साद चित्पावनीचो - एप्रिल २०२६

साद
चित्पावनीचो

चित्पावनी त्रैमासिक, वर्ख ३ | अंक दुसरो
एप्रिल २०२६ 

 

संपादिका: सौ. आरती मोने

 

मुखपृष्ठ, संकलन, अक्षर जुळवणी, प्रकाशन: गणपुले फाऊंडेशन, ठाणे, महाराष्ट्र

(c) गणपुले फाऊंडेशन (डॉ. सौ. अनुश्री वैभव गणपुले)

 

या अंकातील मजकूर प्रकाशकांच्या परवानगी शिवाय अन्यत्र प्रकाशित करण्यास मनाई आहे.

या अंकात वापरण्यात आलेली चित्रे इंटरनेट वरून घेण्यात आली आहेत.
सर्व चित्रांचे कॉपीराईट मूळ लेखकांचे व संकेत स्थळांचे आहेत.

अंकात व्यक्त झालेली मते लेखकांची वैयक्तिक मते आहेत.
त्याच्याशी संपादिका व प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.

 

प्रकाशन दि.  चैत्र कृ. १०, १२ एप्रिल २०२६ 

अनुक्रमणिका

—-  तुम्ला सगळेंना हिंदू नववर्षाच्यो हार्दिक शुभेच्छा  —-

संपादकीय- आरती मोने

नमस्कार !!!

 

नवे विचारांचा नवां ‘बी’, नवे विषयांची नवी ताकद  अणि नवे वर्खांचे ‘चैत्राची’ गंधीत सुरुवात मनाला ताजी करसे, मन प्रसन्न करसे; अणि हे आनंदाला दुप्पट करे तुमचे सारखे अनेक चित्पावनी भावा भेणिशींची बरी साथ मिळसे. हेचे पेक्षा आम्ला वेगळां सुख तां कितां! म्हणी, उत्साह वाढयनांरे, चित्पावनी भाषावर प्रेम करनांरे, हे अंकाला घडयनांरे सगळे साहित्यिक, ‘बरां हंवन्दे’ असो आशीर्वाद देनांरे जेष्ठ श्रेष्ठ हितचिंतक सगळेनां माजो मनापाश्णी नमस्कार!!

“साद चित्पावनीचो” हो अंक आपले नावाप्रमाण तुम्ला साद घालसे अणि तेला प्रामाणिकपणान “ओ” देवेचां कामं तुमी करसां म्हणिच अंकान अम्ना तिसरे वर्खांत पाऊल थेयलांन से अणि सगळेंचे आधारान आपली पाळां मुळां घट् करे सुरूवात केलीन से हेचां कारण तुमचेसारखे प्रेमळ वाचक, चित्पावनी प्रेमी अणि चित्पावनी साहित्यिक. अशीच प्रेमळ साथ द्या!

 

फुलां वेगवेगळ्या रंगाची, वासाची, आकाराची सली तरी तेनां एकिकडा बांध्नी थेयनांरो दोर संपूर्ण वळेसर सुगंधी करसे अणि नवां रुप देसे. तेच प्रमाण  “गणपुले फाऊंडेशन” आपलांं कार्य उत्स्फूर्तपणांन पूर्ण करसे ही अभिमानाची गोष्ट. तसांच साहित्यिक आपले लिखाणात्थीन व्यक्त हसत. साहित्य वैयक्तिक, सामाजिक अणि कलात्मक असे अनेक कंगऱ्येत्थीन तसांच वैशिष्ट्यपूर्ण ससे अणि हीच आमचे साहित्यिकांची खरी ओळख. चित्पावनी साहित्यिकांचा लेखन दिवसेंदिवस प्रभावी हंव लागलां से. असो अनुभव तुम्लाय बी हो अंक वाचताना नक्कीच गावनांर से! 

स्वतःचे अनुभूतिला कल्पकतेची जोड देव्नीं नवनिर्माण जालेले विचार पूरक कसे ? हें वाचा “हरिकाकाची गणपतीची शाळा.”  हें असां हंव शकसे? हेचां उत्तर सोदे गुल्ल जालीत नी?   ऱ्ह्या… ऱ्ह्या….! कितां ? विचार सुरु से? तसां जाले थोडी हसा बघूया. कारण हसणां आरोग्याला फायदेचांच!  हय का नाय? मोग वेळ किताला सोमतेच हास्यविनोद वाचा अणि पोटभरी हसा. 

 

एतां वाचा रहस्यमय, “अनाकलनीय काणी.” छे छे … अहो भयबीय कायच नाय… “शेवंताला नेमको केंचो देव पावलो काय? वाचा अणि तुमीच सांगा केंचो देव.  “कें कितां ‘ शिकणाऱ्या नवशिकेनां, चित्पावनी भाषाची ओढ लागली, प्रेरणा मिळ्ळी. आपल्यो “चार ओळी का सय नात; माजो परिचय तरी चित्पावनीत देवं शकसां असां म्हणत लेखिकेन चक्क आपलो परिचय देव्वेचो प्रयत्न केलोन हेलाच म्हणेची जिद्द.  “मनाला प्रसन्न करेचां तर देह बी चैतन्यमय सैय्वे हवो!” बरोबर नी? तेला लागोनीं आमचे एका यात्राकारान् केलेलो संकल्प ‘तालांसुरात’ गावनीं बघा. कदाचित तुमचीय “, नर्मदा परिक्रमा ” पूर्ण हयेल अणि सहज ओठांवर शब्दय येतील “नर्मदे हर हर !”

 

जरी जग सुधारलां, घरां सुधारली, प्रत्येकाचे वागणेंत बदल जाले. तरी पण एतांची  परिस्थिती बघतां, माणसाला, देवाकडा अशी केंची गोष्ट मागेची वेळ येसे तां समजोनी घ्या ‘माणूसपण’ हे कवितात्थीन. २१ वे शतकात अनेक माध्यमात्थीन चित्रफिती बघल्यो म्हणी आनंद मिळेलच हेची खात्री नाय. पण  फक्त आपले आवाजान पात्रां पुढेंत सलेगत आनंद देनांरो, मंत्रमुग्ध करनांरो कोण सयेल सांगां? बरोबर… “जुनां तां सोनां!” मोग चला ते ‘रेडिओ’ लेख वाचता वाचता , जुने काळांत मात्सी पासय मारनीं या! एतां अशीच पुढां बिनधास्त ६०/७० वर्खा पाठले काळांत चला. एतां  मामात्या जावनीं आयले सारखां दिसे हवां जाले वाचा (एक उत्कृष्ट लेख),  “भाऊ टुबक ठो.”

 

मामात्या मजा आयली नी? बेसा… इवळी विश्रांती घ्या. 

 

टिवी लावनीं देसां, बघा थोडो वेळ! अजिबात नाकां. दिवसभरी  तांच तांच बघे कंटाळो येसे. मात्र जे घरात  “सि अणि सा’ सुरू ससे त्याहां बऱ्योच करामती हसत. हें कळे हवां जाले एतांच वाचा “सिरीयली अणि सासू” ( लेखनाची धाटणी अप्रतिम नमुनो. )

 “मनाचे आरसेंत अचळय बघा, कर्म मनाचो आरसो’ वाचा अणि मनाचे परीक्षांत पास व्हा!  मनापाश्णी भक्ती सली ते देव कोणाचेय रुपात मदत करसे. वाचा, अप्रत्यक्ष आनंद घेत, संताचे रुपांतले रामभक्ताला शोधेचो प्रयत्न करा, “माणसांतलो देव कांरो दिस्से का,!”

पुढां.  चैत्र  पाडवो,  ज्वलंत  प्रश्न, आरसो, चौकटी भायलां पाऊल, वांदर ( उत्तम कविता ) तसांच अंकातले शेवटाला  वाचा “एता तीऽऽ सत्तरी उल्ली नाय”  प्रत्येकाला आपले गावाचो अभिमान ससेच तो कसो हे वेळ काढनी वाचा !! घरांतलेना वाचनी दाखया. गणपुले फाऊंडेशनला अभिप्राय धाडा ! चित्पावनी भाषा सगळी मिळोनी समृद्ध करूया! 

 

परत एकदा सगळेंनां नवे वर्खाच्यो शुभेच्छा देसां!!

 

देव बरां करुं!! धन्यवाद!!

संपादिका
Aarti Mone

सौ. आरती मोने
साखळी, गोवा
फोन: ७०३८०६२५३६

गणपुले फाऊंडेशन चे वतीन- वैभव गणपुले

नमस्कार !


साहित्यिकांचा अभिनंदन अणि वाचक प्रेमींना धन्यवाद! तुमचे मायान साद चित्पावनीचो अंक तिसरे वर्खाची वाटचाल करीत सें. 


एक कल्पना ते तीन वर्खा सातत्यान प्रवास, हेंच ह्या अंकाचा यश सें. 


गणपुले फाऊंडेशनान चित्पावनीचा कार्य सुरू केलेपाष्णी, चित्पावनीचो प्रसार अक्खो भारतच न्हुय तर साता समुद्रा पार जालो सें. जाण्टेंसाठी तोंड ओळख कार्यशाळा, ल्हान भुर्ग्यांसाठी कार्यशाळा, निबंध लेखन स्पर्धा, हे त्रैमासिक अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळा चित्पावनीचो प्रसार खूप झपाटयान जालो सें हेचे बद्दल दुमत नाय. 


गणपुले फाऊंडेशनाचे चित्पावनी कार्यामुळा, चित्पावनीची व्याप्ती बरीच वाढली से अणि अनेक संस्था अणि संघ चित्पावनी संवर्धन करू लागले सत ही आनंदाची गजाल सें. परंतु में दिवाळी अंकात सुद्धा लिहीलेला – जेड्ला काम वाढसे तेड्ला प्रत्येकाला कितातरी वेगळा करेची इच्छा हसे. अणि कळत नकळत एक स्पर्ध्याच सुरू हसे.


तर, स्पर्धा न करता, सगळे चित्पावनी प्रेमींनी एक हवनीं हे कार्य वृद्धिंगत करणां ही आज काळाची गरज सें. एकीचा बळ ही काणी तुम्ला खबरच सनार. तेच प्रमाण सगळेंनी एका दिशान प्रवास करनीं कसो चित्पावनीचो प्रचार अणि प्रसार करू शकसो हेचो विचार करेची गरज से. चित्पावनी प्रसार, प्रचार अणि संवर्धनासाठी  गणपुले फाऊंडेशन कटिबद्ध सें, अणि सातत्य ही फाऊंडेशन ची खरी ओळख सें. 


‘२०३० साला पर्यन्त प्रत्येक चित्पावन घरांत चित्पावनी’,  हो संकल्प करनीं गणपुले फाऊंडेशनचो प्रवास सुरू से अणि हे कार्यात तुमच्या भरीव सहकार्याची (आर्थिक न्हुय) गरज सें.   


चित्पावनी साठी तुमी कितां करू शकसा – घरातले मंडळींना चित्पावनी शिके साठी प्रोत्साहित करा, बोली भाषेची तोंड ओळख कार्यशाळात सहभागी व्हा, तुमच्या परीचयातले किमान १० चित्पावन कुटुंबांना हे कार्याची माहिती द्या, दिवाळी अंकाचो प्रचार करा, ल्हान भुर्गेंना कार्यशाळात धाडा, तुमच्या चित्पावन संघात किंवा कुल संघात चित्पावनी ची माहिती देव्वे साठी आम्ला निमंत्रित करा.


येत्या काय दिवसांत “दिवाळी अंक साहित्य” घेव्वे सुरू करनार सों, तुमचा साहित्य बरवे सुरुवात करा. तसांच, चित्पावनी भाषेची तोंड ओळख कार्यशाळा सुद्धा आयोजित करनार सो, तेत भाग घ्या.


तिसरे वर्खाचो दुसरो अंक संकेतस्थळ रुपात तुमच्या हातात देताना माला खूप आनंद हसे. सगळेंना नवीन वर्खाच्यो हार्दिक शुभेच्छा !


चित्पावनी आमची माय, आमी सगळे एकत्र येवनी त्याचा रक्षण करूया .. !    


आता एकच ध्येय – २०३० पर्यन्त प्रत्येक चित्पावन घरात चित्पावनी. 


धन्यवाद !

Vaibhav Ganpule

वैभव गणपुले
संस्थापक – गणपुले फाऊंडेशन
ठाणे, महाराष्ट्र
फोन: ९९२०३४५८६१

हरीकाकाची गणपतीशाळा- दिनेश्वर जोग

आमचे धर्मात वर्खभरी सण सुरू ससत. काय सण निसर्ग पूजेचे जाले काही संस्कृतीच्या पूज्यांचे ससत. तेतलेतेत आवडतो अणि आनंदाचो सण म्हणजे गणेश चतुर्थीचो. नेण्टेपाश्णी जाण्टे पर्यन्त सगळेंना आवडणारो हो सण. 

 

म्हणी हेच सणाविषयी एक नवीन अणि विनोदी गोष्ट म्हंजे एक कल्पना सुचली, ती लिव्हली से. (“अतिशयोक्ति किंवा वाचताना कथेतलो मुळ मुद्दो मनाला पटलो नाय तरीय हो एक काल्पनिक विचार से इतकांच लक्षात घेव्नी वाचा म्हंजे झालां !”) बदलते काळांत अश्यो घटना घडों पण शकसत. हो केवळ माजे मनाचे विचारांचो खेळ वेगळां काय नाय!

