व्यक्ति
चित्पावनीसाठी भरीव कार्य करणारे व्यक्ति
चित्पावनी बोली भाषावर संशोधन करनी बरीच पुस्तका बरयली गेली सत. जे व्यक्तिंनी हे चित्पावनी संवर्धनाचा कार्य केला सें ते व्यक्तिंबद्दल थोडकेत माहिती हे संकेतस्थळावर दिली सें.
श्री. अशोक नेने
श्री.अशोक नेने हेंचा वास्तव्य कडतरी सत्तरी गोवा. ते एक बागायतदार शेतकरी सत. काष्ठशिल्प हो तेंचो छंद से, तसांच ते एक चित्पावनी लेखक सत.
खडतर जिणां, काळजातले कुकारे, चित्पावनी मार्गदर्शक, आमचे आमी अशी तेंची चार पुस्तकां प्रकाशीत जाली सत. शिवाय एक चित्पावनी नाटक ‘ना घर ना दार’ हे लिवनी सादर केलां से. साद चित्पावनीचो हे अंकाचे ते प्रमुख मार्गदर्शक सत.
तेचबरोबर, चित्पावनीचो प्रसार अणि संवर्धन हो तेंचे जिवाचो ध्यास से.
श्री. श्रीधर केशव बर्वे
१९७५ सालात तेंचे वडील कै. के. ना. बर्वे हेंनी चित्पावनी मध्या लिखाण करनी गोवा सरकार चे भाषा बद्दल उपक्रमात हातभार लायलो.
डॉ. वसुधा भिडे
तेसाठी त्याला १९८३ सालांत पुणे विद्यापीठान पीएचडी प्रदान केली. तेंच्या डॉक्टरेट थिसिसवर आधारित ” चित्पावन आणि चित्पावनी ” हें पुस्तक त्याणी २०१३ सालांत प्रकाशित केलां.
ह. मो. मराठे
तेंनी आपले “बालकांड ” हे पुस्तकांत चित्पावनी संवादांचो समावेश केलो से.
पं. महादेवशास्त्री जोशी
सत्तरीचे सुपुत्र कै. पं. महादेवशास्त्री जोशी हेंचेनी आपले ‘आत्मपुराण’ हे पुस्तकांत्थीन चित्पावनी संवाद अधोरेखित केले सत.
नारायण गोविंद चाफेकर
नारायण चाफेकर “महाराष्ट्र साहित्य पत्रिका” हे अंकाचे संपादक सले. १९३४ सालात बडोदा एठा जालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष सले.
समाज शास्त्रीय अणि ऐतिहासीक अभ्यास करनी “चित्पावन” हे नावाचां पुस्तक शके १८६० मध्यां तेंचेनी प्रकाशित केलां सला.
१. श्री सुभाष जोशी, गोवा.
२. सौ. गायत्री भुस्कुटे, गोवा.
