साद चित्पावनीचो - जाने. २०२६
साद
चित्पावनीचो
चित्पावनी त्रैमासिक, वर्ख ३ | अंक पयलो
जानेवारी २०२६
संपादिका: सौ. आरती मोने
मुखपृष्ठ, संकलन, अक्षर जुळवणी, प्रकाशन: गणपुले फाऊंडेशन, ठाणे, महाराष्ट्र
(c) गणपुले फाऊंडेशन (डॉ. सौ. अनुश्री वैभव गणपुले)
या अंकातील मजकूर प्रकाशकांच्या परवानगी शिवाय अन्यत्र प्रकाशित करण्यास मनाई आहे.
या अंकात वापरण्यात आलेली चित्रे इंटरनेट वरून घेण्यात आली आहेत.
सर्व चित्रांचे कॉपीराईट मूळ लेखकांचे व संकेत स्थळांचे आहेत.
अंकात व्यक्त झालेली मते लेखकांची वैयक्तिक मते आहेत.
त्याच्याशी संपादिका व प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.
प्रकाशन दि. पौष कृ. ८, ११ जानेवारी २०२६
अनुक्रमणिका
Toggle—- तुम्ला सगळेंना मकर संक्रांतिच्यो हार्दिक शुभेच्छा —-
संपादकीय- आरती मोने
नमस्कार 🙏🏻
चित्पावनीचो अभिमान सलेले सगळे जाण्टे नेण्टे भावा भेणिशीना माजो नमस्कार अणि मकरसंक्रांतीच्यो गॉड अणि मनापाश्णी शुभेच्छा!!
नवां वर्ख..! नवो संकल्प ..! नवी उमेद ..! हें सगळेचो ताळमेळ घाल्नी तिसरे वर्खाचो पयलो, “साद चित्पावनीचो” हो अंक संकेतस्थळाचे माध्यमात्थीन तुमचे पर्यंत पाववीत सों जेणेकरनी तुम्ला अंक ऑनलाईन वाचे मिळेल.
खरां म्हणजे हे अंकाची सुरूवात करेचो आमचो उद्देशच हो से तो म्हणजे चित्पावनी भाषांतले साहित्याचो प्रचार, प्रसार अणि संवर्धन! “चित्पावनी बोलणारे, बोलीचे जाणकार साहित्यिक तसांच नवेन बोली शिकणारेनां अणि वाचकांना उपयोगी असां एक व्यासपीठ तयार करेचां हो उद्देश!” एक अशी जागा ज्याहां चित्पावनी साहित्य, विचार अणि अनुभव मोकळेपणांन एकमेकांचे हातात हात घालनीं फुलतील!
ऑनलाईन स्वरूपात अंक सादर करीत सतानां खरांच खूप बरां दिस्से. मकरसंक्रांत्याचे निमित्तान हे अंकातले ‘शब्द रुपी तिळगुळाचे’ साहित्याचो गोडवो तुम्ला नक्कीच गावणार, हेचो आम्ला पूर्ण विश्वास से.
जानेवारी २०२६ हे अंकात वाचक वर्गाला काही खास गोष्टी सत. अनेक विषयांतले लेख, दर्जेदार ओडिओ रुपांतला काव्य, चित्रकृतीचे माध्मात्थीन मनोरंजन, कवितांत्थीन मिळणारो आनंद, चित्पावनी सुविचार, मनांत विशेष घर करनीं ऱ्हेनांरे एखादे जागेचां मर्म. तेच बरोबर जिभाला चविष्ट लागेल अशी पाककृती बी एठा से जी वाचनी, जिन्नस करनीं तरी बघूया अशी ओड लायणारी से.
असे तऱ्हा तऱ्हाचे विषय घेव्नी प्रत्येक साहित्यिकान योग्य शब्दांत गुतलेले शब्दांचे दागिने घायलेलो “सुफळ संपूर्ण” अंक “साद चित्पावनीचो” तुमचे भेटीला आयलेलां से.
जानेवारीचे पयले आठवड्यात एकमेकांना नवीन वर्खाच्यो शुभेच्छा दिले नंतर बायलानां वेध लागसत ते मकरसंक्रांतीचे! बाजारात तयार तिळगूळ उपलब्ध सले तरी स्वतः घरा करनीं वाटेचो आनंद वेगळो ससे. आमच्यो वाचक भगिनी तेंत कुशल सतच तरीय बी “शब्द रुपी तिळगुळाचो आस्वाद घ्या अणि एकमेकांन्ला द्या !
तुमचे प्रत्येकाचे सहकार्यान एतापावेतो “साद चित्पावनीचो ” हे अंकान, आमचे चित्पावनी भावाभेणिशीचे मनात एक स्थान निर्माण केलां से. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटकच न्हुय, तर परदेशांत स्थाईक सलेलेनांय हें संकेतस्थळ (वेबसाईट) आनंदाचां स्रोत थरलां से.
“आमचे प्रेमळ साहित्यिक, तेच बरोबर योग्य मार्गदर्शन अणि गणपुले फाऊंडेशनचे नव नवे उपक्रमाला लागोनीं अंकाची अभिवृद्धी नक्कीच पुढां जायेल. सर्व वाचकांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा! तुमचे सगळेंचा उत्साहपूर्ण पाठबळ अणि ताकतीन हो प्रवास बरे तऱ्हान सुरू से. २०२६ हे वर्खातय तुमचां सगळेंचा सहकार्य लाभेल, ह्याची आम्ला खात्री से!
धन्यवाद!
देव बरां करुं 🙏🏻
✍️ संपादिका
सौ. आरती मोने
साखळी, गोवा
फोन: ७०३८०६२५३६
गणपुले फाऊंडेशन चे वतीन- वैभव गणपुले
नमस्कार.
संकेतस्थळ रुपांतलो तिसरो अणि तिसरे वर्खाचो पयलो अंक प्रकाशित करताना माला खूप आनंद हसे.
सगळे साहित्यिकांचा अभिनंदन अणि कौतुक.
डिसेंबर महिनेत आयोजित केलेले “चित्पावनी भाषेची तोंड ओळख” कार्यशाळाला खूप बरो प्रतिसाद मिळ्ळो अणि १५ पेक्षा जास्ती सदस्यांनी कार्यशाळाचो लाभ घेतलो.
येणारे काळातसुद्धा चित्पावनी संवर्धनाचे उपक्रम गणपुले फाऊंडेशन आयोजित करनार से अणि ते साठी तुमचे सहकार्याची गरज से.
माला खात्री से की तुमी उपक्रमांना सहकार्य करनार अणि अंकासाठी असाच लिखाण करत ऱ्हेनार.
अंकातले साहित्याचो आस्वाद घ्या अणि तुमच्यो सुचना आम्ला धाडा.
तुम्ला मकर संक्रांतीच्यो शुभेच्छा.
देव बरा करू.
वैभव गणपुले
संस्थापक – गणपुले फाऊंडेशन
ठाणे, महाराष्ट्र
फोन: ९९२०३४५८६१
गोवा बागायतदार संस्था- दत्ताराम बर्वे
१९ डिसेंबर रोजी गोवा स्वतंत्र झालो. हो गोवेसाठी अणि गोवेतले शेतकरी बागायतदारांसाठी सुवर्णक्षण जे क्षणाची खास करनी ब्राह्मण बगायतदार जे जाणटेंचे भूमीचे रक्षणासाठी म्हणी दारिद्र्याशी बरीच वरखा दोन हात करनी कसाबसा जीवन जगत सले तेंचेसाठी हे क्षणा सारखो आनंद नतलो. स्वतंत्र झाले उपरांत सुद्धा खूप कष्ट केलीय पण तेंतआनंद सलो भवितव्य सला ते सुपारी घेणारे व्यापारी आपल्यो तागड्यो घेवनी अणि चिला खांदेवर किंवा घोडेवर घालतेकत दोनय वाटान वजन हत सला ते तागड्यांत सुद्धा १६ सुपाऱ्यो वजन घालसत ते वाटान येव्वेच्यो (मोठयोशो वेचनी) तेडला मणांनी सुपारी घेत सले.
मोग भारतीय वजनानुसार किलोंनी घेव लागले. १५ किलोंची तेत सुद्धा अर्धो किलो जास्ती घेत सले. एता हातातले तागड्याचे चमत्कार किता करता येसत हे सांगेची गरज नाय. कुळागरकार सुद्धा बावडे दिन प्रतिकार किंवा ते संबंधात काय बोलेची सोय नतली असे पार्श्वभूमीवर फोंडा, नेत्रावळी एठाचे काय बगायतदार सर्व श्री. आत्माराम सावईकर, श्री. कुंडईकर, नेत्रावळीचे चिंतामणी देव, आत्माराम सहकारी, रामकृष्ण सहकारी, फटबा कामत असे ११६ जणांनी सभासद होवनी सेंट्रल सुपारी सहकारी सोसायटी ही संस्था स्थापन केलीय. सुरुवातीला फक्त सुपारी व्यवहार असो उद्देश सलो कालांतरान सुपारी, काजू, नारळ, मिरी अशी उत्पादना बरो दर मिळोंवनी देणा हो प्रमुख उद्देशासाठी तेडला एका शेअरची किंमत रु. २५ सली. एता ती रु. ५०० झाली से. सुरुवातीला फक्त सुपारी बागायतदारच सभासद होव शकत सले. सध्या काजू, सुपारी, नारळ, केळी, अननस, मिरी असो एकूण बागायती उत्पन्न सणारो अणि गोवा बगायतदार या संस्थांशी व्यवहार कारनारो सभासद होव शकसे.सभासद हताना कुटुंबातलो जर कोणी सभासद सेल जाले रोकडी मान्यता मिळसे अणि कुटुंबात सभासद नसेल जाले प्रथम तीन वर्खा संस्थांशी व्यवहार करेवो लागसे ते नंतर सभासदासाठी विचार होव शकसे.
एकेकदा असा हसे मार्केट एकदम खालता येसे सुपारी, काजू, नारळ हे उत्पन्ना बाबत खूपदा असा हसे ते वेळावर व्यापारी आपलो माल सोसायट्याला देवनी आपला नुकसान कमी करू शकसत किंवा केंचेय सभासदला हाताशी धरनी मंद्याचे वेळावर माल संस्थाला देव शकसत. साधारण पणान प्रत्येक सभासदाचो माल कितको येसे ता रेकॉर्ड संस्थाकडा ससे ते मुळा मोठे प्रमाणात माल तो सभासद सुद्धा देव शकत नाय अणि व्यापाऱ्याला आपल्या वेळावर सभासद होवनी माल विकता येत नाय. हे संस्थाला सुरुवातीपाष्णी श्री. शशिकांत उमर्ये सचीव म्हणी एक रत्न मिळ्ळा. तेणी सगळी व्यवस्था अशी बेसयली की प्रत्येक काम चोख अणि सगळो विश्वास. ते स्वतः सुपारी वेचे सुद्धा जेडला वेळ सेल तेडला बेसत सले. १९६८ – ६९ हे वर्खा सभासदांना पीक कर्ज देव्वे सुरुवात केली. १९७५ पर्यन्त पीक कर्ज वसुली १०० टक्के हत सली अणि महत्वाची गोष्ट हे वर्खा संस्थान रु. १ कोटी व्यवहाराचो टप्पो गाठलोन. एता पर्यन्त १००० सभासद संस्थांचो स्वतः चो निधी ५ लाख पर्यन्त गेलो तसाच भाग भांडवल २५००० पर्यन्त गेला.
१९८० – ८१ सालात संस्थान फोंडा एठा स्वतः ची वास्तु बागायतदार भवन उभा करेचा असा थरवनी २६ फेब्रुवारी १९८१ हे दिवसा तेडलाचे गोवेचे मुख्यमंत्री मा. प्रतापसिंग जी राणे हेंचे हस्ते शिलान्यास केलोन. तेसाठी सरकार कडथीन थोडा कर्ज अणि भागभांडवल म्हणी ५ लाख अर्थ सहाय्य मिळ्ळा. दरमेन वार्षिक उलाढाल ३ कोटी पर्यन्त पावलेली. १९८९ हे वर्खा स्वयंसेवा पद्धतीन चालणारे बाजार फोंडे सुरू झालो. त्याहा पयलेच वर्खा ४४ लखाचो व्यवहार झालो अणि दुसरेच वर्खा १ कोटी पर्यन्त व्यवहार गेलो. आज २०२५ हे वर्खा संस्थाचो व्यवहार १००० कोटीचे दिशान झेप घेसे.
खरा म्हणजे सुपारी खरेदी साठी म्हणी स्थापन झालेली सेंट्रल सुपारी खरेदी विक्रीची संस्था मंडगावचे नारळ विक्री संस्थाचे विलिनीकरणा उपरांत गोवा बागायतदार आज संस्थेचे फोंडा २, मडगाव २, वास्को, जुना गोवा, पर्वरी, म्हापसा, डिचोली, साखळी, वाळपई, नुवे, कुकळ्ळी, काणकोण, शिरोडा, सावर्डे, असे गोवेत सगळेला स्वयंसेवा केंद्रा उभी सत.
अणि गोवेतले लोकांचो बागायतदारावर पूर्ण विश्वास से. बागायतदाराचो दर बघनी बाकी व्यापारी दर लायसत. आज बागायतदार संस्थाकडा १००० आसपास कर्मचारी सत. कर्मचाऱ्यांचो उनिफोर्म सुद्धा आज प्रतिष्ठा से. गोवा बागायतदाराचे संचालकाला सुद्धा आज मान देसत. गोवेत एखादे जागेवर बागायतदार बाजार उभो ऱ्हेलो का तेचे आसपास आपोआप बाकीचे बारीक सारिक दुकानांची गर्दी हसे.
में सुरुवातीला सांगितला ते प्रमाण श्री. शशिकांत गणपत उमर्ये नावाचा रत्न मिळळा. अतिशय हुशार, प्रामाणिक, शब्दाला पक्को, शिस्तीला कडक पण कर्मचारी तेचे घराशी जायेल जाले तेला सोफावर बेसवनी स्वतः चहा करनी देत सलो. पण तेणी केंचेय शाखावर फोन केलोन जाले तो कर्मचारी त्याहासुद्धा उभो ऱ्हेत सलो. कानपूरचे सुपारी व्यापारी फोन दर करीत सले. अगदी कोट्यावधीत पण शब्दांत व्यवहारात कारीच गफलत नाय. प्रत्यक्षात ते व्यापाऱ्यांची अणि हेची कय भेट झालेली आठवत नाय असे भक्कम पायावर उभी सलेली संस्था आज गोवेची अभिमान से. संस्थाला उत्तम सहकारी संस्था म्हणी राष्ट्रीय पातळीवर दोनदा पुरस्कार मिळले सत.
संस्थाचो स्वतः काजू प्रक्रिया प्रकल्प होंडा सत्तरी एठा से. सगळे तऱ्हाची पिठा त्याहाच करसत. संस्थाचे बाबतीत सुपऱ्याचे दर कोसळले मुळा नुकसान सोसेची पाळी आयली असे वेळावर जे बागायतदार बाजारात उभे सत तेंचेच समतोल राखलोन. गोवेतली जनता खाजगीत बोलताना भटांची सोसायटी म्हणोन बरी चलता असा कोंकणीत शेरो मारताना आयको येसे.
दत्ताराम बर्वे
गोवा
फोन:९४२०८१८२७४
सात लघुकथा- रामकृष्ण सोमण
१
आज आवशीन खूप दिवसांनी भाजी केलीन सलीन. तेणीन अणिक अणिक मागनी खाल्लीन.
तो हात धोवनीं आयलो. आईन आपला ताट वाढनीं घेतलान सला. भघसे जाले आईचे ताटात भाजी नतली. तेणीन भाजीचे तोपांत बघलान. तेंत भाजीच नतली. रोकडांच आईकडा बघलान. आई खाल्ती मान घालनीं, सोलाचे कढ्यान भात कालवीत सली.
========
२
अगो कितां जालां, अशी एकटीच किताला बेसलीसस काळखांत ?
में बोयल्या खरां, पण बाबाला तां लागलां सणार मनाला. में खरां ताच सांगलां, तो बोड्यो वाईट से, मवाली से.
चल, उठ, “बाबा बलायसे तुला बाहेर!”
बाबा, में चुकल्यां, तुमचे मनाला लागेल असां नेटानं बोलल्या.
नाय बाय, तू नाय चुकलीस, मेंच घाई करीत सलो.
बाबा…..
अगो बाय, तुजाच बरोबर से गो. तो तुला नाय चालेचो. तो खोटां बोललो.
पण , तू माजां पोर शोभसय, स्पष्ट बोयलीस.
=======
३
सहलीला जायवे पैसे बाबान दिलेन. वर खर्चाला शंभर रुपये ? ते किताला ? ते मात में देवेचो नाय! दहा वीस जाले खूप जाले, हवे तर घे. तो तसोच निदवलो. दुसरे दिवस बटवो घेवनी सहलीला गेलो. मध्याच किताला तरी पैसे देवेचे जाले. तेणी बटवेचे बोल्सात सहज हात घातलोन. तेत नोटी सल्यो. शंभराची एक, दहाच्यो चार.
