चित्पावनी बद्दल

चित्पावनी बोली ही कोकणस्थ ब्राह्मणांची बोली से. रत्नागिरी जिल्हेंत कोकणस्थ ब्राह्मणांचां मूळ सापडसे. त्याहांथीन स्थलांतर होवनी आज गोवा अणि दक्षिण कन्नड भागापर्यंत चित्पावनी बोलणारे भाषिक गटागटान मिळसत. तशीच ही बोली कासारगोड पर्यंत बोलली जासे.

खासकरनी गोवेंतले सत्तरी तालुकेंत जास्तशी कुटुंबां ही बोली बोलसत. तसांच दक्षिण कन्नड जिल्हेंत ही बोली बोलणारी कुटुंबां जास्त प्रमाणात मिळसत. अणि तीं कासारगोड पर्यंत विखुरलीं सत. महाराष्ट्राचे रत्नागिरी हे जिल्हेंत ह्या बोलीचो जन्म जालो. पण त्याहां चित्पावनी बोली बोल्ली जांत नाय. रत्नागिरी जिल्हेंत कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबां सौनी चित्पावनी बोली नामशेष जाली से.

रत्नागिरी जिल्हेंत्थीन तीनशे ते साडेतीनशे वर्खांपाठी, उदरनिर्वाहासाठी ब्राह्मण कुटुंबांनी स्थलांतर केला सैवां, असा अभ्यासाअंती दिसोनी येसे. स्थलांतर करनी चित्पावन समाज दक्षिण कन्नडा पर्यंत स्थायिक झालेलो से. तसांच जगभर पसरलेलो आढळसे.

चित्पावन मंडळी म्हणजेच सध्या कोकणस्थ बाह्मण म्हणी ओळखले जासत ते. तेंची परस्परांशी व्यवहार करेची बोली म्हणजेच चित्पावनी बोली, असां ढोबळ मानान म्हणतां येल. चित्पावनी असां नाव या बोलीला केडला प्राप्त जालां हो संशोधनाचो विषय से.

जुने मध्यम कालीन महाराष्ट्रीय भाषाचां विकसीत रूप म्हणजे चित्पावनी बोली विकसित जाली सैवी. ही बोली मूलत: प्राकृत भाषांत्थीन निर्माण जाली सौनी, आजपर्यंत आपलां जुनां रूप राखनी से, असां एक मत से. डॉ. वासुदेव केतकर हेंचे मताप्रमाण यादवकालीन १८वे शतकातल्या मराठी भाषाचे दोन भाग म्हणजे कोकणी अणि चित्पावनी. चित्पावनी बोलीचां कोकणी बोलीशी, दोनय बोली एकच म्हणेवां असां साम्य नाय. पश्चिम किनारेवर मराठीच्यो खूपश्यो बोली बोलल्यो जासत, तेपैकी चित्पावनी बोली ही एक से.

चित्पावनी बोली बोलणारी कुटुंबां जयगडच्या दक्षिणपाश्णी ते गोमंतका पर्यंत, तसांच पुढां उत्तर अणि दक्षिण कर्नाटका पर्यंत सत. चित्पावनांचे स्थलांतरामुळां या बोलीवर तेगडाच्या प्रादेशिक भाषाचो प्रभाव ठळकपणांन जाणवसे.

कोकणातल्या चित्पावनीवर मराठी अणि मालवणीचो प्रभाव जाणवसे, पण कोकणात ही बोली लोप पावली से. एकदम वयस्क, जाण्टेनाच ही बोली अवगत से. किंवा आईकलेली से. ह्या बोलीसाठी देवनागरी लिपीचो उपयोग करसत.

गोंवेंतल्या चित्पावनीवर पोर्तुगीज अणि कोकणीचो प्रभाव जाणवसे. एठाही देवनागरी लिपीचो उपयोग ह्या बोलीसाठी करसत. गोवेंतले सत्तरी तालुक्येंत ९०% कोकणस्थ ब्राह्मणांची कुटुंबां चित्पावनी बोली बोलसत. बाकीचे गोंवेंत हें प्रमाण कमी से. सध्या एठाची तरुण पिढी चित्पावनीचो उल्लेख करे उदासीन दिस्से.

उत्तर कर्नाटकात चित्पावनी वर कानडी भाषाचो प्रभाव से. त्याहां ह्या बोलीसाठी कन्नड लिपीचो उपयोग करसत.

दक्षिण कर्नाटकात चित्पावनीवर कानडी अणि तुळु भाषाचो प्रभाव से. त्याहांपण कन्नड लिपीचो उपयोग लिहेसाठी करसत.

हे वरथीन चित्पावनी बोलीची व्यापकता दिसोनी येसे. कोकणातली चित्पावनी कालौघात लोप पावली से, सोपली से. तशी ती सगळेच प्रांतांत्थीन लोप पावो नये, जीवंत उरेवी म्हणी साहित्य निर्मिती हैवेची गरज से.

चित्पावनी बोलींत साहित्य निर्मिती जाली नतली तरी संशोधनात्मक मराठी पुस्तकां प्रकाशित जाली सत. नारायण गोविंद चाफेकर – हेंचेनी समाज शास्त्रीय अणि ऐतिहासीक अभ्यास करनी ” चित्पावन ” हे नावाचां पुस्तक शके १८६० मध्यां प्रकाशित केलां.

तसांच इतिहासकार श्री राजवाडे, इरावती कर्वे, लिंडा कोक्स हे लेखक संशोधकांनी चित्पावनीचो समाजशास्त्रीय अभ्यास केलो पण पुस्तकां प्रकाशित जालीं नाय.

डॉ. वसुधा भिडे ह्यांनी ” A descriptive study of chitpaavni, a dialect of marathi ” हे विषयावर पुणे विद्यापीठात शोधप्रबंध सादर केलो सलो. तेसाठी त्याला १९८३ सालांत पुणे विद्यापीठान पीएचडी प्रदान केली. तेंच्या डॉक्टरेट थिसिसवर आधारित ” चित्पावन आणि चित्पावनी ” हें पुस्तक त्याणी २०१३ सालांत प्रकाशित केलां.

श्री.के.जी.साठे – हेंचेनी “चित्पावनी” हे नावान १९३८ सालांत भाषा शास्त्रीय विश्लेषण करणारां पुस्तक प्रकाशित केलां.

गोंवेंतले लेखक, खास करनी सत्तरीचे सुपुत्र कै. पं. महादेवशास्त्री जोशी हेंचेनी आपले ‘आत्मपुराण’ हे पुस्तकांत्थीन चित्पावनी संवाद अधोरेखित केले सत.

ह.मो. मराठे हेंचेनी आपले “बालकांड ” हे पुस्तकांत चित्पावनी संवादांचो समावेश केलो से.

श्री. श्रीधर केशव बर्वे हेंचेनी “सुलभ चित्पावनी ” चित्पावनी भाषा मार्गदर्शक, हे नावाची पुस्तिका प्रकाशित केली से. तसांच ” निबरांतली सावळी ” हें चित्पावनी नाटक ल्हेवनी सादर केलां से.
Ashok Nene

श्री. अशोक नेने – प्रमुख मार्गदर्शक
सत्तरी, गोवा
फोन: ७५८८४४३४४१

गणपुले फाऊंडेशन चे माध्यमात्थीन चित्पावनीच्या संवर्धनासाठी घेणेत येणारे उपक्रम