साद चित्पावनीचो - एप्रिल २०२५
साद
चित्पावनीचो
एप्रिल २०२५
संपादिका: सौ. आरती मोने
प्रमुख मार्गदर्शक: श्री. अशोक नेने
संपादक मंडळ: श्री. वासुदेव दामले, सौ. गायत्री भुस्कुटे
मुखपृष्ठ, संकलन, अक्षर जुळवणी, प्रकाशन: गणपुले फाऊंडेशन, ठाणे, महाराष्ट्र
(c) गणपुले फाऊंडेशन (डॉ. सौ. अनुश्री वैभव गणपुले)
या अंकातील मजकूर प्रकाशकांच्या परवानगी शिवाय अन्यत्र प्रकाशित करण्यास मनाई आहे.
या अंकात वापरण्यात आलेली चित्रे इंटरनेट वरून घेण्यात आली आहेत. सर्व चित्रांचे कॉपीराईट मूळ लेखकांचे व संकेत स्थळांचे आहेत.
अंकात व्यक्त झालेली मते लेखकांची वैयक्तिक मते आहेत. त्याच्याशी संपादिका व प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.
प्रकाशन दि. चैत्र कृ. १, १३ एप्रिल २०२५
अनुक्रमणिका
Toggleसंपादकीय
चित्पावनांचे साहित्यांन, अंकाचा स्वरूप घडसे,
ल्हान मोठी सगळी तुमी, साहित्याचे शिल्पकार,
म्हणीच ‘साद चित्पावनीचो’, अंक हसे बहारदार.
नमस्कार….!!
‘साद चित्पानीचो’, वर्ष दुसरां, अंक दुसरो, साल २०२५, हे अंकाचे प्रकाशन सोहळेचे निमित्तान सगळे ल्हान थोर, वाचक वर्ग, भाषा रसिक तसांच प्रिय साहित्यिकानो तुमचां सगळेंचा सहर्ष स्वागत. तसांच सोहळेला लाभलेले सन्माननिय अतिथी, आदरणीय श्री. नारायण दामले काका हेंनाय माजो प्रेमळ नमस्कार! चित्पावनी भाषा जाणकार, चित्पावनी भाषा बोलणारे, भाषाचां आपले परीन संवर्धन करणारे, अशी जेष्ठ व्यक्ती आज प्रकाशन सोहळेला लाभली हे आमचा मोठां भाग्य से.
आज खूप आनंद हसे की, “साद चित्पानीचो” दुसरे वर्षाचो दुसरो अंक प्रकाशित जालो. हे अंकासाठी लाभलेले साहित्यिक. तेंचे मनातल्यो भावभावना, लेखण्यात्थीन अंका’ पर्यंत पावल्यो सत. प्रत्येकाचे साहित्यात्थीन वाचणारेंचे मनांला आनंद नक्कीच गावनार से. अंकाचा नवां रुप, वाचनीय ‘साद चित्पावनीचो ‘ अंक, तुमचे आमचे विचाराना नवी दिशा देव्वे सज्ज से. तुमचे सगळेंचे सहकार्यान तो घरांघरांत पावेल अशी खात्री से.
आमचे प्रतिभावंत समुहान एकजुटीन एतांचे क्षणापर्यंतची साहित्य तपासेची जबाबदारी चोख बजायलेली से. म्हणीच ‘साद चित्पावनीचो’ हे अंकाचा श्रेय मार्गदर्शक अणि आमचे सहकाऱ्यांना जासे. एतापर्यंत आयलेले सगळे साहित्याला न्याय देव्नी, तां लिखाण अंकात सादर करनींं, साहित्यिकांचो आदर ‘आयोजक’ अर्थातच “गणपुले फाऊंडेशनचे सहकार्यान जालेलो से अणि अंकाचां काम बरे तरांन हैय्वा म्हणी ‘उत्तम प्रकाशकाची भूमिका पार केली से.
चित्पावनी बोलीचो ऱ्हास हंव नये हेची जाणकारांनी जाणीव करनीं दिली. तेच बरोबर सगळेंना साद घालेचां काम तेंचेनी केलां. अणि ते ‘सादाला ओ देव्वेचां काम’ दर चित्पावनी साहित्यप्रेमी करीत सत. ही महत्त्वाची गोष्ट म्हणे हरकत नाय.
“चित्पावनी साहित्य अंकाची निर्मिती” खुपजणांचे सातत्यांमुळां पूर्ण जालेली से. अंकाची निर्मिती हो सगळेंनांच एक आनंदाचो क्षण; कार्याचो हेतू,”पिढ्यानपिढ्यो कर्तृत्वाचां अणि चित्पावनीचां ‘बी’ रुजेवां!” घराघरांत ह्या भाषाचे शिक्षक तयार हैय्वेत अणि एक दिवस असो सैय्वो की ही प्रेरणां घेव्नीं मनामनांत्थीन ‘चित्पावनी बोलीचे’ सादाला ‘ओ’ यैय्वो. तुमचे सगळेंचे मदतीन, “चित्पावनी भाषाचा झाड इतकां मोठां हयेल की युगानुयुगां तेचे सावळ्यांत चित्पावनी भाषाचो नंदादीप दिवसरात्र पेटतो ऱ्हेल!” चित्पावनीचे संवर्धनाचे शुभ कार्याला तुमचे सारखे भाषा प्रेमीचों ‘सहभाग’ सेच, शिवाय तेंत अणिकय भर घालणार सा हो आमचो विश्वास से. आमी सगळी मिळोनीं हे स्वप्न सुरू थेवया अणि मनापाश्णी कार्यरत ऱ्हेवया.
चला ते, “चित्पावनी बोली” चो संभाळ करुया, त्याचो प्रचार – प्रसार करीत संवर्धन करुया!”.
देव बरां करुं!! धन्यवाद!!
✍️ संपादिका
सौ. आरती मोने
साखळी, गोवा
फोन: ७०३८०६२५३६
गणपुले फाऊंडेशन चे वतीन
संकेतस्थळ रुपातलो पयलोच अंक प्रकाशित करताना माला खूप आनंद हसे. असां म्हणसत की, स्वप्न बघेवा अणि तां जो पर्यन्त पूर्ण हत नाय तो पर्यन्त प्रयत्न करीत ऱ्हेव्वे हवे. तुमचां उद्दिष्ट जर बरां सयेल जालेवर देव योग्य माणसांचे रुपात पाठबळ देसे.