दाहाच्यो ह्यो नोटो आईन थेयलेल्यो सतील पण शंभराची ?
तेचे डोळेत पाणी आयला. मनात म्हणो लागलो, बाबा में जेड्ला पैसो जोडीनं तेड्ला तुमला कायच कमीपडे देवेचो नाय, तुमी मागले शिवाय ……
==========
४
आजोबा, आज तुजो हेपी बड्डे नी ? संध्याकाळा केक हाडनी कापूया हा. सकाळां नातू आयलो नी सांगो लागलो. संध्याकाळा काळोख पडे तो घरा आयलो. सगळी माजघरात जमली सली. तो हातपाय धोवनी माजघरात आयलो. नातवान हाताला धरनी खुर्च्यात बेसयलोन. पुढां टेबलावर केक, ताम्हणात निरांजना, हळद कुंकवाची कुयरी. सून पुढेंत उभी सली. आजोबा, हे नवे घरात तुमचो वाढदिवस आमी साजरो करणार सों. तेला एकदम भरनी आयलां. क्षणभरी डोळे धापलेंन. सुनान आरती ओवाळलीन, अक्षता घायल्योन. आजोबा, केक कापा. नातू बोल्लो. तेंचेनीं डोळे उघडले. अश्रु नाकां सताना आयले. तेंचेनीं नातवाचो हात धरलोन. दोघानीय सूरी केकाला लायलेनी. आजोबाला मनात्थींन खूप गदगदोनी आयलां. तेणी परत डोळे धापनी घेतलेन मात्र जमलेले सगळेजण टाळयो वाजयत सले.
===========
५
बघितलांत, आमचो शाणो आज रांगो लागलो. मोगाशी त्याहां थेयलो सलो. एता हेगडा पावलो.
अगो, अणि एका म्हयनेन बघ, तो सगळी कडा फिरे लागणार से. मोग बघ ,तुला जमिनीवर कितांच थेवे गावेचां नाय.
तुमलाय खूप खबरदारी घेवे हवी हा. अगो, घरात वस्तू हेग्डा तेग्डा कोण उडयसे, तूच नी?
में कामाला भाहेरच ससां दिवसभरी. होय पण….माला दिस्से, तो माजां कायच आयकेचो नाय. तुमला मात भ्येवनी ऱ्हेनांर से. माला ? अगो तूच माला भ्येत नाय, तो कसो भ्येल ?
हे मात खूप जाला हां. एतांपाश्णीच तेला माजे विरूद्ध खोटां सांगनीं थेवा !
इतकेंत तो हसलो. दोघानीन तेचेकडा बघितला,
खरांच तो दोघानाय हसत सलो. त्याणीन तेला उखलोनीं सोमतोच तेचेकडा दिलोन.
अगो माजी पेंट…बघ मँगो भिजयलीन तेणी
ती मोठेमोठेन हसतच उभी ऱ्हेली ! हसतच ऱ्हेली.
==========
६
ही बी केळ मोडली नी ? कितां जालासे हे केळींना कायच कळत नाय. घड येवनी तो जून हय्वेचे पयलीच मोडनी पडसत.
आजीन लायलेला हे केळीचा बेट. कितकेसेच नेमे आयले, मोठे जाले ,व्याले अणि मोठेमोठे घड मिळो लागले. आजी सताना तेना पाणी घाली, सुकी पाना कापी, तीन चार केळीना वरती दोराचे फास घालनी बांधनी थेवी. एखादी केळ बघनी, ती केड्ला वियेल तां आजी बरोबर सांगे.
शेजारचे रामान म्हटलान, सगळयो केळी एता खणनी काढे हव्यो. जमीन परत नीव्वळ करे हवी.
अरे देवा, आजीन मोठे प्रेमान, काबाडकष्ट करनी लायलेला केळीचा बेट आमी मोडेचा ? आईला कसां दिसेल ?
बाबा, हे आजीन केलेला नी, आमी किताला मोडूया ?
पोरा, तां एतां जूनां जालां, सगळां खणोनी काढे हवां. तरच नवे नेमे येवनीं व्येवनी घड मिळणार सत. पोराचे मनात भय दाटूनी आयलो.
========
७
चार पाच दिवस जाले, नातवाचो ताप कमी हत नतलो, तेडला दोतोर म्हणों लागलो, तेच्यो मोठ्या हॉस्पिटलात सगळ्यो टेस्टी करनी घेवेच्यो लागणार. तां आयकोनीच म्हातारो भ्यालो. हॉस्पिटल, म्हटला की ते सगळे उपदव्याप, सुई, वायरी … तेला त्याची आठवण जाली. पंधरा विस दिवसांचो तो उपद्वयाप , ती तारांबळ…. अणि शेवटी किता कायच नाय ! ती सोडनी गेली सली तेला ! हास्पिटलाचो कायच उपयोग जालो नतलो….
बोड्यो सकाळी नातवाला घेव्नी हॉस्पिटलात गेलो. घरा म्हातारो म्हणो लागलो, माला कळया रे रोकडांच, कितां सांगसत हॉस्पिटलात तां. में सांगसां माज्या नातवाला कायच हय्वेचा नाय.
हॉस्पिटलात जायवे भायर सरले, एठा म्हातारेचो जीव कासाविस हंव लागलो. तो एकटोच घरात.
संध्याकाळ जाली तरी ते परत आयले नाय. रात्रीचे आठ वरांवर. हॉस्पिटलात्थीन ते घरा आयले. घराचा दार उघडाच. बापू बापू म्हणत बोड्यो घरात सरलो. बापू, के सस तू? हे बघ, सगळे रिपोर्ट बरे सत बाबूचे. भिवेची गरज नाय.आठ दिवसांत तो बरो होणार से. बापाशीचो कायच जाब कसो नाय म्हणत तेणी तेच्या हाताला हात लायलोन. तो थंडगार लागलो. नातवासाठी आजेन स्वतः प्राण सोडलो सलोन.
श्री. रामकृष्ण दिनकर सोमण
गोवा
फोन: ९४२३८८३८४३
कृष्ण घालितो लोळण- दिनेश्वर जोग
(१) कृष्ण घालितो लोळण
कृष्ण घेसे गडबड्या लोळोनी
आयली यशोदा धावोनी
कितां रे बोड्या
मागसय तू
देसां मे हाडनी ….
आई माला चंद्र दे धरनी
तेचो आरसो दे करनी
असलां रे कसलां मागणा तुझां
जगाचे वेगळा ….
कृष्ण घेसे गडबड्या लोळोनी
आयली यशोदा धावोनी
कितां रे बोड्या
मागसय तू
देसां मे हाडनी ….
आई माला साप दे धरनी
तेचो चाबूक दे करनी…
असलां रे कसलां मागणा तुझां
जगाचे वेगळा ….
कृष्ण घेसे गडबड्या लोळोनी
आयली यशोदा धावोनी
कितां रे बोड्या
मागसय तू
देसां मे हाडनी ….!!
(२) आज मथुरेचा बाजार….
आज माला बाजाराला जायवे हवां
माला झालो उशीर….
आज माला बाजाराला जायवे हवां
माला झालो उशीर
घरांतलां काम काय सोपत नाय
माला रोकडां येवे मिळत नाय
मग होसे उशीर….
आज माला बाजाराला जायवे हवां
माला झालो उशीर
किताला रे आडयलीस माजी वाट
घराशिं से सासू खाट
मारील बेष्टी च ती बोबाट
सोड रे पदर
आज माला बाजाराला जायवे हवां
झालो उशीर
आज माला बाजाराला जायवे हवां
झालो उशीर
किताला रे आडयलीस माजी वाट
हे घराशिं बेसोनी सत
तेंचेन हात्थीन काय नाय होत
घालतील बेस्टीच हुज्जत
सोड रे पदर
आज माला बाजाराला जायवे हवां
झालो उशीर
आज माला बाजाराला जायवे हवां
झालो उशीर
दिनेश्वर जोग
गोवा
फोन: ९४०५६६५७७२
कसलां कितां बोलसस- सुबोध फडके
कसलां कितां बोलसस
तु्जां जीवन से गोंडस
कसल्यो बढायो मारसस
तूं एक दिवस जायवेचो सस
तुला कितां दिससे तूंच श्रेष्ठ
बरां काम कर अणि कर कष्ट
कर दुसरेला मदत घे बरी उतरा
कितांय न करता जयकार हसे..
नाय रे शाण्या तसा केड्ला हसे?
बरां कर्म करे एकच जन्म मिळसे
कर बरां काम अणि गाळ घाम
सत्यान वाग असत्य वागणां सोड
कायदेन वाग स्वैर वागणां सोड
सत्यान वागशील जाले तरशील
असत्यान वागशील जाले…..
मरशील कायमचो बदनाम हवनीं
नाव तुजा कमय हो कर्मयोगी!
सुबोध फडके
गोवा
फोन: ८७८८६४८५९७
आईआजी- सुभाष जोशी
(में आजीला आई म्हणत सलो. म्हणी आईआजी असा नाव दिलासे.)
माझी मुंज ८ वे वर्षा झाली. म्हणी में म्हापसे जाउनी कितांय येसे ता बडबडोनी पुजा सांगे तयार झालो. वर्षाथीन ३/४ वेळा जायवे मिळे. माझे आतेभावाकडा खुप भटजी जमत. त्याहां एक सदाकाका म्हणी वयस्कर भटजी येत सलो तेणी एकदा माला विचारला ‘तु भालचंद्रदादाचा ना रे?’ में हय म्हटलां. ते बरोबर तेणी पुढा सांगलान ‘म्हणजे तु तुझ्या आजोबाच्या दुसऱ्या बायकोपासून झालेल्या मुलाचा मुलगा!’
में म्हटलां माला हे, हो इतिहास खबर नाय . एतां हे ज्ञान घेवनीं में कितां कमायनार सलो?
नंतर कोणाकडत्थीन तरी हो इतिहास कळलो. माझे आजीचो जन्म सुर्ला हे गावातलो. मराठे घराणां. माझी आजी जेला में कायम आई म्हणत सलो, ही एक अनाथ चेड सली. धावेत शंकरभाऊ जोशी हेंचे घरा वाढली. नाना मराठेचॊ बापुय त्याहां सलो. दोघांचे आवय, बापुय प्लेगान गेलेले. शंकरभाऊ जोशी हेंचो बापुय तेंचो मामा, तो सुर्ला जावनी दोन्ही भुरगेना घेवनी आईलो. अणि तेंचा बालपण धावेत सुरु झाला.
साल १९०० दरमेन सयवा. महादेवशास्त्री जोशी समकालीन. तेला ‘शाणको‘ म्हणत. नानाचे बापायला ‘शाणको’ म्हणत. १०-१२ वर्षाचो सताना तो कोणाबरोबर तरी धारवाड एठा गेलो अणि त्याहा पाठशाळांत रुजू झालो. तेला तत्वज्ञानाची आवड सली म्हणी त्याहा न रमता पुढां तो पुणे अणि काशी एठा गेलो. महादेवशास्त्री खाजगी गुरुजी सलो, तो पण कंटाळोनी पुणे एठा गेलो अणि मोठा नाव कमायलान.
एता उरली ‘काशी’ माझे आजीचा माहेरचा नाव. सासरचा नाव ‘इंदिरा’ अणि माझी आई. माझे आजेची पयली बाईल हिवतापान गेली. त्याला ‘तारा’ नावाची चेड सली. में त्याला कैच बघली नाय. १९२२-२५ चे दरमेन आजेन दुसरा लग्न केलान. अणि चेड म्हणजे माझी आजी जी तेड्लाचे वयाप्रमाण थोराड झाली सली. लग्न म्हणजे कितां तर देवळांत जावनीं एकमेकांना माळो घातल्यो. ती निराधार अणि हलाखिची परिस्थिती म्हणी लग्न उरलेला.
आजो मूळ खडक्याचो. त्याहा वडिलोपार्जित कुळागर, शेत सला. आजोबा धरनीं तीन भाऊश पण सख्य नतलां. रात्रंदिवस फक्त झगडेचा. तेंचे बापुय अणि काका पण खुप झगडत सले. असांय सांगसत कि तेंचेनी एकदा केंचे तरी देवळांत जावनीं प्रमाण केलां. तेची बाधा सगळेना झाली असा म्हणत. देवासमोर प्रमाण करणारो भाऊ नंतर पिसो झालो असा सांगत. हेला कंटाळोनी आमचो आजो खडकी सोडणी नगरगाव एठा आईलो. कायच शिल्लक नतला
आंबेडे गावातले भावें हेंचेकडथिन १०० रूपये उसने घेतलेन. दामदुपटीन १० वर्षात परत करेचे हे करारेवर. म्हणजे मुद्धल १० रूपये अणि व्याज १० रूपये म्हणजे वर्षाला २० रूपये परत करेचे. पण ही परतफेड सुद्धा खुप कठीण सली. कारण दर केंचेच वस्तूला नतलो.
आजोबा १८७५ चे दरमेन जन्म सयवो. तेडला भुर्गो १५ वर्षा अणि चेड ८ वर्षा असा लग्न हत सला. पयली बाईल गेली अणि नगरगावला ठिकाण घेवनीं वसवेचा सलां म्हणी दुसरा लग्न.
आजेन नगरगाव एठा जवळपास १७ एकर जागा १०० रुपयेना दामले कडथींन विकत घेतलीन. नगरगाव एठा फक्त दोघांच्यो जमिनी सल्यो एक दामले अणि दुसरे जोशी. कुळागर असा नतलाच, फक्त आराखडो, अणि भरपूर जंगल. हो व्यवहार १९२० ते १९२५ चे दरमेन झालो असा सांगसत.
आजोबाला सगळे आपा म्हणत सले. आजो अणि आजी ( आई) हेंचेनी सुरवातीला एक लहान खोपीसारखां घर बांधलां. दोघांय मिळोनीं, थोडे मानाय अणि कांबेरी घेवनीं नगरगावचॊ जागो वसोव लागले. सुपारी, कवाथे, आंबेची कलमां, काजीची रोपां लायली. अणि दोन तीन वर्षात सगळी जागा वसोवनी तयार केली. केंचेच वस्तूला दर नतलो म्हणी पानवेली अणि मिरवेली लायल्यो. अणि घेतलेला कर्ज ‘मुदती पयली’ मोकळा केलां. फक्त काबाडकष्ठ अणि दुर्दम्य इच्छाशक्तीचे जोरावर स्वतःला सुस्थितीत हाडलेनीं.
आजीला ५ भुर्गी झाली. सगळेत मोठी ज्याचा नाव सला येसु. त्याची मोठी चेड नली नगरगाव एठा वाढली. आमचे भावा बहिणीत ती एक. ती मोठी हतकच दादानं त्याचा लग्न लावनीं दिलांन. कारण त्या आतेची परिस्थिती बरी नतली. मध्या एक चेड गेली. तिसरो माझो बापुय जेला आमी दादा म्हणत सलो. चवथी चेड ज्याला म्हापसा एठा दिलेली अणि शेवटची चेड ज्याला शिरसी लग्न करनी दिलीन. माला आजो आठवत नाय पण दिसे गोरोपान अणि गळेत कायम रुद्राक्षमाळ घालत सलो. लोक तेला ‘कृष्णभट’ असो साद घालीत.
सुधाआते सगळेत लहान १९४३ सालातली. त्याचा लग्न झाला १९५८ सालात. तेचेआधी आजो हे जग सोडणी गेलेलो. मोजकी माणसां घेवनीं दादान सुधाआतेचा लग्न शिरसी एठा संपन्न करनीं आयलो. वाटांत कारवार माजाळी एठा सगळेना आडवोनी थेयली. कारण नाव सुधा जोशी. जा नाव महादेवशास्त्री जोशीच्या बायलाचे नावाशी जुळत सलां. जी गोवा सत्यग्रहात सली. सगळ्यो चवकशो झालेवर सगळेना सोडणी घायलीन.
आईची तब्येत बरी सली. दात शेवटपर्यंत शाबूत सले. दंतमंजन ती स्वतः तयार करी. तेसाठी खोबरा काळा हयपर्यंत भाजेचा. तेची पावडर करी तेत कापूर, वेलची पावडर, ज्येष्ठ मध, असा मिसळी. दात हाताचे बोटानी साफ करी. आमी सुधा ही पावडर वापरत सले. मोठे हयपर्यंत आमला ब्रश अणि टूथ पेस्ट खबर नतली. त्याचेकडा आयुर्वेदिक ओखादाचो भरपूर साठो सलो. त्याचा डेटॉल ओखद म्हणजे कोळसे ची पावडर जेत तिळेल अणि हळद पावडर घालनी कायम ओखद तयार सला. कारण आमी सारखे पडोनी घावे हत सल्ये. दर आदितवारा सकाळी सातीव्ण धोंडावनीं तेंत लसूण, हिंग, ओवो घालनी तिखट कडू काढो प्येवे लागत सलो. सगळेना बलावनी हो काढो प्यिवेचॊ लागे
गाईंचा सगळा काम आजीकडा सला. पांच सहा गाईचा दुध काढेचा, वासरांना पाजवेचा, गोठो साफ करेचो, गायी वासरांना खायवे देवेचा. काही वर्षानंतर हे काम वहिनीकडा म्हणजे आईकडा आयला. आमचेकडा एक मोठो माठ सलो जेत दही लायला जात सला. एक लहानसे खांबाला रवी अणि दोर लायलेलो सलो. सकाळी ११ वरांना दही घुसळोव्नी ताक करीत सलीं. लोणी जमा हय. ताक घुसळेचॊ खुप नादमधुर आवाज येतं सलो. में लागी सलो झालें माला बलावी अणि लोण्याचॊ गोळो माझे तोंडात घाली. लोणी कडवनीं तूप केला जात सला. महिनेत दोन तीन किलो तूप सहज जमा हय.