  

चतुर्थीला प्रत्येक गावांत गणपती हाडसत अणि वेळावर पूजा करे कोण मिळत नाय. प्रत्येकाला दिससे की तेंचे गणपतीची पूजा ११ वरां  नंतर अणि २ वाजे पयली तरी हय्वे हवी. सकाळां लोक्कर तयारी करे नाकां अणि सगळी दुपारचां जेवणय बी वेळावर जेंव शकसत.  

      

आमचे हरीकाकान रामपूर गावांचा भटपण पत्करलान सलां.. गाव तसो मोठो म्हणी दर चतुर्थीला हरिकाका ४ ब्राह्मण बलावी. तरी पण चतुर्थी कडा सगळें सांगसत, “काका आमची पूजा बेगीन जांवदी हां!” पण बाकीचे तयाऱ्याला मात उशिर. सकाळी १० वरानां गांवकार वाडेवरचे पयले घरांत भट / ब्राह्मण पावलो, जालेवर त्याहां गणपतीचे मखरांत लायटी लावेच्योच सल्यो. “काका आमकां आजून मातसो वेळ आसा हां. तोमेरेन कोणाची तरी पूजा करून यो!” ब्राह्मण दुसरे घरात गेलो जालेवर, “काका सगळी तयारी जाल्या. आत्ता चेडो मरे गणपती हाडुंग गेला हो बघ… तिसरे घरांत गणपती मखरांत बेसयलेलो पण पूजाचां साहित्य कितांत नतलां .. पळी, पंचपात्री, समई, निरांजन, नेवेद्याला फळां वगैरे हाडे सांगलां.. पयली पूजा हैय्वे १२ जाली…. अणि पावसकार वाडेवरचे पूजानां संध्याकाळचे ४ वाजोनी गेले. दरवर्खा हें असांच हत सलां. हरीकाका सामको कंटाळलेलो. 

 

एक दिवस तेंचे तकल्यांत एक विचार आयलो. तो विचार बरोबर से का चूक तां तपासे तेणिन सगळेंना सांगलोन. 

समजा, ब्राह्मणाचे हातान पूजा केलेले गणपती लोकांना गावो लागले जालेवर? पयलीं हो विचार कोणालाच पटलो नाय, सगळेंनी हो मुद्दोच भायेर माल्लो. पण काकान समजावनीं सांगलान. मोग, सगळेंनी तेला संमती दिली. हरीकाकाला खूप आनंद झालो, किं तर तेंचे बरोबर ‘गांव भटपणाला’ येनांरे सगळेच भटांचो प्रश्न एतां सुटणार सलो.  

 

हरी काका एतां नेटानं तयाऱ्याला लागलो. तेणिन थरयलां की गणपतीची शाळा काडेची. आवड म्हणी तो पयलीं धावेंत गणपती रंगवे जात सलो. म्हणी इवळी माहिती बी तेला सली. एक दिवस बोड्येला घेवनीं हरीकाका बेळगांव गेलो. त्यांहाथीन तेंचेनी गणपतीचे तऱ्हातऱ्हांचे उफाडे ( साचे ) हाडलेनी. माती बी कें गावसे? केंची माती बरी? हें तेला सगळां खबर सलां. रोकडीच माती बी हाडेची व्यवस्था केली. श्रावण म्हयनो लागेचे पयलींच हरिकाकान बोड्येला बरोबर घेवनीं गणपती करे नेटान सुरवात केलीन. मोग तेणी तेचे बरोबरचे ब्राह्मण विनूकाका, तेचो बोड्यो, तसोच शाणूकाका, म्हादेवकाका असे दोग-चौग जण तेंचे मदतीला येंव लागले. असां करतां करतां शंभरेक गणपती तयार झाले. हरीकाका गणपती करसे ही बातमी एतांपावत आयले पयले गावांतय पावलेली. पण हरीकाकान बोड्येला म्हटलांन, “बाबू, अम्ना इतकेच गणपती पुरे मोग पूडले वर्खा बगूया कसां कितां हसे तां!” तोय बी तेचे वर कांय बोयलो नाय. 

 

श्रावण उजाडलो अणि तेंचेनी गणपती रंगवे घेतले. म्हण्टां म्हण्टां गणपती रंगोवनी तयारय झाले. हरीकाकाचो आनंद गगनात मावत नतलो. मोग तेणिन चतुर्थीचे पयली सगळीकडा जायरात प्रसिद्ध करेचां काम केलान. पेपरावर घायलांन, थोडी पत्रकां छापनी घेतलीन अणि शेजारचे प्रत्येक गावांनी चिकटायलीन. “एठा आमचे शाळांत पूजा केलेले गणपती गावतील; पूजा ब्राह्मणांनी अणि पुराणोक्त पद्धतीन केली गेली से हें बी तितकांच खात्रीलायक!” अशी जायरात वाचनी लोकांना अप्रूपच दिसलां. थोडेनीं हे विषयी काकाला विचाल्लांय बी, काका हें कसां कितां? म्हंजे असां चालसे?

 “बघा.. एतां पूजा करणारे दिवसें दिवस कोण गावत नाय, गोंवेंत तर नायच .. एतां चे बोड्ये घरा घरांत जावनीं पूजा करे तयार हन्नाय. भायेरचे ब्राह्मण हाडेचे पडसत अणि तरीय पूजा करे उशीर हसे म्हणी सगळेंची गाऱ्हाणी ससतच का नाय?” तेन्ला काकाचा म्हण्णा पटलांय बी. थोडे पुरेतांनी बी हे गोष्टीला पाठिंबो दिलो. 

 

चतुर्थीचे आदले दिवसा सकाळपाश्णी ब्राह्मणांना बलावनी पूजा सुरू केल्यो. बुंदीचे लाडू नेवेद्याला थेयले. दुपारला महानेवेद्य झालो. संध्याकाळा भजनाचो पंगड (भजनी मंडळी) आयलेलो. बरां ३-४ वरां भजन झालां. चित्र शाळांत शंभरय मुर्त्यांची पूजा अगदी व्यवस्थित जाली, हें सगळेंनी बघितलां. 

 

दुसरे दिवसा सकाळी घे लोक आयले. दुपार पर्यन्त सगळे गणपती घेवनीं गेले. हरीकाकाची ही कल्पना फलद्रूप झाली, यशस्वी झाली. जेनां पूजा करे ब्राह्मण मिळत नाय तेनला तर खूप बरां दिसलां. “भट काकाचे हातीन पूजा झाल्या मरे. आतां कसलोच हुस्को नां. गणपती व्हरप, मखरांन दवरप, अणि फुलां घालून तुमचे तुमीच पूजा करप; नेवेद दाखवप, बऱ्यो आरत्यो म्हणोन ५ दिस जाता तशी मन लावन सेवा करप.. कारण पयली पूजा भटान केल्याच !!   

बदलते काळा बरोबर सामावनी घेताना, लोकांची श्रद्धा अणि भक्ती जपणारी हरीकाकाची ही कल्पना कशी से तां सांगा हां..!!

मंगल मूर्ती मोरया !!

दिनेश्र्वर जोग

दिनेश्वर जोग
गोवा  
फोन: ९४०५६६५७७२ 

एक अनाकलनीय काणी, गावांतली- रामकृष्ण सोमण

काय काय गोष्टी आमचे साधे बुद्धीला पटत नाय अशो ससत. आमी आमचो पूर्वानुभव, सद्सद्विवेकबुद्धी वापरोनी जेड्ला विचार करु लागसों. तेड्ला दिससे, च्छे..! हे असां सोंवच शकत नाय. आमचां शिक्षण, अनुभव बी एकेकदा हेंत मार खासे. मोग देवेच्छा, दैवी करणी अशी विशेषणां पुढां येवं लागसत. 

 

ही हालीचीच गजाल. आमच्या मामाचे शेजाराला एक कुटूंब ऱ्हेसे. चार पाच वर्खां पयली मामाकडा गेलेलों तेड्ला मामीन सांगलेलान, त्याहां, त्या शेवंत्याच्या घरात जाव नाकां हा, ती तुमला बघनी जवळ येवे बघणार, बोले बघणार, खायवे देसां म्हणणार. अजिबात जाव नाकां. ती बाई कजाग से. तेंचे घरात भुताटकी से, अवदसा से. त्याहा एखादां भुर्गां जावनीं आयलां की बरां नाय सारखां हसे. दृश्ट काडली, दोरो बांधलो तरी लोक्कोर बरां हत नाय. तेनाय भुरगां बाळ नाय. गावातले लोक ते घरात भुरगां घेवनी जात नाय. संक्रान्ती कडा तेंचेत्या  हळदीकुंकू ससे, तेवेळा गावातली काय बायलां जासत, पण आपले भुर्गेनां घरा थेवनीं जासत. 

 

में हे कुटूंबाची सविस्तर माहिती काढे म्हणी लागी सलेल्या तातूचे दुकानात गेलो. तातूला पन्नास रूपयाचां गिऱ्हाईक घायलां. हळूच विषय काढलो. तातून खबर दिलीन. शेवंताला लग्न करनीं घरात हाडली अणि सहा म्हयनेतच कोरोना आयलो. तेंत त्याची माय अणि माव आठ दिवसांचे फरकान दोघाय गचकली. घरावर अवकळा आयलेगत झाली. एकदा तेंचेच सोयरेंपैकी एक बाईल आपले ल्हान चेडीला घेवनीं, दोतोराकडा तपासे म्हणी तेंचे त्याहां आयली सली. कर्म धर्म संयोगान ती चेड त्याहांच दगावली. झालां..  तेड्लापाश्णी सगळेंनी ते घरावर बहिष्कार घातलेनी. भुताटकीचां घर म्हणी बी कायजण म्हणो लागले.

 

काळ असोच गेलो. एक दिवस गावात बालवाडी काढेची अशी पंचायतीन योजना जाहीर केलीन. जागो कोण देणार ? कोणीच तयार हत नतलो. शेवटी शेवंता तयार झाली. इतकां मोठा घर. पण ऱ्हेत सलीं इनमीन दोन माणसां . सरपंचालाय घर आवडलां. तेणिन प्रस्ताव धाडलोन, तो पास हवनीं आयलो. शेवंताच्या घराची पडवी अणि कडाच्यो दोन खोल्यो भाडेन घेतलेनी. शेवंतालाय काम मिळ्ळां चाहा फराळाचां. 

 

जून म्हयनेत बालवाडी सुरू झाली. गाववालेंनी आपापले बारकेले भुर्गेनां बालवाड्यात न्हेवनीं बेसवे सुरवात केली. सुरवातीला सगळीच भुर्गी शाळांत, बालवाड्यात जाताना पयली पयली  इवळी रडसत. पाववे आयलेले पालकांला सोबत ऱ्हेवेचां पडसे. तसांच एठाय बी हंव लागला. पण हळूह॓ळू भुर्गी रूळो लागली, खेळो लागली.

 

शेवंता सगळे भुरगेंची खूप मायेन जपणूक करी. काय दिवसांनी बरोबर येणारे आई बाबा बी भुरगेंना सोडनीं घरा जांव लागले. 

गावातले काय घरांत सलेले वयस्कर मंडळीचे मनांत मात अजूनी भयाची पाल वळवळत सलीच. त्याहां, शेवंताच्या घरात भुर्गेना बेसयसत, त्याहां भुर्गी जेयसत खासत, खेळसत. समजा भुरगेंचां उद्या बरां वाईट कितां झालां, जाले जबाबदार कोण? पण देवाची दयाच वेगळी, कोणाला कायच झालां नाय. उलट, भुर्गी अधिक निरोगी, टुमटुमीत दिसो लागली. दोन म्हयनेनी बालवाड्याची तपासणी, (इंस्पेक्शन) झाली. वरथीन बालवाड्याचो रिपोर्ट,  बेस बरो आयलो. बालवाड्याला विशेष बक्षिसय मिळ्ळां. सग्ळीं आनंदीत झाली. शेवंतालाय बरो शेरो (रिमार्क) मिळ्ळो.

 

अणि एक गोष्ट घडली. शेवंताला दिवस गेले. ही बातमी हा हा म्हणता सगळीकडा झाली. शेवंतान बालवाडीचां काम मात तसांच पुढां चालू ठेयलान सलां. एता येणारी जाणारी प्रत्येक बाईल, आपले भुर्गेला बालवाडीत बेसवनी, हळूच शेवंताची खबर बात घेवं लागली. शेवंता दिसे तशी सुंदर सली, पण एतां ती अणिक उत्साहित दिसत सली. काय जणां आपण होवनीं त्याचेबरोबर अधिक वेळ ऱ्हेवं लागली.

 

एका शनिवारा सरपंचान गावात खर्चाशिवाय, फुकटांतला शिबीर (तपासणी शिबिर) करेचां ठरयलान. शेवंतान आपलां म्हणणां मांडलान. बायलांची अणि भुर्गेंची तपासणी बालवाडीत करेची, बाकीचेंची पंचायतीचे भीतर. शेवंताचो हो प्रस्ताव सगळेंना मान्य झालो. दोनयकडा खूप बरो कार्यक्रम झालो.