दिवाळी अंकाचे प्रकाशना वेळा दिलेला वचन जरी पूर्ण जालां सलां, तरी खूप मोठो पल्लो उरलो से.
तंत्रज्ञानाचो उपयोग करनी जास्तीत जास्त चित्पावन घरांत जो पर्यन्त चित्पावनी पावत नाय तो पर्यन्त उसंत नाय.
संकेतस्थळ हे “२०३० पर्यन्त घरा घरात चित्पावनी” उपक्रमाचो एक भाग से.
पुढां जावनी, संकेतस्थळावर चित्पावनीची अणिकय माहिती घालनार सो. गरज से तुमचे सहकार्याची. सहकार्य आर्थिक न्हुय तर चित्पावनीचो अंगीकार, प्रचार अणि प्रसार करे तुमचां सहकार्य हवां.
वाचक वर्ग अणि साहित्यिक वर्ग हे खूप महत्वाचे घटक सत हे अंकाचा भवितव्य घडवे.
संपादिका, प्रमुख मार्गदर्शक, संपादक मंडळ अणि गणपुले फाऊंडेशन चित्पावनीची मशाल तुमचे सहकार्यान पेटत थेयनारच सत.
तुमच्यो प्रतिक्रिया आम्ला नक्की धाडा अणि ह्या अंकाचो दर्जॉ वाढवेला मदत करा.
देव बरा करू.
वैभव गणपुले
संयोजक – गणपुले फाऊंडेशन
ठाणे, महाराष्ट्र
फोन: ९९२०३४५८६१
उमल्ली कळी जालां मनमोहक फूल
लखनौ एठा अमेयचा लगीन खूप थाटामाटात पार पडलेला.
कार्यात उर्वीचे घरातली श्रीमंती, कार्यातले प्रत्येक कार्यक्रमांत दिसत सली. लखनौचे सगळे खाद्य प्रकार प्रत्येक जेवणावळीत मुद्दामच थेयलेले कारण महाराष्ट्रातले बोड्ये कडले लोकांना मात्सा अप्रूप. तरणी भुरगी सगळेचो आस्वाद घेणेत रमलेली. संगीताचो कार्यक्रम तर असो जालो की, सगळी जणां आपला वय विसरली. बरो मेकअप करनी, शालू दागिने घालनी लग्नाचे गार्डन हॉलात दाखल जाली.
अमेय अणि उर्वी हळदिवे रंगाची रंगसंगती अणि रेशमी कपडेचे आधुनीक वेषांत बरी सोबत सली. कोणीतरी अनघाला म्हटलांन सुद्धा की कार्यक्रमानंतर दोघांची दृष्ट काढा म्हणी. आजचो “ड्रेस कोड” सुद्दा हळदिवॉच सलो. सगळे जण हळदिवे रंगाच्या रंगसगतीतले कपडेत सोबत सले. पाव्हणे, लॉनात आपआपले कुटूंबाचे फोटो काढनी घेत सले , ‘सेल्फी पॉईंट’ सुद्धा सलो त्याहां. दोघांचो हळदी समारंभ सुरु झालो. सगळेनी हळदिव्यो पाकळ्यो उधळल्यो, अगदी वर्षाव जालो पाकळ्यांचो, उर्वीचे केसांत अडकलेल्यो हळदिव्यो पाकळ्यो खूप मोहक दिसत सल्यो. त्याचा रूप, तसा सावळां पण दिसेला मात्र आकर्षक. हो कार्यक्रम मनासारखो जालो पण अनघाची सुनाला साड्यात बघेची इच्छा मनातच उरली. आजकाल पश्चिमी प्रकारातले कपडे लग्नात सर्रास घालसत. सोंदे तेगडा, एतां सगळांच बदल्ला से.
भुरगेना जां हवा तांच आपला सुख.
हेच समारंभात काकणां भरेचो कार्यक्रम जालो, तो मात्र अगदी जमलेल्या बायलांना बरो दिसलो. ही जुनीच रीत. एतां दुपारचा ते मानान साधाच पण लखनौच्या पद्धतीचा जेवण, तां मातसा लोक्कोर जेवनी सोपयला. कारण दुपारी चारचो लग्नाचो मुहूर्त. लग्न ज्ञानप्रबोधीनीच्या सुटसुटीत पद्धतीत ठरेयलेला. मंडपात बेसोनी सगळेनी सोहळो मनांत भरनी घेतलो. कौतुकांत लग्नविधी पार पडले अणि अमेय, उर्वी बंधनात अडकली. रात्रीचा जेवण म्हंजे विचारू नाकां. सूप, सालाद, भेळ पाणीपुरी, वेगळेवेगळे स्टार्टर्स लयलूट अगदी. मुख्य जेवणात तरी कितकेसेच पदार्थ, गोडशी, ती सुद्धा चार पाच, तशीच आईस्क्रीमची रेलचेल. सगळेच मनापाश्णी जेयले.
यजमानांचा कौतुक करनी जायवे घरा सरले . अनघा नवीन जोडपेला घेवनी आपले हॉटेलातले अलिशान खोल्यात पावली. एतां दमणूक झालेली सगळी गाढ निदवली. उद्या मुंबईची ट्रेन सली. नव्या सुनाचे स्वागताची तयारी, माप ओलांडणी सुनाचो घर प्रवेश, लक्ष्मीपूजन हेचा नियोजन मनातले मनात करनी अनघा निदवली.
अनघाला अमेयचा लग्न ठरयताना पाष्णीच्यो सगळ्यो आठवणी येतच सल्यो. अमेय MBA होवनी तेला मनासारखी नोकरी मिळतकत, अनघाला जाणीव झाली की, एता हेचे लग्नाचो विचार करे हवो अणि चेडी बघे सुरवात करे हवी. त्यांनी अमेयला आदी विचारनी घेतालान की, बाबारे तू कारां तुजां ठरेयलास बी नाय नी? अमेयान नकारार्थी मान हालयलीन. हाल्ली लग्न जमेयणाऱ्यो संस्था ससत , म्हणी त्यांनी एका अशाच नामांकीत संस्थात अमेयाला दाखल केलोन लग्न जमवे सुद्दा हाली ‘बायो डेटा’ लागसे हे त्याला खबर सलां. हालीचा डिजीटल युग तां, सगळा कसा रेडीमेड.
