घडामोडी

चित्पावनी विषया संदर्भात विविध घडामोडींबद्दल माहिती हे पानावर दिली सें.

चित्पावनी निबंध स्पर्धा

गणपुले फाऊंडेशना ला २ वर्खा पूर्ण जालेचा औचित्य साधनी चित्पावनी निबंध स्पर्धा आयोजीत केला से. इच्छुकांनी १२ ऑगस्ट २०२५ पर्यन्त खालती दिलेले ईमेल किंवा संपर्क क्रमांकावर व्हॉटस्एपचे माध्यमान टाईप करनी निबंध धाडेचा आवाहन गणपुले फाऊंडेशन करीत से.

 

प्रत्येक विभागात्थींन ‘तीन निबंध’ बक्षीस पात्र सतील (हो निर्णय परिक्षकांचो सनांर से). प्रत्येक स्पर्धकांला सहभाग ‘प्रमाणपत्र’ मिळणार से अणि “वेचींव निबंध” २०२५ चे दिवाळी अंकात प्रसिद्ध करनार. जेंचे निबंध अंकात प्रकाशित हतील ते स्पर्धकाला ‘एक दिवाळी अंक’ भेट रुपांत मिळणार से.

 

अधिक माहिती साठी पत्रक बघेवा. 

चित्पावनी संकेतस्थळ अनावरण अणि एप्रिल २०२५ अंक प्रकाशन

रविवार दि. १३ एप्रिल २०२५ हे दिवसा, गणपुले फाऊंडेशनचे वतीन चित्पावनी संकेत स्थळाचां अनावरण अणि ‘साद चित्पावनीचो’ हे त्रैमासिकाचां संकेतस्थळ स्वरूपांत प्रकाशन श्री. नारायण ऊर्फ दिलीप दामले हेंचे शुभहस्ते गूगल मीट द्वारे, आयोजित केलेले सोहळेंत केलां.

कार्यक्रमाची सुरुवात गणपुले फाऊंडेशनचे संयोजक श्री. वैभव गणपुले हेंचे प्रास्ताविकान जाली. तेवेळा तेणि “चित्पावनी संकेत स्थळ अणि संकेत स्थळ स्वरूपात अंकाचां प्रकाशन”, हे वचनाची आज पूर्तता करीत सां असां प्रतिपादन केलां.

ऑक्टोबर २०२४ च्या दिवाळी अंकाचे प्रकाशना वेळा, पुढां भविष्यात “साद चित्पावनीचो” हे अंकाचां प्रकाशन ‘संकेतस्थळ रूपात’ करेची इच्छा से असां मत तेड्ला व्यक्त केलां सलां.

ते उप्रात तेंचेनी कार्यक्रमाचे मुख्य सोयरे श्री. नारायण ऊर्फ दिलीप दामले हेंचो परिचय करनी दिलो.

श्री. नारायण दामले हे मूळचे सत्तरी, गोवा एठाचे सौव्नी, कामानिमित्त साधारण ३३ वर्षां तेंचेनीं दिल्ली एठा वास्तव्य केलेलां से. ते अभियांत्रिकी सल्लागार सौव्नी चित्पावनीचे जाणकार सत. चित्पावनी बद्दल यूट्यूब विडियोचे माध्यमात्थीन ते प्रबोधन करीत ससत. सध्या तेंचां वास्तव्य बंगलोर एठा से.

ते उप्रात सौ. आरती मोने ह्याणिन सुरेल आवाजात प्रार्थना सादर केली अणि कार्यक्रमाची सुरुवात जाली.

चित्पावनी संकेत स्थळाचा अनावरण श्री. नारायण दामले हेंचे शुभहस्ते करणेत आयलां.

चित्पावनी संकेत स्थळाची रचना, तेंतले पानांची माहिती अणि साद चित्पावनीचो अंक कसो वाचेचो हेचे बद्दल सविस्तर माहिती गणपुले फाऊंडेशनचे संयोजक श्री. वैभव गणपुले हेंचेनी सगळेनां करनी दिली.

संकेत स्थळावर्ती चित्पावनी बोली बद्दल माहिती, साद चित्पावनीचो हो अंक, चित्पावनीचां संवर्धन हे सदरांत गणपुले फाऊंडेशनचे वतीनं यशस्वी हत सलेले उपक्रम, चित्पावनीचां भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तिंबद्दल माहिती अणि चित्पावनी विषयाला निगडीत घडामोडी अशी माहिती उपलब्ध करनीं दिली से.