 

काय दिवसांनी, गावातल्या देवळांत काल्याचो दिवस ( जत्रेचा दिवस) सलो. ते दिवस संध्याकाळां एक अघटित घडलां. खूप वर्खा पैली काले दिवस एका जाण्टेवरती अवसर येत सलो, तो सगळेंना आशीर्वाद देय. मध्या असांच कितांतरी झाला अणि अवसर येव्वेचो बंद झालो. जाण्टे लोक नाराज झाले. मात काले दिवस, संध्याकाळा अकस्मात एकावर वारां आयलां. तेणिन शेवंताच्या घोवाला निरोप धाडलोन. अवसर बोलो लागलो, “ही शेवंता म्हंजे देवी आसा गावातली, गावातली सगळी चाळेगत आता भायर गेली हां!”  “गावातली जाण्टी नेण्टी आता सुखात रवतली!” असा सांगोनी, शेवंताच्या घोवाचे हातांत नारळ देवनीं अवसर निवळलो. एतां लोकांनी ठरयलेनी, पालखी शेवंताच्या घरा न्हेवेची, त्याहां पेणो करेचो, आरती करेची. रात्री पालखी ठरलेप्रमाण शेवंताच्या पडव्यात आयली. बालवाडीतली, बाकीचे शाळांतली, सगळीं भुर्गी जमली सली. खरी कालेची गर्दी भरली सली ती शेवंताचे पडव्यात.

 

में विचार करू लागलों. हे सगळां घडलां कसां? कें गेली ती शेवंताचे घरातली अवदसा ? हे सगळां परिवर्तन कसां झाला ? लोकांनी ठरवनी केलेनी, की देवान केलांन ? देवानं  केलान जाले केंचो देव, ते देवळातलो, काय तो अवसर आयलेलेलो…?  शेवटी कितां “जसो मनांत भाव, तसो देव!”

Ramkrushn Soman

श्री. रामकृष्ण दिनकर सोमण
गोवा
फोन: ९४२३८८३८४३ 

माजो परिचय- अंजली आशुतोष मराठे

{चित्पावनी भाषेची तोंड ओळख कार्यशाळा – डिसेंबर २०२५ विद्यार्थिनी}

 

में अंजली आशुतोष मराठे. में माजो परिचय करनीं देसां.  

 

में गुजरातातले बडोदे शहरात ऱ्हेसां.

में गुजरात रिफायनरीत नोकरी करसां. 

 

माला लेखन, वाचन करे आवडसें. 

में मराठी वृत्तबद्ध कविता अणि गझल लिव्हसां.  

 

माजो  “सृजना” नावाचो कवितासंग्रह प्रकाशित जालेलो से. 

माला कार्यक्रमाचां सूत्रसंचालन अणि निवेदन करे आवडसे.  

 

माला नव्यो नव्यो गोष्टी शिके आवडसत, म्हणी में चित्पावनी भाषा शिकल्या. माला ही बोली खूप आवडली.

 

एतां में चित्पावनीत लिव्हेचो, वाचेचो अणि बोलेचो प्रयत्न करनांर सां.. ही भाषा शिकत सतानां ‘चित्पावनी बोली कार्यशाळांत’ महत्त्वाचां मार्गदर्शन करनांरी आरती ताई अणि वैभव सरांची में खूप खूप आभारी सां!

अंजली मराठे

अंजली आशुतोष मराठे 

वडोदरा

फोन: ९७२५०२२५१०   

पोटभरी हसां- आरती मोने

१) पिंटू. :- पाऊस आयलो, पाऊस पडलो, पावसांत में भिजलो. वा….वा! अरे वाह!

पाऊस आयलो, पाऊस पडलो, पावसांत में भिजलो. वाह..वा! वा….वा! अरे वाह!

चिंटी  :- मोग पुढां कितां जालां, सांग मरे!

पिंटू. :-  अगो पुढां कितां…. रोकडांच कडकडीत निबर आयलां, निबर पडलां, में सुकलो!

 
२) मैत्रीण  :- “रितु, तुजी रेणु पयले नंबरान पास जाली!” सद्दानीं कितको वेळ अभ्यास करसे गो ती?
रितु. :- फक्त दोन वरां!
मैत्रीण :- अजबच म्हणेचां ! आमची शामी रात्र रात्र जागोनी अभ्यास करसे तरीय बी नापास मगो!
रितु :- बरोबर… परीक्षाचे वेळां निद पूर्ण करसे सनांर!!

 

३) चिंकू  :- बाबा ओ बाबा..! गाड्याचो टायर कितालां काढसा?

बाबा :- अरे रस्तेत  कवची – खिळो कितांतरी तोपलां सयेल, पंक्चर कें सें, तो बघे म्हणी टायर काढसां! 

चिंकू :- असां… ! बाबा, तसां जाले मरे, हेच नेटान, आक्काचोय पाय मात्सो काढ बघूया. “ती माला सांगत सली, शाळांत्थीन येताना त्याचे पायाला तार तोपली खे.

 
४) आई :-अहो !  दांत काढे दिलोन नी व्यवस्थित बाबल्यान? रडलो बी नाय नी ?
बाबलो :- (पोलोवर हात धरीत) अगो आई तू  बाबाकडा फक्त ५० रुपयेच दिलेलेस मगो, कसो रडनांर? त्याहां दोतरान मोठ्ठे  अक्षरात बरयलेलांन…. १ दांत काढे ५० रुपये ‘फी’ अणि कोण रडलो जाले १०० रु. 
Aarti Mone

सौ. आरती मोने 

गोवा 

फोन: ७०३८०६२५३६ 

आपला कर्म, मनाचो आरसो- गायत्री भुस्कुटे

निसर्गातला धन अणि माणसाचां मन न सुटणारा एक कोडां से.

 

बघेल तेग्डा समुद्रात जसां पाणीच पाणी ससे. तसांच से हे संसाराचा. संसार मनामनांत भर्लेलो ससे. कोणी घरदार सोडनीं सामाजिक कार्यात झोकनीं दिलां तरी तेचे मनांत ‘संसार‘ ससेच. माणूस कारो ऱ्हेवं, घरात ऱ्हेवं नाय जाले रानांत ऱ्हेवं! संसार तेचे मनात मांडलेलोच ससे. प्रत्यक्षात समोर दिसत नतलो तरी संसाराची आसक्ती मनात उरसेच! संसार हो असो हात धोवनीं पाठ लागलेलो ससे. धर्माला सीमारेषा सली तरी त्याहांच संघर्षाला सुरुवात हसे. नाकां सलेले लोकांकडा संबंध येसे अणि माणूस हे त्रासाला कंटाळसे. तेला लागोनीं माणसाचां मन विचारानी सामखां घायाळ हसे.

 

ल्हान भुर्गां चालो लागसे तेड्ला तेला कितके कष्ट पडसत? सगळी जणां तेचे चालणेचा कौतुक करसत. पुढां चालणां  सहज हसे. तसांच जेवेचा कौतुक कितकां, पयले उष्टावणांचा? पुढां जेयणेकडा, चालणेकडां लक्ष तरी देसे काय? नवे गजालीचा अप्रूप! “नवेचे नवं दिवस!” 

 

कर्म अकर्म हयवां ही माणसाची धडपड. ध्येय साधणेसाठी स्वधर्म आचरणांनं कर्मां करेची. ती करताना दोष दिसलो जाले विकर्म! तेचो अभ्यास करेवो लागसे.. ” हें में केलां!”  असां दिसो नये इतको अभ्यास. हजारांनी कर्मा जाली तरी मन शांत, मन निर्मळ उर्से.

तुमी आकाशाला विचारनी बघा, अरे आकाशा..,  तू निबरानं करपसय, पावसानं चिप्प भिजसय, थंड्यानं कुडकुडसय नी?आकाश कितां सांगणार? तां म्हणेल, “माजां कितां? माला काय कितां हसे तां कळत नाय.!” माला कितां हसे हें तुमीच ठरयसा. पिसेला कितां कळसे? माणसाला निर्विकार करणेची किमया असे मोठ मोठे कठीण प्रसंगा उपरांत हसे. कर्मयोगाची हिच तर मेख से. ती एकदा मिळ्ळी काय, कर्म करताना मन निर्मळ करेचो यत्न हयवे हवो. तेड्ला काम-क्रोध नाय से हतील. क्लेषाची जाणीव सोपेल. कर्माचीच जाणीव उर्ली नाय जाले!

 

एकेकदा आमी वाचसो. इतको -इतको राम नामाचो जप करेचो से. कितको केलोत तेची मोजदाद करनीं कळवेचां. ‘रामनाम’ ही कितां जोखेची  वस्तू से का? आई आपले भुर्गेनां लागोनीं अखंड झिजसे, तेची मोजदाद ससे का? धरती आमलां देसे. निसर्ग आमलां समृध्द करसे. हे इतके सहजपणानं हसे, की कळत सुद्दा नाय.

 

“असांच आमचेकडत्थींन कर्म घडेवां ! हीच परेमेश्वराकडां प्रार्थना!”

Gayatri Bhuskute

गायत्री भुस्कुटे  
गोवा 
फोन: ९४२२४५८३४० 

रेडियो- कृष्ण गणेश वझे

आमला रेडियो समजलो तो पन्नास वर्षां पयली. त्या वेळा रेडियो म्हणजे एक असां मोठां कितांतरी नवीन अशी समजूत सली. आयकणारेला अणि बगणारेला असां एक आश्चर्य दिसत सलां की,  हेंतथीन हो आवाज कसो कितां येसे अणि कसो अगदीं जुस्ताक जुस्त  म्हणजे जसेच्या तसो. तसो जर विचार केलो जालेवर रेडियो हो खरोच एक उपयोगी अणि तेंतलेतेंत कमी किमतीचो असो सलो अणि आजपर्यंत से. अजूनी सुद्दा नित्य नेमान रेडियो आयकणारे सत. में आयकसां. खबर से न्हूय तेला कळसे, रेडियोवर इतके सुंदर कार्यक्रम ससत की, जो आयकसे तेलाच कळसत. वेळाचां पत्रक हें रेडियोचा साधारण वर्ष वर्ष सुद्धा आधी केलेला ससे. नियमित वेळावर कार्यक्रम आयकेवे ते रेडियोवरच. एतां नवनवीन साधनां आयलीं सत.

 

पण रेडियो म्हणजे एकमेव. असे कार्यक्रम सुंदर बेसयलेले ससत की पुढेंत अगदी माणूस सले सारखोच दिससे. बोलणां आयकेवां ता रेडियोंत. कोणय म्हणणार कितां हो सांगसे पण ‘जुनां तां सोनां‘. पयले काळांत सुरवातीला असो गावांत एखादोच रेडियो सयवेचो. तो आयके कितकेसेच लोक जमत सले. तेड्लाचे ते मोठे आकाराचे रेडियो बरेच मोठे. एकाच जागेवर थेवेचे. ठराविक एक तेचां चित्र. अंकलिप्यात चित्रां ससत तसो नमुनो चित्र दाखयलां कि भुर्गेबाळां पाश्णी तां जाण्टें पर्यंत रेडियो मरें तो! असां म्हणत सले इतको तो घरचो. आयकोनी हतकत तेला असो झाकनी बी थेवेचो. तुवालो घालनी. श्रुतिका म्हणी सत सल्यो. तेडला ठराविक वेळा त्यो आयके एखाद दुसरो तरी येंत सलो. गोश्टीचो पयलो भाग तेला खबर सत सलो;  म्हणी तो आयकेची अगदीं तसदी घेंत सलो. गाणीं, कीर्तन लागलां काय माणसांना आपुलकी निर्माण हय. एक साधां बारीकसां  साधन पण माणसांना जोडणारो एक दुवोच सलो तो! 

 

हां! एतां ते रेडियोची रचना म्हणजे तेला एक मोठी ब्याटरी मोठ्या गाडयांनां बी ससे तसली, तेला कितांसां, ड्रायब्याटरी काय कितां म्हणत सले. ती बी एकाच जागेवर थेवनी वायर जोडेची शिवाय वरती एक एरियल घरावर दोन कोंडे दोन कडाला, उंचावर उबे करेचे अणि तेनां एक वायर बांदनीं सुकवणां सुकत घाले बांदसत तशी. ती रेडियो पर्यंत घरांत हाडेची अणि सांगेचां जालां जाले तां कितां तां रेंज काय कितां म्हणसत तां सयवां. काय वर्षां नंतर मातशी सुधारणा जाली. बारीक रेडियो आयले तेना ट्रान्झिस्टर असां म्हणत. तेला बेट्रयो (सेली) ल्हान बारीक प्रकाराच्यो. मोग थोडे लायटीवर लावेचे आयले असो तो सुधारलेलो रेडियो जालो. आज सुद्दा रेडियो सत. ते मानानं खर्च बी कमी. मोबाईल सतच पण रेडियोचां महत्व कमी जालेलां नाय. मुद्दाम सकाळीं सहा वाजता रेडियो लावा मन प्रसन्न हसे. 

 

धन्य ते रेडियोचो शोध लायणारेची!