बऱ्याच चेडींचे बरेच बायो डेटा बघनी जाले. आवडली चेड जाले पुढां सरेचा. मॉग चेड बोड्यो बरेच दिवस चॅट करणार म्हंजे एकमेकांना समजोनी घेवेचो प्रयत्न करणार. करता करता एक चेड अमेयचे मनात भरली. तीच ही उर्वी. पण उर्वीच्यो आधुनीक काळाप्रमाण सलेल्यो अटी. अनघाचा सगळां कुटुंब लक्ख गोरा. उर्वीचो सावळो रंग काय अनघाला मान्य नतलो, पण आकर्षक उर्वी अमेयला एकदमच आवडली. मॉग ते पुढां बाकीच्यो अटी मान्यच झाल्यो आपोआप. उर्वीन सांगितलेला की त्याला ना घरकामाची आवड से, ना रांदपाची. हे जरी खरां सला की रांदप येत नाय जाले आजचे काळांत अणि शहरात अडत नाय, पण हेचे परिणाम किता हतील हेची एक धास्ती सली अनघाला. ह्या गोष्टींचा महत्व संसारात कितका ससे हे कोणी सांगे नाका. अनघाचे मनात इतके विचार येव लागले. त्याला दिसला आदीचे काळांत मोठी कुटूंबा सली. सगळी कामां घरातल्यो सगळ्यो बायल्यो वाटनी घेवनी करीत. खरा जाले हेचेमुळां एकीवरच कामाचो भार पडत नतलो.पण मग चेडीना शिक्षण मिळो लागला. नंतर मॉग चेडी नोकरी करू लागल्यो. पण अजुनी सुद्धां बायलांकडा आर्थिक स्वातंत्र नतलाच. नोकरी सांभाळनी, रांधप अणि सगळा घरकाम अजुनीय त्यो नोकरी करणाऱ्यो बायलोच करीत सल्यो. एखादीच भाग्यवान, ज्याला घोवाची साथ काम करताना मिळे. पण एतां चेडी / बायलांची पीढी अणि एक पाऊल पुढा पावली. एतां बायलाची कामां दादलेची कामां हेचेत खूप अंतर उरलेला नाय, शहरांत तरी.
अमेयान हट्टच केलोंन म्हणी लग्न ठरेवेचाच पडला, साखरपुडेची हौस जाली. ते नंतर वर्खांन लग्नाचो म्हूर्त. दोघांचा ऐकमेकांना मिळणां चालू सलां.
अनघाला उर्वीची अट मध्यां मध्यां यववत सली, खरां जाले ही अट तरी कशी म्हणेची? पण उर्वीला रांदपाची आवडच नतली, अजबच न्हूय, अगदी चहा करेची आवडय नसेवी ह्याला? सूनांकडथीन निदानपक्षी चहाची तरी अपेक्षा ससेच, पण एतां पत्करलीसे तर खरी. बघूया हयेल कितां तरी पुढां पाठी. त्याला मध्याच “खूबसुरत” हे हिंदी सिनेमातली “रेखान” सादर केलेली भूमिका यवजली. पण सिनेमात सगळा अचानक घडसे, तसांच खरे जगात हयेल असां कांय नाय. एता लग्नाला म्हयनो झालो. म्हयनेभरांन व्यावहारीक प्रश्न उभे ऱ्हेले, भूक लागसे जाले रांदे तर हवा. सुनाचो हे बाबतीत उजेडच. पण अमेय धिराचो तेनी सावकाशीन उर्वीला बारीक जबाबदाऱ्यो देवे सुरवात केलीन. थोडां थोडां काम आपले बरोबर करेचा सुचयलान. तशी उर्वी सांगितलेला काम करीत सली, ती उलट उत्तरा बी देत नतली, पण जबाबदा-याची जाणीवच नतली त्याला बहुतेक. ना खंत ना खेद असां.
असेच दिवस जात सले. असोच एक दिवस भुरगेचे जन्माची खबर घेवनी आयलो. एतां अनघा आदीचा सगळ विसरली आणि येणारे नातवंडांचे विचारात मग्न होवनी गेली. हळूहळू उर्वीला रांदपाची गोडी लागली. तेत त्याची प्रगती हंव लागली. म्हंजे किता तर ती निदान चपाती भाजी आणि सांबारा भात बरोबरीन , एखादी कोशिंबीर इतका तरी शिकलेली.
एतां निदान भुरगेला आटवल अणि वरण भात शिजोवनी वाढेल हेची खात्री अनघाला झाली. पण त्याला उर्वीचे वागणेत बारीक बदल हताना दिसो लागलो, एतां ती एखाद दुसरो पदार्थ करतांना दिसत सली. हे लक्षण बरां सला. ती एतां खूप लक्ष देवनी रुची घेत रांदतानाच्यो सगळ्यो सूचना बारीकसाणीन आयकत सली. उर्वीला सुद्धा स्वतात हणारो बदल जाणवत सलो. उर्वी मुळांत अहंकारी किंवा गर्वीष्ट कयीच नतली. तेला लागोनी हो बदल त्यानी सहजच स्विकारलोन. अनघाची तंद्री उतरली. उर्वी त्याला विचारीत सली की आई तुमी कसले स्वप्नांत दंग जालेलीत म्हणी? ती हसली आणि मनातले मनात म्हणाली, देवच पावलो. अणि खूप वेळ झोपाळेवर तशीच झोपी घेत बेसली.
सौ. देवश्री गोडबोले
कोथरूड, महाराष्ट्र
फोन:९०११९५८७२५
झेन कथा: रिकामी होडी (रिकामां होडां )
एकदा एक बुद्ध भिक्षूक ( साधू ) बुद्ध विहारांत र्हेवनी वाचन, चिंतन, मनन, ध्यान धारणा करीत ससे. तेचे मनात एक विचार आयलो की, हे विहारापाश्णी दूर कारोतरी शांत एकांतांत गेलो झाले एठाचे पेक्षा आपली ध्यान धारणा अधिक बरी हयेल. मन एकाग्र हयेल.
त्यांहां लागीच एक तळां सलां.
त्याहां एक होडां सुद्धा सलां. दुसरे दिवसा तो तां होडां वल्हवीत तळेंत एकदम मध्यां जावनी थांबलो अणि ध्यानाला बेसलो. आजूबाजूला एकदम नीरव शांतता सली. मन एकाग्र हणेसाठी पोषक वातावरण सलां. तेची ध्यानधारणा चालू झाली अणि अचानक तेचे होड्याला एकदम मोठ्ठ्यानी धक्को बेसलो.