संकेत स्थळ रूपात अंक प्रकाशन करेचो सगळेंत मोठो फायदो म्हणजे वाचकांचे ‘उपकरणा नुसार’ (साधना नुसार) संकेत स्थळावेल्ली माहिती ल्हान मोठी हसे, विडियो देंव येसत, तसांच चित्पावनी बोलीचो उच्चार कसो करेवो हे बद्दल ऑडिओ पण देंव येसत. एकुण अशो सगळ्यो गोष्टी एप्रिल २०२५ चे अंकात समाविष्ट करणेत आयल्यो सत.

ते उप्रात अंकाच्यो संपादिका सौ. आरती मोने ह्याणिन आपलां मनोगत व्यक्त केलां. “बोली भाषा जर प्रवाहीत ऱ्हेली नाय जाले ती लुप्त हसे!” त्याला लागोनी वेगवेगळे उपक्रमांचे माध्यमात्थीं अणि संवादात्थींन ‘चित्पावनी बोली’ बोले हवी. त्याचां जतन, अणि प्रचार, प्रसार हैय्वे हवो असां मत व्यक्त केलां.

ते उप्रात, कार्यक्रमाचे प्रमुख सोयरे श्री. नारायण दामले हेंचेनी आपले विचार मांडले. चित्पावनांच्या एकीचां महत्व सांगताना ते म्हणसत, केंचेय सामाजिक उपक्रमात वैयक्तिक फायदो न बघता, समाजाचो फायदो ज्या गजालीत से ती करीत ऱ्हेव्वां! चित्पावन बांधवांनी सर्वतोपरी एक मेकांना मदत करेवी अणि प्रगती करीत ऱ्हेव्वी, एकीचां बळ खूप मोठां ससे, असे उद्गार तेंचेनी काढले.

ते उप्रात सौ. देवश्री गोडबोले ह्याणिन अंकाचां अभिवाचन केलां अभिवाचनात पूर्ण अंकाचो आढावो घेतलो अणि सूत्रबद्ध पद्धतीन सगळे साहित्याचो बरो गोफ करनीं वाचन केलां.

साहित्यिकां पैकी श्रीमती अश्विनी फाटक अणि श्री. सुभाष जोशी हेंचेनी आपले विचार मांडले. संकेतस्थळ रूपात अंक प्रकाशित हत से म्हणी चित्पावनीचो प्रचार अणि प्रसार जगभरी हैय्वे नक्कीच मदत हयेल तसांच नव्या पिढ्यांंपर्यन्त हो विषय न्हेव्वे मदत हयेल असे विचार श्री. सुभाष जोशी हेंचेनी व्यक्त केले.

शेवटी अंकाचे प्रमुख मार्गदर्शक श्री. अशोक नेने हेंचेनी आपले विचार मांडले. बरां कार्य करीत सताना कसो विरोध हंव शकसे.. तेच बरोबर “आपलां ध्येय पुढेंत थेव्नी, आयलेले प्रसंगाला तोंड देत, सगळेना बरोबर घेव्नी पुढां जाय्वेची गरज से!” असां सुयोग्य मार्गदर्शन केलां.

गणपुले फाऊंडेशन चे संयोजक श्री. वैभव गणपुले हेंचेनी आभार प्रदर्शन केलां अणि कार्यक्रमाची सांगता जाली.

चित्पावनी एकांकिका स्पर्धा

| श्री योगेश्वरी परमेश्वर्यै नमः || श्री योगेश्वरी देवस्थान, कुळण सरवण, साखळी गोवा. आयोजित

|| चित्पावनी एकांकिका स्पर्धा थोडकेंत अहवाल ||

श्री योगेश्वरी देवस्थानचे १६ वे वर्धापन दिनानिमित्त दर वर्खा प्रमाण अम्नाय “चित्पावनी बोली भाषांतली ‘एकांकिका स्पर्धा’ रविवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळां ७.०० वराना आयोजित करणेत आयली सली.

व्यवस्थापक: श्री लक्ष्मण (प्रशांत) वझे , श्री नागेश फडके अणि चित्पावन ब्राह्मण संघ गोमंतक व्यवस्थापक श्री संजय बर्वे हे सले.