Krushn Vaze

कृष्ण गणेश वझे 
गोवा  
फोन: ९४२०३१७१२८ 

माणूसपण- रामकृष्ण दिनकर सोमण

हिच का ती प्रगती, हेंच का तां मोठेपण ?

दिस्से सगळीकडा तां, हेच का आपलेपण?

 

मोठी मोठी घरां खरीं, तेंत ससत तरी कोण?

दोन नाय तर तीन, अधिकचजाले चौघजण

से ढीगभर सामान, नाय घराला घरपण 

गोठे नाय उर्ले, खोल्यात न्हाणीघर से पण

 

तारखो येसत जासत, एकय हत नाय घरात सण

कें से देव्हारो ? बळाणेंवर ऊभे राम अणि कृष्ण

ना पंचपात्री, ना फुलांचो पाटलो, ना ग॔धाची सांण

दिवाळ्याला उटणां नाकां, प्रत्येकाचो वेगळो साबण

 

नाय परवचा, नाय रामरक्षा, नाकां व्रतांं वैकल्यां 

प्रत्येकाची तऱ्हाच वेगळी, बघसत टीवी आपण

प्रत्येकाची वेगळी आवड, प्रत्येकाचा वेगळां खाणं 

अंगत पंगत नाय एतां, खुर्च्यावरच करसत जेवणं 

 

हातात मोबायलाची डबी, बोटांनी करसत टण टण

एकाच खोल्यांत सोयरे कसे, नाय हत सहसा भाषण

कुटूंब नाय ऱ्हेलां एतां, जगसत स्वतंत्र आपले आपण

देवा तूच तारणहार एतां, दे माणसांना माणूसपण!

Ramkrushn Soman

रामकृष्ण दिनकर सोमण 

गोवा. 

फोन: ९४२३८८३८४३ 

भाऊ टुबक ठो- सुभाष जोशी

ही माजी भुर्गेपणांतली दुसरी गजाल. ल्हानपणी आमचां घर बरे पैकी मोठां सलां. चारपाच खोल्यो. एक नारळ अणि भात थेव्वेची खोली. एक लांबचे लांब खोली. भायेरली खोली नंतर केलेली, जेला दादाची खोली असां म्हणत. बरे पैकी मोठो चौक, चौकावरती माळो ज्याहां सुपाऱ्यो थेयल्यो जाव्वेच्यो. माळेवर चढे इस्काद. भितर देवाची खोली अणि जेवेला बेसेची खोली. तेचे भितर रांधपाची खोली. पाठले दाराचे भायेर मोठी पडवी सली. ती काही काळानंतर भितर घेव्नींं रांधपाची खोली मोठी केली.


सगळीकडा काळखाचां साम्राज्य, एकटोच जाय्वे भय दिसत सलो. चौकात कायम एक पाळणो. इस्कादीखाल्ती एक मोठी पेट; त्यालाच जोड्नी एक ल्हानशी पेट. मोठ्या पेटांत सगळेंचे कपडे. बहुतेक करनीं दोन चड्ड्यो, दोन भुश्कोट (शर्ट), बोड्येचे कपडेंचे मानान चेडींचेच कपडे अधिक सले. चेडींचे कपडे, पातळां, लुगडी, पंचे, भुश्कोट, पैरणी सगळां कितां तां त्या पेट्यात. ल्हान पेटलांत बारीक सारीक, मोडके तोडके दागदागिने अणि इतर सामान. त्याला कायम चावी सत सली. ती पेट फक्त दादानच उघडेची. बाकी कोणालाच परवानगी नतलीं. दादाचे खोल्यांत एक मेज, कपाट, रेडिओ, खाट, स्वामी गजानन महाराज मुर्ती, फोटो अशो वस्तू सल्यो. मेजाचे खण अणि कपाट हेनां कायम कुलूप. कईतरी मनांत आयलेवर वहिनीला नाय जाले आक्काला चावी देव्नीं आपले पुढेंत कितां हवां नाकां तां काढेची संधी मिळे.  में एकदा हळूच, नदर चुकवोनी भितर कितां थेयसे हें बघनीं घेतलां, जाले तेंत पैशाचा पाकीट, जमिनीची जुनाट कागदपत्रां, बॅंकाचां पासबुक, कोर्ट कचेरी केलेले कागदपत्र अशो बऱ्योच वस्तू में बघितल्यो. पोर्तुगीज पासपोट (पासपोर्ट) अणि गोवा सरकारानं दिलेलां मानपत्र (ताम्रपट) बी सलां. आपल्यो महत्वाच्यो वस्तू, कागदपत्र भुर्गेनां दाखवेच्यो नाय हें मनात थरलेलां सलां, कारण सुरवातीला आमचेकडा तेंणिन एक रॅली सायकल, एक रेडिओ  ‘Pie’  कंपन्याचो सगळेंत पयली हाडलेलो पण वापरेची परवानगी कोणालाच नतली. फक्त तेंचेनीच (दादानीच) वापरेचो.  में न विचारताच वापरणेची आगळीक करी अणि मोग शाब्दिक मार सहन करी. तर हें जालां भायलां (बाह्य) पुराण.


खरी गजाल ही अशी साधारण १९६५ ते १९६७ चे दरमेन प्रत्यक्ष घडलेली घटना. श्री. मोहन अणि सुचेता अजुनी जन्मेचीच सलीं. तेड्ला आमी साहा अणि नली, दादा, वहिनी, आई, कांबेरी मनाय अशी सगळी मिळोनी दिवसा कमितकमी १२ ते १५ जणां जेव्वे सत सली. एक राखणों सलो तेचां नाव नकुळ. में तेड्ला १०/१२ वर्खाचो, अक्का १४/१५ वर्खाची, नली १३/१४ वर्खाची, बाकी सगळी १० वर्खाभितर्ली. जेवणांवळीचा मोठां प्रस्थ, पण वहिनी, आई हें मोठां काम कायच न्हुय कसां निभावीत. सकाळचे खाणांला पेज किंवा आटवल. पेज म्हणजे पातळ अणि आटवल म्हणजे तांबडे तांदळाचो मात्सो पोटभरीचो असो मवसर ( मऊ ) भातच.  बरोबर दोणातली/ खळांतली आंबाडी, लोणचां, चटणी, कांदो, असां कितांतरी, सगळां न्हुय. दुपारचे जेवणाला सांबारां भात, वरण, भाजी. बहुतेक केळेंची, पणसाची किंवा  पोरसु केलेलां सयेल जाले तांबडी भाजी, मुळो, चिटक्यो, भेंडे अशी कसली तरी भाजी. बरोबर ताक कयतरी करमलाचा नाय ते तोरांचा लोणचां. पण आमी  कईच उपाशी ऱ्हेले नाय ही खरांच वैनीची करामत. आम्ला कोणालाच मोठीशी रोगराई नतली. माजी व्याधी ८/९ वर्षांनंतर सोपली. में धडधडीत बरो जालो.


हे आमचे फौजफाटेंत भर म्हणी म्हापसेचो भाऊ, बरोबर दिपक किंवा प्रकाश अणि एक काकाजी म्हणी सलो, तेनां सगळेनां घेव्नीं  येत सलो.


भाऊचा खरां नाव हरी म्हंजे माजो आतेभाऊश. तेंचेनीं अग्नीहोत्र घेतलेलां. श्री समर्थ गजानन महाराज, अक्कलकोट तेंचा दैवत. तेंचे अनुज्ञा नुसार ते आपलो संसार चालवीत. (ते म्हणजे माजी आते ज्याला आमी ताई म्हणसों अणि त्याचे यजमान जेंना आमी भावोजी म्हणत सले ते एतां हयात नाय.)


हो हरी खूप बुद्धिमान, हुशार अणि धीट. तेला भय म्हणीं कसलोच दिसत नतलो. तो माजे पेक्षा दोन वर्षांनीं मोठो. ते चार भाऊ, सगळेंचां शाळांतला जुजबी शिक्षण,  पुढां कोणच शिकले नाय. हेचां कारण भावोजी सांगे, “आमचं एवढं इथं काम आहे (पौरोहित्य), कशाला शिकायला पाहिजे? शिकुन काय करणार, पैसेच मिळवायचे नां? ते इथही मिळतात, १०/१० पोर सुद्धा कमी पडतील!” त्यामुळे बुध्दी, हुशारी असुनही हरिभाऊने पुढे मोठ शिक्षण घेतल नाही! सगळ्यो सुखसोयी सतानां दीपक मात्सो आंगापेरांन ल्हान, तो मात्सो शिकलो पण शेवट पौरोहित्य पत्करलान. प्रकाश शिकलो नाय पण तोय पौरोहित्य. चौथो विकास तो तेड्ला खूपच ल्हान सलो. काकाजी म्हणी सखा दिक्षित (आपटे कुटुंबीय) हेंना ओवाळनी  उडयलेलो, एक सेवक सलो. खरां म्हणजे तो पेडणेचो भाटकार. माला तेचां आडनाव येवजत नाय पण तेचां माड अणि गारफांचा (आंब्यांचे)भाट सलां. तो कायम कुटुंब सोडनीं हेंचे आश्रयाला सलो. सगळे आपटे कुटुंबीय (भावोजी)  तेला मिळेल ती कामां सांगे अणि तो ती आनंदान करी. खाड, केंस वाढवोनीं  जणु एखादो साधुबुवा सारखो दिसे. खालती पंचो, वरती पंचो- उपरणां हो तेचो पोशाख. “काकाजी हे कर, काकाजी ते कर, काकाजी हांगा वच, काकाजी हे घेवन यो.  “काकाजी थय वच अणि ती पुजा सांगोन यो ” काकाजी म्हणजे चौफेर व्यक्तिमत्त्व. तेला मंत्र कसलेच येत नतले पण लोकांत्या पुजा सांगोनी येत सलो. हो पुजा कशी सांगसे तां बघे में एकदा तेचे बरोबर गेलो. पण “ताकाला तूर लावे दिलीन नाय” माला कायच कळ्ळा नाय. हळू ओठांतले ओठांत कितांतरी पुटपुटत सलो अणि हुकूम (ऑर्डरी) सोडी.  “हां.. आचमन कर, पाणी सोड, हळद कुकुंम घाल, पानां, फुलां, दुर्वा, तुळशी घाल. उजवात लाय, प्रसाद दाखय, पाया पड  (नमस्कार कर)  असां करनीं पांच मिनटांत पुजा सोपवी.


अणि एक सांगे विसरलो. आमचे कडा तेड्ला  (१९६५ ते १९६७)  कमल मावशी ऱ्हेव्वे सली. तेड्ला मराठी शाळांना मास्तर मिळत नतले, अणि सरकारी धोरणानुसार भराभर मराठी इंग्लिश शाळा (गोवा स्वतंत्र जाले नंतर) सुरू जाल्यो ते कारणांन महाराष्ट्र/ कर्नाटक सीमालागचे गावांतले बरेच लोकांना गोवेंत मराठी शाळांत नोकऱ्यो मिळ्ळ्यो. में आंबेडे शाळांत जात सलों. सगळे मास्तर भायले (बाहेरील). धामपुरकर, तेली, भोमण, पाटील, ठाकूर, पिंगुळकर वैगेरे. कमल मावशी म्हणजे (नाना काकाची भेणीश). ती ४/५ वर्खां गोवेंत सली.  दोन वर्खां आंबडेचे शाळांत अणि पिसुर्लेचे शाळांत दोन वर्खां असां काम केलान.  मोग ती गोवा सोडनीं  BED करे.  त्यानी माला अणि अक्काला खूप शिकयलान. “शुभंकरोती” शिकयणारी तीच. दसरेकडा शाळांत पयलो ‘हादगो’  त्याणिन सुरु केलोन.  ती गाणी आयके बरां दिसे.


“एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू,

दोन लिंबू झेलू बाई तीन लिंबू झेलू” ….. वैगेरे.


पुढलां एतां स्मरणांत नाय. कितकीं लिंबा झेल्ली म्हणी आमला कितां करेचां से? कारण तो उत्सव शाळांतल्यो चेडी करीत. आमचो स्वार्थ फक्त शेवटी जे चणे फुटाणे वाटीत तेचेवर दोळो, म्हणी सगळो हदगो सोपे पर्यंत में तो बघी.