तरी सुद्धा तेणी दोळे न उघडता आपला चिंतन चालूच थेयलां. पण मनात मात्र तेचे विचार येंव लागले , ‘कोणी माझे होड्याला धक्को दिलो सनार?’ असो विचार आयलो अणि हळूहळू तेचे मनात राग घर करूं लागलो.
झालां! …. जसे जसे ते धक्के बेसत सले, तसोतस़ो तो ते दुसऱ्या होड्यातले धक्को देणारे माणसाबद्दल विचार करू लागलो. एतां तेचे मनात संताप वाढो लागलो. दोळे धापलेलेच सले; पण मनात रागाचो उद्रेक झालो. तेणी दोळे उघडले अणि होड्याकडा दातओठ खात बघू लागलो . एतां ते नावाड्याला खडसावेचांच, असो विचार करताना तेचे लक्षात आयलां ‘अरे हे होड्यांत तर कोणच नाय ! ‘. दोरखंड सुटोनी तां होडां पाण्याचे प्रवाहाबरोबर हिंदकळत भिक्षूचे होड्यावर हापटत सलां… तोच क्षण तेचेसाठी ज्ञानप्राप्तीचो ठरलो!
तेला जाणवलां, की राग किंवा संताप हो आपले मनातच ससे. दुसर्यो भायेरच्यो गोष्टी ते संतापाला चिथावणी देसत. हे ज्ञानप्राप्तीनंतर जेडला केडला तेचे आयुष्यात रागाला, संतापाला चिथावणी देणारी व्यक्ती समोर उभी र्हेली जाले तो मनात विचार करसे – ‘ही पुढली व्यक्तीही ते रिकामे होड्यासारखी से. संतापाचो किंवा रागाचो झरो खरो तर माझे मनातच से’.
अपर्णा भागवत यांच्या मुळ मराठी लेखावरून
धारवाड, कर्नाटक
फोन: ८८८४९४७४५१
प्राक्तन
तर तसाच घडेल
थेवनी भरवसो,
हात जोडनी शरणागत हयवां,
देव मानसो जाले
देवांचे चरणी लीन हयवां
कर्माचे सिध्दांत धुंडाळले जाले,
सोपां हयेल जगणां
असा कि घडसे,
आपले जीवनात?
भूतकाळात वळोनी बघेवां.
कसां सलां माजां वागणां?
कसां सलां माजां बोलणां?
विस्मरणात विस्मृतीत गेलेलां,
कळत नकळत घडलेला.
परतफेड करता आयली जाले बरां
नाय जाले हे जगत चालयणारे
ब्रह्मांडाकडा शरणागत हयवां.
विचारात मन कुरतडत ठेयणे पेक्षा,
तां शांत कसा ऱ्हेल हे बघेवां,
प्रश्नाकडां पाठ करनी, हयेल तां होवंदे
विरागी होवनी जगेवा .
जीवन आपला सुखी सनार
हेच विचारात ह्रेव्वां,
सद्विचार, सदाचार अणि सत्कर्म करीत जायवां
म्हापसा, गोवा
फोन: ९४२२४५८३४०
एक पारंपरिक तोंडीलावणां: हरभरेच्या डाळीचां तोंडीलावणां
१ वाटी चणेची डाळ, ७ ते ८ हरव्यो मिर्सांगो, (मिर्सांगो, तुमी तुमच्या आवडी प्रमाण कमी -जास्त घेव शकसा,) २ वाट्यो थोडां आंबट दही, चवीपुरतां मीठ, इवळी कोथंबीर; आवडत नसेल जाले, घालू नाकां, अणि चिमटीभरी साखर.
फोडण्याचा साहित्य:
२ ते ३ चमचे गोडां तेल, १ चमचो सासवां, १ चमचो जिरां, १ चमचो हिंग, १ चमचो मिर्सांगाचो पिठो ( लाल तिखट,) १ चमचो हळद, ५ ते ६ करवीलाची पानां. “फोडण्यांला हिंग अधिक घायलो की बरी रुचीक ( चवीष्ठ ) लागसे.
कृती:
हरभरेची डाळ ३ ते ४ वरां ( तास) फुगवोनीं घेवेची मोग पाथरीवर ( पाटा -वरवंटा) किंवा मिक्सरांत सरबरीत वाटनी घ्या. वाटतानांच तेंत मिर्संगांचे कुडके अणि मीठ घाला. ते एका गुळमांत काढनीं तेंत दही अणि साखर घालनीं एकजीव करनीं घ्या. फोडण्याच्या पळ्यांत २ ते ३ चमचे तेल घाला. तेल बरां उन जालांकी तेंत सासवां, जिरां घाला. सासवां बरी फटफटों लागली की हिंग, हळद घालनी गॅस रोकडोच बंद करेचो. मोग तेंत करवील घालनीं ती फोडणी सगळे वाटणांत ओतेची. चुरररररर असो आवाज येसे अणि बरो खमंग वास येसे. शेवट तेचेंत बारीक चिरलेली कोथिंबीर घालेची अणि परत तां सगळां वाटप एकजीव करनीं घेव्वेचां. की जालां सणसणीत असां डाळीचां चटकमटक.
मोग, कशी से रेसिपी? से नी सोपी? तसां जाले एकदा करनीं बघाच अणि कशी लागसे तां माला नक्की सांगा.