एतां मिक्सर आईले तेला लागोनी घूसळेची क्रिया बंद पडली. एतां गोरवां पण नाय.
में तिसरे वर्षापासणी सातवे वर्षापर्यंत खुप बरो नतलो. पाय बारीक, पोट गणपतीचा, तीन चार दिवस संडास नाय. में अगदी मरेचो वाचलो असा सांगसत. घरात माझे पेक्षा मोठी भेणीश अणि माझेपेक्षा ल्हान भेणीश म्हणी माझी जबाबदारी आईन उखललीन. माला खाकोटीला मारनी आई म्हयनेत्थीन एकदा तरी पणज्या नायझाले मडगांव जात सली. सकाळी सुटोनी दुपारपर्यंत दोतोराकडा पावेचा. रात्री केंचेतरी सोयरेकडा ऱ्हेवेचा अणि दुसरे दिवसा परत येवेचा. कारण गाडयो खुप कमी सल्यो. कै कै दादा बरोबर सत सलो. माझी ओखदा, माझेसाठी पेज, रात्री प्यिव्वे दुध सगळा आई बघीत सली. खायवे पोपायो. माझेकरता पोपायांची बाग दादानं तयार केलीन सली. म्हयनेथीन एकदा तरी भायरी सकाळी उठोनी घेव्वी लागत सली.
रात्री भायेरच्या पडवीत आई निदवत सली. में आईच्या कुशीत निदवत सलो. में बेळगांव एठा १९७२ ला जाईपर्यंत माला ही भाग्याची कुस गावली. माझे शिवाय त्याला पण निद लागत नतली. कारण में कारोय गेलो का ती अस्वस्थ हत सली. कैतरी रात्री अचानक मोठो आवाज हत सलो में एकदम भ्येवनी जागो हत सलो. आईला सादव लागत सलो. ती बिनधास्त सत सली. माला म्हणे ‘निदव तु ओगी, तुझो दादा तो, कुरागाळात जावनी टुबकाचे फार मारसे’ हेचा कारण चवथीउप्रांत सुपारी तयार हत सली अणि काय चोर बरी शिपटी बघनीं, रात्रीची चोरनी न्हेत. दादा मध्यरात्री उठोनी विजेरी तकल्याला बांधनी कुरागाळात जावनी दोन तीन फार मारनी येतं सलो. कितेला तर रात्री कोणतरी कुरागाळात फिरत ससे असो संदेश जात सलो.
१९६८-७० चे दरमेन त्याचा मोतीबिंदूचा ऑपेरेशन बेळगांव एठा झाला अणि त्याला बरा दिसो लागला. तरीपण ती शिकली नसलेकारण त्याला वाचे येतं नतला. त्याची बुद्धी तल्लख सली. स्व:ताची आवड सली. आमी ऱ्हेवे मीरामार पणज्या एठा १९८१ – १९८५ पर्यंत सले. ती वर्षाकाठी एक दोनदा येतं सली. आमी दोघांय दिवसभर घराभायेर म्हणी ती कंटाळोनी जात सली. त्याला १५-२० लोकांचां रांधप करेची सवय, आमची ल्हान ल्हान आयदणां बघनीं ती भरपूर हसत सली. आमचां जेवण, नगरगाव एठा एकटेला एक वेळ सुद्धा पुरणारा नतला. त्याला ल्हान घर पसंत नतला. ती म्हणे “किता रे तुमचा घर, हेडा म्हटले तेडा हापटे हसे. अणि किता रे! एका खोल्यात रांधेचा, दुसऱ्या खोल्यात निदवेचा अणि तिसऱ्या खोल्यात जावनी हगेचा शी!! “ एकदा कितां झाला त्यांनी कपाट समजोनी फ्रीझ उघडलोन. हाताला थंड लागलेवर कितां करेचा कळत नतलां. चुकोनी फ्रीझात दोन अंडी सली. त्यांनी ती उखल्लीन अणि माझेलागी येवनी “हे कितां रे बाबा? धवे कोबू? “हय धवे कांदे” असां म्हणोनी में त्याचे हातातली ती अंडी काढनी घेतली अणि भायेर केराचे पेट्यांत उडवोनी आयलो. त्याचे हातात फुटलेली झाले राम राम म्हणे हवा सला.
माजेवर अणि आक्कावर त्याची अशी आभाळमाया सली. त्याला सोडणी काराच जायवे नाकां सला. आमी मामाकडा जायवेचा झाला कि ती सकाळी पुढां कारी नायच हत सली. परत आयलेवर दोन चार दिवस बोलत नतली. वेल्ल्या न सांगता गेलेबद्धल आमला फैलावर घेत सली.
१९८१ सालात माझा लग्न थरलां किंवा थरयलां. त्याचो एकच आग्रह बाबाचा लग्न एठा माझे समोर मोठो मांडव घालनी हयवे हवा अणि खुप थाटामाटात हयवे हवा. अणि अगदी त्याचे मनासारखा सगळां झालां.
सौ अनुराधाचे केस खुप लांब सले. आईला ती आवडत सली अणि त्याला सुद्धा. त्याला आपलेबरोबर बेसवोनी खुप लांब दोन विणयो घालीत सली. त्याला आमचे बरोबर घेवनी जायवे तयार हय. १९८३ सालात त्याला घेवनीं, विमानान मदुराई, रामेश्वर, कन्याकुमारी असे फिरोनि आयले. त्याचो विमानान जायवेचो पयलो प्रसंग पण कारीच भ्याली नाय. ती भलतीच खूष अणि आनंदी सली. सारखी आठवण काढनी दुखा काडी. अणि सांगे ‘तुझे मुळा माला रामेश्वर पावलो रे! में एतां धन्य झाल्यां. फक्त बरा मरण येवंदे रे बाबा!”
१९८५ सालात त्याची तब्येत बिघडली. माला सारखी सांगे “अरे बाबा तु शिकलोस, बरी नोकरी लागली, लग्न करनीं बरी बाईल हाडलीस. अजूनय तु कसलो म्हणी अभ्यास करसय? एता पुस्तका पुरे. बरो संसार कर“ में तेडला CA चॊ अभ्यास करीत सलो. त्याचे आशीर्वादान मे १९८७ सालात CA पास झालो. १९८८ सालात त्याची तब्येत सामखी बिघडली. में शनिवारा घरा जात सलो तेडला ती जीवाचे आकांतान “बाबा, बाबा“ असा मोठ्यान सादवी. त्याची शुद्ध गेली सली. जीवा जीवांचे संबंध सोपत आईले सले. त्याचो जीव शिवप्रिय हणार सलो अणि शेवटाला मे १९८८ बहुतेक ८ मे त्याची प्राणज्योत मालवली. अणि पंचतत्वात विलीन झाली. एक माया लायणारो जीव देवाला प्रिय झालो.
सुभाष जोशी
पर्वरी, गोवा
फोन: ७०२०६१८३२८
एक जागो- शीतल रानडे
माजां घर 🏡
प्रत्येकाचे आयुष्यात असो एक जागो ससे, ज्याहा गेलेवर मन शांत हसे, विचार निर्मळ हसत अणि बाकी सगळ्यो काळज्यो, चिंता क्षणभरी विसरे हसत. माजेसाठी ती जागा म्हणजे माजां घर.
घर म्हणजे फक्त भिंती अणि छप्पर न्हुय, जाले ज्याहां आपुलकी, सुरक्षितता अणि निर्धास्तपणा जाणवसे. दिवस कितकोय बी त्रासदायक सों, भायेर कितकोय बी बवाळ सों घरात पाय दिलो की सगळां कसां शांत हसे. आवशीचे मायाचो आवाज, बापाशीचो सल्लो, अणि घरातले प्रत्येकाची शाब्दिक ऊब गावसे ह्यो सगळयो आठवणी माजां जगणां सुंदर करसत.
घरात माला मनासारखां ऱ्हेव्वे येसे. त्याहां ना देखावो, ना कसलोच दिखावो फक्त में अणि माजां खरां अस्तित्व. हे जागेन माला प्रेम, सहनशीलता अणि एक हव्नी ऱ्हेवेंची खरी किंमत शिकयली.
माजां घर म्हणजे माजां इवळासा विश्व से, ज्याहा में हससां , रडसां सुख अणि दुःख अनुभवसां, अणि परत नवेन जगे तयार हसां तोच हो जागो जो माजे जीवनाचो खरे अर्थान स्वर्ग म्हणे हरकत नाय.
देऊळ – एक जागो
जो माजे जीवनाला खरे अर्थान पवित्र कर्से हो असो एक जागो. नुसतो विचार जरी केलो तरी मन कसा शांत अणि प्रसन्न हसे.
जेड्ला देवळांत पाय / पाऊल थेयसां तेड्ला मनातलो गोंधळ, चिंता, अणि ताण हळूहळू विरघळोनी जासे. मंद प्रकाश, शांत वातावरण, घंटानाद, अणि धुपाचे वासांत माला कायमच एक अदृश्य शक्तीची उपस्थिती जाणवसे. तो जागो माज्या जीवनात फक्त श्रद्धेचा प्रतीक नाय, तर आत्मशांतीचो आसरो से.
देवाच्या मूर्ती पुढां बेसल्या की मन आपोआप स्थिर हसे. सगळ्यो भावना, आनंद, दुःख, भय, कृतज्ञता निःसंकोचपणान व्यक्त करे येसत.
जेड्ला में हात जोडनी प्रार्थना कर्सां तेड्ला माला नवी ऊर्जा मिळसे एक नवीन विश्वास मनात निर्माण हसे, की सगळां कितां तां व्यवस्थित हयेल.
देऊळ ही फक्त पूजा करेची जागा नाय तर ती माज्या आयुष्यात घर करनी र्हेलेली शांततेची, सुरक्षिततेची अणि विश्वासाची जागा से.
शाळा – एक जागो
जो माज्या जीवनाचा सार्थक करसे.
शाळा ही माज्या आयुष्याची पयली शाळाच नाय, तर हें माजां दुसरां घर से. माला फक्त पुस्तकातलांच ज्ञान नाय, तर खरां जीवन कसां जगेचा हेचो अर्थ कळ्ळो. खरां आयुष्य साकारत सतानाची नियमबद्ध शिस्त, सगळेंकडा कसां वागेचा, तोंडात्थीन शब्द भायर काडेचे आधी कसो विचार करेचो. वैगरे..वैगरे..
शाळेच्या भिंतींनी माजे स्वप्नांना आधार दिलो, माज्यो चुको समजोनी घेतल्यो अणि माजां व्यक्तिमत्त्व घडयला. परीक्षाचे काळात जरी ताण सलो, तरी शिक्षकांच्या प्रोत्साहनान सद्दानीं आत्मविश्वास वाडत ऱ्हेलो.
शाळा हो भुर्गेंचे आयुष्यातलो पयलो अणि महत्त्वाचो शिक्षणाचो जागो से. एठा आमी वाचन, लेखन, गणित, विज्ञान अश्यो अनेक विषयांचा ज्ञान घेसों. शिक्षक आम्ला प्रेमान शिकयसत अणि बरे संस्कार देसत. नवीन मित्र मैत्रीणी मिळसत अणि आयुष्य भर आमचे सोबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष र्हेसत.
शाळा आम्ला शिस्त, वेळाचा महत्त्व, प्रामाणिकपणा अणि सहकार्य हेंचे धडे देसे. जेणे करनीं आपलो आत्मविश्वास वाढसे. आमी एक उत्तम नागरीक घडे मदत हसे. म्हणीच शाळा ही फक्त इमारत न्हुय तर व्यक्तिमत्त्व घडयनारी एक सुंदर वास्तु से.
बाजार – एक जागो
हो एक असो जागो ज्याहा माला फक्त वस्तू खरेदी-विक्रीचां ज्ञान नाय, तर जीवनाचा अणि समाजाचा खरा व्यवहारज्ञान मिळ्ळा तो जागो म्हणजे बाजार.
ल्हानपणापाश्णी माला बाजाराचां एक वेगळांच आकर्षण से. सकाळां गर्दीतले आवाज, विक्रेत्यांचे हाकारे, अणि ग्राहकांकडा हनारे संवाद त्या बवाळांत प्रत्येक जण आपापले कष्टाचा मोल मांडताना दिस्से. अजून एक गोष्ट में शिकला की व्यवहार फक्त पैशांपुरतो मर्यादित नस्से तर तो विश्वास, प्रामाणिकपणा अणि संवाद हेचेंवर भक्कम उभो ससे. वस्तू विकणारो दुकानदार अणि खरेदी करणारो ग्राहक दोघांनीय एकमेकाचो सन्मान करे हवो.
त्याहा में समाजाचा खरा रूप बगीतला — श्रीमंत, गरीब, तरुण, वृद्ध, सगळे एकत्र वावरसत, पण प्रत्येकाच्यो गरजो, आनंद अणि संघर्ष जरी वेगळो सलो तरी प्रत्येक जण आपले परीन जगासाठी कितांतरी योगदान देत ससत. म्हणी माला असा दिस्से की, बाजार हो फक्त खरेदी अणि विक्रीची जागा न्हूय तर ती समज वाढयनारी अणि लोकां बरोबर नाता जोडणारी जागा से. तोच हो जागो ज्याहां में व्यवहार अणि माणुसकीय शिकल्या.
माझ्या आयशीची कुस – एक जागो
ह्या सगळ्या अनुभवात्थीन में खूप कितां शिकल्या, अणि आज में एक परिपूर्ण व्यक्ती जाल्यां सां. पण हे सगळ्यांपेक्षा एक अशी जागा से, जी माज्ये आयुष्यात सगळेंत लागीची, सुरक्षित आणि प्रेमान ओथंबलेली ती म्हणजे माज्या आवशीची कुस.
कुशीत तकली तेकयली की सगळो त्रास, दुःख, भय, अणि गोंधळ एका क्षणात लुप्त हसे. त्या उबदार वेंगेत माला कयच शब्दांची गरज भासली नाय त्याचो स्पर्शच मला सांगसे, “सगळा ठीक हयेल.”
आजबी आयुष्यात कितक्योशोच मोठ्यो जबाबदाऱ्यो, अडचणी अणि संकटां आयली तरी, में मनान आईच्या कुशीत आश्रय शोधसां. तोच हो जागो म्हणजे माजे आयुष्याचां शांततेचा अणि निःस्वार्थ प्रेमाचा मंदिर से. त्याचे कुशीतच माला जगेची खरी शक्ती, विश्वास अणि उमेद मिळसे. तीच ती जागा ज्याहां में सगळेंत सुरक्षित, जिवंत अणि सगळेंनां आपलीशी दिस्सां.
आईचे कुशीत शब्दांची गरज नस्से. त्याला माजा मौन बी कळसे . माजां दुःख बी ओळखसे, अणि माजे डोळेतलो आनंदय वाचसे. माजां विश्व अणि माजां सर्वस्व, अणि सगळी कामा ‘किट घो’ करुनीं उडवेचां बळ येसे.
माजे आयुष्यान माला अनेक ठिकाणां दाखयली, पण आईचे कुशीतली शांतता अणि प्रेम दुसरीकडा कयच गावला नाय.
हल्लीचे काळात जागा मिळवे, बळकावे किंवा स्वार्थ साधे लोक नीच कृत्य करे पाठी पुढां बगत नाय. हे चित्र बगनी मन व्यथित हसे. आपलेंतली माणुसकी, कदर, सहवेदना अणि नीतिमत्ता जपणां अत्यंत गरजाचां से. योग्य मार्गान मिळ्ळेलो जागो अणि प्रामाणिक प्रयत्नांनी घडयलेला आयुष्यच खरे अर्थान समाधान अणि शांतता देव शकसे.
शीतल रानडे
लंडन
फोन: +४४ ७५९३५८४६१५
मेंपणा- कृष्ण गणेश वझे
एक सलो माणूस
दिसे झकास काळोसांवळो
आपलीं कामांबिमां करी
दुसरेचींय करी
कोणाचे उपयोगीय पडे
तेचोय तेंतथीन फायदो घडे //१//
कोणाची नड भागवेची
सादालाय कोणाचे धांवोनी जायवेचा
तोंडभरीं बोलेचां! गजाली करेच्यो //२//
खबरी मोठ्योमोठ्यो इंद्राचंद्रा्च्यो
दोनच शब्दांत सांगेचा म्हणजे
‘जनरल मेनेजर’ जगाचो’ //३//
तेला एक सवय सली
पालुपदान सांगेच्यो गजाली
“में म्हणी सगळां केला !”