तर तेड्ला कमलमावशान आम्ला बरे पैकी संस्कारक्षम घडयलेन, दादांना न भिणारी ती एकटीच. ती सरळ सांगे, “ऐक दादा मी तुला घाबरत नाही जा” दादाय बी खूपदा त्याची फकाणां करी. “अवचीन हेडा म्हटले तेडा धावसे!” मोग ती म्हणे मी अवचीन वगैरे काही नाही , “मी बेळगावची आहे, तुलाच पळवीन इकडं तिकडं!” वैनी हे सगळां बघ्नी अणि घे म्हणी हसे, कोणीतरी दादाला चोख उत्तर दिलां म्हणी. साधारण ८ ते१० एप्रिल पर्यंत शाळांना सुट्यो सल्यो. निकालाचे (रिझल्टाच्या) दिवसां  शाळांत भाजलेल्यो काजी वाटेच्यो म्हणजे सगळे मास्तर खूष. परिक्षा बी सोपलेनंतर आमचो धुडगूस सुरू हय. आमचे बरोबर धुडगूस घाले भाऊ आपली फलटन घेव्नी येत सलो.  बरोबर एक मोटारसायकल त्याचो मोठ्ठो आवाज (भयान काळजात धडकी भरे.) पाठल्या प्रकाश नाय जाले दिपक. मोग दिमत्याला काकाजी, तेचे बरोबर अणिक एकटो. भाऊचो पेहराव बघलो ते  ‘एकदम हिरो’ टाइट पॅन्ट, वरती बरो शर्ट. आम्ला सांगे, ” बाबा हें कापड कसलां जाणस मरे? हे स्टेचलान,  हे  वुलन, हे पॉलिस्टर वगैरे.. वरती मोठे केस अणि तेंत लिपलेली लांब शेंडी असो हो अवतार तेला बघलो जाले में एकदम भिकारी कारण माला दोन शॉर्ट चड्ड्यो अणि दोन शर्ट (पूर्णवर्षाकाठी )  तेंत शाळाचोय युनिफॉर्म धरनीं. तेला लागोनीं भाऊ म्हणजे आमचो हिरो सलो. बरीचशी हिंदी पदांय बी म्हणे..

            

“जिंदगी एकसफर है सुहाना “

“रातकली मेरे ख्वाब में आई”

“ये जीवन है…………” वगैरे 


सिनेमातल्यो गोष्टी सांगे. शशी कपूरची अशी हेअरस्टाईल, शम्मी कपूरची अशी, राजेश खन्ना मान वाकडी करणारी स्टाईल वगैरे. ‘अंदाज’ सिनेमातलो तेचो अवतार बघनीं, हरिभाऊ म्हणजे माजे एक आदर्शवत हिरो सलो. कारण तेचेच कृपान माला वर्खाकाठी एक दोन सिनेमे बघे मिळत सले. ‘एल – कापितान’ (El – Capitan) नाय जाले ‘अलंकार’ 


कई कई तो आम्ला तिकीट न काढताच भितर सोडी. कारण तेचे त्याहां डोअरकिपर सगळे ओळखीचे. ‘भटा’ आज खय ? पिक्चर पळोवपाक? असां विचारनी आमची इज्जत काढीत. मध्यांतराला एक आईसफ्रुट म्हणजे साखर मिसळलेलो झेल (बर्फ) अणि थोडो उच्च दर्जाचो म्हणजे दुधाचां पाणी मिसळलेलो बर्फ जेला आईसकॅन्डी म्हणत. कई कई चणे फुटाणे चॉकलेट नाय जाले भजी, कणसां.


तर एतां सांगेचां म्हंजे एप्रिल १५ नंतर १९६५ किंवा १९६७ साल बहुतेक. शाळांना सुट्टी पडलेली. आमी आपले केंचे नारळ पुंजाय (पडलेले), उसपकाराचे कुरागळांतली घोटां लागी कर. ती घोटां दिकाळ अणि खोकली येल इतकी आंबट पण तेड्लाची उमेदच वेगळी. थोडे माड्याना आंबुल्याच्यो खांद्यो टेकलेल्यो. मोग में बी कईतरी खाडू करनीं लागीच्या माड्यावर चढेचां अणि गोखेन खांदी हालवेची. असां करतां करतां चार घोटां तर चाळीस तोरां खालती पडत. ती पुंजावेची अणि वैनीला न्हेवनीं देवेची. वैनी पिकलेल्या घोटांचो रस काढी, तेंत थोडे बरे आंबेंचो रस घाली अणि रायतां करी. रायतेंत कांदो अणि खोबरां थरलेलो. तेंतकरनीं वैनीचा रांधप तेला लागोनीं रुचकर हें वेगळां सांगे नाकां. अधिकशी तोरां भायेर भिरकाटावनीं देत सली.  में मात्र माड्यावर्थीन उतरताना जांघो, कुले धोडावनीं, सालपटां काढनीं घरा येत सलो. मोग आठ एक दिवस तेल हळद लावेची अणि जखम बरी करेची असो उपद्व्याप. 


तर असे दिवस जात सताना एकदा हरिभाऊ आयलो. बरोबर प्रकाश, काकाजी सले. मामु शेणाचे  गोळे घाले आयलेली. मामु म्हणजे एक म्हातारी विधवा बाई, जी शेणाचे गोळे घाले वर्खात्थीन दोनदा तरी येत सली. शेणाचे गोळे भावोजीना अग्नीहोत्रा करतां लागत.  जेवणाला लोक कितके जाले, आमी मुळांत बारा तेंत म्हापसा मंडळी चार, कमल मावशी अणिक बाकी इतर कायजणां म्हणजे साधारण १५/२० लोक जेव्वे जाली पण  वैनीन कयच कुरकुर केलीन नाय. 


तर ते दिवसा भाऊ आयलो बरोबर प्रकाश मोटारसायकलीवर्ती  फ ट फ ट फटाट आवाज करीत आयलो. में कुळागरात सलो. आवाजानच माला कळ्ळां की आमचो हिरो आयलो. मोग संध्याकाळां काकाजी अणि मामु हि मंडळी आयली.


भाऊ, दिपक दुपारचे जेवणाचे वेळां आयले बरोबर,   न्हायवे  कोंडीवर.  (न्हायवेचा  पुराण  वेगळां से तां मोग सांगसां.) दोन वरां न्हावनीं दोनानां सगळे जेव्वेला हजर. वैनीन सगळी व्यवस्था बी बरी केलीन. 


दुपारी तो दिपकाला घेव्नीं बरेच कडा फिरोनी  संध्याकाळपर्यंत परत हजर. दादा तेला रेडिओ लावे देत सलो. तो रेडिओवर “सिलोन केंद्र” लावनीं हिंदी गाणी आयके. दादाकडा बऱ्यो गजाली मारी. दादाय तेला सिनिमातल्यो खबरी सांगे. दादाला नटांची नावां येत नतली पण तेणिन वैनीबरोबर ‘दोस्ती’ सिनेमा बघलेलो बरेच वेळा सांगे. तसांच मराठी ‘मोलकरीण’, प्रभातचे काही सिनेमा बघलेले सांगे. पण भाऊचा म्हण्णां ‘ हे मराठी सिनेमा फालतू (थर्ड क्लास) हिंदी सिनेमात मजा से ती मराठी सिनेमात नाय. 


तो येतानां बॅट,बोल, विकेटी असा घेव्नी येय अणि आम्ला प्रात्यक्षिक करनीं दाखवी. फोर म्हणजे कितां? सिक्सर म्हणजे कितां? बॅट धरेची कशी, शॉट कसे मारेचे? आपण मारी अणि आमला बॉल हाडे धाडी. में १० वर्खाचो उदय पांच वर्खाचो. तेला लागोनीं धावेचा पडे माला.!  एकदा आमचेकडा नाना (नाना मराठे) आयलेलो. भाऊ तेला आपलो पराक्रम सांगो लागलो.  थोडी चर्चा जालेवर दोघय खेळे गेले (सरदात). में तेंचे पाठल्या. आधी भाऊ खेळ्ळो. तेणी दोन तीन शॉटी मारल्यो अणि आऊट जालो. मोग नानान बॅटिंग सुरू केली. एक दोन शॉटी हतकत बॉल असो टोलवनीं मारलोन की बॉल सामको पाटात पडलो अणि व्हाव्नी गेलो. क्रिकेट त्याहांच सोपलां अणि माजी सुटका जाली कारण ‘बोल हाडे धावेचां’ काम मालाच सलां. 


संध्याकाळां दादा घरा आयलो. दादा बहुतेक करनीं  (निदान पैरेन) वाळपै, डिचोल्या, म्हापसे, पणज्या असो जात सलो कितेला म्हणी जाले कोर्ट कचेरी. तो विषय वेगळो से.


दुसरे दिवसा दादा सकाळी उठोनीं परत डिचोल्या का म्हापसे कारोतरी गेलो. घराशी आमी सगळी तेतले तेंत में, भाऊ, आक्का, नली १० वर्खावेल्ली.  सकाळ गेली सद्दांसारखी. दुपारला पणसाची भाजी अणि पापडांकरतां पणसुलां काढेचो बेत सलो. अक्राचे दरमेन रामा आयलो. तेणिन बरेच पणस उतरावनीं दिलेन. चारानां सगळेनीं बेसेचां थरलेलां. वैनी, आई, आक्का, कमलमावशी, दोन कामेरी अणि बहुतेक उषा मावशी आयली सली. 


नकुळान पणस फोडनीं दिलेन. सगळीजणां कोंडाळां करनीं बेसले.. हाताला तेलगाळ लायलो. (घाणेंवर खोबरेचां तेल काढनीं हाडतकत ते तेलांत तळाला चिखल कसो बेससे तो. तेंत बरांच तेल शिल्लक उरसे तेचो वापर असो करीत.)  हें सगळां काम खळेंत जाले. पयली खळां स्वच्छ सारवनीं थेवीत. आवारच मोटो, ८/९ जणांचां कोंडाळां करनीं कामाला सुरूवात हय. आई शेडां काढेचां काम करी. एकान गरे काढेचां. दोघानीं कोशिऱ्यो अणि आठळ्यो वेगळ्यो करेच्यो. एकान भाजाला गरे बारीक करेचे. दुसरेन आठळ्यो फोडेच्यो.‌ साल काढनीं कुडके करेचे. असां काम सामुदायिक तऱ्हान गजाली करतां करतां चाले.


हेडा भाऊ आपले मोहिमेवर सलो. तो कितांतरी थरवनी आयलेलो; कारण माला तेणिन जेव्वेचे पयली एकदोनदा विचारलान, “अरे बाबा, दादा टुबक कें थेयसे सांग मरे! में तुला म्हापसें एक सिनेमा दाखयसां. 


हें आयकोनी माला भयच दिसलो. पण तो बरो धीटाचो सलो. में जाणे सलो दादा टुबक कारांतरी काळखांत न्हेवनीं थेयसे. पण आम्ला टुबक म्हटलां की कापरां भरे. फावले वेळांत दादा टुबक काढी. तेला ऑईल असा कितातरी लावी. टुबक वजनदार सलां अणि ठासेचां सलां.  ठासेचां म्हणजे, दारुसामान वरथींन नळीन भरेचां. जेंत मुलशांव, गुळ्यो, छरे, गंधक अणि ठासे चक्क सोडणाचो काथो. माला दिस्से ठासेला सुध्दा प्रमाण सलां. कारण दादा वरथीन सामान भरी अणि मोग काथो घालनीं तेला दुसरां एखादं टोकीचां कितां तरी साधन घेव्नी भितर घायलेलां सामान घट्ट करी. असां टुबक ठासनीं जालेवर टुबकाचे मध्या एक रिलीज लिवर सलो. तेला गंधकाचा एक धापणा लावी. कारण लिवर हाताचे बोटान सोडलां की गंधकाचां धापण पेटोनीं भितरले दारुसामानाचो स्फोट हवनीं छरे, मुलशांव, गुळ्यो सावजाला लागोनी सावज गतप्राण.  असां ठासवनी थेयलेलां टुबक काळखाचे खोल्यांत थेवी.‌ दादाचे टुबकाचो आवाज आमचे पेटेला (कुत्रेला)  परिचयाचो कारण ते आवजासरशी तो सैरभेर नाचे, मोठ मोठेन आवाज करी कारण एतां थोडेच वेळानं आपलेलां फिस्ट (मेजवानी) मिळणार म्हणी.


थरलेप्रमाण भाजी अणि पापडानां गरे  काढेचे असो कार्यक्रम सुरू जालो अणि गजालीना  नेट आयलो. हेडा भाऊला स्फुरण आयला. माजे कानाकडा येव्नी हळु सांगलान, “मला आज टुबक उडवायचे आहे” पण तेला तां थेयलेलां मिळत नतलां.  तेचे लागी सद्दानीं बरी विजेरी (बॅटरी) सत सली. सगळीं भायेर बेसलेली बघनीं तो घरांत टुबक सोदु लागलो. चौकात खूप काळोख त्याहां बघलान, दिसलां नाय, रांधपाचे खोल्यांत सोदलांन, ना य !…… मोग पुढां गेलो नारळाचे खोल्यांत, त्याहां नेमकां दारापाठल्यां एका भिंतीला लोंबकळायलेलां सलां. भाऊन तां हळुच काढलान अणि आपले खांदेला लायलान. माला विचारलान, बाबा में कसो दिस्सां. में म्हटलां तू सामखो सोलदार कसो दिस्सय मरे! माला दिस्लां तो तां मात्सां बघणार अणि थेयनांर. पण केंचा कितां. तेंत सगळे लोक कामात गुल्ल. मामु शेणाचे गोळे घाले सरदात. काकाजीला कारो तरी धावडायलेलोन. दिपक तो ल्हान, दादा घरा नाय. सगळे जण गरेंचे कामांत. उल्लो बाबडो में एकटो. माजां थोडांच तो आयकनांर सलो, अणि तितकी विचारशक्ती बी नतली.