देव बरां करू 🙏😊
बदलापूर, महाराष्ट्र
फोन: ७५५९४२४३२१
चित्पावनीचे संवर्धनासाठी गणपुले फाऊंडेशन चे उपक्रम
- चित्पावनी भाषाची तोंड ओळख – ऑनलाईन कार्यशाळा
- चित्पावनी पाठयक्रम
- चित्पावनी त्रैमासिक
- छापील चित्पावनी दिवाळी अंक
- संकेतस्थळाची सुरुवात
सावज (व्हीडिओ कथा)
फुलां अणि गुच्छ
उत्तराचो सुवास तेचे, करसे मन नितळ ।।१।।
जायो जुयो धव्यो, हता सांज उमलल्यो;
आकाशातल्यो चांदण्यो, तेनां बघनी लुकलुकल्यो ।।२।।
मोगरो आणि कुंदाची, फाती केली गच्च;
माळली ती आंबाडेवर, आकडे लावनी भरगच्च ।।३।।
गुलाबी रंगात फुलसत, नाजूक शेब्दुली सांजची;
सोय हसे खरीच, गणपतीच्या आरत्याची ।।४।।
पान नाय हालत, जास्वंदा शिवाय पूजात;
लक्ष्मी पूजना करता सजली, शेवती, रोजा तामणात ।।५।।
सदाफुल्याला बघितली, फुलताना सांदी- कपारीत;
बी रुजेला नाकांच त्याला, सुपीक जमीन कदाचीत ।।६।।
देवचाफो फुलसे, धवे धवे गुच्छ माळसे;
चटकचांदण्यो फुल्ल्यो की, आसमंत दरवळसे।।७।।
विष्णुक्रांत गणेशवेल, नाजूक नाजूक चंद्रिका;
हळूच खुडा वेलावरथीन, हातांन दाबू नाका।।८।।
शंकराची हळदीवी तांबडी, फुलां खांदयावर डुलसत;
हळदी कुंकवासारखी, देवावर ती दिस्सत।।९।।
केगदाचो हातो फुललो, दरवळसे बघा केन्थीन;
सोदा बघूया हळदिवो हातो , काटेरी लांब पानात्थीन ।।१०।।
कमळ साळकांचा तळां, भरलां गुलाबी धवा;
खोल खोल पाण्यात, तंतूसारखी तेची मुळां ।।११।।
गुलछड्याची ताठ मान, खूपच झाली लांब;
गुलाबांची लांब छडी, तेचे बरोबर बांद ।।१२।।
रंगमोहक फुलांचो, बांदलो सुरेखसो गुच्छ;
यजमानाचे हातात देवनी, निरखां तेचा हास्य ।।१३।।
प्राजक्ताचो गालिचो, धवे केशरी रंगाचो;
पाऊल उखला हळू तुमचां, पाय नाय हां देवचो ।।१४।।
कोथरूड, महाराष्ट्र
फोन: ९०११९५८७२५
तुर्कस्थान एक सहल
११ मार्च ते १९ मार्च असे ८ दिवसांचो एकूण आराखडो आखलो, तेंतले ११ ते १५ इस्तंबूल अणि १५—१९ अंतालिया असो प्रवास करेचो ठरलो. आमी बुक केलेले हॉटेलात नाश्त्याची सोय सकाळी ७: ०० ते १०:३० सली म्हणी आमी सकाळीच पोट भर खावनीं मोगच भायेर पडत सली. सुरवात आमी इस्तंबूल हे शहरापाष्णी केली, समुद्राचे कडावर वसलेला, निसर्गान परिपूर्ण असां हें शहर. तेंतलो बऱ्यापैकी भाग पाण्यान व्यापलेलो से. एठा आमी (blue) निळी मशीद, राणी सोफिया हेंचि कब्र, सुलतान सुलेमान ची कब्र, जुना इस्तंबूल, प्रिन्सेस island एठा एकूण ४ मोठी बेटां सत अणि बरीच ल्हान वैयक्तिक बेटां बी सत. त्याहां बोटीन जायवेचां लागसे. आमी प्रत्येक बेटावरती उतरोनी त्याहांचो भाग बगत सलो. रस्तेवर हेगडा तेगडा बिनधास्त भोवणारी भरपूर मांजरा बगीतली. हेगडाचे लोक हे माजरांना खायवे भरपूर देसत तेंना मारेचा नाय कारण देवाच्या रूपात ती सगळी कडा वावरसत असो समज से. तेलालागोनी सगळी कडा बुकले अणि माजरां बिनधास्त भोवताना बगे गावसत.
बरेच ठिकाणी मांसाहार चालसे. समुद्राचेलागी वसती हे कारणान मास मासे खाणा हो लोकांचो मुख्य आहार से, काय काय जागेवर मागितलेवर शाकाहारी खाणां मिळत सलां. एठा शिंगाडेच्यो बियो भाजनी मिळसत, त्यो आमी खूप खाल्ल्यो. पणसातल्यो आठळ्यो कशो लागसत. शिवाय उकडलेली मकेची कणसां बी मिळसत. माजेसारखे शाकाहारी माणसाला तोच थोडो आधार सलो.
मोजके लोक सोडले तर, लोकांना तुर्की शिवाय दुसरी केंचीच भाषा सोडाच इंग्लिश पण येत नतली म्हणी आमला खूपच अडचणी येत सल्यो. अजूनी एक अडचण म्हणजे में इंटरनेट घेतला नतलां, जां कितां सलां तां फक्त रसिका कडा. तरुण पिढी अणि आमची पिढी हेंत खूप फरक से, हे पावलो पावली जाणवत सलां. अणि ती घेवनी जात सली तशी में त्याचे पाठल्यां जात सल्यां. त्याचो माला खूपच आधार दिसलो. मुस्लिम देश म्हणजे बायलो अख्यो चेहरो ( तोंड) बुरखेन धाकसत किंवा पूर्ण शरीरभर काळो अंगरखो घालसत अशी माजी कल्पना सली ती खोटी ठरली, ह्यो बायलो माथेवर्थीन स्कार्फ गुंडाळसत. कय कय बायलो तितकांय बी करीत नतल्यो. असो हो आधुनिक जालेलो इस्तंबूल तुर्की देश.
माजे जेव्वेचे मात थोडे हाल जाले, मोग में पाव अणि sandwich करनीं खात सली गोझलेमे हो खूप फामत पदार्थ से जाहां त्याहां मिळसत. थोडक्येत आपलो आलू पराठोच, खूप बरो लागसे एकदम पोट भरलेचा समाधान. Antalya पाष्णी ३ वरां वाटावर heirapolis अणि pumukalen एठा थंड पाण्याचे ल्हान ल्हान झरे सत अणि आजुबाजूला चुनेचे डोंगर सत. भोवताली झाडी अणि मोकळां मळ/ पठार से एठाचा सगळां दृश्य खूपच विलोभनीय से. हे वेगवेगळे गुणाचे पाषाणी गुंडेचे डोंगर सत . ते पाषाणांच्यो अनेक वस्तू तयार केल्यो जासत .
असे प्रकारान आमची ही सहल सोपताना मनात खूप समाधान दिसत सताना नवीन वेध सुरू जाले पुढल्या सहलीचे!
लंडन
फोन: +४४ ७५९३५८४६१५
चित्पावनी कोडी, सांगा में कोण?
एक फुकट गेले, दुसरो नाय कामाचो.