अणि कोणी कितां केलां?
बाकी सगळे कांयच न्हूंय !
‘सोवनी फुकट’ //४//
शेवटी कितां जालां ?
मेंपणाचे शब्दानच तेचां सगळां फुकट गेला.
म्हणी — कोणी उंच फटाशो मारु नये.
जमनीवर ऱ्हेव्वेचां सोडूं नये.
तेड्लाच तेचां उरसे नांव – –
अमको बरो म्हणसे गांव – –
श्री. कृष्ण गणेश वझे
गोवा.
फोन: ९४२०३१७१२८
बदामी हालवेची कृती- रमा जोशी
साहित्य :-
गहू २ वाट्यो, साखर २ वाट्यो, गावठी (घरगुती) तुप २ वाट्यो, बदाम, केशरी रंग, वेलची पूड, एक लींबू.
कृती :-
आदले दिवस गहूं धोव्नी फुगत घालेचे. दूसरे दिवस सकाळां ते वाटनीं; पातळ पंचेन किंवा बरे सुडकेंन गाळनीं घ्या. १ वर (१तास ) तसांच थेव्नी वरचां पाणी काढनीं उडवेचां. बूडाचा लागी जालेलां सत्व एका दाट बुडाचे तोपाला थोडां तुप लावनीं तेंत ओतेवां. तोप शेगड्यावर थेवनीं गॅस सुरू करा. गॅस बारीक करनीं मिश्रण सारखां ढवळीत ऱ्ह्या. उन (गरम) हतकत साखर ओता. ढवळतांना रंग इवळे दूधात कालवनीं घाला. मोग लिंबाचो रस पीळा अणि ढवळीत ऱ्ह्या. गुठली हैय्वे देंव नाकां. वर्थीन तुपाची धार सोडा.
ढवळीत सतानां वेलच्याचो पिठो घाला. एकिकडा गुळो हंव लागलो काय समजेचां मिश्रण बरां एकजीव जालां. नंतर एक मोठे ताटाला तुप लावनीं तेंत हें मिश्रण थापा. जाडशी कापां कापनी प्रत्येक तुकडेला बदामाची दाबी लाया.
हो पारदर्शक अणि मऊसर असो बदामी हालवो. पौष्टिक आहार भुर्गेनां बरो सेच तसोच जाण्टेनांय बी खायवेला बरो. बाजारांतलो कसले पीठाचो करसत, अणि डालडा तुपात का तेलांत करसत देवाला खबर.
हे कृती प्रमाण बदामी हालवो तुमी करनीं बघा. घरातलेंना खायवे घाला. अणि आमला सांगे विसरों नाकां कसो जालो तो.
देव बरां करु!
श्रीमती रमा गोविंद जोशी
वास्को, गोवा
फोन: ७५०७१५८४०३
सत्संगतीचो परिणाम- माधव भुस्कुटे
एकदा नारदमुनिना शंका आयली. सत्संगतीचो परीणाम किदा हसे? म्हणी विचारणेसाठी ते वैकुंठात गेले. त्यांहा भगवान विष्णु शेषशय्येवर आराम करीत सले. तेंना बघूनी विष्णून विचारलान, ‘हे नारदा ; तुझा स्वागत से!’ तुजां किदां काम से काय ?
तेड्ला नारदमुनी सांगो लागले “हे महाविष्णो, हे कलियुगात संताचे सहवासाचो परिणाम हंव शकचे काय?
तेड्ला महाविष्णूंन सांगलान, तू मृत्युलोकात चल. त्यांहा तुला एक कीडो मेलेलो दिसेल तेला तू हो प्रश्न विचार . .
मृत्युलोकांत येव्वनी नारदांन कीडेला विचारलान “अरे किड्या, तुला केड्ला संतसंगत मेळली से काय ?”
तां ऐकताच कीडो जागेवरच गतप्राण जालो . मांजे विचारणेन कीडो मेलो हें बघतांच नारदमुनी भेवनी विष्णुकडा आयले अणि सगळी हकिकत सांगलीन.
महाविष्णु बोल्ले, ” हे नारदा , भीवेची गरज नाय. तू परत एकदा मर्त्यलोकात चल. त्यांहा एका झाडावर पोपट बेसलेलो दिसेल तेला सत्संगतीचो परिणामाविषयी विचार.
नारदांन पोपटाला विचारलांन, “अरे पोपटा, तुला संत सहवास घडलो से काय?
तां ऐकताच पोपट रोकडोच मेलो.
पोपटाला मेलेलो बघूनी नारदमुनीना भय दिसलो. ते विचार करु लागले. अरे! जेला जेला में सत्संगतीविषयी विचारसां तो तो प्राणी मरसे. माला पाप तर लागेचा नाय नी !
धावत धावत भगवान विष्णुकडा येवनीं म्हणो लागले “हे विष्णो, तू सांगितले प्रमाण पोपटाला में संत सहवासाचो परिणाम विचारलेवर तेणीय जीव सोडलोन. जीव हत्येचा माला पाप लागणार .
भगवान विष्णु नारदाला सांगचत ”नारदा, भेंव नाकां. तां किदां तां में बघसां. परत एकदा पृथ्वीतलावर जा त्याहां एक गाय व्याली से . त्याचे वासराला सत्संगतीचो परिणाम किंदा हसे तां विचार.
नारदांन भियेत भियेत कसाबसां वासराचे कानांत सत्संगती विषयी विचारले बरोबर तां वासरु मरण पांवला .
एतां मात्र नारदमुनीनी सत्संगतीचे परिणामाविषयी विचारेंचाच सोड़नी दिलान .
नारदमुनी परत विचारे माजेकडां आयले नाय हें महाविष्णुंचे लक्षांत आयला. तेणी नारदमुनिंना बलायणां धाड्नी सांगलान “हे नारदा, शेवटचो एकदा मृत्युलोकांत चल. किंदा जाला जालेवर में तुजे पाठिशी सां. भेंव नाकां” आईक, मर्त्यलोकांत काशीक्षेत्रांत काशीराजा राज्य करसे. तेला
एक बोड्यो से. एत्ता तो राजपुत्र एक वर्षाचो जालोसे. तेला तू सत्संगतीचे परिणामाविषयी विचार.
भगवान विष्णुवर विश्वास अणि श्रध्दा थेवनीं नारदमुनी काशी क्षेत्रात जाव्नी, नारदांन काशीराजाला म्हटलांन “हे काशीनरेश, तुजें बोड्येला माला किंदा तरी विचारेंचा सें. परवानगी मिळेवी.
राजाकठ्ठीन होकार मिळ्ळे बरोबर भेत भेतच नारदमुनींन राजपुत्राला हळूच विचारलांन “हे राजपुत्रा, सत्संगीताचो परिणाम किंदा हसे तू जाणसस काय ?”
तां ऐकताच राजपुत्र हसो लागलो अणी म्हणो लागलो “हे नारदमुनी, सत्संगतीचो परिणाम खूप मोठ्ठो से. पयले तीन जन्मांत तुमी माला होच प्रश्न विचारलो सलो, तेड्ला तुमचे सहवासामुळां मालां प्रत्येक जन्मात सद्गती मिळत गेली अणि त्याचो परिपाक म्हणी आज माला उच्च कुळात माणसाचो जन्म मिळळो से. में कृतकृत्य सां.”
राजपुत्राचो हो विचार आयकोनी नारदमुनी संतुष्ट जाले. तेंची खात्री जाली की, संतांचो सहवास लाभलो जालेवर कांयच अशक्य नाय.
माधव भुस्कुटे
पुणे
फोन: ९४२३९०८२२२
परसो (धग)- कृष्ण गणेश वझे
परसेला धग असांय म्हणसत. परसो म्हणजे कितां? खूप पयलीं छत्र्योय नतल्यो पावसा दिवसांनी फक्त कांबळी घेवनी कुळागरांत किंवा शेतांत असां कारांतरीं जायवेचां. छत्री लांब दांडेची. एखादी सलीच जाले ती अशी कारी तरी दुकानावर किंवा फिरे जायवे न्हेव्वेची.
तात्पर्य कितां कांबळी सुकवेला परसो करेचो चार मोठीं लाकडां पेटोवनी कायम अशीं कारींय कडाला थेवेचीं पडव्यावर. अधिक करनी ते परसेवर कोंडेची दांडी बांदलेली अणि तेचेवर कांबळ सुकव्वेला घालेची. मध्यां तेला एक हातभरी लांबीची काठी लावेची म्हणजे कांबळीला भितरथीन धग लागसे. पण बारीक कपडे कसे सुकव्वेचे? चार आडव्यो-उब्यो कोंडेच्यो काठ्यो सादारण तीन तीन हात लांब्याच्यो घेवेच्यो अणि चौकट तयार करनीं वरती बांदेची
खालथीन विस्तव सेच. त्या धगावर (उष्णतेवर)कपडे सुकत सले.
परसेचो दुसरो उपयोग म्हणजे थंड्याचे दिवसांत हात-पांय शेकवेचे. धगाचे कडाला बेसलो काय थंडी लागत नतली.
सादारणसो एखादो कोणय धगाला बेसले बेसले एक पेलोभरीं चहा करनीं घेंत सलो.
तेडला पणसाच्यो आठुळ्यो संत सल्यो. घरांत लिपोनी थेयलेल्यो. त्यो आठुळ्यो मात्यांत कालोवनी भिंतीला लिपीत सले. सांगेचा कितां तर त्यो अदमासान मेजनी मुंबरांत म्हणजे बारीक विस्तवान तापलेले गोबरांत भाजनी खायवेच्यो, लागल्यो दांताला जाले बरांच जांला, नाय जालेवर गुंडेन धोडावनी खांत सले. वेळय गेलो अणि आठुळ्यो तशो बर्यो लागत सल्यो. चवीला गोड. असो हो परसो. चार-आठ दिवसांनी झाडनी सगळो गोबर उडवेचो लागे. न्हेवनी उडवेचो केळंबेचे मुळावर. असो हो परसो अणि तेचे खूपसे फायदे.
श्री. कृष्ण गणेश वझे
सत्तरी, गोवा.
फोन: ९४२०३१७१२८
चित्पावनीचे संवर्धनासाठी गणपुले फाऊंडेशन चे उपक्रम
- चित्पावनी भाषाची तोंड ओळख – ऑनलाईन कार्यशाळा
- चित्पावनी पाठयक्रम
- चित्पावनी त्रैमासिक
- छापील चित्पावनी दिवाळी अंक
- संकेतस्थळाची सुरुवात
सुफळ संपूर्ण- भावना दातार
एका गावांत एक जोडपां आपले दोन भुर्गेंबरोबर ऱ्हेंत सलां. कुटुंबप्रमुख म्हणी तो आपले नोकऱ्याचे निमतान कार्यालयांत सद्दानीं जात सलो. तेची बाईल घरकाम अणि घरचे शेती बागायतींत, येसे तितकां काम करी. दोन भुर्गेंबरोबर तेंचो संसार बरो सुखांत चाले.
एकदिवस शाळाला सुटी सताना भुर्गीं म्हणो लागलीं, ‘बाबा,आमी कारींतरी फिरे जावया. आई, बाबा दोघांनाय तो विचार पटलो. तसां ते सगळेंनी देवदर्शनाला जायवेचां ठरयलां. एकच दिवसांत जावनी परत येतां येल असां क्षेत्र तेंचेनी निवडलां. तेंचे गावापाश्णी दोन तासांचे अंतरावरच एक बरां, मोठा अणि फामात श्री शंकराचां देऊळ सलां. तेच देवळाकडा तीं आज जायवे भायेर पडलीं.
तीर्थक्षेत्राचे ते गावांत पावतकत त्याहां गाडी एकीकडा लायली अणि तेच रस्तेन चालत तीं पुढां देवळाहारी जांव लागलीं. देवळाचे लागीं पावतां पावतां पुढां उंच डोंगरावर धवांफुल देऊळ दिसों लागलां. त्याहां वरती पाव्वे शंभरेक पायऱ्यो सल्यो. ते पायऱ्याना कडानी पेठाले बांधलेले सले. प्रवास करनीं गेलेलीं म्हणी तीं चौघांय एका पायऱ्यावर मात्शी बेसलीं.
तितकेंत त्याहां एक रांयआवळे विकणारो माणूस आयलो. ते बघतकत भुर्गेना ते खाईनसे जाले. बरो मीठ-मसालो घालनी कागदांत्थीन दिलेले आवळे तेंचेनी खाल्ले. देवळाचे परिसरांत उष्ट्यो बियो उडवे नाकां म्हणी तेच कागदांत बियो बांधनी घेतल्यो. मोग देवदर्शन केलां, घरांत्थीन न्हेलेलां जेवण देवळालागीं सावळ्यांत बेसोनी सगळीं जेयलीं, प्रसाद घेतलो अणि घरा आयलीं.
आईन तेगडा जाताना न्हेलेली पर्स चार दिवसांनी सहज उसकली जाले त्याला त्यो आवळेच्यो बियो गावल्यो. त्याला बियो बघनी त्याचे माहेरा मागीलदारा पुढले पायवाटाचे देगाला सलेले रांयआवळेचे झाडाची, ते भोवत्यानचे ते ल्हानपणातले दिवसांची, आपले भावंडांची आठवण आयली अणि त्याचे मनात आयलां की, आपणय ह्यो बियो रुजत घालुया. म्हणी, त्याणी एका कापेत्याचे (प्लास्टिकचे) पिशव्यांत माती घालनी चार बियो रुजत घायल्योन. त्याला त्यो रुजे कितके दिवस लागसत तां काय खबर नतलां. घराचे भिंतीला लागोनीच
भायेर्ल्ले वाटान पिशवी थेयलीन, अणि कय कयतरी पाणी घालूं लागली. रुजत घालनी म्हयनो झालो तरी एक कोंबय दिसलो नाय. त्याला दिसलां की रुजेच्यो नाय बहुतेक बियो. ओगीच वाट बघितली रुजेल म्हणी, असो विचार करनी ती मात्शी निराश जाली. पुढां चार, पांच दिवस ती ते पिशव्याकडा बघे विसरलीसुद्धा.
अणि एका दिवसा ते पिशव्याकडा त्याचां सहज लक्ष गेलां. त्याला आधी खरांच दिसलां नाय. ते पिशव्यांत पोपटी रंगाचे टवटवीत बरे दोन कोंब दिसत सले. त्याला खूप खूप बरां दिसलां. मोग ती, ते रुजलेले रोपेना खूपच जपों लागली.
पावसाळेंत तीं रोपां बरीं मोठीं जाले उपरांत खड्डेंत सारां बी घालनी लायली. तीं बरीच नेटान वाढो लागलीं. बरीं मोठीं पाच-सहा वर्षांची जालेवर तेंवर गुलाबीशी बारीक फुलां फुलली अणि खांद्यावर वाटाणे कसे दिसणारे आवळे लागों लागले. भुर्गीं तयार जालेले आवळे काढनीं मीठ, तिखट लावनीं रुचीन खांव लागलीं. आवळेचां लोणचां, चटणी घरात होंव लागली. आपले बागांत नवीन आपण जपलेले झाडाला आज फुलताना, फळताना बघे त्याला मनापाश्णी आवडत सलां. खूप्प बरे आवळे लागले काय ती सगळे शेजाऱ्येनां आवडीन देंव लागली. रस्तेन जाताना बारीक भुर्गीं आवळे मागत, तेंनाय ती, ते काढनी देव लागली.
असे तऱ्हांन त्याचे आयुष्यांत हौस म्हणी जपलेली आवळेची काणी सुफळ संपूर्ण झाली..
भावना दातार
बेळगुंदी, बेळगाव
फोन: ९४८०४८४७१०
माझे शिक्षकी पेशातले अनुभव- विद्या शरद भुस्कुटे
माला ल्हानपणा पाश्णीच शिक्षिका हयवेची आवड सली. माजे वडील शिक्षक सले तेंचो आदर्श माजे समोर सलो तेमुळां में शिक्षिकाच हनांर हें मनात ठरयलेला. ते प्रमाण १० वी जाले उपरांत “शिक्षक प्रशिक्षण केंद्र” पर्वरी एठा दोन वर्षांचा प्रशिक्षण पूर्ण केला. पण ७ वर्षांनी माजी पूर्व प्राथमिक शिक्षिका म्हणी नेमणूक जाली. त्याहा ३ वर्षांची भुरगी सली. त्याला लागोनीं तेना गोष्टी, गाणी, खेळ असे माध्यमात्थीन शिकवेचा पडे. एक दिवस भायेर व्हरांडेत बेसोनी भुरगेंना गोष्ट सांगत सल्या. तितकेत एक भुरगां नाकाला हात लावनी रडो लागलां. में तेला लागी घेवनीं विचारला. जाले तेणी नाकात वास घेता घेता गुंडो घातलेलो अणि में तापयनार म्हणी काल गेलेलो म्हणी सांगो लागला. माजी मदतनीस सली. त्याणी अणि में दोघांनीय गुंडो काढेचो प्रयत्न केलो पण तो घट्ट बेसलेमुळा येत नाय जालो. मोग दोतोराकडा न्हेवनी एकदा तो गुंडो काढणी घेतलो अणि सुटकाचो सुस्कारो सोडलो.