तेंणी टुबक खाकोट्याला मारलान अणि भायेर आयलो. सगळेंत आनंद जालो तो आमचे पेटेला. तो नाचो लागलो पण बाकीची कामांत व्यस्त. म्हण्टां म्हणसर तो खळेंत पावलो. तो एतां पुढां कितां करणार हे माला कायच सांगलान नतलां, माला कळेल इतकी माजी कुवतय बी नतली. 


टुबक घेवनीं खळेंत आयलो, पेटो कुळागराचे दिशान धांवो लागलो. सगळेनां दिसलां कुळागरात वांदर आयले. भाऊला सनसनाटी करणेची घाई जालेली. … जी मंडळी कोंडाळां करनीं बेसलेली त्याहां भाऊ मध्या आयलो. एक दोघांनी तेला सांगलां, “ते हांगा नाका,  पयली कुशीक घेवन वच” भाऊ केंचो आयकसे. तेणी मधले भागात टुबक धरलान अणि चाप (लिव्हर)  ओढलोन अणि खूप मोठ्ठो आवाज जालो!  


ठो!  $   $ !  (आवाज एकदाच आयलो.)


तुरंत परिणाम, कमलमावशी आडवी पडली. दोघतिगानां श्वास घेव्वे त्रास हंव लागलो. कांबेरी हातातले गरे उडवीत, आड्ड्यो मारीत, शेपडी तुटेसर धावली. बाकीचे भयान हेडातेडा पळ्ळे. आई, वैनीन मात संयम सोडलो नाय.  सगळेनां दिसलां की कमलमावश्याचो प्राण गेलो. त्याचे तोंडावर पाणी माल्लां., नाकाला  कांदो धोडावनी लायलो. नीलगिर हुंगे दिली. पण ती अक्षरशः धापो टाकीत सली. जणू घटकाभरीची सोबत.  त्याला त्याहांघ निदयली. वांगडाला आक्का, वैनी दिमतीला. वरांभरान मात्सी हुशारी आयली पण आंग अजुनय थरथरत थोडे वेळांन साहा, साडेसापर्यंत सगळां सामसुम जालां. 


इतकेंत दादा आयलो, टुबक पडव्यावर बघनीं सामखो रागारुद्र अवतार जालो. सगळें वरती तापो लागलो. पेटो तेचे पायाकडा येवनीं नेट्टान भुकों  लागलो. थोडे  वेळांन दादाला सगळी गजाल कळ्ळी.


भाऊ अणि तेचे बरोबर माजी, “न भुतो न भविष्यती” अशी हजामत जाली. मोग काढू करेची एक दोरी सली. भाऊला लागी बलायलो, कुलेवर एक थापट मारलान, दोरी हातात घेतलीन दोन्ही हात बांधवलेन. दोरीचां दुसरो टोकान खळेंतल्ये एका मेडीला बांधनीं घातलोन. मोग माला बलायलो. माजे कुलेंवर दोन थापटां लगायलीन. दुसरी एक दोरी घेतलीन अणि माला दुसरे माड्याला बांधनीं घातलोन. तेला दिसलां की मेंच तेला टुबक दाखयला सलां.


थोडे वेळांन नाना धाव्येत्थीन आयलो तेड्ला रात्रीचै ८/९ वरां जालेले.  दोन मेडीना दोघानां बघलेन मोग दादान तेचे  पुढेंत परत एकदा आमची हजामपट्टी केलीन.  तरीपण नानान सांगतकत साधारण एका वरांन दोघांना सोडनीं घायलेन. बघे गेले माजी कायच चुक नतली. पण भाऊ पडलो सोयरो तेला लागोनी तेचे बरोबर माला शिक्षा भोगेवी पडली. भाऊ जावनीं खळेंत निदवलो. में बी खळेंतच गुठ्ली केली. पण अर्धेवरान वैनी आयली. माला उठयलोन. भाऊलाय उठोव लागली तो उठलो नाय. तेला आपलु चुक कळोनी आयली.‌


में इवळां आटवल खाल्र्ला अणि परत निदवलो. रात्रीपर्यंत कमलमावशी बरे पैकी बरी जाली.


सगळी देवाची कृपा अणि कितां ? अनर्थात्थीन सोडयलेन, आमची सुटका केलीन.


तर अशी ही भाऊ टुबक गजाल!!

Subhash Joshi

सुभाष जोशी 
गोवा 
फोन: ७०२०६१८३२८ 

नर्मदा परिक्रमा- देवश्री गोडबोले

यात्रेकरून् केलो,

नर्मदा परिक्रमाचो संकल्प;

आशीर्वाद दिलो नर्मदामाईन्,

पूर्ण झालो तेचो संकल्प   ||१||

 

नर्मदामाई जेचे पाठी,

दृष्टी थेयसे तेचेवर;

तयारी करनीं शरीर-मनाची, 

यात्रेकरू चालसे नर्मदा तीरावर  ||२||

 

नर्मदा माई चो मिळ्ळो आशीर्वाद,

केलो संकल्प ओंकारेश्वराकडा;

चालसे तो यात्रेकरू,

आठवणींचो वांगड पाठीकडा  ||३||

 

नर्मदे हर उच्चारण ,

देसे धीर अणि ताकत मनाला;

परिक्रमा ही करसे यात्री,

मनात थेवनीं भक्ती भावना  ||४||

 

चालसां में बी ही वाट सुखाची,

न करता पर्वा काटेकुटेंची;

सांज वेळाला मनांत, 

भावना दाटेल कृतकृत्याची  ||५||

 

अन्नदाते वाटांतले, 

वांगडाला यात्रेकरू;

स्वतःच्यो कसल्योच गरजो नाय,

अनुभवली माज्या माईची पाखर  ||६||

 

माई धाडसे पाठीराखो,

होच त्याचो आशीर्वाद;

पूर्ण हतां परिक्रमा,

करूया जयघोष 

“नर्मदे हर! नर्मदे हर!  ||७||

Devashree Godbole

देवश्री गोडबोले 
पुणे 
फोन: ९०११९५८७२५  

सीरियली अणि सासू- वेदिका गाडगीळ

“अगो! इतकां पाणी पायऱ्यांवर कसां काय सांडलां से तां? नक्कीं सांडलांच से काय कोणीतरी मुद्दाम ओतलां से काय?” शोभाकाकी  विचार करुं लागली.  

 

“सुखदा!…ए सुखदा! आवाज येसे नी आयके?…कें गेली सय? एठा ये आदी!…” 

“हां येसां येसां! कितां जालां? एकदम वेल्ल्या पट्ट्याचो आवाज लायलोत तो?” 

 

“कितां म्हणजे? हें इतकां पाणी मुद्दाम सांडयलांस नी पायऱ्यांवर? म्हणजे में बाबडी मात्शी वरतीं तेर्रासावर जानार सल्यां, ती अणि खालतीं येव्वे नाकां. डायरेक्ट चंद्रावर! नांव फक्त सुखदा! पण दु:ख देव्वेची एक संधी सोडूं नाकां तूं!” 

 

“शिव…शिव…शिव…ओगीच कितांय तोंडाला येल तां बोलों नाकां हां!…तुमला मारनी माजेवेल्लो कामाचो भार कीं वाडोवनी घेयन में? में मघा तेर्रास धोवनी घेव्वे म्हणी बालदी भरनी थेयलेली दाराशीं. ती माजरान बी लवंडायली सनार.” 

 

“हय ते! कळ्ळां! दोन पायांच्या माजरान!” 

“”कितां? शुद्ध से नी बोलेची? में सांगोनी थेयसां हां, ओगीच कायच्या काय में आयकोनी घेव्वेच्यां नाय.” 

 

“हय तर! जाणं में! तुमचे मॉर्डन पिढ्याला जाण्टी म्हणसत तीं ओखदाला सुद्धा घरांत नाकां. पण मेंय बी कमीची नाय. अशी स्वस्तांत मरेच्या नाय में….अनसूये, मात्सो कुडको घे अणि हीं सपणां पूस गो बाये आदी….” शोभाकाकी बडबडत भायेर गेली.

 

‘ही आई सिरियली बगनी बगनी पिशी हयवे पावली से. हेंना सांगोनी आजच बांबोळ्या एक बेड बुक करनी थेय म्हणी सांगसां.’ मनातले मनांत विचार करीत सुखदा आपले कामाल गेली. 

 

सद्दां उठोनी पाच सहा वरां सिरीयली बगेच्यो (अणि तेंचो रिपीट टेलिकास्टय बगेचो) हो शोभाकाकीचो आवडतो छंद. भुरगीं मोठीं होवनी आपापले मार्गाला लागलेलीं. कामां सुखदा अणि अनसुया करीतच सलीं. ह्याला काम कितां? उठलां काय आपल्यो त्यो सिरीयली बगेच्यो. त्याला तेंचां इतकां व्यसन लागलेलां की तेंत घडसे तसांच आपलेय घरांत घडसे काय कितां असे त्याला भास हत. 

 

“आई, बगा में यूट्युबवर वेगळ्या पद्धतीन पावभाजी केली से. खावनी बगसा?’ सुखदान विचारलान. 

“हय तर. तेंत वीख घालनी माला मारनार सय नी? नाय जाले माजे आवडिचां कीं करशील तूं?” 

 

“ओगीच भूत लागलेवारी बडबडूं नाकां हां! माला दिसलां म्हणी केली सली. एतां कोणी सांगलेवरय करेच्यां नाय! अणि केली जाले देव्वेच्यां नाय! तुमला मारेचां जालेवर सांगोनी सवरोनी मारीन में! माला असले सिरीयलींतले उपाय करेची गरज नाय! हेचेपुडां में रांदलेलां जेंव नाकां! कळ्ळां नी! र्‍ह्या उपाशींच!” सुखदा रागान फडफडत घरांत गेली.  

 

“ह! सांगोनी मारीन खे! में जाणं! ‘जोडी तुजी माजी’ सिरीयलींत असेच डावपेच ससत. तेंत ती मधुरा कितकी संस्कारी सून! त्याचेवारी सून सलेली जाले माजां नशीबच! पण माजां केंचे जन्माचां कर्म आड आयलां रे व्याघ्रेश्वरा..ही असली मोनिकासारखी व्हिलन सून दिलीस माजे पदरांत!….”

 

काकीचां बोलणां अनसुयान आईकलान अणि हळूच सुखदाला दोळो मारलोन. ‘ये केस तो काम से गया’ अशी सिनालां करीत दोगीय आपापले कामाला गेल्यो. 

 

संध्याकाळां वरद कामावेल्ल्यां घरा आयलो. बग जाले काकी टिव्हीचे पुढेंत बेसोनी रडत सली. 

“किंता गे आई? रडसय शी? कितां जालां? सुखदान कितां म्हटलान का तुला?” 

“ती कितां माला म्हणणार? घर माजां! में हवी तशी र्‍हेयन!” 

“कितां जालां तर मोग?” 

 

“अरे, तो ‘अग बाई सासूबाई’ सिरीयलींतलो बबड्या कसो म्हणी रे आपल्या आवयला केंडनी बोलसे? ती आवय तेची बाबडी सादी रे. कांयच उत्तर देंत नाय. तेला मात्शी म्हणी लजबीज नाय का दिसत? कितां म्हणी रे एतांचीं भुरगीं!” – म्हणी ती परत रडों लागली. 

 

वरदान हें आयकोनी स्वताचांच कपाळ बडवनी घेतलां. 

 

“अगे, नाटकां गे तीं. तेचे पैसे मिळसत तेंना. प्रत्यक्षांत ती निवेदिता जोशी सामकी डॅशिंग बाईल मगे. तुला मिळ्ळी नतली का कला अकादमींत? तुला सादी दिसलेली का ती? मात्शी तकली वापर गे आई!” 

 

“हय आरड! तूंय बी ते बबडेवारीच! एक दिवस उरभायेर काडशील म्हणजे जालां.” वरद रागान घरांत गेलो. 

 

एक दिवस वरदान पिक्चराची तिकीटां काडनी हाडलीं. सुखदाला बगतकच काकीला तिडक आयली. “हें कितां घातलां सय गो त्या संजनावारी? बरे कपडे नाय का तुजेकडा?” त्याणी सुखदाला तापयलीन. 

 

“आई हेला काफ्तान म्हणसत. हो माजे जनरेशनाचो नॉर्मल ड्रेस. अणि संजना कोण? में ओळखतय नाय अणि बगलीय बी नाय केडला?” 

 

“तूं कशी बगशील? ‘आई कुठे काय करते?’ सिरीयलींतली व्हिलन ती. कसले कसले नाका जालेले कपडे घालसे म्हणी सांगों! तूं त्या रजनी वारी कपडे कीं घालीत नाय गो. ती रजनी कशी बरी संस्कारी सून! एकदम नम्र चेड!” 

 

“आई, ती नम्र चेड प्रत्यक्षांत भयानक मॉडर्न सनार. तेनां हेचे पैसे मिळसत गे आई! तूं माला सांग, तुजेहारीं पन्नास हजार सतील जाले मिळतील का माला?” 

 

“इतके पैसे कीं हवे तुला? वृद्धाश्रमांत बी धाडीत नाय मरे माजेच पैसेंनी?” 