२) खात नाय जेवित नाय, रंगीत पाणी प्येसे,
हात नाय पाय नाय, चाल चाल चालसे.
३) आठ तोंडा, तेंत जिभ एकय नाय,
शब्दाचो गोडवो, मधापेक्षा कमी नाय.
दिवसभरी गुळयो मात भरवीत ऱ्हेसे पोर.
५) एका जाण्टेलेला बारा बोड्ये, थोडे ल्हान ते थोडे घोडे,
चार ऱ्हेले पाणी सोपवीत, चार गेले पाणी हाडे.
सौ. आरती अनंत मोने
साखळी, गोवा
फोन: ७०३८०६२५३६
सत्यासत्य
का अर्धो ग्लास पाणी, अर्धो रिकामो से ?
बरेचदा सत्य असत्य ससत भास, आभास
असत्यात सत्य का सत्यात असत्य ससे?
अपूर्णांथिन पूर्णंत्वाकडा का उरफाटा?
कार्यकरण, कर्तव्यपरायणता मन:साक्षी भाव
सत्य, असत्य, नित्य, अनित्य अशाश्वतता?
अस्तित्व, चेतना, आनंद एक अनन्तता
रिक्तपणाची जाणीव मनाला बोचसे का?
अपूर्णांथिन पूर्णंत्वाचो ध्यास लागसे का?
जशी न्हय सागराला मिळताच, सागरच हसे
तसा नि:श्रेयस होवनी जीवन सफल हसे, कृतार्थ हसे
भरलेपणात तृप्तीची ढेकर येववे हवी
जीवनात कृतकृत्त्यता मिळे हवी.
पर्वरी, गोवा
फोन: ७०२०६१८३२८
आठवणी
पण आमचो काळ वेगळोच सलो. खुप मज्जा येत सली. आमी गाडयाची सोय नाय म्हणी सोयरेंकडा ऱ्हेत सलोँ. शाळाला सुट्टी पडली की घरा येवेचा. मोग घराशी उन्हाळेतली कामां सत सली. गोठो शिवेचो, चुडता लागी करेची, पोवल्यो हाडेच्यो, तेंचे कानपे करनी थेवेचे, शेणी भरेच्यो, लाकडां आचावर लावेची, वेळ पावत नतलो. सकाळी कल्लां घेवनी शिपेचा. (कल्लां म्हणजे लाकुड पोखरुनी करित सले) दुपारी काजीत जायवेचा. मोग म्हुट्टे (बोंडु) लागी करेचे मोग, बियो काढेच्यो, म्हुट्टे मळेचे, निरो प्येवेचो, मोग घराशी येवेचां. अणि न्हायवेचां. परवचा म्हणेची अणि मोग पेज जेवेची. तोंडी लावे तोर, खोबरां नाय तर कई तरी पणसाची भाजी. मोग बरी नीज लागत सली. मध्या वेळ मिळेल तेडला कुळागरातली चार हाडनी ती धोवोनी थेव्वेची. खुप कामा. आबोली हाडनी ती फाडी, फाती घालेची. हे दिवसांत ओवळां फुलसत, त्याहां आईची साडी, बाबाचा पुडवां, कितां तरी घालनी थेव्वेचा. मोग फुलां हाडनी माळा करेच्यो . माळेच्यो. कोदाळीत श्री चिंदंबरा ला देत सलो. हे दिवसात नागचाफी, भुईचाफी, आबोली, ओवळां, सुरंगा खुप फुलसत.
आमचे वेळा दूरचित्रवाणी, फोन, मिक्सर असा काय नतलां, तेला लागोनी आमला पाटेवर, घाटणेत वाटेचां. घि्ट्टीवर भात कांडेचां, लाटीवर पोहू कांडेचे, कल्ला घेवनी शिपेचा हि सगळी कामा शिकलो.
हे दिवसात वेगवेगळी फुलां तशीच वेगवेगळी फळां, चुन्ना, करवंदा, कण्हेरा, जांभळा, चारा, पेरा. मग पाडवो झालो का हळदिकुंकवाचो बोवाळ सगळी फळां लागी करनी हाडेची, चांदिवडेचे खोले हाडेचे, काजी भाजेच्यो, फुलां लागी करेची, डाळ भिजत घालेची, तोरां हाडेची, पन्हां करेचां, खळां सारोवनी चेंत्रागण घालेचां. सुवासिनी येणार म्हणी तेंचे पाय धुणार म्हणी पाणी, टुवालो किंवा पंचो थेव्वेचो. हळदी कुंकवाचे वेळा चैत्रागौरीचा गाणां म्हणसत . “गौर पुसे शंकरासी स्वामी विनंती तुम्हासी मज पाठवा माहेरासी भेटून येईन स्वामी या.”
खोले तयार करेचे काजी, अननस, पेर, गरे, जी फळां मिळसत ती घालेची, अणी वाटलेली डाळ पानावर घालेची. पेलेथीन पन्हां, देव्वेचा. ती एक मजा सली.
पणसाची साटां घालेची, कापे गरे सुकवनी थेव्वेचे. पापड करेचे. भिंडा, ओकांबे, तोरा हाडनी, तेंची सोलां करेची. घोटां हाडनी रायता करेचा. अधिक घोटा सली जालेवर तेंची बी साटां करेची तोरांचा लोणचां करेचा. पावसात मिळत नाय म्हणी तोरा, गरे मिठात घालनी थेवीत सले. उकड आंबो करेचो मोग पावसात चटणी करेची. उपासाला पणसाची सालां करनी खायवे ची. तेडला पणस खूप लागत सले. खाणारे लोक सले. पणस मागे कितके लोक येत सले ! एतां काळ बदललो अणि खाणारे कमी जाले अशो ह्यो खुप आठवणी सत.
आमचो काळ वेगळोच सलो एताचा खाणां अणि आमचे वेळचा खाणां, खुप बदल जाले. पहिली लग्न, मुंज किता कार्यक्रम सले का जेव्वे केळीची पाना, ति कमी सली जालेवर बन केळीची पानां मांडनी पंक्ति वाढीत सले. तेची जागा बुफेन घेतली. पण मजा नाय. जेयलेचा समाधान नाय. पैसे मात्र खर्च होसत. तेंडला लोक एका जागेवर बेसत सले, लोक वाढीत. एतां बुफे लायलेलो ससे पण लोक भोवोनी खासत. एताचां खाणां अणि आमचे वेळचा खाणां हेत फरक पडले कारणानं माणूस पोकळ, आळशी झालो. तेडला पंक्ति वाढीत सले. तेला लागोनी पदार्थ केंचों कें वाढेचो हे समजत सलां. तेथींन सामाजिक बांधिलकीत्थींन शिक्षण/ज्ञान मिळत सलां.