एठा पूर्व प्राथमिक शाळात १० वर्षांत खूप अनुभव आयले. मोग माला बढती ( प्रमोशन ) मिळ्ळेलेची ऑर्डर आयली. ती शाळा एकदम खेडेगावात दुर्गम भागात पण प्रमोशन मिळ्ळां हो आनंद सलो. त्या शाळांत हजर हयवे गेल्या. रस्तो खडबडीत मात्याचो, वाहनांची काहीच सोय नतली पण यजमानांना घेवनी शाळात गेल्या. त्याहा एक गुरुजी सले. तेंचेनी माला हजर करनी घेतली. शाळाची अवस्था खूप अशी बरी नतली. वर्गात जमिनीवर खड्डे पडलेले, खिडक्यो फुटलेल्यो. भुरगी कामगारांची अणि धनगर समाजातली. गावातली थोडीच भुरगी सली.
माजेसाठी हें एक आव्हानच सलां. में माजे मनाची तयारी केली.
माजेकडा तिसरी, चौथीचे वर्ग दिले. में भुरगेंची ओळख करनीं घेतली. ते भुरगेंना भाषा कळत नतली. पयलेच दिवसा एक गाणां अणि गोष्ट सांगितली. भुरगी खूष. हळूहळू अभ्यासा कडा वळल्या. दोन तीन दिवसांनी सकाळी वर्गात गेल्या. तारीख, वार घाले म्हणी डस्टर उखल्ला जाले तेचे खालती वेटोळां घालनीं फुरसां ( एक सापाचो प्रकार ). डस्टर उडयला अणि मोठ्येन आरडतच वर्गाभायेर धावल्या. थोडी भुरगी वर्गात सली. पण ती भ्याली नाय. तेना सवय सली. गुरुजीं आमचो बोवाळ आयकोनी वर्गात आयले अणि काठी घेवनी तेला माल्लां. तेडला साप धरनी न्हेणारे कोण नतले. तेमुळां ते सापाला मारेवोच लागलो.
भुरगी अनुकरणप्रीय ससत. म्हणी शिक्षकांची वागणूक आदर्शच हवी. में सद्दां मधल्या सुट्यात खायवे चपाती, भाजी, उफिट असां कितांतरी न्हेत सल्यां. ते भुरगेना कुतूहल सत सलां टिचर कितां खासे हेचां. में खाताना भुर्गी वर्गात येवनी येवनी जात सली. थोडेदिवस माजेतला भुरगेंना दिला. मोग तेना सांगितला तुमीय उद्यापासनी डबो हाडा. सगळी मिळोनी खावया. सगळेनी दुसरे दिवसा पासनी डबे हाडे सुरवात केली. पालकांनी शाळांत येवनीं सांगितलां.”टिचर तुमी आमच्या भुरग्यांक डबो हाडूंक सांगले ते बरे केले. घराकडें ती कायच खायनासली.” मालाय मात्सा बरां दिसला.
एक दिवस एक भुरगो माझे लागी आयलो अणि म्हणो लागलो.”टिचर ती कामगारांची भुरगी आसा न्हू, ती गुठको खातात, सुपारी खातात . गुरुजी नी तेंका मारली म्हणोन दोन भुरगे शाळेक येयचना” हे आयकोनी माला वाईट दिसला. कारण अजूनी हे भुरगेंचा बालपण से अणि एतापाश्णीच जर हेना व्यसना लागली जाले पुढां हेंचा जीवन फुकट. खूप विचार केलो.मारनी धाक दाखवनी उपयोग नाय. कारण भुरगेंचे मनात जर माजे बद्दल वाईट मत जालां जाले पुढां कायच उपयोग हनार नतलो.
गुरुजींकडा चर्चा केली. एता हे भुरगेंना हे व्यसनातथीन भायेर काढेच हवी. असो निश्चय करनीं कामाला लागल्या. दुसरे दिवसा प्रार्थनाचे वेळा गुरुजींच्या परवानगीन व्यसनांवर आधारित एक गोष्ट रचौवनी सांगितली. में शाळात नविन सलेमुळां एकदम निर्णय घेव शकत नतल्या. पण हळूहळू वर्गात भुरगेंबरोबर सतत बोलत ऱ्येल्या. तेचो परिणाम हळूहळू दिसो लागलो. एक दिवस बोलता बोलता ते भुरगे घरात्थीन, खोटां कितांय सांगोनी पैसे हाडीत सले, हे लक्षात आयलां. में तेना विचारला तुमला पैसे कोण देसे? तुमी सद्दानी कितके पैसे हाडसा? प्रत्येक भुरगो दिवसाला १०,२० रु. हाडणी खात सले. में तेना म्हटला उद्या पाश्णी आमी शाळातच एक बॅंक करूया. तुमी जितके पैसे खायवे हाडसा ते माजे कडा द्या. में तुमचे प्रत्येकाचा खाता तयार करसां अणि तुमला पैसे हवे तेडला आईला नायले बाबांना शाळात बोलावेचे तेंची सही घेवनी तुमला पैसे देणार.ही कल्पना भुरगेंना आवडली दुसरे दिवसा पासनी कोण १० रु.कोण २० रु. हाडणी देंव लागली. असां करता करता एक म्हयनो जालो. प्रत्येकाचे १००,२०० रु.जमले. एक दिवस पालकांना शाळात बोलावनी तेंचे भुरगेंचे जमा जालेले पैसे सांगितले. सगळेंना खूप बरा दिसला.माजे आभार मानू लागली.में म्हटला माजे आभार मानणे पेक्षा तुमचे भुरगेंचेच माना. कारण तेंचेनी मे सांगितलेला आईकला अणि तशी वागली.
भुरगेंना जशी तुमी वागणूक द्याल तशी ती घडसत.
अणि एक आठवण म्हणजे इयत्ता तिसरीत एक धनगरांचो भुरगो सलो .तो मात्सो रागीट स्वभावाचो सलो. तेचे मनात येल तसो तो वागे. एक दिवस प्रार्थना जाले उपरांत भुरगेंनी जुती व्हरांडेत एका ओळीत थेयली अणि वर्गात गेली. थोडे वेळानं तो भुरगो आयलो. में तेला सांगितला जुतां भायेर थेवनी वर्गात ये. तेचा कितां जालेला कोण जाणे? तेणी कितां केलानं, ओळ्यांत थेयलेली सगळी जुतीं हेडातेडा उडयलीन.भुर्गेनीं बघितलां आपली जुतीं उडयलीन तां अणि मोठमोठ्यान तेला कितां कितां म्हणो लागली. मोठो बोवाळ आयकोनी थोडे पालक शाळांत आयले. तेडला गुरुजी सेवानिवृत्त जालेले. तेमुळां में एकटीच चारय वर्ग सांभाळीत सल्या. पूरे हत सलां. तेंत अणि अशी हट्टी भुरगी. तेला खूप समजायलो पण वर्गात येवे कसोच तयार नाय. शेवटी तेचे बापाला फोन केलो. तो फोन घेत नाय झालो. मोग बाकीचे भुरगेना अभ्यास दिलो अणि तेला बाबा -पुता करनीं कितां कितां सांगितलां. पण कायच आयके तयार होत नतलो. में बी मात्शी रागान बोलल्या. ते बरोबर हो दप्तर त्त्याहाच उडयलान अणि धावत सुटलो. एता मात्र किता करेचा तां कळत नाय जाला. सगळे भुरगेंना एकाच वर्गात बेसयली. भायेरथीन दाराला खीळी घातली, एका भुरगेला बरोबर घेतलो अणि ते भुरगेला बघे भायेर सर्ल्या. माला अंदाज सलो तो के सनार तो. त्याहा एक अर्धवट खणलेली बांव सली. त्याहा ही भुरगी जात. में ते भुरगेला घेवनीं त्या बावीकडा गेल्या माजो अंदाज खरो ठरलो. हो महाशय त्याहा बेसोनी बावीत गुंडे मारीत सलो. में तेला हटकलो नाय कारण उडी बी मारील म्हणी में मात्शी कडाला ऱ्हेवनी तेचे बापाला फोन केलो. फोन उखललोन तेला ताबडतोब बलायलो तो येवनी तेला शाळांत हाडलोन अणि एक कांशीलात मारलान. बरोबर भिडभिडलो. तेचे बापाला सांगितला असा मारू नाकां म्हणी.
तोच भुरगो पुढां बरो शिकोनी कामाला लागलो. कारोय मिळ्ळेवर टीचर म्हणी हटकले शिवाय जात नाय. असे ३३वर्षांचे कालखंडात खूप अनुभव घेतले. ३०सप्टेंबर २०२५ हे दिवसा सेवानिवृत्त जाल्या.
माजो निरोप समारंभ जालो तेयसा में काम केलेल्या सगळ्या शाळांतले पालक, विद्यार्थी माला साश्रूनयनांनी निरोप देव्वे आयले. माला जरी सरकारी पुरस्कार मिळले नाय तरी सगळे पालक, विद्यार्थ्यांनी भरभरूनी प्रेम, माया दिली हेचे पेक्षा माजे मतान केंचोच पुरस्कार मोठो नाय.
काही लोक म्हणसत “बाई, मास्तरांची मजा. खूप सुट्यो मिळसत, अर्धो दिवस शाळा अणि बारकेले भुरगेना शिकवे कितां? पण आमला शिक्षकांना खूप अभ्यास करनी, विचार करनीच शाळांत जायवा लागसे. भुरगीय एता हुशार ससत, तितकीच, कणभर अधिकच तयारी शिक्षकान्लाय करेवी लागसे.
“विद्यार्थ्यांना मनापाश्णी ज्ञान देव्वेची अणि संस्काराची शिदोरी देव्वेची!”
विद्या शरद भुस्कुटे
सत्तरी, गोवा
फोन: ७८७५७७८८२३
टाईम टेबल / वेळापत्रक- कृष्ण गणेश वझे
शर्टाचो बटण,
खालतो वरतो
सारखो करे
नाय उसंत //१//
केड्ला नाडी
घट्ट हंसे
गांठ केडला
सुटत नस्से //२//
तेड्ला मोग दिससे
एतां आपली
इलास्टिकच बरी //३//
समजा – –
केलीच घाई
गेलो भायेर
गोगलगाय जुतेवर //४//
एक गडबड
सतरा भानगडी
पण कोणी सोडूं नाकां
तुमचो नेम
वेळापत्रक आदी करा
काम मोग बरांच करा
श्री. कृष्ण गणेश वझे
सत्तरी, गोवा.
फोन: ९४२०३१७१२८
माजां दुबई दर्शन- देवश्री गोडबोले
एक श्रीमंत, भव्यता व समृद्धी सलेलो देश – दुबई
में माजो पयलोच परदेश प्रवास “दुबई” एठा केलो. अगदी ध्यानीमनी नसताना हो प्रवास ठरलो. आमी जेडला विमानतळावर उतरलो ती वेळ साधारण सकाळची ४.३० ची सली. आमी भायेर जाणे करता ज्येष्ठ नागरीक म्हणी व्हीलचेअर घेतलेली. कारण हे अंतर खूपच लांब से. हे व्हिलचेअर चालयणारे सगळे हिंदी बोलत सले. सगळे सोपस्कार करनी भायेर टॅक्सी बघे गेलो. आमी ५ जणां सले मुळां मोठी गाडी हवी सली. पयलीच गाडी मिळ्ळी ती “लिमोझीन” हे कंपन्याची. हेचो ड्रायव्हर सुध्दा हिंदीत बोलणारोच. पार्कींग मधल्यो सगळ्यो गाड्यो बघनी कळतनकळत एक विचार मनात आयलो की हो एक वेगळोच अणि अती श्रीमंत देश से. नंतर सुध्दा आमी फिरे जाताना ज्यो किता गाड्यो घेतल्यो त्यो सगळ्योच नामांकित कंपन्यांच्यो सल्यो. तर विमानतळा वरथीन भायेर पडलेवर रस्तेला जास्त गर्दी नतलीच पण दिवेची रोषणाई अणि रस्तेवेल्लो झगमगाट मात्र खूप लक्षात ऱ्हेणे सारखो. असो झगमगाट नंतर सतत खूप बघे मिळ्ळो. विमान उतरेचे आधी रस्तेवेल्ले दिवे, माळो लायले सारखे झगमगताना दिसत सले. एकूणच जाणवला की दुबईत रोषणाईचा खूपच आकर्षण से, अणि तेंचेनी ही टूरीझमची आवश्यकता मानलेली से असां दिसला.
माजां दुबईचा म्हणी जां किता आकर्षण सला तां “मिरॅकल गार्डन” चा. हे शिवाय में काय जास्त माहिती घेवनी गेल्या नतल्या. टुरीझम/पर्यटन हो सुध्दा दुबईचो एक महत्त्वाचो उद्योग धंदो से. तेमुळां सगळ्यो जागो ह्यो त्या दृष्टीन तयार केलेल्यो सत. तेत प्रत्येक इमारतीची भव्यता हो एक गुणविशेष दिस्से. जसो बुर्ज खलिफा हो टॉवर जगातलो सगळेत उंच टॉवर अणि एक आकर्षण बिंदू से, तश्योच सगळे खाड्यांचे अवतीभवती सलेल्यो इमारती सुध्दा खूपच उंच अणि झगमगलेल्यो अश्योच सत.
दुबई हे समुद्र किनारेवेल्ला शहर. पण शहराचे आजूबाजूला सगळे कडां खूप खाड्यो सत. ह्यो खाड्यो पर्यटकांना आकर्षित करणे करता खूप तऱ्हान सजेयलेल्यो सत. बोटीत्थीन फिरताना संध्याकाळां सगळ्याकडां नजर गेली की भव्य दिव्य इमारती अणि तेचेवेल्ली रोषणाई कितकी बघू अणि कितकी नाकां अशीच. समुद्र किनारेंचा पर्यटन स्थळ म्हणी जास्त उपयोग न करता, खाड्यातला नौकानयन खूप आढळला. नौकानयन करताना, खाड्याचे कडान ज्यो इमारती सत त्यो बहूमजली अणि रोषणाई केलेल्यो, भले त्यो ऱ्हेव्वेच्यो सतील, नायले व्यापारी.
आमी अबूधाबीतला बॅप्स हिंदू मंदिर बघितला. त्याहाची सुरक्षा व्यवस्था खूपच भारदस्त से. हे सुध्दा एक स्वच्छ, सु़ंदर मंदीर से. प्यिव्वेचा पाणी, चपला स्टॅड खाणेपिणेची व्यवस्था सगळांच बरां से. देवळा नंतर आमी एक हेरीटेज व्हिलेज बघितला. त्यांहा एक १९५० सालातलो फोटो सलो. अगदी तांडेनी ऱ्हेणारे लोकांचो. तो काळ अणि एता दुबईची नी अबूधाबीची प्रगती केंचेकारी पावली से. त्यांहाचा सी वर्ल्ड बघेला कितेकेसेच तास लागले. तीन मजली अक्वेरीयम. हे सगळा तयार करनी परत वर्षानवर्षा सांभाळेचा सोपा काम न्हूय. दुबईतली ही सगळीच पर्यटकांची आकर्षणां जगातले, स्थापत्य, अभियांत्रिकी हेची झेप कें पावली से तां दाखयसे. कारण हो सगळो प्रदेश खरांजाले वाळवंटाचो. प्यिव्वेचे पाण्याचा दुर्भिक्ष. पण एताची त्याहांची जीवनशैली मात् एकदम, श्रीमंत्याची.
दुबईचा प्राणी संग्रहालय एकदम हिरवागार से. एरव्ही एठा एक काय झाड द्रीष्टी पडत नाय. पाम ट्री कितां ती थोडी सत. पण हे प्राणी संग्रहालय मात् अगदी हिरवाच. ते शिवाय निबर लागो नये म्हणी केलेले माटव सलेले रस्ते अणि तकल्यावर थंड पाण्याचे फवारे उडयणारे पंखे. त्याहांचो उष्मो सहन हयवे हवो म्हणी ही व्यवस्था.
प्यिव्वेचा पाणी मात् म्हारग, म्हणी जातांना घरात्थीन घेवनी जात सलो. तसां बघलां जाले, सगळ्योच वस्तू एठा म्हारगच, कारण म्हारग चलन.
बाजाराला सूख असो शब्द वापरसत. मसालेंचे पदार्थ, वेगवेगळे “हर्ब्ज” अणि भांगराचे खूप मोठे, नाजूक दागिने हे एक वेगळाच काम. ते शिवाय खजूर, खजूर सलेली चॉकलेटां, सुकेमेवेची चॉकलेटां ही सुद्धा प्रसिद्ध सतच. सगळेच भारतीय पदार्थ दुबईत हॉटेलात मिळसत. अणि सगळेच जण हिंदी बोलसत. त्यांहा बाकीचे देशांची सगळी “कुझीन” सत. टॅक्सी सर्व्हिस एकदम उत्तम.