स्पर्धाचो प्रवेश अर्ज मिळेचां ठिकाण, चित्पावन ब्राह्मण संघ गोमंतक, श्री योगेश्वरी देवस्थान, पार्वती नगर, कुळण, सर्वण साखळी गोवा हें सलां. प्रवेशिका सादर करेची शेवटची तारीख सली शनिवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२५.

नियम अणि अटी थोडकेंत अश्यो सल्यो:
पयली प्रवेशिका देनांरो पयलो हे तत्वानुसार पयले पांच प्रवेशिकांना प्रवेश असो नियम सलो. स्पर्धा प्रवेशिका सादर केलेनंतर ते ते गटांन आपले गट प्रमुखाचां नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, एकांकिकेची एक लिखित प्रत, लेखक, दिग्दर्शक अणि कलाकारांचे संपुर्ण नावासकट (पात्र परिचय) चित्पावन ब्राह्मण संघ कार्यालयांत ०६ फेब्रवारी २०२५ संध्याकाळां ६:०० वरांपर्यंत जमा करेची सली.

एकांकिका सादरीकरणाचो क्रम सोमवार दिनांक १० फेब्रुवारी २०२५ रोजी ठरवनीं संबंधित गटप्रमुखाला तो कळीत केलो.

बक्षिसां अशी सली:
एकांकिकाला पयलां, दुसरां, तिसरां अशी तीन बक्षिसां. स्वतंत्र विषय घेव्नी नवे एकांकिकाला लेखनाला एक. पुरुष अभिनय दोन बक्षिसां. स्त्री अभिनय दोन बक्षिसां. बालकलाकार (१५ वर्षाखालती बोड्यो सों वा चेड) अशी एकूण दोन बक्षिसां. (रोख/भेटवस्तू)

अपेक्षापेक्षा कमी प्रवेशिका आयले कारणांन अम्ना ‘एकांकिका महोत्सव’ असो निर्णय परीक्षकांनी जाहीर केलो. सादरीकरणा नंतर दोन्ही पथकांचे प्रमुखाला बलावनीं फुल अणि रोख रक्कम देव्नी कलाकारांचा कौतुक केलां. एकांकिका सादर करे कमीत कमी २० अणि अधिकाधिक ३० मिनीटांचो कालावधी दिलो सलो. रंगमंचावेल्ली तयारी/व्यवस्था अणि नंतर सापसारे ( आवराआवर) करे एकंदर दहा मिनीटां सली. स्पर्धाचे आयोजकांकडथींन ध्वनी (साऊंड सिस्टम), पुढलो पड्डो पाठलो पड्डो, चार विंग्ज, दोन स्पॉट अणि एक हॅलोजन लाईट अशी व्यवस्था करनीं दिली सली, या व्यातिरिक्त लागणारां बाकीचां सामान (साहित्य,) स्पर्धक गटांन हाडेचां सलां. स्पर्धक गटांन स्पर्धा सुरु हैय्वेचे पयली अर्धां वर पयली स्पर्धाचे ठिकाणावर उपस्थित ऱ्हेणां आवश्यक सलां.

विशेष हेतू: “चित्पावनी भाषाला प्रोत्साहन मिळेवां” म्हणी हि स्पर्धा आयोजित केली जासे, तेड्ला पुढले वर्खा अधिकाधिक एकांकिका प्रवेशिका येनांर सत अशी खात्री बाळगसां!” पूर्ण दोन दिवस एकांकिका सादरीकरणांला वेळ देव्वे आमी तयार सों फक्त सगळेंचा सहकार्य अपेक्षित से.शेवट व्यवस्थापकांनी अशी इच्छा व्यक्त करनीं स्पर्धेची सांगता केली.

सौ.आरती मोने – एकांकिका स्पर्धक

अंकासाठी साहित्य धाडेचा से?

येणारे अंकासाठी जर तुम्ला साहित्य धाडेचा सयेल, जालेवर पयली प्रकाशित न केलेला तुमचा साहित्य आम्ला धाडा. चित्पावनीतला तुमचा साहित्य टाईप करनी आमच्या ईमेल पत्यावर किंवा व्हॉटस्यॅप क्रमांकावर धाडनी द्या.