 

“अगे साड्यो घेवनी देसां मगे तुज्या सुनाला! संस्कारी सून हवी नी? सिरीयलींत तेंना फुकटच्यो साड्यो मिळसत. तश्योच ह्याला देंव नी हाडनी? एत्तां माजेहारीं पैसे नाय. माजे पगारांत्थीन सगळे हफ्ते गेले सत. दे पन्नास हजार. येतानाच साड्यो घेवनी येसां.” 

 

“फक्त साड्यो घेवनीं कितां करुं में? तेला फॉल बिडींग, ब्लाऊज बी शिंव्वे नाकां? अणिकय धा हजार अ‍ॅड करा तेंत!” सुखदानय व्हावते पाण्यांत हात धोवनी घेतले. 

 

“हय तर! सत्याचो जमानो म्हणीं उरलोच नाय जाले! आवय बापूय म्हणजे कीं कोंत हेंना!” अणि कांयच बोले सुचलां नाय म्हणटकच भुरगेंवरच धुकलुनी काकी घरांत गेली. 

 

एक दिवस शोभाकाकी अणि त्याचे महिला मंडळाचे गृपान पिकनिक काडलेली. आदी समुद्रावर जावनीं तीं सगळीं लागींच सलेले मॉलांत गेलीं. बग जाले कितां! ‘जोडी तुझी माझी’ सिरीयलींतली संस्कारी रजनी सामको शॉर्ट वनपीस, मोठ्ठे हील्सचे सँडल, भडक मेकप करनी केंचेतरी बोड्येचे हातांत हात घालनी फिरसे!  

 

त्याणिन खात्री करे म्हणी लागीं जावनी विचारलान. जाले तीच सली. मोग कितां! सगळेंनी त्याला एक सेल्फी काडेची विनंती केली. सेल्फीला पोज देतां देतां दोगी-तिगी त्याला चिकटल्यो. जाले ती संस्कारी रजनी तेंचेवर कसली तापली! सगळ्या बायलांना केंथीन शेण खाल्लां अणि ह्याचेलागीं आयलीं असां जालां. 

 

घरा पावतकच काकीचो मूड काय बरो नतलो. थकली सनार म्हणी बोड्यो अणि सुनान लक्ष दिलान नाय. दुसरे दिवसा गीताकाकीन रजनीची गजाल सांगतकच मात्र तेंना हंसेवां काय रडेवां कळेना. एतां काकी पडली एक नंबर हुशार! ती आपली चूक कशी माननी घेल? पण तेड्लापाष्णी काकीचां सीरीयल पुराण मात्र मात्सां कमी जालां. एतां काकी सिरीयली बगसे, पण तेंच्यो काण्यो सांगोनी लोकांचो जीव काडीत नाय. 

 

Disclaimer: हे काण्यांतलीं पात्रां अणि सीरियलींचीं नांवां फक्त मनोरंजनाकरतां घेतलीं सत. कोणाच्यो भावना दुखाव्वेचो हेतू नाय.   

वेदिका गाडगीळ

वेदिका गाडगीळ 
गोवा.
फोन: ८२०८१६५६०५ 

चित्पावनीचे संवर्धनासाठी गणपुले फाऊंडेशन चे उपक्रम

माणुसकी- रमा गोविंद जोशी

माणसातलो देव – भक्त

 

एकदा में, माजो बोड्यो अणि अणिक काय लोक, अशी आमी सगळी मिळोनी अयोध्येला जायवेचा थरयलां. ‘दाभोळी विमानतळावेल्या लखनौच्यो तिकटी काढल्यो. थरलेले तारखाला आमी सगळी मंडळी विमानान गेली. संध्याकाळा, दिवसा उजेडा विमान लखनौ पावलां.

 

पुढां जातां जातां अजून ‘चेअर वर’ बेसलेली जाण्टी माणसां दिसली बरां दिसलां. आरतीला सुरूवात जाली सली. माला सामखी श्रीरामाचे पुढेंत न्हेवनीं सोडलीन. दोळे भरनीं आयले. दर्शन झालां, तीर्थ प्रसाद घेतलो. परत चेअर वरथींन भायेर हाड्नी सोडलीन. नाय जाले  इतके गर्द्यात दर्शन हयवेचां कठीणच सलां. ते संतामुळां आमला कसलोच त्रास न हतां देवाचा दर्शन झालां. 

ते संताला कितातरी दक्षणां देव्नीं पाया पडेवां म्हणी माजे बोड्येन तेला सगळेला शोधलो पण कारोच तो दिसलो नाय.

 

“राम भक्तच सनांर तो कोण तरी!” अशो में अणि माझो बोड्यो गजाली करीत सलो इतकेंत, “हे वाटान या, हनुमान गुडी से, हेग्डा वरती जावया!”  बरोबरची मंडळी मिळ्ळी अणि पुढां चालों लागली . तेंचे बरोबर आमी बी गेली. पुढेंत हनुमंताची उभी मुर्ती. कडाला पुजारी प्रसाद देतानां, दुसरे कडांला हे सगळे ‘संत साधू’ जप करीत बेसलेले दिसले. तेनां बघनीं सगळेंना नमस्कार केलो. यथा शक्ति दक्षणां दिली. त्याहांच आम्ला मदत करनांरो संत बी दिसलो. तेंचेमुळां   श्रीराम दर्शन बरां जालां म्हणी पाया पडली, सगळेंचे बरे आशीर्वाद घेव्नी “जय श्री राम, जय हनुमान!”  असो नामाचो गजर करीत  आमी ‘हनुमान गुडी’ उतरोनीं खालती आयली . . तर असो हो राम भक्त, हनुमान संताचे रूपांत आमचे मदतीला धाव्नी आयलो.

Rama Joshi

श्रीमती रमा गोविंद जोशी  

गोवा

फोन: ७५०७१५८४०३

भुरगेंचा लग्न - आजचो ज्वलंत प्रश्न- स्वाती सदानंद केळकर

आज काल भुरगेंची लग्ना थरवे खूप त्रास हसत आई बाबाला. एक कारण म्हणजे चेडीचा शिक्षण अधिक ससे. तेला लागोनीं त्याची अपेक्षाय तशीच ससे. बोड्ये शिक्षण घेवे कमी पडसत.

 

दुसरो प्रकार सुरू जालो से तो म्हणजे जर पत्रिका जुळली, शिक्षण मना सारखा सला तरी दोघांनी लग्न थरेचे पयली मिळेचा. मोग होकार देवेचो काय नाय तां चेड थरयसे. म्हणजे बोड्येची किंमत कितां उर्ली?

 

इतकांय करनीं पुढां किदां घडेल तां काय सांगे येतं नाय.

 

हे कारणानं भुरगे लग्न नाकां म्हणसत.

 

अणि लग्न जालां जाले भुर्गी हतील काई नाय हो दुसरो प्रश्न.. कठीण से पुढां पुढां!

 

हे पिढ्याला ‘झेन झी’ म्हणसत.

 

हो कलियुगाचो प्रभाव सोंव शकसे.

स्वाती सदानंद केळकर

स्वाती  सदानंद केळकर 
गोवा
फोन: ७०६६०९८१८०  

आरसो- विद्या दांडेकर

आज आरसेत बघलां जाले स्वतःचोच चेहरो अनुळखो दिसलो.

भायेरथीन हसणारो माणूस, भितरथींन मात्र थोडो खचलेलो दिसलो.

धावसे प्रत्येक जण एठा, वेळ मात कोणालाच नाय,

आयुष्य म्हणजे नुसतांच जोडेचां / मिळवेचां, दुसरा काहीच नाय.

 

आपले शेजारचे घरात कोण ऱ्हेसे, हें आज कोणाला खबर नस्से,

पण साता समुद्रापार कोण कितां खासे ? के जासे, कितां करसे ? हेचो इतंबुत तपशील (अपडेट ) मात सामको तोंडपाठ ससे.!

 

मोबायलान माणसां जवळ हाड्ली असां म्हणसत,

पण प्रत्यक्ष भेट अणि संवादाचे शब्दच सांडले सत

 

बोल्सांत पैसो खुळखुळों लागलो की माणूस नाती विसरसे.

माणूस मात्याचे भिंतीपेक्षा शिमिटाचे भिंतीवर प्रेम करू लागसे.

जेंचेनी बोट धरनीं चालेला शिकयला, तेंचाच हेना ओझां हसे.

 

निसर्ग आपले परीन सांगसे पुरे करा एतां ही लूट,

विकासाचे नावावर माणसां माणसात किं फाटाफूट.

घटकांभरी ओग्गी ऱ्हेवनीं, प्रश्न स्वतःलाच बघा विचारनीं,

जगसों का आमी माणूस म्हणी, का यंत्रमानव हंव्नी ?

हेचो एकदा पडताळो बघाच एतां करनीं !!

विद्या दांडेकर

विद्या दांडेकर 
पुणे.
फोन: ९८९०८९०४६० 

चैत्र पाडवॉ- रमा गोविंद जोशी

निसर्गाचे कुशीत लिपलेलो, ल्हान तानप्यासारखो, लुसलुशीत पानाफुलानी भरलेलो, अणि फळांनी लगडलेलो चैतन्यदायी ऋतूराज म्हणजे वसंत ऋतू. अणि आनंददायी वातावरणात येनांरो चैत्र पाडवो म्हणजेच ‘संसार पाडवो’ हे सणाचे आगमनान आमचां मराठी वर्ष सुरु हसे. ह्या नवे वर्षाचां मोठां स्वागत गुढी, तोरणां लावनीं हसे. सगळे हिंदू घरात ल्हान मोठे प्रमाणांत सण साजरो करसत. ल्हान झोपडी जरी सली तरी शेणांचा सारवण करनीं रांगोळ्यानी आपले दाराचो उंबरो, खळां सजयसत. चैत्र म्हयनेंत तुळशीकडा किंवा देवाकडा चैत्रांगण घालसत. गोडाधोडाचा रांधप करनीं नवे वर्षाची गोड सुरुवात करसत.

 

विशेष करनीं ब्राह्मणांकडा अशी पद्धत से. लाकडी डोलाऱ्येंत चैत्र गौरीचे रुपांत अन्नपूर्णा बेसवनीं त्याची सद्दानीं वासाची फुलां, चाफ्याचे वळेसर घालनीं पूजा करसत. एक म्हयनो ती ते घरांत माहेरवाशिण म्हणी ऱ्हेसे. हे महिन्येत फळां फूलां खूप प्रकारची उपलब्ध ससत. सद्दानीं तऱ्हातऱ्हाचे फळांचो नैवेद्य दाखयसत. घरात  नवीन सुन सयेल तर ‘नव्या सुनाचो नवो पाडवो’ म्हणी कौतुकानं जोडप्याला बेसवनीं तेंची ओवाळणी करसत. सवाशीण बायलानां  बलावनीं हळदीकुंकू करसत. गाणी गासत आरत्यो म्हणसत. फुगड्यो घालसत. आंबे पणस, काजी, केळी, अनस तसांच सगळो रान मेवो खावनीं मंडळी तृप्त हसत. चैत्रांतले हळदीकुंकाची सांगता ‘डाळीची पचडी अणि तोरांचा पन्हां’ घेवनीं हसे.

 

असो हो आनंदाचो वसंत ऋतू सगळेंना आनंदाचां, सुखाचां दान देय्वे शिकयनारो. जेनां नवांं घर, गाडी घेवेची सयेल जाले साडेतीन मुहूर्तांपैकी संसारपाडवो हो एक शुभ मुहुर्त. नवे जोडपेनां संसार सुरू करे हो दिवस एकदम बरो. ब्रह्मदेवांन ही जी सृष्टी तयार केलीन तो  दिवस म्हणजे चैत्र प्रतिपदा म्हणजेच ‘संसार पाडवो’!

Rama Joshi

श्रीमती रमा गोविंद जोशी 
गोवा 
फोन: ७५०७१५८४०३

वांदर- भावना दातार

आमचां बाबा वांद्रांचां

झाडांवरती राज्य

लांब उडक्यो मारेला

आमी सदांच सज्ज ।।१।।

 

लांबलचक शेपडी

डोळे मिचमिचणारे

हुप हुप आवाजात,

देसां आमी इशारे ।।२।।

 

तसे आमी ऱ्हेव्वेला,

रानानीच ससों

केळी, पेरां खायवेला

कुरागळात येसों ।।३।।

 

झाडावेल्ली कवळी पानां 

खासों आमी बुड्डुनीं

एकटे कईच नससों,

फिरसां सदां झुंडीनी ।।४।।

 

तुमी भुर्गी आमला

वेडायनी बरी दाखयसा,

आमी मोठे डोळेंनी बघतकत

धूम फुजो धांवसा ।।५।।

भावना दातार

भावना दातार 

बेळगुंदी, बेळगाव

फोन: ९४८०४८४७१०

त्याची काणी ... चौकटी भायलां पाऊल- विद्या दांडेकर

राधा….,  राधाचा आयुष्य म्हणजे जणू नेमाप्रमाण चालणारां सला. त्याचो घो, दोन गुणी भुरगी, असो सुखी संसार अणि दिमतीला सुखसोयीची सगळी साधना सली. हे सगळें  व्यापात इतकी घुसपलेली की स्वतःलाच विसरोनी गेलेली. न चुकता पहाटे उठेचां, डबे करेचे, भुरगेंना शाळांत सोडेचां. बाकी घरांतली कामां, केरवारो करेचो, घरा येनांरे सोयरेधायरेंची बडदास्त राखेची. हें सगळां करणेंतच त्याचे दिवस सरत सले.