में जे “मिरॅकल गार्डन” विषयी सुरवातीला ल्हियलां से, तां बघनी मन खूप प्रसन्न जालां. ३-४ तास हें सगळां बघणेत गेले. सगळी फुलां खूप टवटवीत, जो आकार तेंना दिलोसे तो तसोच थेयलेलो से. प्रवेश दारात उंच हिरवे घोडे, मध्या दोन हत्ती, फुलांचोच पिसारो सलेले दोन मोर हे सगळांच आकर्षक. एक खरां विमान खूप जीवंत फुलांनी सजेयलेला. फुलांनी डवरलेल्यो कमानी, एका पाठोपाठ एक, अश्यो कितक्योश्योच. अणि हे सगळां वाळवंटात. कितके कष्ट घेवनी उभारलेला, अणि कष्टांनीच सांभाळलेला. पण हे सांभाळणारे हात मात् भारत, पाकिस्तान , बांगलादेश हे सारखे देशातले. म्हणीच बहुतेक सगळेकडा हिंदी भाषा खूप बोलसत.
ग्लोबल व्हिलेज म्हणी एक, बरेच देशांचे संस्कृतीचां, वस्तूंचां, प्रदर्शन सलेला एक गांव तयार केलेलां से. प्रत्येक देशाचो वेगळो नी भव्य मंडप उभो केलोसे. आमचे देशाचा – भारताचा हे स्थळ बरांच मोठासे, नी वस्तू सुध्दा खूप प्रकारच्यो, भारतभरातल्यो थेयलेल्यो सत. तसेच खाणेपिणेचे पदार्थ.
अणि एक गोष्ट अशी की, कितांय बघेचा ठिकाण सोंवदे, प्रवेशद्वारा कडथीन खूप दूर ससे. ते मुळां खूप चालेवा लागसे. आमी सद्दानीं ७-८ कि.मी तरी चालत सलो. एक- दोन कडा, भितरले भितर सुध्दा भोव्वे बस सली.
त्याहांचे राजाचो जुनो राजवडो सुध्दा स्वच्छ, भव्य, मोठी सालां सलेलो, झुंबरां लायलेलो, संगमरवरी असोच. भितर एस्केलेटर सुध्दा सले. आधुनिकतेची आवड राजालाच सले मुळां सगळी पर्यटन स्थळां आधुनीक सत.
आमी एक “म्युझीयम ऑफ फ्यूचर” सुध्दा बघला. तेंत, कॉफी करनीं देणारो रोबो, एक उडणारो डॉल्फिन अणि एक चालणारो/नाचणारो रोबोटीक कुत्रो सलो. हे म्युझियम, अणि झू बघे शाळांच्यो सहलीय बी आयलेल्यो दिसल्यो.
अणि ज्यो काय गोष्टी बघितल्यो तेत, दुबई मॉल, दुबई फ्रेम, लूलू मॉल, ऐन दुबई नावाचा मोठ्ठा व्हील – हे व्हील सुद्धा खाड्याचे कडालाच से, तां बघितला. हेचा एक खास आकर्षण म्हंजे, समुद्रात भितर तयार केलेलो “पाम ट्री” चो आकार. परत रोषणाई सेच. हे चक्र खूप सावकाश फिरसे, म्हणी खूप वेल्यान, समुद्र किनारो, अणि मानव निर्मित गगनभेदी इमारती बऱ्योच बघेला मिळसत. एक अगदी पिळलेले सारखे आकाराची इमारत दिसली. साधारण पणान एक इमारत काय दुसरे सारखी नसेल. बंगले जे सले ते मात् उच्चभ्रू लोकांचेच फक्त.
बाकी हे देशाची सामाजीक माहिती, व्यापार ह्यो गोष्टी इतर वाचनांत्थीन कळतीलच. पण हे देशाचो पर्यटन उद्योग मात् खूप प्रयत्नात्थीन, खूप पैसे खर्च करनीं, शिस्त पाळनी नावारूपाला हाडलो से हेचेत शंका नाय.
अणि बघलेली पर्यटन स्थळां म्हंजे, रणातली रेवातली सफर, करमणूकीचे नाच,(belly dance, fire show ) नंतरचा बुफे जेवण. हे जेवण पुणेतले एखादे लग्नातले जेवणासारखाच. थोडेच पदार्थ वेगळे. पण एठा हुक्को ऒढणारे लोक सुद्धा सले. बुर्ज खलिफा ही उंचच उंच इमारत, हे बद्दल सगळेना खबर सयेल. एठा १२४/१२५ मजलेवर जायवे मिळसे. ही लिफ्ट ६० सेकंदात हे मजलेवर पावसे. १२४ सावे मजले वरथीन अख्या दुबईचा दर्शन घडसे. हे विहंगम दृश्यच. कारीय जाताना बुर्ज खलिफाचा सतत दर्शन हसे.
त्याहा रस्तेवर फक्त सामानाची डिलीव्हरी करणारे तितकेच मोटरबाईक चालवीत. बाकी सगळे चारचाकी गाड्यो वापरणारे. ते शिवाय आमी एकदोनदा मेट्रोत बेसलों. ती मात् पुणेतले सारखीच, पण सजावट अणि वापरलेले सामानाची प्रत जास्त बरी सयेल असा जाणवला. रिक्षा हे वाहन त्यांहा नाय. रस्ते रुंद, वाहतूकीची शिस्त वाखाणणे सारखी, गाड्यो/ टॅक्सी आधुनीक. एकंदरीतच एका धनाढ्य देशाचा दर्शन जालां. माला हो देश पर्यटनाचे दृष्टीकोनात्थीन खूपच आवडलो. रोजचा जीवनमान हे त्यांहा ऱ्हेणारे लोकानाच खबर सणार.
भारतात सुध्दा हे प्रकारच्यो बरोचश्यो गोष्टी होव लागल्यो सत, जालेल्यो सत. पण भारत हो खूप मोठो अणि खूप लोकसंख्याचो देश सले मुळां असे प्रकारच्यो सोयी सगळेकडां हयवे थोडो काळ लागेल.
हो लेख पर्यटनस्थळ म्हणी बघलेल्या दुबईचो से. बाकी बऱ्योच गोष्टी आपलेला इतके कमी वेळात कळत नाय.
सौ. देवश्री गोडबोले
कोथरूड, महाराष्ट्र
फोन: ९०११९५८७२५
बाय गो- भावना दातार
जन्मा पाश्णीच तुजी
लढाई नाय सोपली
कितकेसेच वेळा तुजेवर
परिस्थितीच कोपली ।।१।।
चेड म्हणी तुला,
गर्भातच गो सोपयली
समाजापाश्णी ही गजाल
बिनबोभाट लिपयली ।।२।।
आई बाबाची परी तू
हैवानांना गो दिसलीस
चार, सहा वर्षांचीय तू
भोगाची वस्तू जालीस।।३।।
शाळा, कॉलेज करीत
शिकलीस ताठ मानान
विद्रुप तुजां तोंड केलां
कोणां एकतर्फी प्रेमान ।।४।।
समाजमान्य नातेतय
तुजे विचार पटले का?
चार भिंतीतले अत्याचार
अजुनी तरी घटले का?।।५।।
दुर्गा, लक्ष्मी ,राणी चन्नमा
तूच सय झाशीची राणी
दाखय नवां रूप तुजां
लिव्ह धारिष्ट्याची काणी II६II
भावना दातार
बेळगुंदी, बेळगाव
फोन: ९४८०४८४७१०
थोडासां हसोया- स्मिता मोने अय्या
स्मिता मोने अय्या
गोवा
फोन: ८८०५४५७४८४
तुझां माझां नातां- रोहिणी कुलकर्णी
नातां तुझां माझां
जालां एतां एखादे जीर्ण…
चिरकुटा सारखा.
आवडसे आवडसे म्हणी
वापरनी घेतलां खूपदां…
सुखदुःखाचे दोरेची मजबूत सली शिलाई
पण…
कसां कोण जाणे
केंथिन कसां उसोंव लागलां
कळलांच नाय उसवलेलां …
समजलां तेड्ला मात
घायले समजुतीचे चार टाके
अणखीन कांय दिवस तरी वापरे येल म्हणी
पण …
हे उसवणां सद्दांचा जालां.
अणी एतां तां विरोय बी लागलां
म्हणी ..
रफू करनी बघलां…
सुरुवातीची आनंदाची वेलबुट्टी
मात्र धूसर हत गेली
गैरसमजांच्यो चुण्यो
एतां प्रकर्षान जाणवसत…
आसवांचे शिडकावेन
परत परत कडक इस्त्री मारनी,
फक्त मेंच जपलेले
स्नेहाचे रेश्मी बासनात,
अलगद बांधनी,
आठवणीचे आलामार्यांत
जपोनी थैलां से
नातां तुझां माझां
आवडीचे वस्त्रासारखा….
रोहिणी कुलकर्णी
बेळगांव
फोन: ९७४२४९९८१४
आमची कॅनडा सफर- मिनल नेने
में अणि माजो घो नोव्हेंबर २०२५ मध्यां, एक म्हयनो बोड्येकडा ऱ्हेवनी आयलों. सगळेंनी म्हटलां की थंड्यात किताला जासा? पण बोड्येला मिळेची तीव्र इच्छा म्हणी नेट धरलो.
पुणे, मुंबई, पॅरिस, ओटावा असो प्रवास करनी त्यांहा पावलो ते दिवसा ‘हॅलोवीन‘ सण सलो. हाडांचे सापळे, भुतांची चित्रा घराभायेर, झाडांवर टांगनी थेयलेली. माला असां दिसला की भुता खेतांची भीती नाहीशी करे हो सण साजरो करीत सणार.
दोनचार दिवस फॉल कलर्स सले. थंड्यात झाडांची सगळी पानां, विविध रंगांची उधळण करसत अणि मोग गळोनी जासत. निसर्गाची रंगपंचमीच जणू. मोग दुसरे दिवसा स्नो फॉल सुरु जालो. पांच साहा इंच स्नो. सगळीकडा जणू धवो गालिचो घातलेसारखां दिसत सला. मध्या मध्या पाऊस अणि आठ आठ दिवस सूर्यदर्शन हत नतला.
आमी एका लागीचे मॉल मध्या भाज्यो, फळा, दूध हाडे सद्दानी जात सलो. घरात, मॉल मध्या हिटर सत पण भायेर चार पावलां जायवेचा म्हणजे ही इतकी भयंकर थंडी अणि खूप जास्त वेगात वारो.
थंडी सोसत नतली तरी एक दिवस थंड्यात भायेर जावनी में स्नो हातात घेवनी आयल्यां. स्वच्छ, धवो स्नो हातात घेव्वे हवोच. इतको स्नो सलो तरी मोठमोठयो धीट खारी मात हेगडा तेगडा खेळत सल्यो.
मोग आयलो ‘ब्लॅक फ्रायडे’ सण. सगळीकडा खरेदीची धमाल अणि सेल च्यो जाहिराती. पुढा सणाऱ्या ख्रिसमस सणाची बी तयारी जोरात सुरु जालेली. मॉल अगदी आकर्षक सजयलेले. भुरगेंसाठी खेळ थेयलेले. आमी दिवाळ्यात कर्सो तसांच लायटिंग घराभायेर केलेला.
एक दिवसा पब्लिक लायब्ररीत गेलेलो. त्याहा फी नाय. पुस्तका फुकट वाचे मिळसत अणि घरा नेव शकसो. भुरगेंसाठी सुद्धा खूपशी पुस्तकां ससत.
सगळीकडा अतिशय स्वच्छता, प्रदूषण नाय, कसलो आवाज नाय, अगदी शांतता ससे. थंड्यात, स्नो मध्या आपापली कामा लोक शांतपणान करसत म्हणी माला तेंचा कौतुक दिसला. लोक सामके मोकळे मनाचे ( फ्रेंडली ) सत. ओळख नतली जाले हाय, हॅलो करसत.
एक म्हयनो कय गेलो आमला कळलाच नाय. बोड्येला मिळोनी जालेलो आनंद भरभरोनी घेवनीं घरा येव्वे आयलों.
आकारान भलो मोठो अणि अगदी कमी लोकसंख्या सलेलो, परत परत जायवे आवडेल असो हो एक सुंदर देश से कॅनडा.
मिनल नेने
पुणे
फोन: ८८०५९१३६०४
आयुष्य एक प्रवास- विद्या अजित दांडेकर
आयुष्य, एक सुंदर प्रवास से
केड्ला ऊन तर केड्ला सावळ्याचो आभास से
सुख दुःखाच्या वाटावर चालताना
जगोया प्रत्येक क्षणाला.
चढ उतार तर बरेच येसत जीवनात
पण सामोरां जायवे लागसे तेला धैर्यान
नाती जपताना, प्रेम देताना
प्रत्येक क्षण जगेचो खऱ्या अर्थानं.
जेड्ला दिसेल सगळां सोपलां
नवीन सकाळ उगवेल नव्येनं
आयुष्य हें अनमोल किंमती से
कदर करूया खऱ्या अर्थानं.
विद्या अजित दांडेकर
पुणे
फोन: ९८९०८९०४६०
चेड मोठी जाली- विदुला विनय ताम्हनकर
शाळेला मात्सो ऊशीर जालो तरी
भोकाड पसरून रडणारी जेड्ला
गजर लावूनी आपणच ऊठसे
तेड्ला जाणवसे…..
..चेड मोठी जाली…
आई तू नीदव
में माजो चाहा करनी घेसां!असां सांगसे तेड्ला जाणवसे…..
..चेड मोठी जाली..
ड्रेसाची ओडणी सारखी लायलीस नाय म्हणी करवादणारी जेड्ला
हात पाडल्या घेवनी आलफिन लायसे
तेड्ला जाणवसे…..
..चेड मोठी जाली..
अभ्यास नाय केलो म्हणी बोलणी खाणारी रात्र रात्र जागनी अभ्यास करसे
तेड्ला जाणवसे….
..चेड मोठी जाली..
आवडीचो पदार्थ नाय केलो म्हणी रागान जानांरी जेड्ला सगळां
रांधप आवडीन करसे
तेड्ला जाणवसे…..
..चेड मोठी जाली..
काळखाला भेणारी जेड्ला विश्वासान सांगसे “काळजी करू नकोस लवकर येते”
तेड्ला जाणवसे…..
..चेड मोठी जाली..
“ओ बाबा हे असं नाहीय हा!” असा बाबाला शिकयसे
तेड्ला जाणवसे…..
..चेड मोठी जाली..
“आई तुला कळत कसं नाही!” हेचेत्थीन रोकडाच कळसे एतां
..चेड मोठी झाली…
चिवचिवणारी चिमणी गंभीर हसे
तेड्ला जाणवसे…..
..चेड मोठी जाली..
आईचो पदर सोडनी हळूच
आपले विश्वात रमसे
तेड्ला जाणवसे…..
..चेड मोठी जाली..
“तू नको ग टेंशन घेऊ मी बघते काय ते” असां बोलसे
तेड्ला जाणवसे…..
..खरांच चेड मोठी जाली..
सौ.विदुला विनय ताम्हनकर
मालवण
फोन: ९८६०२२१३७६
भाऊबीज- रमा जोशी
हीच भाऊश भेणिशीची माया…!
निळे निळे आकाशात, चान्नेंची दाटी
चंद्रमुखी निरांजनात, तुजी माया मोठी
हीच भाऊश भेणिशीची माया…!
उजळोव्नी निरांजन पुढेंत धरसे
हसरे तोंडान, प्रेमानं औक्षण करसे
हीच भाऊश भेणिशीची माया…!
प्रेमान हसे भावा भेणिशीचा मिलन
बरे विचारांत्थीन हसे दुःखाचा क्षालन
हीच भाऊश भेणिशीची माया…!
देवा सौंदे असोच एकमेकांचो आदर
नातेला नाकां लागोंदे, कोणाची नदर !
श्रीमती रमा गोविंद जोशी
वास्को, गोवा
फोन: ७५०७१५८४०३
सुविचार- वर्षा केळकर
१) जेड्ला विश्वास से तेड्ला पुरावेंची गरज लागत नाय मोग ती भक्ती सो नायते व्यक्ती!!!
२) पेरलेलां मनासारखां रुजलां की, माणसाला काम करे अधिकच बळ येसे अणि ऊर्जा मिळसे, मोग ती पेरणी धान्याची सो नाय जाले आपले कर्माची.
३) “मन शांत सयेल तर मार्ग आपोआप मिळसे, शंका दूर जाली की संकटाय बी ल्हान दिस्सत. स्वामी समर्थांचो आशिर्वाद सेल तर, सद्दाची नवी सुरवात शक्य हसे.”
४) सकाळच्या शांततात घेतलेले निर्णय तुमची वाट उजळावनी उडयसत.
