चित्पावनी संकेतस्थळावर तुमचां स्वागत से
चित्पावनी बोली भाषा बद्दल माहिती देणारे संकेतस्थळावर तुमचां स्वागत से.
हे संकेतस्थळावर तुम्ला चित्पावनी बोली भाषा, साद चित्पावनीचो हे एकमेव चित्पावनी त्रैमासिक, चित्पावनी भाषाचे प्रसाराचां काम करणाऱ्यो व्यक्ति, चित्पावनी उपक्रम अणि चित्पावनी बद्दल घडामोडी हे विषयांची माहिती मिळनार सें.
चित्पावनी बोली भाषाबद्दल
चित्पावनी ही चित्पावन (कोकणस्थ) ब्राह्मणांची बोली भाषा. गोवेत ही भाषा ‘क्यें किता’ हे नावांन प्रसिद्ध से.
ह्या भाषाचो उगम रत्नागिरी एठा जालो असां म्हणसत. गोवेंतले सत्तरी तालुक्येंत जास्तशी कुटुंबां ही बोली बोलसत. तसांच दक्षिण कन्नड जिल्हेंत ही बोली बोलणारी कुटुंबां जास्त प्रमाणात मिळसत.
गणपुले फाऊंडेशन बद्दल
आपल्या भारतीय संस्कृतीचा जतन करेला अनेक उपक्रमांवर गणपुले फाऊंडेशन काम कर्से. चित्पावनी भाषाचो प्रचार अणि प्रसार हैवो म्हणी चित्पावनी बोली बद्दल खुप उपक्रम गणपुले फाऊंडेशन घेसे.
साद चित्पावनीचो हे अंका बद्दल
खुपसे जाणकारांचे सहकार्यान हे अंकाचा प्रकाशन एक वर्खापाष्णी करणां शक्य जाला सें.
व्यक्ति
चित्पावनी बोली भाषावर संशोधन करनी बरीच पुस्तका बरयली गेली सत. ज्या व्यक्तिंनी हे चित्पावनी संवर्धनाचा कार्य केलां, त्या व्यक्तिंबद्दल थोडकेत माहिती हे संकेतस्थळावर दिली से.
शोध निबंध, पुस्तकां असे रुपात ह्या व्यक्तिंनी चित्पावनी बोली भाषाचो प्रचार अणि प्रसार करे खूप मदत केली से. तेंचे भरीव कार्याला शतशः वंदन.
उपक्रम
पाठले साधारण दीड वर्खापाष्णी, गणपुले फाऊंडेशन द्वारा चित्पावनी बोली भाषाचे प्रचार, प्रसार अणि संवर्धनाला बरेच उपक्रम घेसत .
जाण्टेंना कार्यशाळा, ल्हान भुर्गेंना वर्ग, चित्पावनी अभ्यासक्रम निर्मिती असे उपक्रम राबवनी ह्या भाषाचां अस्तित्व टीकवेचे प्रयत्न सुरू सत.
संकेतस्थळा वेल्लां चित्पावनी लिखाण अचूक सैवां म्हणी श्री. अशोक नेने अणि सौ. आरती मोने हेंचा खास मार्गदर्शन मिळलां से.
अधिक माहिती हवी सयेल जाले आम्ला संपर्क करा
चित्पावनी बोली बद्दल जास्ती माहिती अणि गणपुले फाऊंडेशन घेत सलेले उपक्रमांबद्दल माहिती हवी सयेल जाले आम्ला संपर्क करा.
