सली आमची.
घडघडो अणि वीजचमको लागली की माला खूप भय दिसे मोग में आजीच्या कुशीत ओग्गी बेसत सल्या. आजी आमला सांगे म्हातारी आभाळात गुंडे दळसे म्हणी घड घड आवाज येसे. आमचेत्या तेड्ला लाईट नतली. तिनसांन जाली की चिमण्यांत/ दिवेंत रॉकेल भरनीं त्यो पेटवेच्यो. पण पावसाळेत वारेमुळा चिमणी विझत सली मोग आमी कंदील पेटवीत सलों. तेच उजेडात सगळां आटपोनी लोक्कोर निदवनी सोडेचां. भायेर धोधो पाऊस पडत सयवेचो. पावसाचे आवाजान बरी नीद लागे. खूप पाऊस पडों लागलो की, चुल्यावर पणसाची भिंगटा/आठळ्यो भाजनी खायवेच्यो. आई पणसाची, आंबेची साठां घाली. ती खोबऱ्याचो कुटको घेवनी खायवेची. पणसाचे पापड कोळसेत भाजनी खायवेचे. अशी आमचे ल्हानपणातली खाणां सली. आमचे भुरगेनां एतां असला खायवे नाकां.
माजे ल्हानपणातले दिवस आठवले की, खूप आठवणी ताज्यो हसत. तेड्ला आमला बाजारांतली खाणां मिळत नतली पण आमची घरची खाणांच बरी लागत.
पावसाळेची बेगमी म्हणी आई सांडगे, पापड,भरलेल्यो मिरसांग्यो, साठां, अशी सुकवणां करी. गरेची सालां घाली. साला म्हणजे हिरवे गरे मिठाचे पाण्यात चेपणाला घालेचे अणि पावसांत ते काढनीं पाण्यात निवळत घालनीं मोग भाजी करेची. नायजाले ते गरे वाटणी तेची भाकरी करेची. खूप रूचकर लागसे. पाऊस पडों लागलो की आमचे शेजारची भुरगी आमचेत्यां येत नाय जाले में तेंचेत्यां जात सल्या. खूप मजा करीत सलों.
पावसाळेंत सगळीकडा हिरवागार हय. आमचे घराचे पुढां एक मळ सलां त्याहां में आई बरोबर तायकिळेची भाजी काढे जात सल्यां. आसरे कापेतीची खोळ घेवनीं जायवे माला आवडत सलां. मोठ्ठो पाऊस आयलो तरी खोळ घेवनीं भीजे हत नतला. ते मळावर्थीन दूर एक धबधबो दिसे. माला निसर्ग सौंदर्य बघे खूप आवडे एतांय बी आवडसे.
पण तेड्लाचो पाऊस अणि एतांचे पावसांत खूप फरक से. एतां पाऊस जर पडो लागलो जाले खूप नुकसान करनीं जासे. पयली पाऊस खूप पडे पण बरा दिसे.
माला बाकीचे ऋतूंपेक्षा पावसाळोच आवडसे. थंडगार वातावरण ससे. खूप प्रसन्न दिससे.
धन्यवाद !
विद्या शरद भुस्कुटे
गोवा
फोन: ७८७५७७८८२३