 

एक दिवस, दुपारचेवेळा आवरेवां म्हणी कपाट उघडला. आवरत आवरता धुळ्ळो खात सलेली एक फाईल हाताला गावली. त्याचेवर सलेलो धुळ्ळो पुसलो अणि तेंतली फाईल भायेर काढलीन. त्यांत त्याची पैंटिंग्स सली. कॉलेजात सतानां त्याला गोल्ड मेडल मिळ्ळां सलां. तां बघतकत त्याचे दोळेंत पाणी आयलां. त्याला ल्हानपणापाश्णी चित्रांरंगवेची आवड सली. अतिशय सुंदर पैंटिंग करीत सली. क्षणभरी त्याचां मन भूतकाळांत पावलां. पुढेंत आरसो सलो. त्याणिन आरशात बघला जाले त्याला एक ‘गृहिणी’ दिसली. तेलकट, मळकट, स्वतःला विसरलेली. त्याचे भितरलो ‘कलाकार’ कारो तरी लुप्त झालो सलो. इतकेंत ‘टण,टण’ करनीं घड्याळ्याचे टोले वाजले अणि ती भानावर आयली. कारण भुरगी परत शाळात्थीन येवेची वेळ झाली सली. जालां….. ! परत येरे माझ्या मागल्या! परती घरचे कामांत व्यस्त झाली.

 

त्या रात्री त्याणिन थरयलान की घोवाशी (केशवाशी) आपलां मन मोकळां करेचां. तेचे कडा चित्रकलेचो विषय काढेचो, अणि बोलता बोलता केशवाला बोयली, “आयकलांत, माला परत चित्रकला सुरु करेची से, अणि एक बारीकसां प्रदर्शन भरवेचा से.”

 

केशव एकदम मोठ्ठेन हसलो अणि बोयलो ”अगो, एतां हें वयांत? भुरगेंचा एतां वाढता वय से, ती मोठी हंव लागली सत. तुला घर संभाळे वेळ कसो गावणार? एकवेळ छंद म्हणी चालसे, पण हे प्रदर्शन बिदर्शन अजिबात नाकां हां, हें सगळां करताना संसाराकडा तुजां दुर्लक्ष हनांर, तेमुळां नाकांच तां!” असां बोलता बोलता तेंचो दोळो लागलो. इतकी निद आयली की साहेब चक्क घोरों लागलो.

 

पण राधाला मात तो नकाराचो टोमणो सुईसारखो तोपलो. त्याची निदच गेली. विचारांत सामखी बुडोनी गेली. त्याणिन मनाशी नक्की केलांन की एतां ‘बे’ म्हणे चां नाय. सकाळी घो आफिसात अणि भुरगी शाळांत गेली काय सगळां कामां लोक्कोर आवरेची अणि हातात पिशोल (कुंचलो ) घेवेचां. रात्रीचो दिवस करनीं गावेल तसो अणि ते ते वेळांत चित्रां काढेची. असे तऱ्हान त्याणिन ‘कितानावर्ती’ ( कॅनव्हासवर ) आपले मनातले रंग देव्वे सुरुवात केलीन. करतां करतां राधान, संसार, मातृत्व बाकी सगळ्यो जबाबदाऱ्यो संभाळीत सताना, दिवसात्थींन गावेल तसो वेळ आपले ‘कलाला’ देवं लागली.

 

सहा म्हयनेनी त्याणिन एका इवळेसे गेलरीत प्रदर्शनाचा आयोजन करेचां थरयलान. जेड्ला केशव अणि भुरगी त्या गेलरीत पावली तेड्ला तेना अजबच दिसलां. त्याचे प्रत्येक चित्रात राधाचा अस्तित्व बोलत सलां. तेंतले एका चित्राचा नाव बी सलां “अप्रकाशित कोन्सो.” ते चित्रात एका स्त्रीचो चेहरो सलो. अर्ध्या भागावर काळोख सलो तर दुसऱ्यावर उजेडाची तिरीप सली.

 

प्रदर्शन बघे आयलेले एका समिक्षकान हें चित्र बघला अणि राधाला प्रश्न केलो, “मॅडम, ही तुमची गोष्ट से नीं ?”

 

तेड्ला राधा हसली, अणि म्हटलांन, “नाय…. ही माजीच नाय ते स्वतःचे अस्तित्वासाठी प्रयत्नशील प्रत्येक बायलाची ही काणी से.

 

एतां केशवाला आपली चूक लक्षात आयली. केशवान राधाचो हात हातात घेतलोन अणि त्याची मनपाश्णी माफी मागितली. राधाला आज कळ्ळां की, “आपली इच्छा पूर्ण हय्वे कोणाच्या परवानगीची न्हुय तर ध्येयाची गरज सली.”  एकदा ध्येय गाठेचा थरयला जाले माणूस कसलीच पर्वा न करता तां साध्य करुं शकसे.

 

स्त्रीचां अस्तित्व हें केवळ घराचे चार भिंतिच्या चौकटीत नस्से तर तां आपले सुप्त गुणांत, स्वताच्यो आवडीनिवडी जपणेंत ससे. ती केवळ कोणाची तरी आई, बाईल किंवा चेड नस्से तर त्याचां एक वेगळां अस्तित्व बी ससे. जगान घायलेल्यो मर्यांदांपेक्षा स्वतःचे क्षमतेवर विश्वास थेयणां अधिक गरजाचां ससे. जेड्ला ती स्वतःवर विश्वास थेयसे तेड्लाच त्याची खरी काणी सुरु हसे.

विद्या दांडेकर

विद्या दांडेकर  
पुणे  
फोन: ९८९०८९०४६० 

एता तीऽऽ सत्तरी उल्ली नाय- दत्ताराम बर्वे

बालमनावर झालेलो परिणाम हे गोष्टीला ६७ किंवा ६८ वर्षा झाली सतील. में सत्तरी भोहेल्ली एका  ब्राम्हण कुटुंबांत गेलेलो कोणाबरोबर गेलेलों ता यवजत नाय. त्याहां इतर गोष्टींबरोबर ‘तू कुठला? अशी ओळखीसाठी विचारणा झाले उप्रांत-वाळपय सातोडे असा कळ्ळेवर बाकीचे गोष्टींबरोबर वाळपय कशी मागास आदि चर्चा बरी रंगात आयलेली तिथे सगळे रान, डुकर, साप, वाघ आ व य …. बाये माझ्यांन तिथे जाऊ नजे ‘गे बाये। अशी गजाली हताहता म्हणूनच म्हणटा गो, “नाका गे बाये सत्तरीचो घोव सातय कापडां तोच घोव” में ते वयांत सुद्धा गंभीर झालों अणि सोधू लागलों सत्तरीत असां कितां भयानक से की जेमुळां आयलेले लोकाना सत्तरीत सगळो काळोखच दिस्से अणि ती साधारण जाण्टी बाई पदराचोशेव तोंडाला लावनीं कुत्सीत असां मनसोक्त हसली. 

 

असोच अणि एक बारीकसो प्रसंग १९ डिसेंबर १९६१ ला गोवा स्वतंत्र झालो अणि कांय म्हयनेनीं, फडके (आंबेडे), मराठे (पाटवळ) असे जुने कांय जाण्टी मंडळी सहज हालचाल बघू म्हणी आयलेले हे मुळचे सत्तरीचेच पण गोवे भायेर सलेले एठा आमचे बरोबर चित्पावनी बोलों लागतकत आमला बरां दिसलां असोच एक सुशिक्षीत अणि तेची गृहस्थी बरी चाललेली सैवी असो गृहस्थ आयलो आमचे दादाचो (वडील) तो लांबचो नातेवाईकय सलो तेणी भायेल्ले जगाचे अनुभव अशो बऱ्यो गजाली सांगितल्योन अणि यथावकाश आमचे शिक्षणाची चौकशी केलीन, आपली भुर्गा कितकी शिकलींसत ती कशी हुशार. इत्यादि सांगोपांग सांगतकत आमलाय बरां दिसलां. में अणि आमचो पुतण्यो अशी आमची शैक्षणीक पात्रता (मराठी चौथी फक्त) जाणोनी घेतकत तेणी आमला आमची लायकी सांगोनी “थोडकेंत म्हणजे ‘तुमला रेडे” म्हणे हरकत नाय असां शिफारस पत्र दिलां. आमला आमचेबद्दल तेड्ला कितां दिसलां ही अपराधिक भावना सलेपेक्षा आमचे दोघांचेय वडिल समोर सतानां हे गृहस्थान हें शिफारस पत्र आमला देताना तेला मातय कशी लाज दिसली नाय हे आईकतकत. 

 

ते दोनय पालकाना कितां दिसला सेल हो विचार तेणी करे हवो सलो असा माला अजुनी दिस्से असे हे दिवस सत्तरीतले कित्येक पालकांचे नशीबी आयलेले सतील. अणि आज ती सत्तरी नाय, तैसां आमी सत्तरींतले दोतोरांची ( डॉक्टरांची ) सहज म्हणी नावां काढली तेंत आयुर्वेदीक, एमबीबीएस (M.B.B.S. ), होमीओपॅथीक सगळे मिळोनीं आंकडो ५० चे आसपास गेलो तुमी पुणे रुबी हॉल हॉस्पिटलात गेले जालें सत्तरीतलो डॉ. भावे दिसेल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटलांन गेलेत जाले सत्तरीत डॉ. बर्वे, डॉ. कुलकर्णी म्हणी आमची नात से. संरक्षण मंत्री पर्रीकर सताना ते PA, म्हणी जोशी सलो तसाच जपान, ऑस्ट्रेलीया अमेरीका यू.के. असे आमचे कित्येक सॉफ्टवेअर इंजिनीयर कार्यभार सांभाळसत. गोवेंत सुद्धा पणज्या जाशाल जाले निष्णात वकील सत्तरीचो सेल उत्तम गणिती आमचोच सनार मोठे मोठे उद्योगांचा ऑडीट करे आमचे सत परवा धारखंडावर झालेले मेळावेत ओळख कुटुंबीयांची ओळख सांगताना कित्येक जणांनी कौटुंबीक माहिती सांगताना आपली भुर्गी परदेशात सत तां सांगितला तेचे शिवाय अणि कित्येक जण परदेशात सेवा देसत हे खबर से.

 

कृषीक्षेत्रात सुद्धा असंख्य युवकानी भरपूर परिश्रम घेवनीं भरपूर उत्पन्न वाढयलेलां से. सत्तरीतले कित्येकजण बीएस्‌‍सी अँग्री सत भारत सरकारचे कृषी रत्न पुरस्कार सत्तरीत आयलेले सत तेच बरोबर फैक्टरी आदि उद्योगक्षेत्रात आमचे भुर्गे सत आज वाळपय जाशाल जाले आमचे कितकेसेच तरुण स्वतःचो व्यवसाय उत्तमरीत्या 

सांभाळसत. पणज्या उत्तम आर्किटेक आमचो से. दोळेची उत्तम शल्यविशारद बांबोळ्या आमचीच से. गोवेतले उत्तम हृदयतज्ञ फोंडे आमचीच अशी सगळेच क्षेत्रांतली नावां सांगले ‘यादी खूप लांबनार. पयली आमचे जाण्टेनी खूप परिश्रमान एठाच्यो जमनी राखल्योन सत त्यो केंचेय परिस्थीतीत राखे हव्यो कोटी रू. मिळसत म्हणी अजिबात विकेचा नांव काढेचां नाय. आमची भूमी सुवर्ण भूमी से ती प्रत्येकान राखे हवी.

 

सत्तरीत आमच्यो चेडी ज्याहां जातील त्यांहां नाव मिळोवनी सत्‌‍ तेंचेकडा वेगवेगळ्यो कला सत तेचो उपयोग करताना दिस्सत मुख्य म्हणजे त्यो कोणाला ओझां हत नाय.  परिस्थीला दोन हात करेची हिंमत तेंचेत से, माला तेचो अभिमान से.

 

सत्तरीचां वैशीष्ट्य एठाचे  लोक शब्दाला पक्के (अपवाद सोंव शकसे) आपले आई बाबान सुद्धा जर शब्द दिलेलो सेल जाले पाळनार सहकार क्षेत्रात आमचे कितकेसेच तरुण नावां रुपाला आयलेले दिस्सत सत्तरीलले तरुणाना माझा आवाहन से की तुमी स्वतःला कमी समजों नाको पुढले काळांत गोवेतली ‘सदाशीव पेठ” म्हणी सत्तरीकडा लोक बघू लागले जाले माला आश्वर्य दिसेचां नाय.

दत्ताराम बर्वे

दत्ताराम बर्वे 
गोवा   
फोन: ९४२०८१८२७४ 

साहित्य धाडेसाठी सुचना

अंकासाठी, आधी प्रकाशित न केलेला साहित्य घेतला जासे. साहित्य प्रकार अणि विषय समजून घेणे साठी साहित्य आवाहन पत्रक बघेवा. साहित्य धाडताना ता टाईप करनी धाडेवा, पीडीएफ रुपात साहित्य धाडू नये.