५) सगळां जग रुसला तरी चालसे, पण आपलो परिवार आनंदी सयेल तर तूमी जगातले सगळेंत श्रीमंत माणूस सा.
६) बरे दिवसांत जर मद मारलॉ, जाले वाईट वेळ येव्वे वेळ लागत नाय….!!
७) बापायची संपत्ती बापायपेक्षा मोठी नस्से. आपले आयुष्यात बापुय असणां महत्वाचां ससे. जेना बापूय नाय तेना विचारा बापायची किंमत कितां से ती. से तोपर्यंत जपा स्वतःसाठी बापायला. दिवस मावळसे नंतर उगवसे पण मातीआड गेलेलो बापुय केडलाच दिसत नाय.
८) स्वामी म्हणसत….. आयुष्यात परिस्थितीला लागलेली नदर कष्टान काढेवी लागसे.
९) तुमी जितकां कठीण काम करसा /कर्सा तितकां यश लागी येसे.
१०) सुखाला लागोनीं धडपड सैवी पण ते सुखाला कारीतरी समाधानाची जोड सैवी..!!
वर्षा केळकर
बदलापूर
फोन: ७५५९४२४३२१
रामनवमी- अंजली माधव भिडे
काणकोणातले पर्तगाळी मठात भव्य अशा श्रीराममूर्तीची स्थापना जालेची बातमी वाचली अणि रामनवमीच्यो कितक्यो तरी आठवणी मनात दाटोनी आयल्यो.
माजे मामाचो गांव खडकी – सत्तरी. त्याहां रामाचां देउळ से. रामनवमीचो उत्सव मोठे प्रमाणात साजरो करसत. माजे ल्हानपणात आमी दोघां तिघां भावंडां आईबरोबर दरवर्खा खडक्या जात सलों. रामनवमीचे दिवसा सकाळां लोक्कर उठोनी तयारी करनीं चालत मामात्यां जायवेचां. भुरगेंचे चालीन दोन एक वरां लागत सली हे नक्की.
वाटा म्हादय लागत सली. पेलतडी गांव. ते दिवसांत नयला उतार सत सलो. पण वाटांत मोठेमोठे शेळो धरनी सामके सुळसुळीत जालेले गुंडे सत सले. तेत्थीन वाट काडीत जायवे खूप वेळ लागत सलो. जुतीं काडनी हातांत धरनी गुंडे चुकवीत वाट काढताना वेळ लागत सलो. ताईन हात धरलेलो सतानाय एक दोन वेळा गुंडेची पायभेट हत सलीच. मोग एकमेकांना हसता हसता मात्सां तरी भीजे हतच सलां. पण म्हादय दिसली का मामात्यां पावले सारकां दिसत सलां.
पेलतडी पावतकच तोंडावर पाणी मारनी, नी पोसेत्थीन पाणी प्येतकत पुडले वाटावर पावलां नेटान पडत सली. पुढां एक बारीकशी धड काढली की गांव लागत सलो. तांबडो रस्तो, बारीक मोठी गावठी नळेंची घरां, पोरसां, लाकडांच्यो खोपी, अणि चुकोनी कारो गोठोय दिसत सलो. पुढां गावांतले झरीकडा पावलों का आमी एकदम शूर होवनी मामाचे घराचे वाटान किरावीत सुटत सलों. हात-पाय धोवले की मामी पोहू नाय जाले लाह्यांचे पीठाचे लाडू असां कितांतरी खायवे देत सली. मग आमी भुरगीं खळेत खेळत सलों. मामीबरोबर बारीकसो तांब्यो घेवनी पाटावर पाणी हाडे जात सलों. मनात मात्र देवळाकडा कय जायवेंचां होच विचार घोळत सत सलो.
माजां खेळाकडा लक्ष लागत नतलां. कितको तरी वेळ ज़ालो. एतां रामनवमी चुकनार असां मनात येत सलां. मग खेळताना में मद्यां मद्यां घरात जावनी आईला विटवित सल्यां. ‘आई, चल गे जावया देवळाकडा’. ‘जावया गो थोडे वेळान. मामा बरोबर जायवेचां’. आई सांगत सली. असां दोन-तीन वेळा ज़ालां की मग आई कडथीन एक धेकणो पडत सलो.
मोठेलो मामा न्हावनी बी देवळांत जायवेची तयारी करीत सलो. रामजन्माला पाळणो धरेचो मामाचे घरचो मान से. मामा रामाचो पाळणोय बी म्हणत सलो. बाबगो मामाय न्हावनी पूजा करनी तयार हत सलो. हेगडा चुलीकडा मामी बरां बरां रांदीत सली. गोडसां सतच सलां. बारकेल्या मामीन केलेलां दाट दाट सांबारां आमला एकदम बर्रां लागत सलां. गोडसेसारखां भुरकाव्वे मजा येत सली. सगळी तयारी हतकच आई आमला भुरगेना सादवीत सली. ‘चला गो. जावया’. हो साद आयकेला आमचे कान तसे पडव्याचे वाटान वळयलेलेच सत सले. ‘हांSSS’ असां म्हणत में खळेत्थीनच देवळाकडा जायवेची वाट धरीत सल्यां.
‘अगो, भूताय कशी जांव नाका. हेगडा ये. केसांना फणी मारुया’. आई हातात फणी घेवनीच भायेर येत सली. तितकेत मोठेलो मामा जांव लागत सलो. रामजन्म वेळावर करे मामा मात्सो लवकरच घराकड्थीन जायवे जात सलो. आईन केस उगवे साद घालयोन की माला मनात्थीन राग येत सलो. किताला हवी फणी-बीणी. तेत अणि वेळ जात सलो. एतां उशीरच हनार. असां मनात घोळवीत में केस सारखे करनी घेत सल्यां. मामी कितकांय लवकर रांदे सुरू केला तरी शेवटी मात्सो उशीर म्हणसत तो हतच सलॊ. मोग आमी घाई करनी दुपारचे कडावर धावत धावत देवळात पावत सलों. दहा मिनिटांची सुद्धा वाट नतली. पण ‘कितकां म्हणी दूर से तां देऊळ’ असांच तेवेळा दिसत सलां.
झरीकडा पावतकच कितकेसेच लोक बरे तयार होवनी मोठमोठेन बोलत, हसत – खिदळत देवळाकडा जाताना दिसत सले. ते दिवसा देऊळ एकदम वेगळांच दिसत सलां. देवळाचे मंडपात पाट्यांना रंगीबेरंगी बोंदेरा ( पताका) लायलेली दिसत सली. ती वारेवर्ती हालताना मध्यांच फर्र फर्र आवाज करीत. सगळे कडा गर्दीच गर्दी बगे गावत सली. सगळे लोक एकदम झेतान ओगीच ह्यावाटान त्यावाटान बोवाळत ऱ्हेत सले. माला जाले चिड्डेच हत सलां. इवळेस्से हातान लोकाना धुकलीत ताईचो हात घट्ट धरनी वाट काढीत काढीत आमी सगळी एकदाची रामाचे पाळणेकडा पावत सलों.
पाळणेला चारय वाटान कितके तरी फुलांचे वळेसर लावीत सले. पाळणेत भीतरय फुलांच फुलां, नारळ, खण असां माला येवजसे. ते दिवसांत आबोल्यां अणि चाफेची फुलांच दिसत सलीं. चाफेंचो एक मंद वास अणि तेत भर घाले देवळांत लायलेल्यो उजवाती, निरांजना, कापूर, गंध,… असे सगळे वास एकीकडा येवनी उनान तापलेलां वातावरण ताजां थेवीत सले. माला पाळणेतलां मात कांयच दिसत नतलां. मोठे उंच लोक पुढां उभे सतकच कितां दिसनार से कपाळ! केंचेतरी खाचीतत्थीन फक्त पाळणो हालताना माला दिसत सलो. बरेच लोक रामाचो पाळणो म्हणत सले. हे सगळे लोकांत माला मोठेलो मामा मात सारको दिसत सलो.
माजो मामा पाळणो धरसे हेचांच माला अप्रूप सलां. रामजन्म जाले उपरांत मामा हातात नारळ घेवनी गर्द्यात्थीन वाट काडीत कडाला सरत सलो. आपण एक मोठ्ठां जबाबदा-याचां काम व्यवस्थितपणान पार पाडलां असो समाधानाचो भाव तेचे चेहेरेवर दिसत सलो. सगळे लोक मोग ‘बाळ रामाचां’ दर्शन घेव्वे एकच गर्दी करीत सले. माला जालेवर दर्शन घेताना रामाचां तोंड दिसतच नतलां. पाळणेकडा पावतकच आई माला उखलूनी धरीत सली. हो बघ राम. तां बारीकसां तोंड दिस्से तो राम असा सांगत सली. फुलांनी भल्लेले पाळणेतला तां एवढास्सां तोंड माला मोठे यत्नान दिसत सलां.
तितकेत पाठले लोक आमला धुकलीत पुढां येत सले अणि माजां राम दर्शन हत सलां. तेवेळा मंडपातच दुसरे कडाला एक बाई पाटावर बेसत सली. कपाळाला ठसठशीत कुंकू, धारीकाठाचा गुलाबीसां नऊवारी कापड, मोठ्ठो आंबाडो, तेवरती आबोल्याचे वळेसर, गळेत माळो, हातभर कांकणां असे थाटात ती मांडी घालनी बेसत सली. त्याचेवर भार येत सलो. ती कोणाकोणाला कितां कितां सांगताना दिसत सली. बाकी बायलो त्याला कुंकू लावनी, ओटी भरनीं नमस्कार करीत सल्यो. आमी दूरथीन त्याला बगीत सलों. आईन माला ती ’राणी’ म्हणी सांगितलेलां येवजसे.
खडक्या गावात राणेंचां प्रस्थ मोठां नी मानाचां! राणे घरातले लोकांकडा बोलताना ‘येया जी’, ‘बसा’, ‘चला’ असां मान देवनी बोलेची पद्धत से. ही बाई त्यांहांचे राणे घराणेतली सयेल बहुतेक करनी. म्हणी ती ‘राणी’. माला ती कौसल्या राणी का कितां असो प्रश्न पडत सलो. पण त्याचे तकल्यावर मुकुट घायलेलो नसत सलो. थोडे वेळान हळदी कुंकू चालू हत सलां. आमी बरोच वेळ देवळात ऱ्हेत सलों. आईला कोण कोण ओळखीची हटकीत सलीं. ‘अगो दुर्गी, केन्ना येयलय…’ अशी संवादाची सुरवात हत सली. बरोबर भुरगेंचीय विचारपूस करीत सली. तेत एक आपलेपणा अणि कौतुकाचो भाग मोठो सत सलो हे एतां कळसे. ‘ही अमकी. ल्हानपणात माजेबरोबर सद्दानी खेळे येत सली’, ‘ही तमूक. आमचेत्यां चारीचो पेंडको हाडीत सली’ अशी आई आमला तेंची ओळख सांगत सली. आई अणि ल्हान सली, खेळत सली हे माला खरांच दिसत नतलां. अश्यो गजाली हता हता चणे, प्रसाद खावनी आमी परत मामाचे घराकडा चालो लागत सलों. घरा पावलों तरी देवळांतलो तो थाटमाट, उत्साही वातावरण, पाळणेचे सूर…हे सगळेत्थीन भायेर येव्वे हत नतलां.
घरा येतकच जेवणां झालीं की आमला भुरगेंना परत देवळाकडा धाव मारीनशी दिसत सली. पण आमचां कोण आयकसे! एता मात्शी घरातच बेसा असो हुकुम येत सलो. तेमुळां संध्याकाळ हयवेची वाट बगीत बेसत सलों. संध्याकाळां हात-पाय धोवनी देवाचां म्हणे बेसत सलों. आजचो एक दिवस सुद्धा, ’आज सोंदे म्हणेचां’ असां कोणच म्हणत नतलो. आमी मामाकडा आयलों सां किंवा आज रामनवमी अशी कसलीच कारणा चालत नतली. पण कितांय सांगा, ते दिवसा रामरक्षा म्हणे बरो नेट येत सलो हेंय बी तितकांच खरां. सगळां कितां तां म्हणोनी जालां की मोग बाबगो मामा, डोळे धापनीं कितको तरी वेळ एक्का लयीत ‘ऎकूनी धावा कानी चिदंबर प्रकट बानी धानी’ हो धावो म्हणत बेसत सलो.
भायेर काळोख तेमुळां आमी भुरगीं ओग्गी हेगडा तेगडा बेसोनी ऱ्हेत सलों. तो मंत्र सतत आमचे कानावर पडत सलो. एका प्रकारान आमचे कडथीनय बी नकळत ध्यान हत सलां. मनात मात नाटकाचे वेध चालू सत सले. कय एकदा मामाचो जप सरसे असां हत सलां. पण मामा आपलो सद्दासारखोच तल्लीन होवनीं म्हणत बेसत सलो. तेडला रामनवमीला दोन नाटकां हत सली. पयले दिवसा ऎतिहासिक अणि दुसरे दिवसा सामाजिक नाटक. ते काळात गावातली नाटकां म्हणजे मन उमेदी करेची एक मोठी पर्वणीच!
नाटकाचे नावा वरथीन तेंत असां सनांर नी तसा हनांर असां काल्पनिक चित्र मनात घोळत उरत सलां. सो. ते दिवसा संध्याकाळचे वेळा मामात्यां नारळ बी न्हेव्वे गावातली कोणय येत सलीं. तेंचे कडथीन नाटकाशी संबंधीत कितां तरी गजाली कानावर पडत सल्यो. अमकेन यंदा पार्ट घेतलोन से, येसायी अमकेचे घरांत जाल्यो, नाटकात दोन नट्यो सत असां कितां कितां… मोग नाटकाची उत्सुकता अणि इवळी ताणत सली. नाटकाला जाताना बरोबर शेंदरी घेवनी जात सलों. नाटक सुरु हयवेचे आदी त्याहां आयलेले दुकानानी फेरी मारे मजा येत सली. लोक घडघडॊ खेळत सले, चहा प्येत सले. भजेंचो बरोss वास येत सलो. पण आमला खायवे मिळत नतलीं. खूपसे लोक पानपट्टी खात सले. आमी पयली वोता-यांचे दुकानात जावनी चेंडू, सऱ्यावर धावणारो मारुति, एखादी रिबीन अशी मोठ्ठी खरेदी करीत सलों.
मोठेलो मामा खडक्याचेच खाजेकारा कडथीन ताजां, कुरकुरीत, खूप तीळ नी आलां घायलेलां खाजां अणि तिखट आलेची कापां हाडीत सलो. दुकानांची फेरी जाली की आमी देवळाचे पायऱ्यांकडा शेंदरी घालनी बेसत सलों. एकदा माजी मजाच झाली. नाटक शिवाजीवर सलां. सगळे नटांचे कपडे एकदम चकचकीत, जर लायलेले. दादलेंचे सुद्धा कानात, गळेत मण्यांचे दागिने…कमराला तलवार, तकल्याला मंदिल नायजालेवर मुकुट, रंगयलेली तोंडा असे अवतारात गावातलेंना सुद्धा पार्टी ओळखे येत नतले. . ‘हो बाये कोण? वोळखोकच ना मियां. हो तो बाये वंडाळ्यावयलो अमको, हो त्या अमक्याचो झील म गे.’ असे प्रकारचे लोकांचे आपसांतले संवाद कानावर पडत सले.
नाटक बरां रंगात आयलेलां. त्वेशपूर्ण संवाद, गाणी, लढाई …सगळाच माजे मनात भरत सलां. अणि मोग पुडले प्रवेशाला दरबारात धिप्पाड सरदार अफजल खान आयलो अणि दात ओठ खात, तलवार नाचवीत मोठमोठेन शिवाजीला मारेची प्रतिज्ञा करू लागलो. तेला बगनीच माला धडकी भरली. हा…हा…हा करनीँ हसतकच ते विचारुच नाका. खानाची गोष्ट खबर सतानाय हे खानाला बगनी माला खूप भंय दिसलो. एतां शिवाजीला तो मारनार से गो? हो केवडो मोठो से म गो? असां में माजे चंद्रकलाताईला विचारलां. तेड्ला त्याणी हसोनी म्हटलान ‘तसा नस्से. शिवाजीच तेला मारनार से’. पुढां त्याणी माला हो खान म्हणजे आमचो धोंडे मामा (केशव जोशी) असा सांगितलां. मोग में बारीकसाणीन तेला बगू लागल्यां. आवाजावरतीन बी माला खात्री पटली. मोग मे नाटक अधिक आवडीन बघू लागल्यां. मामाचे भारदस्त आवाजान सगळी स्टेज सामकी हालोनी जात सली. लोकय बरेच उत्साहित जाले सले. नाटकाचे शेवटी खानाचे वेशातलो मामा खालती पडतकच माला खूप वाईट दिसलां. तेत अणि लोकानी खूप टाळ्यो बी मारल्यो सल्यो म्हणी इवळां जास्तच. एतां सुद्धा माला धोंडेमामाची ती वेषभूषा आठवसे.