सत्तरी, गोवा
फोन: ९७६४३१९३४६
छंद
में अणि माजो बोड्यो बाल्कनीच्या खिडक्याकडा सुकणी परत येव्वेची वाट बघीत उभी ऱ्हेलो. मात्से वेळान एक सुंदर, ल्हानशी, चमकदार जांभळे रंगाचां सुकणां आमी जास्वंतीचे फुलातलो मध पित सताना बघीतलां. आमी दोघांय बी खूष झालो. बोड्येन माला खुण करनी, हेंच सुकणां सलां असांय बी सांगितलान.
में माजी सगळी कामां थोडो वेळ कडाला थेयली अणि इंटरनेटवर तेचो शोध घेव्वेचो प्रयत्न करू लागल्यां. सुकणेंची माहिती, तेंचो फोटो बघे गावसे का तां में बघू लागल्या. थोडे प्रयत्ना उप्रांत सुकणेची माहिती अणि तेचो फोटो समोर आयलो. ही सुकणीं म्हणजे फुलातलो मधुरस टिपणारो “सूर्यपक्षी”/जांभळो शिंजीर असा बी नाव सें. पण हें सुकणा अचानक केंथीन आयलां सयेल? अशी सुकणी हे आधी आमी कईच बघीतली नतली.
आमच्या सोसायटीचे आवारात बुचाची/ हादगेची खुप झाडां सत. ते झाडाला यंदा खुपच बहर आयलो से. धवे शुभ्र रंगाची, मंद सुवासाची फुलां तेला येसत. झाडाचे शेंडे आमच्या बाल्कनीच्या उंच्याचे जाले सत. तेचेवर खुपशी फुलां फुलली सत. सहज बाहेर जाव्नी में झाडा बघीत उभी ऱ्हेल्या. अनेक निरनिराळे आवाज करणारी सुकणी बघे मिळली. सूर्यपक्षी हे फुलावर्थींन दुसऱे फुलावर सहज उडत सताना बगला. में खूष झाल्यां अणि झाडाकडा एकटक बघीत ऱ्हेल्या. तेंचो आवाज काढेची लकब निराळी सें. ‘चि -चि -चि -चिविक् -चिविक् -चिविक्- चिर्र्- चिक् -चिक् असो गोड गोड आवाज आयके येत सलो. तेंचे जांभळे रंगाला वेगळीच लकाकी सें. तेला लागोनी निबरांत अणीकय चमकसे.
तेंत हिरवे रंगाचे पोपटा सारखो दिसणारो पण आकारान ल्हान सणारां सुकणां माला गिरक्यो घेत सताना दिसलां. में म्हटलां हें केंचा सुकणां? इतके दिवसात कय बघीतलां नतलां. तेचीय बी माहिती शोधली अणि गिरक्यो घेत सणारे सुकणेचां नाव “वेडा राघू”(Green Bee-eater). हे फुलावर बेसलेल्यो माश्यो, किडे हेना वारेत गिरक्यो घेव्नी चोचीत धरनी एखाद्या खांद्यावर बेसोनी आस्वाद घेसत. संध्याकाळा एकत्र येवनी टीर-टीर -टीर असो किणकिणो आवाज करनी गोंधळ घालसत.
आमचेत्या सद्दानी निरनिराळी सुकणी हजेरी लायसत. पोपट, मैना, चिमण्यो हेंचो वेळ बी ठरलेलो ससे. न्याहारीचो वेळ कय चुकवेचो म्हणी नाय. तांदूळ, पेरां, सफरचंद असां तेचां आवडीचां खाद्य. निरनिराळे आवाज काढनी ‘में आयलो सां ‘ असा आम्ला सांगसत. एतां में खायवे थेयनार हेचो अंदाज आयलो जाले आपलो गोतावळो बी बरोबर घेवनी हजर सनार हे मात्र ठरलेलाच ससे.
पण झाडावरची सुकणी बघणेचो आनंद अणि समाधान निराळाच सलां. मन सुखायणारां “पक्षी निरीक्षण “करणेची आवड माला केडला लागली तां कळलांच नाय. ही आवड जपणेचो में मनोमन प्रयत्न करनार हे नक्की.
सौ.दीप्ती दामले
पुणे, महाराष्ट्र
फोन:८००७७७०७४६
खेड्यातला घर (चित्पावनी कविता वाचन)
सुभाष जोशी
पर्वरी, गोवा
फोन: ७०२०६१८३२८
आमचो केरळ प्रवास
त्याहांचा पद्मानाभाचा देऊळ बरां मोठा से. हे पद्मनाभाचे देवळाला एकुण सात दारां सत. तीन दारांनां भांगराचे दागीने सत. चार दारांना देवाची वस्त्रां अणि पालक्याचां सामान से. भितर जावनी देवाचा दर्शन घेतला. मूर्ती बरी भांगराची से. खूप वेळ ओळीत ऱ्हेव्नी दर्शन घडलां. पद्मनाभ देऊळ पाहाटी तिन वरांना उघडसे अणि रात्री आठ वरांना बंद हसे. पाहाटी तिनाला पुजा आरती हसे. दिवसभरी देवाचा दर्शन घेव्वे मिळसे. त्याहांचे लोक रंगान काळे काळे सत.पण आपली संस्कृती, भाषा, वेशभूषा घट्ट धरनीं सत. दादले लुंगी लायसत अणि बायलां हळडुवी धारीसलेली साडी नेस्सत, कपाळाला आडवा भस्म अणि गंधाचा मोठो टिळो लायसत हें विशेष! सगळे कडा खूपशो समई तेल- वात घालनी पेटयसत. खुपबरो कापूर घालनी आरती करसत. चूर्मेचो प्रसाद देसत. तेंची भक्ती खूप बघे मिळसे. एकजुटीन आपली पद्धत टिकवोनी ऱ्हेसत. आम्ला तेंचा कौतूक दिसलां.
जगाच्या पाठल्या कें जरी गेलीं तरी आपली संस्कृती, भाषा वेशभूषा सोडीत नाय. असे तऱ्हान आमी सगळेंनी एकजूटीन कंबर बांध्नी आमची चित्पावनी भाषा पुढां न्हेवया असा माला दिसोनीं आयलां. “एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ!”
त्याहांथीन पुढां उंच जटायू डोंगरसे. तेला दाहा हजार पायऱ्यो सत. आमी ‘रोपवेन’ गेलो. तरुणांना पायऱ्यो चढोनीं जायवे येसे. वरती जाव्नी बघलेवर एकदम आमचे दोळेत पाणी आयलां. इतके मोठे पक्षाचे असे हाल केले, पण तो भ्यालो(डगमगलो) नाय. तोंडान रामाचो जप करीत बेसलो. तेड्ला श्रीरामप्रभू प्रत्यक्ष तेला मिळे गेलो, त्याहां प्रभूरामाची पावलां लागलेली सत.
श्रीरामाची बरी मोठी मूर्ती से. त्याला पाया पडलो. कडाला जय हनुमान पण से. सिता मातान अणि श्रीरामानीं कितकां अणि कसां दु:ख सोसलां सयेल? हेचो विचारच करूं शकत नाय. धन्य ते श्रीराम, सिता माई अणि हनुमान! धन्य तो जटायू!
गेले मुळां प्रत्यक्ष अनुभव घेव्वे मिळ्ळो. असो आमचो प्रवास प्रभू रामचंद्रांचे आशीर्वादान उत्तम झालो.
वास्को, गोवा
फोन: ७५०७१५८४०३
भगवदगीता कितेला वाचेची?
दुर्लभं त्रयमेवैदद्येवानुग्रहहेतूकम
मनुष्यत्वं मुमुक्षत्वं महापुरुषसंशय:
म्हणजे माणुसकी, मोक्षाची इच्छा, अणि ज्ञानी महापुरुषाकडा शरणागती हें जीवनात खुप कठीण ससे. जर हें तिनय गुण सतील तर ईश्वर अनुग्रह मिळलो असां म्हणे हरकत नाय. मनुष्य म्हणी जन्माला येणां हेच मुळांत खुप भाग्याचां लक्षण से, म्हणी तेला दुर्लभ म्हटलासे. हेच करता दुर्लभ असो मनुष्यजन्म धर्माचरण करनी सार्थकी लावे हवो.
गीता: गीता हि महाभारतात भीष्मपर्वात येसे. १८ अध्याय अणि ७०० श्लोक सत. दोन्ही वाटान म्हणजे कौरव अणि पांडव हेंची युद्धाची तयारी चाललेली ससे. युद्ध कितेला तर, मुख्य कारण सत्ता अणि भाऊबंदकी. म्हणजे असा पांडवाना ध्युतात कपटान हरवनी १३ वर्षा वनवास भोगू लायलोन. द्रौपदीची भर सभात विटंबना, लाक्षागृहात जळणेचो प्रयत्न अणि शेवटी एक इंच भूमी सुद्धा पांडवाना मिळेची नाय असो दुर्योधनाचो अहंकार, जी कारणा युद्धाला तोंड फुटला.
गीताचे पयले अध्यायात अर्जुन कसो निराश होवनी युद्ध करणे ऐवजी आपला गांडीव धनुष्य खाली थेवनी बेसलो. तेला सगळे भाऊबंद, काका, मामा, आचार्य द्रोण अणि कृपाचार्य हेना बघनी तेंचो आत्मविश्वास सोपलो. जेला विषाद असां नाव से. तेडला भगवान कृष्णान तेची कानउघाडणी केलीन. अणि तेला युद्धाला तयार केलोन. कारण एकच से. हे जन्मात येवनी आपला कर्तव्यकर्म, स्वधर्माचा पालन केलां नाय जाले हो जन्म व्यर्थ ससे.
जे लोकांनी गीता साता समुद्रापार नेली तेत स्वामी विवेकानंद प्रमुख सत. १८९३ हें सालात विश्वधर्मपरिषद झाली, स्वामीजीन व्यासपीठ गाजवनी सोडलान. तेणी सांगलान आमचो धर्म सत्य, अहिंसा, दया, क्षमा, शांती, सहिष्णूता हें तत्वावर आधारलेलो से. आमचे धर्मात प्रत्येक मनुष्य आपले कर्मान देवत्व मिळोव शकसे. सर्वपल्ली राधाकृष्णन, विनोबा भावे, सावरकर, सरोजिनी नायडू, योगी अरविंद, अणि हल्लीचे राष्ट्रपती अब्दुल कलाम हें गीताचे अभ्यासक सले. आमचो पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी हेचो सुद्धा गीताचो अभ्यासक से. तेणी टेंबेस्वामीजी कडथिन दिक्षा घेतलीन सली. ब्रिटन, जर्मनी, डेंमार्क एठा काही शाळामध्यां गीता शिकयली जासे. गीता सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाकरता खुप महत्वाची से.
गीता कितेला अभ्यासेची अणि वाचेची?
१. गीता आपलो पवित्र ग्रंथ से हें खूप लोकांना खबर सुद्धा नाय. जसा कुराण किंवा बायबल से तशी आमची गीता से.
२. गीता तुमला जीवन बरेपणी कसा जगेचा तां शिकयसे.
३. गीता तुमचा जीवन समृद्ध करसे. व्यक्तिमत्व सुधारसे.
४. गीता तुमला शांत करसे, केंचेय संकटाला धीरान तोंड देव्वे शिकयसे.
५. गीता तुमला सत्य, अहिंसा, दया, क्षमा, शांती अणि सहिष्णूता शिकयसे.
६. गीता तुमला समभाव अणि विश्वबंधुत्व शिकयसे.
७. गीता तुमला दुराचारापाष्णी सदाचाराकडा वळयसे.
८. गीता तुमचे विचार प्रगल्भ करसे.
९. गीता तुमचे रजोगुण, तामसगुण कमी करनी सत्वगुण वाढयसे.
१०. गीता तुमला ईश्वरालागी घेवनी जासे.
११. गीता तुमचो सर्वांगीण विकास करसे.
१२. गीता तुमला आदर्श मनुष्य घडयसे.
सुरवातीला नित्य गीता वाचेवी, हळू हळू अर्थ जाणणेचो प्रयत्न करेवो. म्हणजे आवड निर्माण होवनी गीता अभ्यासात मन रमो लागसे.
सुभाष जोशी
पर्वरी, गोवा
फोन: ७०२०६१८३२८