दुसरे दिवसा दुपारचे वेळा मामाकडा आयलेले धोंडेमामाला बगनी माला थोडो भयच दिसलो सलो. तेणी माला ‘कितां गो म्हणसय’ असां हसत हसत विचारलान. ते वेळचो तेचो तो प्रेमळ आवाज आयकोनॊ माजो भय पळोनी गेलो.
रामनवमीचे ते दोन दिवस सोपले की आमी परत घराचे वाटाला लागत सलों. मामा पाववे येत सलो. वाटांत, घरा येतकच अणि पुडले कांय दिवससुद्धा आमी रामनवमीच्योच गजाली करीत सलों. ते दोन दिवसांतली सगळी मजा मनात घर करनीं उरत सली पुडले वर्षाचे रामनवमीची वाट बगीत.
आज खूप वाईट दिस्से की गेले कितकीशीच वर्शां मनात सोवनीं सुद्धा में खडक्या रामनवमीला पावल्यां नाय. एतां मोठेलो मामा, बाबगो मामा, आई, माम्यो, धोंडेमामा कोणच आमचेंत नाय. हीं सगळीं जणां सताना कसातरी करनीं एकदा रामनवमीला जावनीं येव्वे हवां सलां. आज ती माणसांच नाय मोग मामाकडा रामनवमीसाठी जायवेचो धीरच हत नाय. एतां ते दिवस परत कयच येव्वेचे नाय. सत त्यो फक्त आठवणी.
अंजली माधव भिडे
रायबंदर, गोवा
फोन: ९५१८७६५५३७
पोपटांचो थवो- रमा जोशी
पोपट हो असो वेगळोच पक्षी से, तेचो पोपटी रंग, तांबडी चोंच, गळेला पट्टो, देवान तेला कसां रंग रूप खूप बरां दिलांन से.
माणसांना चित्र काढनीं रंगयताना खूप विचार करेवो लागसे.
पोपटाचा चित्र काढनींं रंग भरेला बरोच वेळ लागसे.
पण देवान कशी सगळेंना पशु पक्षी फुलपाखरा तऱ्हां तऱ्हाचे रंगाची, आकाराची जन्माला घायलीन सत. देवाची लिला अगाध से, तेंचा खाण जेवण तेंचा तीच सोधनीं खासत. तेंतले तेंत पोपट मात्सो सोवळो भट. कितांय पडलेलां अन्न खात नाय, झाडावेल्लां बरां पिकलेला फळ खासे. अधिककरनी पेर, ताय बी तांबडा भडक जालेलां खासे, तां तेचे खुप आवड्याचा. मकेचे दाणे तर बरो खासे!
में पाठले म्हयनेंत माजे चेडिकडा गेल्या सल्यां. ती ऱ्हेसे त्यांहा एक मोठ्ठां झाड से. तेला बॉटल ब्रश असां म्हणसत !
तांबडी लांब अशी फूलां येसत, तेचेतला म्होव खायवे खूप पाखरा येसत, माजी नात केड्ला तरी खिडक्याचे भायेर दशमी थेयसे ती ते येवनीं खासत. एक दिवस मकेचां कणस भायेर खिडक्याला बांधनीं थेयलांन, खासे काय बघुया म्हणी.
आमी ओग्गी आडसाला बेसोनी बघितलां जालेवर हळू येवनी चोंची मारनी पोपट कणसाचे दाणे खातसलो. एक दोन तीन असां करता करतांं थवोच आयलो. घरांतत बेसोनी बघेची मजा, इतके लागीं येसत. थंडी मात्शी कमी होवनीं निबर आयलां काय परते परते येसत, बरे लागीं बघेला मिळसत. पोपट दाणे खातानां बघनी माजां मन, माजे भुर्गेपणांत पावलां.
आमचेत्या साखळ्या – कुळागरांत (आग्रात ), बिंबल अणि करमल हेंचेमध्या एक पेराचा झाड सलां, तांबडेच पेरू पीकोनी लंग जाले की पोपट पेरू खाव्ये येत सले.
आमी भावंडा बेडे पूंजवे गेली काय तेंना बघेला ते झाडाचे तेंगक्षात बेसोनी बघीत सलों. तेड्ला आमी आठ दहा वर्खाची सलों. करमल अणि बिंबल ही झाडां बरी मोठी सलीं.
वरती चढोनी लागथींन पोपट पेरू कसे आवडीन खासत तां बघेला मिळत सलां. ही गजाल में माजे नातीला सांगताना माजां मन सामका ल्हान जालां. आज दुपारची निदवे भी गेल्या नाय, पोपटांना बघता बघता बरोच वेळ गेलो सलो; म्हणोनी आज माला पोपटावर लेख बरवेचां असां दिसलां.
तात्पर्य -: पक्षी माणसां पेक्षा हुशार सत. सद्धानीं दुपारचे त्याहां येसत नातीन घातलेली दशमी, मकेचे दाणे अणि फुलांतलां म्हव ( मध ) खाऊनी जासत.
पण ‘एतां तर ही झाडांय बी मारनीं मोठ मोठ्यो ईमारती हनांर सत खे. तेड्ला हें सौंदर्य बघेला मिळेचा नाय. असां घरांत कोणीतरी खबर पावयलीन म्हणी सगळेंना मात्सां वाईट दिसलां. पण सों ….. “सगळेंनाच घर हवां! न्हुय का?”
देवबरां करू .
श्रीमती रमा गोविंद जोशी
वास्को, गोवा
फोन: ७५०७१५८४०३
खराच, आजची स्री खरीच प्रगत झाली से का?- विद्या अजित दांडेकर
“त्याचा स्वप्न दहा जणींसारखा, चविष्ट भरल्या ताटाचा, दोन वेळचे बेतांचा, सजलेले घराचा, नाटक, मैफिली, गजाली गोष्टींचा. स्वप्न त्याचा दहा जणींसारखा “
सहज, सरळ अशा स्त्रीचे मनातल्यो भावना कवी इंदिरा संतांनी व्यक्त केल्यो सत. खरांच स्त्रीला अजूनी कितां हवा ससे.
खरोखरच आजची स्त्री स्वावलंबी जाली से का? किंवा नाय. हो एक कठीण प्रश्न से. काही प्रमाणात स्त्री आर्थिकदृट्या स्वतंत्र जाली से. शिक्षणामूळां योग्य अयोग्य ह्याची जाणीव जाली से. पण, पण आज सुद्धा अशो अनेक बायलो सत ज्यो घरगुती हिंसाचार, अत्याचार हेना बळी पडल्यो सत. त्याना त्यांचे जोडीदारावर आर्थिक दृष्ट्या अवलंबून ऱ्हेव्वां लागसे.
जरी ती स्वावलंबी जाली तरी पूर्ण स्वतत्र जाली से का?आर्थिक भार उचललो पण मूळांत स्त्रीचो पिंड बदललो से का? तडजोडी स्वीकारनी आयुष्य जगसे. आयलेल्या परिस्थीतिशी एकरूप हसे.
इतका करूनय शेवटी प्रेमाच्या दोन शब्दांना वंचित हसे.
प्राचीन भारतात बायलांना पुरुषांचे बरोबरीन स्थान सला. गार्गी, मैत्रेयी, अणि अत्रेयी यांना विदुषी म्हणोनी विद्वत सभामद्या मानाचा स्थान सलां. प्राचीन भारतात बायलांचो मान राखलो जायवेचो. पण मध्ययुगीन काळात परकीय आक्रमणा जाली अणि सुरक्षित सलेली स्त्री असुरक्षित जाली. ब्रिटिश अणि स्वातंत्रोत्तर काळात स्त्री सुधारणेसाठी विविध कायदे करण्यत आयले. महिला विविध क्षेत्रात आघाडीवर दिसो लागल्यो सल्यो तरी त्यांचा प्रमाण नगण्यच.
स्त्रीला समाजात आज पुरुषांच्या बरोबरीनं संधी मिळसे का? आजही त्यो अनेक प्रकारचे भेदभावाला बळी पडसत. अनेक प्रकारचे अत्याचारांना सामोरां जायवां लागसे. अनेकींना सामाजिक अणि आर्थिक समस्यांना तोंड देव्वां पडसे. ते मुळा त्यांचा जीवन अधिक खडतर हत चालला से. अनेकदा त्यांचे आरोग्यविषयक समस्यांकडा दुर्लक्ष केला जासे. ते मुळां त्यांचेआरोग्यावर नकारात्मक परिणाम हसे.
आज बी काही बायलां (महिला) घरांतले जबाबदाऱ्यात अडकोनी पडलेल्यो दीस्सत. घर अणि नोकरी अशी दोन्ही मैदाना त्यो लढ़सत. तरीय बी काऱ्योतरी कमी पडताना दिस्सत. आज मित्याला, कामाच्या जागेवर किंवा समाजात कमी लेखल्यो जासत. समान संधी मिळत नाय. कामाचा योग्य असा मूल्यमापन केलां जात नाय. कौटुंबिक जबाबदाऱ्यो निभावे अनेकींना स्वतःचे स्वप्नांना तिलांजली देव्वी लागसे. आजही काही समाज्यात त्यांचे शिक्षणाला अणि त्यांचे कामाला विरोध केलो जासे. स्वावलंबनात अजूनही थोड्यो मर्यादा आयलेल्यो दिस्सत. जसां की कौटुंबिक जबाबदाऱ्यो, भेदभाव, इ…
भारत हो एक एकमेव असो देश से ज्यांहा स्त्रीला एकतर देवळांत बेसेयली जासे, नायजाले ‘पायींची वहाण पायी बरी’ असां म्हटला जासे. पुराण काळापाश्णी स्त्रीला देवी किंवा सामान्य वागणूक मिळत सली तरी तेंत पुरुष प्रधान संस्कृती जाणवसे. उदा. सीता माता, जी रावणाचे घरा ऱ्हेल्येमुळा लोकाग्रहास्तव रामान त्याला अग्निपरीक्षा देव्वे भाग पाडलीन. एका मडवळाचे (परिटाच्या ) शब्दावर्थींन अरण्यात सोडली सली. शेवट स्वतःला जमिनीत सामावनी घेतलांन. शेवटी हो एक प्रकारचो अन्यायच न्हुय का? आजचे स्त्रीला एक देवी म्हणोनी नाय तर एक माणूस म्हणी बरी वागणूक हवी ससे.
आजची स्त्री हि बऱ्याच आघाड्यावर्ती पुरुषांच्या बरोबरीन काम करसे. सकाळी पेपर उघडोनी बघितलो कि बऱ्योच बातम्यो आमचां लक्ष वेधोनीं घेसत जसां की सुधा मूर्ती एक यशस्वी उद्योजिका, सुनीता विलियम्सची अवकाशात यशस्वी भरारी, अशो अनेक बातम्यो दिस्सत. तर दुसऱ्ये कडान भ्रूणहत्या, हुंडोबळी. एकाच दिवसा अशो दोन प्रकारच्यो बातम्यो वाचल्यो कि दिस्से आजचे युगात स्त्रीचा स्थान तरी नक्की कितां से? आज ती केंचेही क्षेत्रात पाठी नाय तरी पण त्याचेवर्ती अत्याचार कमी न हतां वाढतच चालले सत .
पयलीपाश्णी स्त्री कर्तृत्व गाजवत आयली से. तरीही त्याला दुय्यम वागणूक किताला दिली जासे. आज ती प्रत्येक गोष्टीत आघाडीवर्ती से अग्रेसर से . मोग तरीही चेड जाली तर वाईट दिस्से. अजूनय भेदभाव मानलो जासे. त्याला स्वतःचे पायावर उभी न करता त्याचा लोक्कोर लग्न लावनी देसत. जेणे करनी जबाबदारीत्थीन मुक्त हणां पसंत करसत. बघे गेला तर त्रास सहन करणा ही त्याची सहनशक्ती ससे. त्याग ससे. पण ह्याच स्त्रीला समाज्या कडथीन अन्याय, अबला नारी अशी विशेषणा दिली जासत.
असां म्हटला जासे कि स्त्री हि क्षणाची पत्नी अणि अनंत काळची माता से. देव सगळ्याकडा पावों शकत नाय म्हणी तेणीन आईची निर्मिती केली. स्त्री हि प्रेमरूपी सागर से. पण स्त्री ही कितां फक्त वंशवृद्धीचांच साधन से का? त्यालाय भावना सत, विचार सत. त्याचा स्वत्व से. स्त्री हि कितां फक्त वस्तू से का? त्याला फक्त एक माणूस म्हणोनि बरी वागणूक हवी से.
खरोखरीच ती स्वतंत्र जाली से का? आजही ती गुलामगिरीत जगसे. कमावपी जाली पण, थरवपी हयवेची से. प्रत्येक स्त्रीत एक सावित्री ससे गरज से ती फक्त ज्योतीबांच्या पाठिंब्येची. मिळ्ळो तर उत्तमच नाय तर त्याणिन स्वतःचा अस्तित्व स्वतःच निर्माण करणां गरजाचा से.
खरे अर्थानं समानता तेड्लाच येल जेड्ला ती आत्मनिर्भर, स्वावलंबी, सक्षम हयेल. त्याणिन स्व:ताचो सम्मान करेच हवो. स्वतःवर प्रेम करे शिके हवां. समाज्याच्या सगळ्या घटकांचो सहभाग हवो. हक्कान मिळत नसलेल्यो गोष्टी स्वकर्तृत्वान मिळवेव्यो लागसत.
शेवटी इतकाच म्हणेन दिस्से ,
“नारी तू, शक्ती तू
कष्ट सोस्नी, दुःख पचवोनी
शिकयसय लढप, तूच लढोनी
ममता तुजी से अथांग
देसय तू जगाला नवां दालन
सय तू अद्भुत कला वेगळी
तुजे मुळाच से जगाला झळाळी”
विद्या अजित दांडेकर
पुणे
फोन: ९८९०८९०४६०
माजो गांव - सावनी गोगटे
{ चित्पावनी भाषेची तोंड ओळख – डिसेंबर २०२५ विद्यार्थिनी)
माजो गांव साखरी आगर सें. डोंगराचे कुशीत वेळणेश्वर अणि हेदवीचे मध्या वसलेलो सें. माजेत्यां माघी गणेश जन्मोत्सव ससे. दोन तीन दिवस आधीपाश्णी सोयरे जमसत. आमी गजाली करसों. खळेंत बेसनी आटवल (मऊ भात ) मेतकूट खासोंं दादले मंडळी पहाटे उठोनी बावीवर न्हासत. नेणते, भुर्गे लोक्कर उठसत. न्हावनीं तयार हसत.
जन्मोत्सवाचे दिवस आमचेत्यां सहस्रावर्तन म्हणसत. आमी सगळे एकदम आवर्तन म्हणसों. माज्यो सगळ्यो आत्या – त्यांचे घोव, काका – काकी, चुलते अशी जमोनीं पुढले पडव्यांत, पाठले झोपेवर ( झोपाळ्यावर ) बेस्नी गजाली करसत. आमी आंबेंचे बागात (आमराईत) फिरे जासों, देवाला माळो ( हार ) करनीं घाले पोसेंत फुलां हाडसों.
सगळो उत्सव सामको हसत खेळत पार पडसे.
माला सद्दानीं त्याहां जावनी ऱ्हेन दिस्से.
सावनी गोगटे
पुणे
वडोदरा: गुजरातची सांस्कृतिक राजधानी - पल्लवी कुंटे
{चित्पावनी भाषेची तोंड ओळख – डिसेंबर २०२५ विद्यार्थिनी)
में गुजरात राज्यात जेला एतां ‘वडोदरा’ म्हणसत त्याहां ऱ्हेसां. विश्वामित्री नयचे काठावरती हें शहर वसलेलां से. आमचां शहर त्याहांचे संस्कृतीसाठी प्रसिद्ध से, म्हणी तेला गुजरातची सांस्कृतिक राजधानी म्हणसत. हें शहर खऱ्या अर्थान महाराजा सायाजीराव गायकवाड पाष्णी नावारूपाला आयलां से. तेंचेनी तेंचे काळांत शहर सुधारेसाठी खूप बरी कामां केली सली.
बडोद्यात “लक्ष्मी विलास पॅलेस” इतको मोठो से की इंग्लंडचो बर्किंगहम पॅलेस सुद्धा तेचेपुढां बारीक दिस्से. एठाचां ‘महाराजा सायाजीराव विध्यापीठ’ शिक्षणात गाजलेलां से. ह्यो दोनय वास्तु बघणेसारख्यो सत.
एठाचो नवरात्री हो मुख्य सण से. नवरात्रीत एठा गरबारास बघेसाठी अणि खेळ्येसाठी अख्ये जगभरात्थीन लोक येसत.
एठाचे लोकांची खास गोष्ट म्हणजे एठा मराठी अणि गुजराती लोक एकमेकांबरोबर खेळीमेळीन, आनंदात ऱ्हेसत. तुमी आमचेकडा या. आम्ला एठा ऱ्हेव्वे खूप आवडसे तसां तुम्ला पण नक्कीच आवडेल.
पल्लवी कुंटे
वडोदरा, गुजरात
